क्वॉड रियर कॅमेरा आणि 5000एमएएच बॅटरी असलेला Realme 5 झाला अजून स्वस्त, फक्त 8,999 रुपयांमध्ये मिळेल हा दमदार फोन

Realme ने ऑगस्ट मध्ये भारतीय बाजारात Realme 5 सीरीज सादर केली. या सीरीज अंतर्गत Realme 5 आणि Realme 5 Pro स्मार्टफोन लॉन्च केले गेले होते, ज्यांनी आपल्या पहिल्याच सेल मध्ये 1,20,000 पेक्षा जास्त यूनिट विकून नवीन रेकॉर्ड बनवला होता. Realme 5 आणि Realme 5 Pro भारतीय बाजारात पण लोकांना आवडत आहे. सीरीजचे यश पाहून Realme ने आपला स्वस्त स्मार्टफोन Realme 5 अजून स्वस्त केला आहे. या स्मार्टफोनचे सर्व वेरिएंट थेट 1,000 रुपयांनी स्वस्त करण्यात आले आहेत.

Realme 5 प्राइज कट सह कपंनीच्या अधिकृत वेबसाइट वर लिस्ट करण्यात आला आहे. इथे फोनचे सर्व वेरिएंट्स 1,000 रुपयांनी स्वस्त मिळत आहेत. किंमत पाहता Realme 5 चा 3जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 9,999 रुपये, 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,999 रुपये तर 4जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता. पण प्राइज कट नंतर हे तिन्ही फोन 1,000 रुपयांनी स्वस्त झाले आहेत फोनचा 3जीबी + 32जीबी वेरिएंट 8,999 रुपये, 4जीबी + 64जीबी वेरिएंट 9,999 रुपये तर 4जीबी + 128जीबी वेरिएंट 10,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

हे देखील वाचा: अंडर-डिस्प्ले सेल्फी कॅमेरा सह लीक झाला Xiaomi Mi MIX 4 चा फोटो, कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती

Realme 5

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. फोटोग्राफीसाठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. तर फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तर डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

Realme 5s

काही दिवसांपूर्वी रियलमीचा एक नवीन स्मार्टफोन इंटरनेट वर गाजला होता, ज्याचे नाव Realme 5s सांगण्यात आले होते. हा डिवाईस RMX1925 मॉडेल नंबर सह इंडियन वेबसाइट ब्यूरो ऑफ इंडिया स्टॅंडर्ड (BIS) वर लिस्ट झाला होता. तसेच Realme 5s नावाचाच एक स्मार्टफोन थायलंड नॅशनल ब्रॉडकास्टिंग एंड टेलीकम्युनिकेशन एजेंसी (NBTC) वर पण दिसला होता. त्यामुळे आशा आहे कि रियलमी लवकरच Realme 5s स्मार्टफोन बद्दल एखादी घोषणा करू शकते तसेच हा डिवाईस याच महिन्यात भारतीय बाजारात येऊ शकतो. Realme 5 ची किंमत कमी होणे हा Realme 5s च्या येण्याचाच ईशारा म्हणता येईल.

हे देखील वाचा: Redmi ला पुन्हा आव्हान देईल Realme, Realme 5s मॉडेलची करत आहे तयारी

जगातील 7वा सर्वात मोट स्मार्टफोन ब्रँड Realme

Realme ने सांगितले आहे कि साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने ग्लोबल मार्केट मध्ये 10 मिलियन म्हणजे 1 कोटी स्मार्टफोन्सची शिपमेंट केली आहे. फक्त 3 महिन्यात इतके मोबाईल फोन विकून Realme ने गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी 808 टक्केची अविश्वसनीय वाढ नोंदवली आहे. या सेलमुळे Realme जगातील 7वी सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. हैराणीची बाब म्हणजे मागच्यावर्षी याच कालावधीत Realme जगभरात 47व्या क्रमांकावर होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here