कडाक्याच्या थंडीचा तुमच्या फोन वर पण होतो परिणाम, जाणून घ्या कशाप्रकारे वाचवायचा आपला स्मार्टफोन

डिसेंबर महिन्याची सुरवात झाली आहे आणि हा तोच महीना आहे जेव्हा वर्षातील सर्वात कडक थंडी पडते. यावेळी हवामान तज्ञानी सांगितले आहे कि गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी जास्त थंडी पडणार आहे. या सीजन मध्ये तब्येतीसोबत सोबतच तुम्हाला तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या गॅजेट म्हणजे स्मार्टफोनची पण जास्त काळजी घ्यावी लागते. कारण थंडीच्या दिवसांत स्मार्टफोनची बॅटरी जास्त लवकर संपते. तसेच, स्क्रीन पण वारंवार धूसर वाटू लागते होते.

सामान्यतः जोपर्यंत तापमान 0 सेल्सियसच्या आसपास असते तोपर्यंत तुमचा फोन ठीक चालतो. पण, मायनस मध्ये तापमान गेल्यावर स्मार्टफोनच्या बॅटरी वर सर्वप्रथम परिणाम दिसून येतो. जसे जसे तापमान कमी होते तशी तशी फोनची बॅटरी पण कमी होऊ लागते. जर तुम्ही पण जास्त थंड वातावरणात राहत असाल तर काही टिप्स फॉलो करून फोनची बॅटरी लवकर संपवण्यापासून वाचवू शकता.

हे देखील वाचा : जाणून घ्या बॅकग्राउंड मध्ये कशाप्रकारे चालू ठेवायचे YouTube, बंद होणार नाहीत गाणी, इतर ऍप्स पण येतील वापरता

अशी घ्या फोनची काळजी

– फोनला थंडी पासून वाचवण्यासाठी जास्त काळ फोन उघड्यावर ठेऊ नका.

-प्रयत्न करा की फोन एखाद्या गरम गर्म जॅकेट मध्ये ठेवा.

-फोनला चांगल्या कवर मध्ये ठेवा, जेणेकरून फोनचे तापमान योग्य राहील.

-जर तुम्ही एखादा मोठा आउटगोइंग कॉल करणार असाल तर फोन एका पावर बँकेशी जरुर कनेक्ट करा.

धूसर होणारी स्क्रीन

एलसीडी स्क्रीन असलेल्या स्मार्टफोनची स्क्रीन थंडीमुळे बिघडते. तापमान खाली गेल्यावर फोनची स्क्रीन धूसर होते. यामुळे फोन वरील टेक्स्ट आणि फोटोज पण धूसर होतात. त्यामुळे अश्यावेळी जेवढा वेळ फोन खिश्यात राहील तेवढे चांगले. तसेच फोन सोबत एका चांगल्या केसचा वापर केल्याने पण मदत होते.

हे देखील वाचा : 5000mAh बॅटरी आणि 8GB रॅम सह येत आहे Vivo Y52s

का होते बॅटरी लवकर डिस्चार्ज

एक्सपर्ट सांगतात कि जास्तीत जास्त फोन मध्ये लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. पारा खाली गेल्यावर त्यांचा इंटरनल इलेक्ट्रिकल रेजिस्टंस वाढतो. यामुळे बॅटरीची कपॅसिटी कमी होते आणि बॅटरी लवकरच डिस्चार्ज होऊ लागते.

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here