Redmi 12 ची विक्री होणार अ‍ॅमेझॉनवरून; लाँचपूर्वीच लिस्ट झाला फोन

Highlights

  • Redmi 12 येत्या 1 ऑगस्टला भारतात लाँच होणार आहे.
  • Redmi 12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल.
  • हा फोन किफायतशीर किंमतीत सादर केला जाईल.

Redmi 12 1 ऑगस्टला भारतात लाँच होईल हे कन्फर्म झालं आहे. परंतु लाँचपूर्वीच फोनची मायक्रोसाइट अ‍ॅमेझॉन इंडियावर लाइव्ह झाली आहे. त्यामुळे हा फोन कंपनीच्या ऑफिशियल चॅनेल्ससह अ‍ॅमेझॉनवरून विकला जाईल हे स्पष्ट झालं आहे. चला जाणून घेऊया अधिक माहिती.

माइक्रोसाइट लाइव्ह

  • माइक्रोसाइटवरून समजलं आहे की Redmi 12 स्मार्टफोन Mi.com आणि मी होम स्टोर्ससह अ‍ॅमेझॉनवर उपलब्ध होईल.
  • कंपनी Redmi 12 ची जाहिरात स्टाइलिश डिवाइस म्हणून करत आहे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटनीची नियुक्ती अँबॅसेडर म्हणून करण्यात आली आहे.
  • हा फोन क्रिस्टल ग्लास डिजाईनसह येईल हे अ‍ॅमेझॉन लिस्टिंगवरून समजलं आहे.
  • Redmi 12 ची आणखी माहिती ह्या माइक्रोसाइटवरून लवकरच समोर येईल.

Redmi 12 चे स्पेसिफिकेशन्स

हा स्मार्टफोन काही दिवसांपूर्वी थायलंडमध्ये लाँच करण्यात आला होता, त्यामुळे ह्याच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीची माहिती आधीपासून उपलब्ध आहे. Redmi 12 चा भारतीय व्हेरिएंट जागतिक मॉडेलपेक्षा वेगळा असण्याची शक्यता आहे.

  • डिस्प्ले : ग्लोबल मार्केटमध्ये हा फोन 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.79 इंचाच्या फुलएचडी स्क्रीनसह सादर करण्यात आला आहे. स्क्रीन एलसीडी पॅनलवर बनली आहे तसेच 90हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या फोनमध्ये एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे जो 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेन्ससह येतो. तसेच फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • प्रोसेसर : हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 14 वर चालतो. कंपनीनं हा मीडियाटेक हीलियो जी88 प्रोसेसरसह सादर केला आहे. 12 नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर तयार करण्यात आलेला हा प्रोसेसर कमी रेंज मध्ये गेमिंगसाठी देखील चांगला मानला जातो. तसेच जोडीला माली-जी52 2ईईएमसी 2 जीपीयू देण्यात आला आहे.
  • मेमरी : ग्लोबल मार्केटमध्ये Redmi 12 4जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी, 8 जीबी रॅमसह 128 जीबी मेमरी आणि 12 जीबी रॅमसह 256 जीबी मेमरी मिळते. तसेच ह्यात मेमरी कार्ड सपोर्ट आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5,000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे आणि कंपनीनं 18वॉटचा फास्ट चार्जर दिला आहे.
  • कनेक्टिव्हिटी : डेटा आणि कनेक्टिव्हिटीसाठी रेडमी 12 मध्ये तुम्हाला 4जी एलटीईसह ड्युअल बँड वायफाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here