120Hz AMOLED डिस्प्ले आणि 48MP क्वाड कॅमेऱ्यासह येईल OnePlus 8T, फोटो पण झाला लीक

OnePlus 8 सीरीज मध्ये सादर केल्या जाणाऱ्या अपकमिंग फोन बाबत लीक समोर येऊ लागले आहेत. अलीकडेच Android 11 के डेवलपर प्रीव्यू मध्ये OnePlus 8T चे फोटोज दिसले होते. या फोटोज मध्ये वनप्लस 8टी ची फ्रंट डिजाइन दिसली होती. आता Kebab कोडनेम असलेल्या या डिवाइसच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा एका वेबसाइटने केला आहे. या लीक मध्ये फोनच्या कॅमेरा, डिस्प्ले साइज आणि रिफ्रेश रेट बाबत माहिती देण्यात आली आहे.

डिस्प्ले आणि कॅमेरा

टेक वेबसाइट Android Central नुसार OnePlus 8T मध्ये 6.55-इंचाचा AMOLED डिस्प्ले असेल जो 120Hz रिफ्रेश रेट सह येईल. तसेच फोन मध्ये कंपनी 48 मेगापिक्सलचा क्वाड रियर कॅमेरा देईल. कॅमेरा सेंसर्स पाहता फोन मध्ये 48एमपी कॅमेऱ्याव्यतिरिक्त 16 मेगापिक्सलचा वाइड अँगल मॉड्यूल, 5 मेगापिक्सल मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलची पोर्टेट लेंस असेल. OnePlus 8 मध्ये पण कंपनीने 48MP कॅमेरा दिला आहे पण वनप्लस 8टी मधील कंपनीने दिलेला सेंसर चांगले फोटोज क्लिक करेल.

डिजाइन

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या OnePlus 8T च्या फोटोजच्या आधारवर याची डिजाइन पाहता हा फोन बऱ्याच अंशी यावर्षीच्या सुरवातीला लॉन्च केल्या गेलेल्या OnePlus 8 सारखा दिसेल. वनप्लस 8टी फोन वनप्लस 8 सारखा सिंगल होल-पंच कटआउट असेल, जो फोनच्या डावीकडील कोपऱ्यात असेल. तसेच वनप्लस 8 पेक्षा वेगळा वनप्लस 8टी चा डिस्प्ले सपोर्ट असेल. डेवलपर प्रीव्यू बिल्ड मध्ये फक्त फोनच्या समोरच्या भागाची माहिती मिळाली होती.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी वनप्लसचा अजून स्मार्टफोन ‘lemonade’ कोडनेम सह ऑनलाइन लीक झाला होता, जो XDA Developers फोरम मेंबरने स्पॉट केला होता. या वनप्लस स्मार्टफोन बाबत बोलले जात आहे कि याचे पण अनेक वेरिएंट कोडनेम आहेत जसे कि lemonade, lemonadep, lemonadept, lemonade आणि lemonadev. कोडनेम व्यतिरिक्त फोन बाबत कोणतीही माहिती समोर आली नव्हती.

वनप्लस 8टी बद्दल बोलायचे तर अजूनतरी कंपनीने या फोन बाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही पण बोलले जात आहे कि पुढील काही आठवड्यांत कंपनी अधिकृतपणे या फोनबाबत काही घोषणा करू शकते.

सोर्स

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here