4जीबी रॅम आणि सुपर एमोलेड बेजल लेस डिस्प्ले सह लॉन्च झाला सॅमसंग गॅलेक्सी आॅन6

सॅमसंग इंडिया ने मागच्या आठवड्यात माहिती दिली होती की कंपनी भारतात आपल्या गॅलेक्सी आॅन सीरीज मध्ये नवीन स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्यानुसार आज सॅमसंग ने आपला नवीन स्मार्टफोन गॅलेक्सी आॅन6 देशात लॉन्च केला आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी आॅन6 14,490 रुपयांमध्ये बाजारात आणला आहे. हा फोन शॉपिंग साइट ​फ्लिपकार्ट वर एक्सक्लूसिव विकला जाईल त्याचबरोबर हा सॅमसंग शॉप वरून पण विकत घेता येईल.

सॅमसंग इंडिया ने गॅलेक्सी आॅन6 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या डिस्प्ले सह सादर केला आहे. या फोन मध्ये 5.6-इंचाचा एचडी+ सुपर एमोलेड ​इनफिनिटी डिस्प्ले देण्यात आला आहे, जो 2.5डी कर्व्ड ग्लास ने प्रोटेक्टेड आहे. सॅमसंग चा हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 1.6गीगाहर्ट्ज आॅक्टा-कोर प्रोसेसर सह एक्सनॉस 7870 चिपसेट वर चालेल. तसेच ग्राफिक्स साठी या फोन मध्ये माली टी830 जीपीयू आहे.

सॅमसंग ने आपला हा फोन 4जीबी रॅम सह बाजारात आणला आहे. त्याचबरोबर फोन मध्ये 64जीबी इंटरनल मेमरी देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सल चा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तर सेल्फी साठी या फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे जो एलईडी फ्लॅश सह येतो.

सॅमसंग गॅलेक्सी आॅन6 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई सोबत चॅट ओवर ​वीडियो फीचर ला पण सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविट फीचर्स सह फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच यात फेस अनलॉक टेक्निक पण आहे. पावर बॅकअप साठी गॅलेक्सी आॅन6 मध्ये 3,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 5 जुलै पासून ब्लॅक आणि ब्लू कलर वेरिएंट मध्ये 14,490 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here