Samsung Galaxy S22 खरेदी करण्याची सुवर्णसंधी; 8000 रुपयांपेक्षा जास्त कपात

Highlights

 • सॅमसंग गॅलेक्सी एस22 वर सध्या बंपर डिस्काउंट मिळत आहे.
 • फ्लिपकार्टवर Galaxy S22 5G व्हेरिएंट फक्त 49,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 • एका रिटेलरनं दिली माहिती.

Samsung नं आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोन गॅलेक्सी एस 22 (Galaxy S22) च्या किंमतीत मोठी कपात केली आहे. ह्या फोनची प्रारंभिक किंमत 71,999 रुपये होती, तर आता हा फोन 63,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे. म्हणजे की कंपनीनं थेट ह्या फोनच्या किंमतीत 8 हजार रुपयांची कपात केली आहे. कंपनीनं आतापर्यंत याबाबत अधिकारिक माहिती दिली नाही परंतु ऑफलाइन स्टोरच्या माध्यमातून आम्हाला माहिती मिळाली आहे. दिल्लीच्या एका रिटेलरनं आम्हाला एक स्क्रीनशॉट शेयर केला आहे ज्यात किंमत कमी झाल्याची माहिती देण्यात आली आहे.

Samsung Galaxy S22 ची ऑफलाइन प्राइस

सॅमसंगचा हा फ्लॅगशिप फोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर ही योग्य संधी आहे. ऑफलाइन तसेच ऑनलाइनही फोनवर मोठी सूट मिळत आहे.

 • ऑफलाइन पाहता, Galaxy S22 च्या 8GB+128GB व्हेरिएंटची जुनी किंमत 71999 रुपये होती, जी 8,000 रुपयांच्या कपातीनंतर फक्त 63,999 रुपये झाली आहे.
 • Galaxy S22 च्या 8GB+256GB व्हेरिएंटची ऑरिजिनल किंमत 75,999 रुपये होती, प्राइस कटनंतर हा 67,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 • तसेच ऑफलाइन स्टोरवर बँक ऑफर आणि एक्सचेंज बोनस सारखी सूट मिळत आहे. ह्या ऑफरनंतर हा फोन 60 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत विकत घेता येईल.

Samsung Galaxy S22 ची ऑनलाइन प्राइस

 • ऑनलाइन ह्या फ्लॅगशिप फोनवर आणि जास्त डिस्काउंट मिळत आहे. फ्लिपकार्टवर Galaxy S22 5G (8GB+128GB, Green) व्हेरिएंट फक्त 49,490 रुपयांमध्ये उपलब्ध आहे.
 • फोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत फ्लिपकार्टवर 59,999 रुपये आहे. तसेच, ऑनलाइन तुम्ही बँक ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकता. हा फोन बोरा पर्पल, ग्रीन, पिंक गोल्ड, फँटम ब्लॅक आणि फँटम व्हाइट कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.

सॅमसंग गॅलेक्सी S22 चे स्पेसिफिकेशन्स

 • डिस्प्ले : सॅमसंग गॅलेक्सी एस22 मध्ये 6.1-इंच FHD+ डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स डिस्प्ले आहे. हा फोन 120Hz पर्यंत स्क्रीन रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो.
 • प्रोसेसर : सॅमसंगचा हा फोन दोन व्हेरिएंट 8GB+128GB आणि 8GB+256GB मध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर Snapdragon 8 Gen 1 SoC चा वापर करण्यात आला आहे.
 • कॅमेरा : हा ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येतो. रियर पॅनलवर 50MP प्रायमरी सेन्सर, 12MP अल्ट्रा वाइड आणि 10MP चा टेलीफोटो सेन्सर आहे. तसेच फोनमध्ये सेल्फीसाठी 10MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
 • ओएस : फोन अँड्रॉइड 12 वर आधारित वन युआय 4.1 वर चालतो.
 • बॅटरी : ह्यात कंपनीनं 3,700mAh ची बॅटरी दिली आहे, जी 25W वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
 • कनेक्टिव्हिटी : फोन 5G, 4G LTE, v5.2, 802.11 a/b/g/n/ac/ax (2.4 GHz | 5 GHz), एक्सेलेरोमीटर, बॅरोमीटर, फिंगरप्रिंट सेन्सर, जायरो सेन्सर, लाइट सेन्सर, प्रॉक्सीमीटी सेन्सर इत्यादी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here