LG W सीरीज आली समोर, ट्रिपल कॅमेरा आणि वॉटरड्रॉप नॉच सह होईल लॉन्च, Galaxy M सीरीज पेक्षा पण स्वस्त असतील फोन

91मोबाईल्सने याच आठवड्यात LG संबंधित एक एक्सक्लूसिव माहिती दिली होती कि हि टेक कंपनी भारतात एक नवीन स्मार्टफोन सीरीज आणण्याची तयारी करत आहे. LG ची हि नवीन स्मार्टफोन सीरीज खासकरून Samsung च्या गॅलेक्सी एम व गॅलेक्सी ए सीरीज आणि Xiaomi तसेच Realme सारख्या ब्रँड्सना टक्कर देईल. आमच्या बातमीवर शिक्कामोर्तब करत एलजी ने स्वतः हि नवीन सीरीज समोर आणली आहे. कंपनीने आपल्या ऑफिशियल इंडियन वेबसाइट वर आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवून खुलासा केला आहे कि हि LG W टाईटल सह बाजारात येईल.

LG India ने कंपनीच्या वेबसाइट वर कपंनीच्या आगामी स्मार्टफोन सीरीजचे प्रोडक्ट पेज बनवण्यात आले आहे. या पेज वर फोनचे फोटोज पण दाखवण्यात आले आहेत ज्यावरून डिजाईन आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. कंपनीने या प्रोडक्ट पेज वर ‘W’ अक्षराचा वापर केला आहे ज्यावरून अंदाज लावला जात आहे कि कंपनीची हि स्मार्टफोन सीरीज LG W नावाने भारतीय बाजारात लॉन्च केली जाईल. तिथे फोनच्या कलर वेरिएंट्सचा पण खुलासा करण्यात आला आहे.

फक्त अमेझॉन वर होईल सेल
वेबसाइट लिस्टिंग पाहता तिथे W सह ‘फोन द विन’ लिहिण्यात आले आहे. कंपनीने कमिंग सून सोबत प्रोडक्ट पेज वर असे पण लिहिले आहे कि ‘वाट बघितल्याने फायदाच होईल’. कपंनीने LG W शॉपिंग साइट अमेझॉनच्या पेज वर पण रिडायरेक्ट केला आहे जिथे LG W चे अमेझॉन पेज बनले आहे. या पेज वर ‘नेटिफाई मी’ बटण आहे. शॉपिंग साइट वर LG W पेज वर अमेझॉन स्पेशल लिहिण्यात आले आहे. यावरून स्पष्ट होते कि LG ची हि आगामी सीरीज फक्त ऑनलाइन शॉपिंग साइट अमेझॉन वरच विकली जाईल.

स्वस्तात मिळतील शानदार स्पेसिफिकेशन्स
हि माहिती आम्ही आधी पण दिली होती कि LG च्या या आगामी स्मार्टफोन सीरीज मध्ये कमी बजेटचे स्मार्टफोन लॉन्च होतील. तसेच आपल्या अधिकृत प्रोडक्ट पेज वर एलजी ने स्पस्ट शब्दांत लिहिले आहे कि ‘अशी किंमत तुम्ही आधी बघितली नसेल.’ कंपनीची हे विधान सांगते कि LG आपली डब्ल्यू सीरीज खूप एग्रेसिव प्राइस वर लॉन्च करणार आहे. किंमतीच्या बाबतीत कंपनीने Pocket-Worthy Price Tag म्हटले आहे. LG इशारा करत आहे कि लो बजेट व स्वस्तातल्या किंमतीच्या बाबतीत हि कंपनी Samsung, Xiaomi आणि Realme पेक्षा पण चार पाऊले पुढे जाणार आहे.

डिजाईन
LG ची आगामी स्मार्टफोन सीरीज ट्रेंड मधील ‘वॉटरड्रॉप नॉच’ डिजाईन वर सादर केली जाईल. फोटो मध्ये फोन बेजल लेस डिस्प्ले सह दाखवण्यात आला आहे ज्याच्या वरील नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. या नॉचच्या वर स्पीकर आहे. LG W सीरीजचे हे फोन एंटिना बॅंड डिजाईन सह दाखवण्यात आले आहेत. तसेच बॅक पॅनल पाहता एलजी चे आगामी स्मार्टफोन ट्रिपल रियर कॅमेऱ्याने सुसज्ज करण्यात आले आहेत.

LG W सीरीजच्या या फोनच्या बॅक पॅनल वर डावीकडे वर तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे वर्टिकल शेप मध्ये आहेत. या कॅमेरा सेंसर्सच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट देण्यात आली आहे. फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंगरप्रिंट सेंसर पण देण्यात आला आहे. LG च्या या फोनच्या वरच्या पॅनल वर 3.5एमएम जॅक पण दिसला आहे. तसेच फोनच्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर सह पावर बटण देण्यात आला आहे तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट आहे.

ट्रिपल कॅमेरा
LG W सीरीजची मुख्य यूएसपी याचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. एलजी आपल्या नवीन सीरीज मध्ये खूप कमी किंमतीत ट्रिपल रियर कॅमेरा असलेले स्मार्टफोन आणणार आहे. हा कॅमेरा सेटअप आर्टिफिशियल इंटेलिजेंस टेक्नॉलॉजी सह येईल. फोन मध्ये प्राइमरी कॅमेरा सेंसर सोबत वाइड एंगल लेंस आणि टेलीफोटो लेंस दिली जाईल. हा कॅमेरा सेटअप पोर्टरेट मोड तसेच नाइट मोड सारख्या फीचर्स सह येईल.

LG आपल्या आगामी W सीरीज मध्ये एकापेक्षा जास्त स्मार्टफोन लॉन्च करू शकते. या फोन्सची नावे अजूनतरी समोर आले नाहीत पण वेबसाइट वरून समजले आहे कि कंपनी आपले आगामी स्मार्टफोन ग्रीन, ब्लॅक आणि ब्लू कलर शेड्स मध्ये लॉन्च करू शकते. विशेष म्हणजे LG W सीरीज खासकरून इंडियन मार्केट साठी बनवण्यात आली आहे. ज्याप्रमाणे Samsung ची Galaxy M सीरीज फक्त भारतात विकली जात आहे त्याचप्रमाणे LG ची W सीरीज पण फक्त भारतात विकली जाईल. जरा दोन्ही सीरीजच्या टाईटल वर लक्ष टाकल्यास तुमच्या लक्षात येईल M आणि W एकेमेकांचे उलटे स्वरूप आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here