Samsung Galaxy A90 5G लॉन्च, यात आहे 8जीबी रॅम, स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट आणि ट्रिपल रियर कॅमेरा

Samsung Galaxy A90 बद्दल अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या कि कंपनी या फोनचा 4G वर्जन सोबतच 5G मॉडेल पण लॉन्च करेल. काही दिवसांपूर्वी हा स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच सोबतच वाई-फाई सर्टिफिकेशन्स साइट वाई-फाई लायंस वर दिसला होता. या लिस्टिंग नंतर बोलले जात होते कि Samsung लवकरच Galaxy A90 5G टेक मंचावर सादर करेल. त्यानुसार आज कंपनीने आपला हा 5जी मॉडेल अधिकृत केला आहे.

Samsung Galaxy A90 5G कंपनीने आपल्या होम मार्केट म्हणजे साउथ कोरिया मध्ये लॉन्च केला आहे. सॅमसंग ने फोनचे सर्व स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स शेअर केले आहेत पण कंपनीने अजूनही फोनची किंमत सांगितली आहे. Samsung Galaxy A90 5G ची अंर्तराष्ट्रीय प्राइस येत्या काही दिवसांत समोर येईल त्याचबरोबर असे बोलले जात आहे कि कंपनी Samsung Galaxy A90 5G इंडियन मार्केट मध्ये पण सादर करेल.

लुक व डिजाईन

Samsung Galaxy A90 5G कंपनीने बेजल लेस इनफिनिटी ‘यू’ डिस्प्ले वर लॉन्च केला आहे. गॅलेक्सी ए90 5जी मध्ये डिस्प्लेच्या तिन्ही कडा बेजल लेस आहेत तर खालच्या बाजूला बारीक बॉडी पार्ट आहे. त्याचप्रमाणे डिस्प्लेच्या वर छोटीशी ‘यू’ शेप नॉच देण्यात आली आहे. Samsung Galaxy A90 5G एंटिना बँड डिजाईन वर सादर केला गेला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो वर डावीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली फ्लॅश लाईट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर इतर कोणताही सेंसर देण्यात आला नाही तसेच मधोमध Samsung ची ब्रांडिंग देण्यात आली आहे.

फीचर्स व स्पेसिफिकेशन्स

Samsung Galaxy A90 5G ची सर्वात मोठी खासियत फोन मधील 5G सपोर्ट आहे. गॅलेक्सी ए90 5जी मॉडेल सॅमसंगचा नॉन फ्लॅगशिप फोन आहे जो 5जी कनेक्टिविटी सह येतो. कंपनीने डिवाईस क्वालकॉमच्या Snapdragon X50 5G modem सह सादर केला ज्यामुळे Galaxy A90 चा हा मॉडेल 5G वर चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 देण्यात आला आहे.

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता Samsung Galaxy A90 5G 6.7-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. हा स्मार्टफोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर सह येतो ज्यामुळे फोन स्क्रीन वर टच करताच हा अनलॉक होतो. एंडरॉयड 9 पाई आधारित हा स्मार्टफोन कंपनीने 6जीबी रॅम आणि 8जीबी रॅम मेमरी वर सादर केला गेला आहे तसेच दोन्ही वेरिएंट 128जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Samsung Galaxy A90 5G ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर 48-मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX586 सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे फोनच्या बॅक पॅनल वर 8-मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड एंगल सेंसर आणि 5-मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच सेल्फी व वीडियो कॉलिंग साठी Samsung Galaxy A90 5G 32-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Samsung Galaxy A90 5G डुअल सिम फोन आहे जो 5G सोबत Dual 4G ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 25वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. Galaxy A90 5G मध्ये Samsung DeX फीचर पण मिळेल. हा फोन कोणत्या किंमतीत अंर्तराष्ट्रीय बाजारात सेल साठी उपलब्ध होईल हि माहिती लवकरच तुम्हाला दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here