64-मेगापिक्सल सह सप्टेंबर मध्ये लॉन्च होईल Realme XT, कंपनीने केला शिकामोर्तब

चिनी स्मार्टफोन निर्माता कंपनी Realme ने आज आपली Realme 5 सीरीज लॉन्च केली आहे. या सीरीज मध्ये कंपनी ने Realme 5 आणि Realme 5 Pro सादर केले आहेत. तसेच कंपनीने आपल्या 64-मेगापिक्सलचा कॅमेरा असलेल्या स्मार्टफोनच्या नावाचा आणि लॉन्चचा खुलासा केला.

रियलमीच्या सीईओ ने लॉन्च इवेंट मध्ये अधिकृतपणे याची माहिती दिली कि कंपनी सप्टेंबरच्या शेवटी आपला 64-मेगापिक्सल कॅमेरा असलेला फोन लॉन्च करेला, ज्याचे नाव Realme XT असेल. Realme च्या अपकमिंग फोन मध्ये जगातील पहिला 64एमपी चा सॅमसंग ISOCELL Bright GW1 सेंसर असेल. याव्यतिरिक्त फोन संबंधित अधिक माहिती समोर आली नाही. पण या फोनला शाओमीच्या 64-मेगापिक्सल कॅमेरा स्मार्टफोन कडून टक्कर मिळेल.

Realme 5 चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्स पाहता Realme 5 मध्ये 6.5-इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 665 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने दोन रॅम व तीन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 3+32GB, 4+64GB, 4+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 च्या मागे चार सेंसर आहेत. यात 12+8+2+2एमपी कॅमेऱ्याचा कॉम्बिनेशन देण्यात आला आहे. तसेच फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 13-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

Realme 5 Pro

Realme 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा Realme 5 पेक्षा वेगळा आहे. यात 6.3-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच फोन क्वॉलकॉम 712 स्नॅपड्रॅगॉन प्रोसेसर सह येतो. हँडसेट कंपनीने तीन रॅम व स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे, ज्यात 4+64GB, 6+64GB, 8+128GB वेरिएंटचा समावेश आहे.

फोटोग्राफी साठी Realme 5 Pro मध्ये पण चार सेंसर आहेत. यात 48+8+2+2एमपी कॅमेऱ्यांचे कॉम्बिनेशन देण्यात आले आहे. फ्रंटला सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये VOOC फ्लॅश चार्ज 3.0 सह 4,035mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच डिवाइस एंडरॉयड 9.0 पाई सह कलरओएस 6.0 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here