अजून स्वस्त झाला 5,000mAh बॅटरी असलेला Galaxy M11, जाणून घ्या नवीन किंमत

Galaxy M11

सॅमसंगने आज आपल्या भारतीय फॅन्सना एक नवीन भेट देत Samsung Galaxy M11 च्या किंमतीत कपात केली आहे. हा फोन कंपनीने गेल्यावर्षी जून मध्ये लॉन्च केला होता. दोन वेरिएंट मध्ये सादर करण्यात आलेल्या या डिवाइसच्या किंमतीत बदल होण्याची हि पहिली वेळ नाही. याआधी सप्टेंबर 2020 मध्ये पण कंपनीने फोनची किंमत कमी केली होती. चला जाणून घेऊया पंच-होल डिस्प्ले, 5000एमएएच बॅटरी आणि ट्रिपल रियर कॅमेरा असलेल्या लो बजेट सॅमसंग गॅलेक्सी एम11 ची नवीन किंमत किती आहे.

1,000 रुपयांनी कमी झाली किंमत

91मोबाईल्सला गॅलेक्सी एम11 च्या नवीन किंमतीची माहिती एक्सक्लूसिवली ऑफलाइन रिटेलर्सनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कंपनीने यावेळी फोनच्या फक्त 4GB रॅम आणि 64GB वेरिएंटच्या किंमतीत 1,000 रुपयांची कपात केली आहे. तर 3GB रॅम आणि 32GB स्टोरेज वेरिएंट जुन्या किंमतीत विकला जात आहे.

हे देखील वाचा : लाॅन्चच्या आधी समोर आला Samsung Galaxy A52, 8GB रॅम आणि 64MP कॅमेऱ्यासह असेल 90हर्ट्ज डिस्प्ले

Samsung Galaxy M11 पाहता हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये उपलब्ध आहे, त्यातील 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंट 10,499 रुपये तर 4 जीबी रॅम + 64 जीबी मेमरी वेरिएंट 11,999 रुपयांमध्ये विकला जात होता. पण, आता सॅमसंगने फोनच्या 4 जीबी रॅम वेरिएंट मध्ये 1,000 रुपयांची कपात केली आहे त्यानंतर फोनची किंमत 10,999 रुपये झाली आहे. 3GB रॅम वेरिएंट जुन्या किंमतीत विकला जात आहे.

Samsung Galaxy M11

गॅलेक्सी एम11 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.4 इंचाच्या एचडी+ इनफिनिटी-ओ डिस्प्लेसह लॉन्च केला गेला आहे जो अँड्रॉइड 10 आधारित वनयुआय 2.0 सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 4450 चिपसेटवर चालतो. डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबतच बेसिक कनेक्टिविटी फीचर्स फोन मध्ये आहेत. सिक्योरिटीसाठी हा फोन रियर फिंगरप्रिंट सेंसरला सपोर्ट करतो तर पावर बॅकअपसाठी गॅलेक्सी एम11 मध्ये 15वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

हे देखील वाचा : Samsung Galaxy M62 कंपनीच्या इंडियन साइटवर लिस्ट, लवकरच होईल भारतात लाॅन्च

सॅमसंग गॅलेक्सी एम11 फोटोग्राफीसाठी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Galaxy M11 एफ/2.0 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या पंच-होल कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here