Exclusive: 20 ऑगस्टला भारतात लॉन्च होईल Samsung Galaxy Note 10, 22 ऑगस्ट पासून होईल सेल

सॅमसंगच्या बहुप्रतिक्षित फोन Galaxy Note 10 बद्दल गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या येत आहेत. कंपनी 7 ऑगस्टला हा ग्लोबल इवेंट मध्ये लॉन्च करणार आहे. या लॉन्च बद्दल कंपनीने खूप आधीच माहिती दिली होती आणि त्याचबरोबर फोन भारतात लॉन्च केला जाणार असल्याचा अंदाज लावण्यात आला होता. आज 91मोबाईल्सला याबद्दल एक्सक्लूसिव माहिती मिळाली आहे. कंपनी 20 ऑगस्टला हा भारतात लॉन्च करणार आहे. लॉन्चच्या दोन दिवसानंतर हा फोन सेल साठी उपलब्ध होईल. अर्थात 22 ऑगस्ट पासून भारतात Samsung Galaxy Note 10 चा सेल सुरु होईल.

आम्हाला हि माहिती सॅमसंगमधील एका सुत्रा कडून मिळाली आहे. याआधी पण त्यांनी आम्हाला माहिती दिली आहे जी खरी ठरली आहे. त्यांनी आम्हाला सांगितले कि “आता पर्यंत Samsung Galaxy Note 10 बद्दल माहिती होती कि 23 ला विक्रीसाठी उपलब्द होईल परंतु हा फोन 22 ऑगस्टलाच ग्लोबली सेल साठी उपलब्ध होईल आणि याच दिवसापासून भारतात पण हा उपलब्ध केला जाईल.” त्यांनी किंमतीबद्दल आम्हाला माहिती दिली नाही. पण भारतात Samsung Galaxy Note 10 ची प्री बुकिंग आधीच सुरु झाली आहे आणि आम्ही आधीच याची माहिती दिली होती. आज सॅमसंग इंडियाच्या सपोर्ट पेज वर पण हा फोन लिस्ट करण्यात आला आहे. यावरून असा अंदाज लावला जात आहे कि फोन लवकरच भारतात लॉन्च केला जाणार आहे.

दोन मॉडेल होतील लॉन्च

आता पर्यंत असे होत होते कि नोट सीरीज मध्ये कंपनी एक फोन लॉन्च करत होती. पंरतु यावेळी दोन मॉडेल लॉन्च होणार आहेत. सॅमंसग गॅलेक्सी नोट 10 सोबतच कंपनी Samsung Galaxy Note 10+ सादर करणार आहे. दोन्ही फोन मध्ये प्रामुख्याने स्क्रीन, मेमरी आणि बॅटरीचा फरक असू शकतो. अलीकडेच एका लीक मध्ये याचा खुलासा केला गेला आहे.

Samsung Galaxy Note 10

Samsung Galaxy S10 प्रमाणे यावेळी नोट फोन मध्ये पण तुम्हाला पंच होल डिस्प्ले मिळेल ज्याला कंपनीने इनफिनिटी ओ डिस्प्लेचे नाव दिले आहे. Samsung Galaxy Note 10 मध्ये तुम्हाला 6.3-इंचाची स्क्रीन मिळेल हा फोन 2के डिस्प्ले रेजल्यूशन सह येऊ शकतो. प्रोसेसिंग साठी फोन मध्ये क्वालकॉमचा दमदार स्नॅपड्रॅगॉन 855 किंवा एक्सनोस 9825 चिपसेट मिळेल. भारतात एक्सनोस चिपसेट असलेला फोनच उपलब्ध होईल. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार Samsung Galaxy Note 10 मध्ये तुम्हाला 8जीबी रॅम मेमरी मिळेल तर 256जीबी चा स्टोरेज ऑप्शन असेल. कॅमेरा पाहता या फोन मध्ये तुम्हाला ट्रिपल रियर कॅमेरा मिळेल. ज्यात याचा मेन कॅमेरा सेंसर 12एमपी चा असेल. तसेच सेकेंडरी सेंसर 16एमपी मिळेल. तर तिसरा सेंसर 12एमपी चा असेल. सेल्फी बद्दल कोणतीही खास माहिती अजूनतरी मिळाली नाही पण आता पर्यंत ज्या बातम्या मिळाल्या आहेत त्या नुसार या फोन मध्ये 10एमपी चा फ्रंट कॅमेरा असेल. या फोन मध्ये तुम्हाला 3,600 एमएएच ची बॅटरी मिळेल.

Samsung Galaxy Note 10+

Samsung Galaxy Note 10+ मध्ये तुम्हाला मोठी स्क्रीन मिळेल. हा 6.8—इंचाच्या डिस्प्ले सह सादर केला जाऊ शकतो. यात पण पंच होल डिस्प्ले असेल. हा फोन पण क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 855 आणि एक्सनोस 9825 चिपसेट वर सादर केला जाऊ शकतो. मेमरी मध्ये फरकअसा असेल कि कंपनी हा 8जीबी रॅम सह 512जीबी मेमरी मध्ये सादर करू शकते. यात पण तुम्हाला 12 एमपी + 16 एमपी + 12 एमपी चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. बॅटरी पावर जास्त आहे. हा फोन 4,300 एमएएच च्या बॅटरी सह येऊ शकतो.

Samsung Galaxy Note 10 वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here