शाओमीला टक्कर देण्यासाठी रियलमी घेऊन येत आहे अजून एक स्वस्त स्मार्टफोन

रियलमी ने गेल्याच महिन्यात भारतीय बाजारात आपला स्वस्त स्मार्टफोन यू1 लॉन्च केला होता. हा फोन शाओमी रेडमी फोनचा चांगला प्रतीस्पर्धी म्हटले जात आहे. रियलमी यू1 11,999 रुपयांच्या बेस किंमतीती सेल साठी उपलब्द आहे. पण रियलमी संबंधित एका ताजा बातमी वरून समजले आहे कि कंपनी रियलमी यू1 नंतर आता अजून एक स्वस्त स्मार्टफोन आणण्याची तयारी करत आहे. बोलले जात आहे कि रियलमी कंपनी हा फोन रियलमी ए1 नावाने लॉन्च करेल.

रियलमी ए1 बद्दल एका विदेशी वेबसाइटने एक्सक्लूसिव रिपोर्ट दिला आहे. या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि रियलमी कंपनी एका नवीन स्मार्टफोन वर काम करत आहे जो लो बजेट सेग्मेंट मध्ये लॉन्च केला जाईल. या फोनची किंमत 10,000 रुपयांपेक्षा कमी ठेवली जाऊ शकते. रिपोर्ट नुसार रियलमी आपला हा फोन रियलमी ए1 नावाने मार्केट मध्ये सादर करेल. बातमी नुसार रियलमी ए1 नॉच सह लॉन्च केला जाऊ शकतो.

रियलमी यू1 मध्ये ‘यू’ शेप असलेली नॉच दिसली होती, तर रिपोर्ट नुसार रियलमी ए1 मध्ये रुंद रेग्यूलर नॉच दिली जाऊ शकते. रियलमी ने ‘यू’ शेप असलेल्या नॉचला ‘ड्यूड्रॉप’ नॉच डिस्प्लेचे नाव दिले आहे. रिपोर्ट नुसार रियलमी यू1 मध्ये मीडियाटेक चा हेलीयो पी60 किंवा क्वालकॉम चा स्नॅपड्रॅगॉन 600 सीरीजचा चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच रियलमी ए1 च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा मिळू शकतो तसेच फ्रंट पॅनल वर एआई सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो.

रियलमी यू1 पाहता हा भारतात 2 वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. एक वेरिएंट 3जीबी रॅम सोबत 32जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो तर दुसऱ्या वेरिएंट मध्ये 4जीबी रॅम सोबत 64जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. रियलमी ने 3जीबी/32जीबी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता तसेच 4जीबी/64जीबी वेरिएंटची किंमत 14,499 रुपये ठेवण्यात आली आहे. रियलमी यू1 शॉपिंग साइट अमेझॉन इंडिया वर एक्सक्लूसिव सेलसाठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here