6GB रॅम आणि 20MP सेल्फी कॅमेरा असलेला Samsung Galaxy A31 पुन्हा झाला स्वस्त, जाणून घ्या नवीन किंमत

Samsung Galaxy A31 ची किंमत भारतात पुन्हा एकदा कमी करण्यात आली आहे. याआधी फोनची किंमत अनेकदा कमी करण्यात आली आहे, मागच्या वेळी या स्मार्टफोनची किंमत 1,000 रुपयांनी कमी होऊन 19,999 रुपये झाली होती. यावेळी Samsung ने गॅलेक्सी ए31 च्या किंमतीत 2,000 रुपयांची कपातीची घोषणा केली आहे, त्यामुळे हा फोन आणि पण जास्त स्वस्त झाला आहे. हा हँडसेट तीन रंग आणि एक मात्र स्टोरेज मॉडेल मध्ये उपलब्ध आहे.

नवीन किंमत

हा फोन 6 जीबी + 128 जीबी स्टोरेज मॉडेल सह येतो, जो कि यावर्षी जून मध्ये 21,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता. पण आता फोनची नवीन किंमत 17,999 रुपये झाली आहे. गॅलेक्सी ए31 स्मार्टफोन खरेदीसाठी अमेझॉन इंडिया वर उपलब्ध आहे. तसेच हि कपात सर्व रिटेल स्टोर्स, सॅमसंग ओपरा हाउस, सॅमसंग.कॉम सारख्या ऑनलाइन पोर्टल्स वर पण लागू करण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Exclusive: भारतात धुमाकूळ घालायला येत आहे Samsung Galaxy M12, मास-प्रॉडक्शन झाले सुरु

स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A31 चे स्पेसिफिकेशन्स पाहता हा डिवाईस 2400 x 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.4 इंचाच्या फुलएचडी+ सुपर एमोलेड इनफिनिटी-यू डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनचे डायमेंशन 73.1 x 159.3 x 8.6 एमएम आणि वजन 185 ग्राम आहे. सॅमसंगने हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर टेक्नॉलॉजी सह आणला आहे तसेच स्क्रीन प्रोटेक्शनसाठी ग्लास कोटिंग पण दिली आहे.

Samsung Galaxy A31 एंडरॉयडच्या लेटेस्ट ओएस एंडरॉयड 10 वर बनवण्यात आला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह मीडियाटेकच्या हीलियो पी65 चिपसेट चालतो. इंडियन मार्केट मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च केला गेला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. माइक्रोएसडीच्या मदतीने मेमरी 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy A31 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/2.0 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे.तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेल्या 5 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंसला सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 20 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर आहे.

Samsung Galaxy A31 एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये 3.5एमएम जॅक पण देण्यात आला आहे. तसेच पावर बॅकअपसाठी सॅमसंग गॅलेक्सी ए31 मध्ये 15वॉट क्विक चार्ज सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए31 व्हिडीओ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here