खुशखबर: स्वस्त झाला 3 रियर कॅमेरे असलेला Moto G8 Plus, जाणून घ्या नवीन किंमत

स्मार्टफोन निर्माता कंपनी मोटोरोलाने गेल्यावर्षी भारतात आपला Moto G8 Plus स्मार्टफोन लॉन्च केला होता. आता या डिवाइसच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 1000 रुपयांनी कमी केली आहे. या कपातीनंतर डिवाइस 12,999 रुपयांमध्ये मिळेल. प्राइस कटच्या आधी हँडसेट 13,999 रुपयांमध्ये विकला जात होता.

Moto G8 Plus चे स्पेसिफिकेशन्स

यात 6.3 इंचाचा फुल-एचडी+ (1080×2280 पिक्सल) आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे आणि नॉच यू आकाराची आहे. फोन मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 655 प्रोसेसर सह 4 जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच 64 जीबी इंटरनल स्टोरेज आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Moto G8 Plus क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह 48 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. सोबतच रियर कॅमेरा सेटअप मध्ये 16 मेगापिक्सलची वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एक मॅक्रो लेंस आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी Moto G8 Plus मध्ये 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

Moto G8 Plus डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह फोनच्या बॅक पॅनल वर फिजिकल फिंरगप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Moto G8 Plus मध्ये 4,000एमएएच ची पावरफुल बॅटरी देण्यात आली आहे.

Motorola ने MWC 2020 मध्ये आयोजित होणाऱ्या इवेंटचे इन्वाइट पाठवायला सुरवात केली आहे. कंपनीने घोषणा केली आहे कि येत्या 23 फेब्रुवारीला मोटोरोला मोबाईल वर्ल्ड कॉग्रेंस मध्ये सहभाग घेऊन आपला नवीन प्रोडक्ट टेक मंचावर सादर करेल. मोटोरोलाने याचा खुलासा केला नाही आहे कि एमडब्ल्यूसी मध्ये कंपनी कोणता फोन घेऊन येईल, पण आशा आहे कि हा एक फ्लॅगशिप फोन असेल.

मोटो जी8 प्लस वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here