Realme चा धमाका : फक्त एका महिन्यात विकले 52 लाख स्मार्टफोन, Xiaomi चे सिंहासन धोक्यात

Pic Credit : detik.com
Pic Credit : detik.com

गेले काही दिवस देश दिवाळीच्या सणात व्यस्त होता. दिवाळीच्या निमित्ताने स्मार्टफोन ब्रँड्स व ई-कॉमर्स साइट्सनी पण वेगवेगळे सेल आयोजित केले, ज्यात वेगवेगळ्या प्रोडक्ट्स वर मोठ्या डिस्काउंट सोबत अनेक आर्कषक ऑफर उपलब्ध होत्या. काही दिवसांपूर्वी Xiaomi ने खुलासा केला होता कि फेस्टिवल सेल मध्ये ब्रँडचे 12 मिलियन पेक्षा पण जास्त डिवाईस विकले गेले होते आणि यात 8.5 मिलियन म्हणजे 85 लाखांपेक्षा पण जास्त स्मार्टफोन्सचा समावेश होता. आज Realme ने पण आपला फेस्टिवल सेल सांगत सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला आहे. Realme ने सांगितले आहे कि या एका महिन्यात ब्रँडचे 5.2 मिलियन म्हणजे 52 लाख स्मार्टफोन यूनिट विकले गेले आहेत.

Realme ने प्रसिद्ध पत्रक पाठवून सांगितले आहे कि गेल्या महिन्यात वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म व रिटेल स्टोर्स वर आयोजित फेस्टिवल सेल मध्ये रियलमीने रेकॉर्ड सेलची नोंद केली आहे. कंपनीनुसार 30 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत Realme चे 5.2 मिलियन पेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत. फक्त एका महिन्यात 52 लाख स्मार्टफोन विकून Realme ने नवीन रेकॉर्ड केला आहे. पहिल्यांदा Realme ने एका महिन्यात इतके यूनिट विकले आहेत. गेल्या वर्षी तुलनेत Realme ने 160 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

जगातील 7वा स्मार्टफोन ब्रँड

फक्त 3 महिन्यात इतक्या मोठ्या प्रमाणात मोबाईल फोन विकून Realme ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 808 टक्क्यांची अविश्वसनीय वाढ केली आहे. या सेल सोबतच Realme जगातील 7वी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे तर गेल्या वर्षी या काळात Realme संपूर्ण जगात 47व्या स्थानी होती. यावर्षी बद्दल बोलायचे तर दुसऱ्या तिमाहीचे तुलनेत तिसऱ्या तिमाहीत Realme ने थेट 3 टक्क्यांवरून 18 टक्क्यांची वृद्धि केली आहे. रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि Realme गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 6 पट जास्त वेगाने आपला विस्तार करत आहे. विशेष म्हणजे 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत Realme ने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे.

Xiaomi ने विकले 85 लाख स्मार्टफोन

Xiaomi नुसार 28 सप्टेंबर ते 29 ऑक्टोबर पर्यंत भारतात 120 लाखांपेक्षा पण जास्त Xiaomi प्रोडक्ट्सची विक्री झाली आहे. या महिन्याभरात ब्रँडचे 8.5 मिलियन म्हणजे 85 लाखांपेक्षा पण जास्त स्मार्टफोन विकले गेले आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विकले गेलले स्मार्टफोन 37 टक्के जास्त आहेत. याच काळात Redmi Note 7 सीरीज Xiaomi ची सर्वात जास्त विकली जाणारी सीरीज होती तर Redmi 7 आणि Redmi 7A अमेझॉन वर विकले गेलेले बेस्ट बजेट स्मार्टफोन बनले.

तीन महिन्यात विकले गेले 490 लाख फोन

काउंटरप्वाइंटच्या रिपोर्ट नुसार जुलै ते सप्टेंबर महिन्यात भारतात 490 लाख स्मार्टफोन्सचा सेल झाला आहे. या आकड्यांची प्रमुख करणे म्हणजे स्मार्टफोन कंपन्यांनी केलेले नवीन लॉन्च, स्मार्टफोन्स वर देण्यात आलेला डिस्काउंट आणि दिवाळीच्य आधी वेगवेगळ्या शॉपिंग साइट वर आयोजित झालेला सेल असल्याचे बोलले जात आहे. रिपोर्ट नुसार 49 मिलियन यूनिटच्या या विक्रीत एकट्या Xiaomi ने 26 टक्के मार्केट शेयर आपल्या नावे केला आहे.

हे देखील वाचा: क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी असलेला Realme 5 झाला अजून स्वस्त, फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन

इतर ब्रँड्सची स्थिती

Samsung देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. Samsung ने बाजारात 20 टक्के शेयर आपल्या नावे केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी Samsung ला 4 टक्कयांचे नुकसान झाले आहे. Samsung फॅन्स साठी चांगली बातमी अशी कि यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीचे तुलनेत Samsung ने तिसऱ्या तिमाही मध्ये 3 टक्क्यांची वाढ मिळवली आहे. Samsung ची गॅलेक्सी एम सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीजचे फोन लोकांना खूप आवडले.

Apple देशातील टॉप 10 ब्रँड्स मध्ये येत आहे. iPhone XR च्या कमी झालेल्या किंमती आणि iPhone 11 च्या लॉन्चने Apple चा सेल वाढला आहे. Oppo F11 series आणि Oppo A5s स्मार्टफोनच्या यशामुळे Oppo ची वार्षिक वाढ 12 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर Vivo U10, Vivo Z1x आणि Vivo Z1 Pro च्या लॉन्च मुळे Vivo ने या तिमाहीत भारतात आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल केला आहे. OnePlus साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील नंबर वन प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

हे देखील वाचा: 108MP पेंटा कॅमेरा, 5,260एमएएच बॅटरी आणि मोठ्या स्क्रीन सह आला Mi CC9 Pro, Realme च्या अडचणी वाढल्या

Realme च्या या नवीन रेकॉर्ड विषयी ब्रँडचे सीईओ माधव सेठ म्हणाले कि, ‘Realme ने पुन्हा स्वतःला सिद्ध केले आहे तसेच फ्लिपकार्टच्या फेस्टिव सेल मध्ये ब्रँड पुन्हा नंबर वन बनला आहे. Realme भारतात बजेट सेग्मेंट मध्ये अनेक शानदार प्रोडक्ट्स आणते. आमच्या 5.2 मिलियन सेलचे आकडे अविश्वसनीय आहेत’

LEAVE A REPLY
Please enter your comment!
Please enter your name here