या स्कूटरवरून पडण्याची अजिबात भीती नाही; आल्या सेल्फ बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर Liger X आणि Liger X+

Highlights

  • सेल्फ बॅलेन्सिंग Liger X+ इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज 100km आहे आणि टॉप स्पीड 65kmph आहे.
  • Liger X डिटॅचेबल बॅटरी पॅकसह येते, जी 3 तासांत चार्ज होते
  • Liger X+ मध्ये बिल्ट-इन नॉन-डिटॅचेबल बॅटरी आहे, जी 4.5 तासांत चार्ज होते.
  • Liger X आणि Liger X+ पाच कलरमध्ये येते.

Liger Mobility नं ऑटो एक्सपो 2023 मध्ये Liger X आणि Liger X+ असे दोन इलेक्ट्रिक स्कूटर मॉडेल सादर केले आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर बाबत दावा केला जात आहे की ही जगातील पहिला सेल्फ-बॅलेन्सिंग इलेक्ट्रिक स्कूटर (self-balancing electric scooters) आहे. ही इतर स्कूटरच्या तुलनेत आपोआप जास्त संतुलित राहते म्हणजे या स्कूटरवरून पडण्याची भीती नाही.

100 किलोमीटरची रेंज

Liger X ची रेंज 60km प्रति चार्ज आहे, तर Liger X+ ची रेंज 100km आहे. हीचा टॉप स्पीड 65kmph इतका आहे. महत्वाची बाब म्हणजे यातील सेल्फ-बॅलेन्सिंग टेक्नॉलॉजी लो-स्पीड मोड (5km ताशी पर्यंत) काम करते. Liger इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये लिक्विड-कूल्ड लिथियम-आयन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. Liger X डिटॅचेबल बॅटरी पॅकसह येते, जो 3 तासांमध्ये चार्ज होतो. तर Liger X+ मध्ये बिल्ट-इन नॉन-डिटॅचेबल बॅटरी आहे, जी चार्ज होण्यास 4.5 तास घेते. दोन्ही व्हेरिएंटसाठी फास्ट चार्जिंगचा पर्याय मिळेल. हे देखील वाचा: BGMI खेळण्यासाठी बजेटमध्ये फोन हवा? रेडमी नोट 12 सीरीजमध्ये नव्या प्रोसेसरसह येतोय Note 12 Turbo

ऑटोबॅलेन्सिंग टेक्नॉलॉजी

कंपनीनुसार यातील सेल्फ-बॅलेन्सिंग सिस्टम (ऑटोबॅलेन्सिंग टेक्नॉलॉजी) मुळे स्कूटर कमी स्पीडमध्ये वापरता येते. त्यामुळे स्पीड कमी असून देखील जमिनीवर पाय ठेवावा लागत नाही म्हणजे ट्रॅफिक किंवा रेड लाइटमध्ये पाय रस्त्यावर ठेवण्याची गरज नाही. ही सिस्टम रिवर्स गियर सोबत मिळून पायांचा वापर न करता स्कूटर रिवर्स करण्यास मदत करते. तसेच टॉप स्पीड कंट्रोल करण्यासाठी यात learner mode देखील मिळेल.

फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

दोन्ही ई-स्कूटर 4G आणि जीपीएस इनेबल आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर सोबत अ‍ॅप मिळेल, जो रायडरला स्कूटरचं लाइव्ह लोकेशन, राइड हिस्ट्री, बॅटरी टक्केवारी आणि टेम्परेचरची माहिती देईल. युजर्सना यात टो, अपघात आणि सर्व्हिस रिमाइंडर सारखे स्मार्ट अलर्ट देखील मिळतील. Liger X+ मध्ये टर्न बाय टर्न नेव्हिगेशन देखील आहे. तसेच युजर स्कूटरच्या TFT डिस्प्लेवर फोन कॉल आणि मेसेज पाहू शकतील. हे देखील वाचा: टाटा मोटर्सला टक्कर देण्यासाठी चायनीज कंपनी सज्ज; 521KM रेंजसह लाँच झाली BYD Atto 3 Electric SUV

Liger X and Liger X+ मध्ये मुख्य हेडलॅम्प फ्रंट एप्रनमध्ये इंटीग्रेटेड आहे. Liger X आणि Liger X+ पाच कलर म्हणजे ग्रे, पोलर व्हाइट, ब्लू, टायटेनियम आणि रेड मध्ये उपलब्ध होतील. या ई-स्कूटर खरेदी करण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल. कंपनीनुसार दोन्ही स्कूटर्सची बुकिंग 2023 च्या मध्यात सुरु होईल आणि डिलिव्हरी वर्षअखेर सुरु होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here