Instagram - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Sun, 16 Jul 2023 06:09:30 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/#respond Sun, 16 Jul 2023 06:05:06 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21367 तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं […]

The post Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्ही इन्स्टाग्रामवर रील (Instagram reel) बनवता परंतु ती फेसबुक (Facebook) वर कशी शेयर करायची? गोंधळून जाऊ नका, पद्धत सोपी आहे. इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर केल्यामुळे फक्त प्रेक्षकवर्ग वाढत नाही तर फॉलोअर्स देखील वाढू शकतात. फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याची माहिती पुढे वाचू शकता.

इन्स्टाग्राम रील फेसबुकवर शेयर करण्याची पद्धत

फेसबुकवर इन्स्टाग्राम रील शेयर करण्याआधी तुमचं Instagram आणि Facebook अकाऊंट एकमेकांशी जोडलेलं असावं. Instagram आणि Facebook अकाऊंट लिंक करण्यासाठी पुढील स्टेप फॉलो करा:

  • इन्स्टाग्राम अकाऊंटवरून फेसबुक जोडण्यासाठी तुम्हाला अकाऊंट सेंटर (Accounts Centre) मध्ये जावं लागेल.
  • यासाठी आधी प्रोफाईल मध्ये जाऊन खाली उजवीकडे प्रोफाईल किंवा अपना प्रोफाईल पिक्चरवर टॅप करा.
  • त्यानंतर उजवीकडे वर तीन लाइन असेलल्या hamburger मेन्यूवर टॅप करा, नंतर ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ मध्ये जा.
  • यहां ‘अकाऊंट सेंटर’ टॅप करा.
  • ‘अ‍ॅड फेसबुक अकाऊंट’ च्या ऑप्शनवर टॅप करा आणि सूचनांचे पालन करून इन्स्टाग्राम अकाऊंट फेसबुकला जोडा.

अशी शेयर करा इन्स्टाग्राम रील

  • सर्वप्रथम डावीकडे ‘क्रिएट’ वर क्लिक करून रील रेकॉर्ड करण्यास सुरुवात करा.
  • त्यानंतर तुमची रील शेयर करण्याआधी ‘शेयर टू फेसबुक’ वर क्लिक करा.
  • तुम्ही ज्या फेसबुक अकाऊंटशी रील शेयर करू इच्छित असाल त्याच्या स्विच बटनवर टॅप करा.
  • इथून भविष्यातील सर्व रील फेसबुकवर शेयर करायच्या आहेत की फक्त चालू, ते निवडा.
  • वर डावीकडे> वर टॅप करा, आणि ‘शेयर’ वर टॅप करा.

ऑटोमॅटिक फेसबुकवर शेयर करा रील

जर तुम्हाला इन्स्टाग्रामवरील सर्व रील ऑटोमॅटिकपद्धतीनं फेसबुकवर शेयर करायची असेल तर पुढील स्टेप को फॉलो करा:

  • तुमच्या प्रोफाईलवर जाण्यासाठी उजवीकडे प्रोफाईल किंवा प्रोफाईल पिक्चर वर क्लिक करा.
  • सर्वात वर उजवीकडे hamburger मेन्यू वर क्लिक करा आणि ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ सेक्शन मध्ये जा.
  • इथे तुम्हाला अकाऊंट सेंटरमध्ये गेल्यानंतर Sharing across profiles ऑप्शनवर टॅप करा.
  • आता तुमचं ते अकाऊंट सिलेक्ट करा, ज्याच्या माध्यमातून रील्स शेअर करायच्या आहेत किंवा ते अकाऊंट देखील सिलेक्ट करा, ज्यावर रील शेयर करायच्या आहेत.
  • त्यानंतर खाली ‘ऑटोमॅटिकली शेयर’ समोरील स्विच बटनवर टॅप करा. त्यानंतर इन्स्टाग्रामवर जी रील तुम्ही शेयर कराल ती आपोआप फेसबुकवर देखील शेयर होईल.

The post Instagram Reel फेसबुकवर शेयर करणं आहे सोपं, अशी आहे पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-instagram-reels-on-facebook/feed/ 0
Instagram Reels मध्ये म्यूजिक कस लावायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/how-to-add-music-in-instagram-reels/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-add-music-in-instagram-reels/#respond Thu, 06 Jul 2023 13:14:00 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22270 तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम रील्स (Instagram Reels) मध्ये म्यूजिक जोडायचं आहे का? पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही रील्ससह ऑरिजिनल ऑडियो देखील जोडू शकता किंवा तुमच्या आवडीचं म्यूजिक देखील लावू शकता. सध्या ऑडियो असलेल्या रील्स जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि लोकांना खूप आवडत आहेत. रील्स इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ बनवण्याची एक शानदार पद्धत आहे. चला जाणून घेऊया की कशाप्रकारे […]

The post Instagram Reels मध्ये म्यूजिक कस लावायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला तुमच्या इन्स्टाग्राम रील्स (Instagram Reels) मध्ये म्यूजिक जोडायचं आहे का? पद्धत खूप सोपी आहे. तुम्ही रील्ससह ऑरिजिनल ऑडियो देखील जोडू शकता किंवा तुमच्या आवडीचं म्यूजिक देखील लावू शकता. सध्या ऑडियो असलेल्या रील्स जास्त ट्रेंडमध्ये आहेत आणि लोकांना खूप आवडत आहेत. रील्स इन्स्टाग्रामवर शॉर्ट व्हिडीओ बनवण्याची एक शानदार पद्धत आहे. चला जाणून घेऊया की कशाप्रकारे इन्स्टाग्राम रील्स मध्ये म्यूजिक जोडता येईल.

Instagram Reels मध्ये म्यूजिक लावण्याची पद्धत

तुम्ही पुढील 10 स्टेपच्या मदतीनं तुमच्या इन्स्टा रील्समध्ये ऑरिजिनल ऑडियो किंवा म्यूजिक जोडू शकता :

  • स्टेप 1: सर्वप्रथम डिवाइसवर इन्स्टाग्राम अ‍ॅप (Instagram app) ओपन करा.
  • स्टेप 2: त्यानंतर खाली + icon वर टॅप करा.
  • स्टेप 3: आता साइडबारमधून Reels असलेल्या ऑप्शनमध्ये जा म्हणजे इन्स्टाग्राम कॅमेरा ओपन होईल. इन्स्टाग्रामला कॅमेरा आणि मायक्रोफोन अ‍ॅक्सेस द्या.
  • स्टेप 4: रील बनवली असेल तर स्क्रीनच्या वरच्या बाजूला ऑडियो बटनवर टॅप करा.
  • स्टेप 5: रील्स मध्ये म्यूजिक जोडण्यासाठी म्यूजिक आयकॉनवर टॅप करा.
  • स्टेप 6: म्यूजिक अँड ऑडियो असलेली लिस्ट ब्राउज करा किंवा खास ट्रॅक सर्च देखील करता ईल.
  • स्टेप 7: ट्रॅक निवडून झाल्यावर त्या गाण्याचा जो भाग वापरायचा आहे तो निवडा. त्यासाठी स्क्रीनच्या खाली डावीकडे किंवा उजवीकडे टाइमलाइन स्लाइड करता येते.
  • स्टेप 8: गाण्याचा समाधानकारक भाग मिळाल्यावर स्क्रीनच्या वरच्या बाजूला उजवीकडे Done वर टॅप करा.
  • स्टेप 9: रीलची एडिटिंग संपल्यावर स्क्रीनच्या खाली उजवीकडे नेक्स्टवर टॅप करा.
  • स्टेप 10 : तसेच रील्ससह कॅप्शन टाकू शकता, कव्हर एडिट करू शकता आणि लोकांना टॅग देखील करू शकता. रील पूर्णपणे तयार झाल्यावर स्क्रीनच्या खाली उजवीकडे Share बटन वर टॅप करा.

The post Instagram Reels मध्ये म्यूजिक कस लावायचं? जाणून घ्या सर्वात सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-add-music-in-instagram-reels/feed/ 0
बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव https://www.91mobiles.com/marathi/best-instagram-reel-editing-apps/ https://www.91mobiles.com/marathi/best-instagram-reel-editing-apps/#respond Sun, 25 Jun 2023 12:41:57 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=20167 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम भारतात खूप लोकप्रिय आहे. कारण भारतात इंस्टाग्रामचे 32,12,00,000 अकाऊंट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 22.4 टक्के आहे. यावरून स्पष्ट समजतं की भारतीय इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवतात. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युजर्स सर्वात जास्त रील बघण्यास पसंती देतात. परंतु तुम्हाला जर इंस्टा रील क्रिएटर बनायचं असेल तर आम्ही या […]

The post बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • सुमारे 22 टक्के भारतीय इस्टाग्राम वापरतात.
  • इंस्टाग्राम युजर्स दरम्यान रील्स व्हिडीओ खूप लोकप्रिय आहेत.
  • आम्ही टॉप इंस्टाग्राम रील व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्सची माहिती घेऊन आलो आहोत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्राम भारतात खूप लोकप्रिय आहे. कारण भारतात इंस्टाग्रामचे 32,12,00,000 अकाऊंट आहेत, जे भारतीय लोकसंख्येच्या सुमारे 22.4 टक्के आहे. यावरून स्पष्ट समजतं की भारतीय इंस्टाग्रामवर बराच वेळ घालवतात. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मनुसार त्यांच्या प्लॅटफॉर्मवर युजर्स सर्वात जास्त रील बघण्यास पसंती देतात. परंतु तुम्हाला जर इंस्टा रील क्रिएटर बनायचं असेल तर आम्ही या आर्टिकलमध्ये टॉप रील एडिटिंग अ‍ॅप्सची माहिती देणार आहोत. ज्यामुळे तुम्ही देखील शानदार रील बनवू शकता.

का वापरावे रील एडिटिंग अ‍ॅप्स?

इंस्टाग्राम एक क्रिएटिव्ह प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्ही थेट व्हिडीओ पोस्ट केला तर तो आकर्षक वाटेलच असं नाही. त्यामुळे व्हिडीओ बनवण्यासाठी केलेली मेहनत एडिटिंगविना वाया जाऊ शकते. रील्स क्रिएटिव्ह आणि जास्त आकर्षक बनवण्यासाठी तुम्हाला शानदार व्हिडीओ एडिटिंग करावी लागेल. तुम्ही जितका चांगला आणि मनोरंजक कंटेंट बनवाल तुम्हाला तेवढ्या लाइक आणि फॉलोअर्स मिळतील.

बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स

  • VN Video Editor
  • Canva
  • Inshot
  • KineMaster
  • Splice
  • Filmora

VN Video Editor

VN व्हिडीओ एडिटर इंस्टाग्राम युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. यात युजर्सना अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर्स फ्री मध्ये मिळतात. तसेच व्हिडीओमध्ये कोणताही वॉटरमार्क देखील येत नाही. यात युजर्स मल्टी फ्रेम व्हिडीओ देखील सहज एडिट करू शकतात. या अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे:

  • व्हिडीओ इफेक्ट्स
  • फिल्टर
  • ट्रिम
  • स्पीड
  • स्लिप्ट
  • म्यूजिक लायब्रेरी

Canva

कॅनवा अ‍ॅप ऑनलाइन सर्वात लोकप्रिय व्हिडीओ आणि इमेज एडिटर अ‍ॅप आहे. जे युजर्स पहिल्यांदाच एडिटिंग करत आहेत त्यांच्यासाठी हे बेस्ट अ‍ॅप्लिकेशन आहे. यात अनेक फ्री टेम्पलेट आहेत, ज्यांचा वापर तुम्ही क्रिएटिव्ह कंटेंट तयार करण्यासाठी करू शकतात. याचे फीचर्स पाहता तुम्ही व्हिडीओ एडिट केल्यानंतर थेट सीधा पोस्ट करू शकतात. कॅनवाचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे :

  • फ्री टेम्प्लेट्स
  • फिल्टर्स
  • अ‍ॅनिमेशन
  • ट्रांजिशन
  • GIF एलिमेंट्स

Inshot

Inshot अ‍ॅप व्हिडीओ एडिंगसाठी बेस्ट अ‍ॅप्स पैकी एक आहे. याच्या मदतीनं तुम्ही वर्टिकल आणि हॉरिजॉन्टल व्हिडीओ सहज एडिट करू शकतात. त्याचबरोबर सहज व्हिडीओ फॉर्मेट देखील बदलू शकता. या अ‍ॅपची सर्वात खास बाब म्हणजे तुम्ही फोनमध्ये स्टोर ऑडियो फाईल व्हिडीओमध्ये जोडू शकता. या व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे :

  • इफेक्ट
  • फिल्टर
  • ट्रांजिशन
  • स्पीड
  • अ‍ॅनिमेशन

KineMaster

रील एडिट करण्यासाठी काइनमास्टर अ‍ॅप देखील शानदार पर्याय आहे. यात देखील युजर्सना अनेक टेम्प्लेट आणि फीचर्स मिळतात, ज्यांच्या मदतीनं युजर्स शानदार रील बनवू शकतात. KineMaster अ‍ॅप ध्ये युजर्सना ऑडियो, व्हिडीओ आणि इमेजची मोठी लायब्रेरी मिळते. या व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅपचे टॉप फीचर्स पुढीलप्रमाणे आहेत :

  • अ‍ॅनिमेशन
  • ट्रांजिशंस
  • इंपोर्ट एक्सपोर्ट ऑप्शन
  • मोशन ट्रॅकिंग
  • टेक्स्ट एडिटिंग

Splice

Splice अ‍ॅपमध्ये व्हिडीओ एडिट करण्यासाठी युजर्सना अनेक अ‍ॅडव्हान्स फीचर मिळतात. या अ‍ॅप ध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) आधारित स्पीच टू टेक्स्ट फीचरचा सपोर्ट दिला आहे, जेणेकरून युजर्स व्हिडीओमध्ये टेक्स्टचा समावेश करू शकतात. त्याचबरोबर एडिटरमध्ये व्हिडीओ कट करणे, ट्रिम करणे आणि क्रॉप करण्यासारखे फीचर्स देखील मिळतात :

  • यूनीक ट्रांजिशन
  • अ‍ॅनिमेशन
  • स्लिप्ट
  • टेक्स्ट एडिटर
  • म्यूजिक अँड ऑडियो

Filmora

ऑनलाइन व्हिडीओ एडिटिंग अ‍ॅप्स ध्ये फिल्मोरा खूप पॉपुलर आहे. यात युजर्सना अनेक प्रोफेशनल फीचर्स मिळतात, ज्यामुळे तुम्ही शानदार रील एडिट करू शकता. या अ‍ॅप मध्ये युजर्सना अ‍ॅपमध्ये व्हिडीओ एडिटिंग दरम्यान व्हॉइस ओव्हर करण्याचा ऑप्शनही मिळतो. याचे टॉप फीचर्स पुढे पाहू शकता :

  • स्टिकर
  • अ‍ॅनिमेशन
  • टेक्स्ट
  • ऑडियो इक्वलाइजर
  • पिक्चर-इन-पिक्चर इफेक्ट

The post बेस्ट इंस्टाग्राम रील एडिटिंग अ‍ॅप्स; व्यूज, लाइक आणि फॉलोअर्सचा होईल वर्षाव first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/best-instagram-reel-editing-apps/feed/ 0
जाणून घ्या कसं बनवायचं इंस्टाग्राम अकाऊंट, अशी आहे सोपी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/instagram-account-kasa-banavayach/ https://www.91mobiles.com/marathi/instagram-account-kasa-banavayach/#respond Thu, 22 Jun 2023 10:47:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21714 इंस्टाग्राम सध्या तरुणाईत खूप लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवायचं असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. इंस्टाग्रामवर दोन प्रकारे अकाऊंट बनवता येईल. ह्या प्लॅटफॉर्मवर नवीन अकाऊंट इंस्टाग्रामच्या अ‍ॅप आणि वेबसाइट Instagram.com वरून बनवता येतं. इथे आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामचं नवीन अकाऊंट बनवण्याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवण्यासाठी […]

The post जाणून घ्या कसं बनवायचं इंस्टाग्राम अकाऊंट, अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
इंस्टाग्राम सध्या तरुणाईत खूप लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. जर तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवायचं असेल तर हा लेख तुमच्यासाठी आहे. इंस्टाग्रामवर दोन प्रकारे अकाऊंट बनवता येईल. ह्या प्लॅटफॉर्मवर नवीन अकाऊंट इंस्टाग्रामच्या अ‍ॅप आणि वेबसाइट Instagram.com वरून बनवता येतं. इथे आम्ही तुम्हाला इंस्टाग्रामचं नवीन अकाऊंट बनवण्याची स्टेप बाय स्टेप माहिती दिली आहे. इंस्टाग्रामवर अकाऊंट बनवण्यासाठी तुमचं वय 13 वर्षांपेक्षा जास्त असलं पाहिजे.

असं बनवा इंस्टाग्रामवर नवीन अकाऊंट

स्टेप 1 : सर्वप्रथम तुमच्या कंप्यूटरवर इंस्टाग्रामची वेबसाइट instagram.com ओपन करा.

स्टेप 2 : वेबसाइट ओपन केल्यानंतर ‘Sign Up’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या ईमेल किंवा मोबाइल नंबरसह संपूर्ण नाव, युजरनेम आणि पासवर्ड बनवून Sing Up वर क्लिक करा.

नोट : जर तुम्ही ईमेलद्वारे साइन इन केलं तर अचूक ईमेल अ‍ॅड्रेस द्या आणि तो लक्षात ठेवा. जर तुम्ही लॉगआउट केलं आणि पासवर्ड विसरलात तर इंस्टाग्राम अकाऊंट अ‍ॅक्सेससाठी तुम्हाला ईमेल आयडी आवश्यक आहे.

स्टेप 3 : पुढील पेजवर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकावी लागेल आणि Next वर क्लिक करा. जर तुम्ही बिजनेस अकाऊंट क्रिएट करत असाल तरी तुमची जन्मतारीख टाका.

स्टेप 4 : पुढील पेजवर कंफर्मेशन कोड द्यावा लागेल. हा कोड तुम्हाला ईमेल आणि मोबाइल नंबरवर मिळेल.

स्टेप 5 : पुढील पेजवर तुमच्या समोर इंस्टाग्रामची टर्म्स अँड पॉलिसी दिसतील. अकाऊंट बनवण्यासाठी Agree बटनवर क्लिक करून पुढे जा.

स्टेप 6 : पुढे तुम्हाला तुमचा इंस्टाग्राम प्रोफाईल फोटो अपलोड करावा लागेल. जर तुम्ही प्रोफाईल फोटो नंतर अपलोड करायचा असेल तर स्किप बटनवर टॅप करा. तुमचं इंस्टाग्राम अकाऊंट तयार आहे.

फेसबुक अकाऊंट असेल तर असा बनवा इंस्टाग्राम अकाऊंट

तुमच्याकडे फेसबुक अकाऊंट असेल तर तुम्ही त्या अकाऊंटच्या मदतीनं इंस्टाग्राम अकाऊंट बनवू शकता. दोन्ही अकाऊंट एकाच लॉगइन पासवर्डनं अ‍ॅक्सेस करता येतील. तसेच तुम्ही दोन्ही अकाऊंटची प्रोफाईल इंफॉर्मेशन जसे की नाव, प्रोफाईल फोटो, युजरनेम आणि अवतार सिंक करू शकता. त्याचबरोबर अकाऊंट सेंटरवरून तुम्ही दोन्ही अकाऊंट एकत्र मॅनेज करू शकता.

स्टेप 1 : सर्वप्रथम कंप्यूटरमध्ये इंस्टाग्रामची वेबसाइट ओपन करा.

स्टेप 2 : वेबसाइट ओपन केल्यावर लॉगइन विथ फेसबुक लिंकवर क्लिक करा. पुढील पेजवर फेसबुकच्या आयडी पासवर्डनं लॉगइन करा. त्यानंतर नाव, प्रोफाईल फोटो आणि अवतार सिंक करा.

स्टेप 3 : पुढील पेजवर इंस्टाग्रामची टर्म अँड पॉलिसी दिसतील, त्या अ‍ॅक्सेप्ट केल्यावर तुमचा अकाऊंट तयार होईल.

The post जाणून घ्या कसं बनवायचं इंस्टाग्राम अकाऊंट, अशी आहे सोपी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/instagram-account-kasa-banavayach/feed/ 0
इन्स्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/instagram-varun-paise-kase-kamavayache/ https://www.91mobiles.com/marathi/instagram-varun-paise-kase-kamavayache/#respond Mon, 12 Jun 2023 03:50:27 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21038 तुम्हाला माहित आहे का इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेयर करून तुम्ही पैसे पण कमवू शकता. जर तुम्ही देखील इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुमच्या पोस्ट आणि रील्सच्या माध्यमातून कमाई करता येईल. परंतु ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं अकाऊंट नॉर्मल अकाऊंटवरून प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करावं लागेल. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला सर्वप्रथम नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करण्याची पद्धत सांगणार आहोत. […]

The post इन्स्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
तुम्हाला माहित आहे का इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेयर करून तुम्ही पैसे पण कमवू शकता. जर तुम्ही देखील इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह असाल तर तुमच्या पोस्ट आणि रील्सच्या माध्यमातून कमाई करता येईल. परंतु ह्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमचं अकाऊंट नॉर्मल अकाऊंटवरून प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करावं लागेल. ह्या आर्टिकलमध्ये आम्ही तुम्हाला सर्वप्रथम नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करण्याची पद्धत सांगणार आहोत. त्यानंतर आम्ही या आर्टिकलमध्ये काही अशा पद्धती सांगितल्या आहेत, ज्यांच्या मदतीनं तुम्ही इन्स्टाग्रामवर कमाई करू शकता.

इन्स्टाग्राममध्ये प्रोफेशनल अकाऊंट कसं बनवायचं?

इन्स्टाग्रामवर जेव्हा आपण अकाऊंट बनतो तेव्हा ते साधं अकाऊंट असतं. इन्स्टाग्रामवरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला तुमचं नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटमध्ये रूपांतरित करावं लागेल. इन्स्टाग्रामवर प्रोफेशनल अकाऊंट देखील प्रकारचे असतात. ह्यात एक क्रिएटर अकाऊंट आणि दुसरं बिजनेस अकाऊंट असतं.

स्टेप 1 : सर्वप्रथम ‘सेटिंग अँड प्रायव्हसी’ मेन्यूवर क्लिक करा.

स्टेप 2 : इथे तुम्हाला अकाऊंट टाइप अँड टूल्सवर टॅप करा.

स्टेप 3 : एक नवीन पेज उघडेल, ज्यात स्विच टू प्रोफेशनल अकाऊंटवर टॅप करा. इथे काही सूचना दिसतील त्या फॉलो करून तुम्हाला पुढे जावं लागेल.

स्टेप 4 : इथे तुम्हाला क्रिएटर अकाऊंट आणि बिजनेस अकाऊंटचे दोन ऑप्शन मिळतील.

जर तुमचा बिजनेस असेल तर इन्स्टाग्रामवर बिजनेस अकाऊंट सिलेक्ट करा आणि जर तुम्ही सामान्य क्रिएटर असाल तर क्रिएटर अकाऊंटवर क्लिक करा. अशाप्रकारे तुम्ही तुमचं नॉर्मल अकाऊंट प्रोफेशनल अकाऊंटवर स्विच करू शकता.

इन्स्टाग्रामवरून अशाप्रकारे कमवा पैसे

इन्फ्लूअन्सर बनून

जर इन्स्टाग्रामवर तुमचे फॉलोवर जास्त असतील तर तुम्ही इन्फ्लूअन्सर बनून प्रोडक्ट प्रमोट करू शकता. परंतु ह्यासाठी तुमचे इन्स्टाग्रामवर फॉलोअलर्स जास्त असणं आवश्यक आहे, तरच मोठे ब्रँड तुमच्याशी कॉलॅब्रेशन करतील. तसेच फॉलोअर्स तुमचे ऐकणारे असावे आणि तुमच्या पोस्टवर चांगली एंगेजमेंट असावी. इन्स्टाग्रामवर इन्फ्लूअन्सर बनून तुम्ही चांगली कमाई करू शकता.

अफिलीएट मार्केटिंग

अफिलीऐट मार्केटिंग आणि स्पॉन्सर पोस्ट एकसारखे बिजनेस मॉडेल आहेत. परंतु अफिलीऐट मार्केटिंगमध्ये तुम्हाला तेव्हाच पेमेंट मिळतं जेव्हा तुमच्या लिंकवरून एखादा युजर प्रोडक्ट किंवा सर्व्हिस खरेदी करतो. तसेच स्पॉन्सर्स पोस्टसाठी तुम्हाला थेट पैसे मिळतात. अफिलीएट मार्केटिंग खूप चॅलेंजिंग आहे कारण तुमचे फॉलोअर्स असावे असे असावे लागत जे तुम्ही सांगितल्यावर एखादं प्रोडक्ट किंवा सर्व्हिस वापरतील. इन्स्टाग्राम युजर्सना फक्त बायोमध्ये क्लिकेबल लिंक टाकण्याची परवानगी देतो. त्यामुळे प्रोमो कोडच्या माध्यमातून तुम्ही इन्स्टाग्रामवरून पैसे कमवू शकता.

इन्स्टाग्राम शॉप

तुम्ही इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून ई-कॉमर्स स्टोर शॉप सेट करू शकता. अशाप्रकारे तुम्ही इन्स्टाग्रामवर पोस्ट, स्टोरी आणि रील टाकून प्रोडक्ट प्रमोट करू शकता. उदारहणार्थ, जर तुमचं कपड्यांचं दुकान असेल तर तुम्ही तुमच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून तुमचे कपडे ऑनलाइन विकू शकता. जर तुमच्याकडे चांगल्या क्वॉलिटीचं सामान असेल तर तुम्ही इन्स्टाग्रामवर वेगानं वाढू शकता.

कॅप्शन रायटिंग

इन्स्टाग्रामवर पोस्टसाठी तुम्हाला कॅप्शन लागतं. तुम्ही इतर इन्स्टाग्राम युजर्ससाठी कॅप्शन रायटिंग करून पैसे कमवू शकता. काही ब्रँड आपल्या प्रोडक्ट आणि सर्व्हिसच्या मार्केटिंगसाठी Instagram चा वापर करता, परंतु त्यांना आकर्षक कॅप्शन हवं असतं. तुम्ही कॅप्शन लिहून पैसे कमवू शकता.

इन्स्टाग्राम कन्सल्टंट

जर तुम्ही इन्स्टाग्रामवरील कसलेले खेळाडू असाल तर तुम्ही दुसऱ्या युजर्ससाठी कन्स्लटंट म्हणून वेगानं मदत करू शकता. अनेक युजर्स आपले इन्स्टाग्राम फॉलोअर्स वाढवणे आणि इन्स्टाग्रामवरून पैसे कमावण्यासाठी संघर्ष करत आहेत. अशा युजर्सना तुम्ही इन्स्टाग्राम कन्सल्टंट म्हणून मदत करू शकता. अशाप्रकारे तुम्ही चांगली कमाई करू शकता.

डिजिटल आर्टवर्क तयार करू शकता

जर तुम्ही पोस्टर, फोटो, पेंटिंग, अ‍ॅनिमेशन आणि व्हिडीओ सारखे आर्टवर्क चांगल्यापद्धतीने बनवू शकत असता तर तुम्ही हे डिजिटल आर्टवर्कच्या माध्यमातून इन्स्टाग्रामवर पैसे कमवू शकता. इन्स्टाग्रामवर अनेक ब्रँड, कंपन्यांना आणि युजर्सना डिजिटल आर्टवर्कची आवश्यकता असते. तुम्ही तुमचं सॅंपल आर्टवर्क शेयर करून फ्रीलांस काम करू शकता. इन्स्टाग्रामवर आर्टवर्क बनवून तुम्ही ह्या प्लॅटफॉर्मवरून चांगली कमाई करू शकता.

The post इन्स्टाग्रामवरून पैसे कसे कमवायचे, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/instagram-varun-paise-kase-kamavayache/feed/ 0
इन्स्टाग्रामवरील कोणताही व्हिडीओ डाउनलोड करण्याची सर्वात सोपी ट्रिक https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-instagram-story-and-video/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-instagram-story-and-video/#respond Sun, 05 Feb 2023 12:30:22 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13193 एकेकाळी फोटो शेअरिंग अ‍ॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्स्टाग्रामनं सध्या आपलं लक्ष व्हिडीओवर केंद्रित केलं आहे. रिल्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु विनोदी किंवा माहितीपर रिल्स थेट व्हिडीओ स्वरूपात डाउनलोड करण्याचा Instagram अ‍ॅपमध्ये पर्याय नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे इंस्टाग्राम नाही अशा लोकांना व्हिडीओ ऑफलाईन दाखवता येत नाही. परंतु आमच्याकडे अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज […]

The post इन्स्टाग्रामवरील कोणताही व्हिडीओ डाउनलोड करण्याची सर्वात सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
एकेकाळी फोटो शेअरिंग अ‍ॅप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इन्स्टाग्रामनं सध्या आपलं लक्ष व्हिडीओवर केंद्रित केलं आहे. रिल्सची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु विनोदी किंवा माहितीपर रिल्स थेट व्हिडीओ स्वरूपात डाउनलोड करण्याचा Instagram अ‍ॅपमध्ये पर्याय नाही. त्यामुळे ज्यांच्याकडे इंस्टाग्राम नाही अशा लोकांना व्हिडीओ ऑफलाईन दाखवता येत नाही. परंतु आमच्याकडे अशा काही ट्रिक्स आहेत ज्यांच्या मदतीनं तुम्ही सहज इन्स्टाग्राम व्हिडीओ ऑफलाइन बघण्यासाठी डाउनलोड करू शकता. यासाठी तुम्हाला थर्ड पार्टी अ‍ॅप किंवा ब्राउजरचा वापर करावा लागेल. व्हिडीओ सोबतच आम्ही तुम्हाला इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड करण्याची सोपी पद्धत सांगितली आहे.

अँड्रॉइड आणि आयफोनवर अशाप्रकारे करा इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड

Android आणि iPhone वर इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी अनेक टूल आहेत. हे टूल सर्व ब्राउजरमधून वापरता येतात. इथे आम्ही तुम्हाला ingramer.com च्या मदतीनं इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करण्याची पद्धत सांगणार आहोत. तसेच तुम्ही w3toys.com चा देखील वापर करू शकता. दोन्ही प्लॅटफॉर्मवरून व्हिडीओ डाउनलोड करण्याची प्रक्रिया जवळपास एक सारखी आहे. हे देखील वाचा: PUBG Mobile 2.2 update: Erangel चा मॅप बदलणार! छोटया नवीन मॅपसह येतंय नवीन पबजी; जाणून घ्या सविस्तर माहिती

How To Download Instagram Story And Video

  • सर्वप्रथम ingramer.com ओपन करा.
  • त्यानंतर हॅमबर्ग आयकॉनवर ‘Tools’ –> ‘Downloader’ –> नंतर कॅटेगरी सिलेक्ट करा. यात तुम्हाला फोटो,व्हिडीओ, प्रोफाईल स्टोरी आणि IGTV ऑप्शन दिसेल.
  • आता जो व्हिडीओ हवा आहे त्याची इंस्टाग्रामवरील व्हिडीओ लिंक इंस्टाग्रामवरून कॉपी करून घ्या.
  • कॉपी केलेली लिंक ingramer मध्ये दिसत असलेल्या URL box मध्ये पेस्ट करा आणि सर्च बटनवर क्लिक करा.
  • त्यानंतर सर्च रिजल्ट बघण्यासाठी स्क्रोल डाउन करा.
  • पुन्हा डाउनलोड बटनवर सिलेक्ट करून व्हिडीओ अँड्रॉइड किंवा आयफोनमध्ये डाउनलोड करा.

Windows/ macOS लॅपटॉप आणि PCs वर अशाप्रकारे करा इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड

वरील इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड टूल विंडोज 7/विंडोज 10 पीसी आणि लॅपटॉपसह मॅक ओएस डिवाइसवर वापरता येईल. परंतु अजून एक पद्धत आहे जिचा वापर करून डेस्कटॉप वर Instagram व्हिडीओ डाउनलोड करता येईल. तुम्ही तुमच्या डिवाइसवर व्हिडीओ/फोटो सेव्ह करण्यासाठी Google क्रोम एक्सटेंशन ‘Downloader for Instagram’ चा वापर करू शकता.

How To Download Instagram Story And Video

  • इन्स्टाग्राम व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम Google Chrome Web Store वर ‘Downloader for Instagram’ असं सर्च करावं लागेल. तसेच तुम्ही या लिंकव्हर क्लिक करून थेट extensions पेजवर जाल.
  • त्यानंतर ‘Add to Chrome’ ची निवड करा. त्यामुळे तुमच्या क्रोम वेब ब्राउजरमध्ये हे एक्सटेंशन इंस्टॉल होईल.
  • त्यानंतर इन्स्टाग्राम व्हिडीओ लिंक कॉपी करा.
  • कॉपी लिंक क्रोम एक्सटेंशनवर पेस्ट करून डाउनलोड करा.

डेस्कटॉपच्या माध्यमातून इन्स्टाग्राम स्टोरीज, फोटो, प्रोफाइल आणि रील व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. काही एक्सटेंशन प्रत्येक Instagram फोटो किंवा मीडिया फाइलवर डाउनलोड बटन देतात.

Instagram Reels डाउनलोड

जर तुम्ही इन्स्टाग्राम रील्स व्हिडीओ डाउनलोड करायचा असेल तर वर सांगितलेल्या एक्सटेंशनच्या मदतीनं तुम्ही रील्स व्हिडीओ देखील सहज डाउनलोड करू शकता. अशाप्रकारे तुम्ही काही सेकंदात रील्स व्हिडीओ डाउनलोड करू शकता.

How To Download Instagram Story And Video

Instagram प्रायव्हेट अकाऊंटचे व्हिडीओ कसे डाउनलोड करावे

इन्स्टाग्राम प्रायव्हेट अकाऊंटवरील व्हिडीओ डाउनलोड करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला त्या अकाऊंटला फॉलो करावं लागेल. जर तुम्ही ते अकाऊंट फॉलो करत नसाल तर प्रायव्हेट अकाऊंटवरील व्हिडीओ वरील पद्धतीनं डाउनलोड करता येत नाहीत. हे देखील वाचा: What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

How To Download Instagram Story And Video

Instagram स्टोरी डाउनलोड

  • तुम्हाला ज्या युजरची इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड करायची आहे सर्वप्रथम त्याची लिंक कॉपी करा.
  • त्यानंतर तुम्हाला StorySaver.net वर जा.
  • लिंक ‘Enter Instagram account username’ बॉक्समध्ये पेस्ट करा.
  • त्यानंतर डाउनलोड ऑप्शन सिलेक्ट करा.
  • स्क्रॉल डाउन करून ‘Save as Option’ वर चेक करा आणि थोड्या वेळात इन्स्टाग्राम स्टोरी डाउनलोड होईल.

The post इन्स्टाग्रामवरील कोणताही व्हिडीओ डाउनलोड करण्याची सर्वात सोपी ट्रिक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-download-instagram-story-and-video/feed/ 0
Instagram आणि WhatsApp वर तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून कसा ठेवायचा? https://www.91mobiles.com/marathi/75-independence-day-how-to-change-tiranga-dp-instagram-whatsapp/ https://www.91mobiles.com/marathi/75-independence-day-how-to-change-tiranga-dp-instagram-whatsapp/#respond Sun, 14 Aug 2022 05:16:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12222 75th Independence Day येत आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात बुडला आहे. भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या साजरा करण्यासाठी Har Ghar Tiranga अभियान सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचं आव्हान केलं आहे. तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय आपला DP म्हणजे प्रोफाईल पिक्चरवर राष्ट्रध्वजाचा फोटो लावत आहेत. जर […]

The post Instagram आणि WhatsApp वर तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून कसा ठेवायचा? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
75th Independence Day येत आहे. संपूर्ण देश तिरंग्याच्या रंगात बुडला आहे. भारत सरकारकडून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवच्या साजरा करण्यासाठी Har Ghar Tiranga अभियान सुरु करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला आपल्या घरावर तिरंगा फडकावण्याचं आव्हान केलं आहे. तसेच 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने भारतीय आपला DP म्हणजे प्रोफाईल पिक्चरवर राष्ट्रध्वजाचा फोटो लावत आहेत. जर तुम्ही देखील Whatsapp किंवा Instagram वर Tiranga Dp म्हणून ठेवू इच्छित असाल तर पुढे आम्ही खूप सोपी पद्धत सांगितली आहे.

इन्स्टाग्रामवर प्रोफाईल पिक्चर कसं बदलायचं/ How to Change Instagram Profile Photo

1. Instagram वर खाली डावीकडे असलेल्या प्रोफाईल आयकॉन वर क्लिक करा.

2. प्रोफाईल ओपन झाल्यानंतर त्यात Edit Profile ऑप्शन दिसेल त्यावर टॅप करा.

3. इथे Change Profile Photo चा ऑप्शन येईल, त्यावर टच करा.

4. New Profile Phone ऑप्शनची निवड करा आणि गॅलरीमध्ये सेव्ह असलेला तिरंग्याचा फोटो सिलेक्ट करा

5. फोटोची साईज अडजेक्ट करा ओके बटनवर क्लिक करा. Tiranga Instagram Dp वर सेट होईल.

व्हॉट्सअ‍ॅपवर प्रोफाईल पिक्चर कसं बदलायचं/ How to Change WhatsApp Profile Photo

1. WhatsApp मध्ये सर्वातवर डावीकडे तीन डॉट दिसतील, त्यावर टॅप करा.

2. इथे ऑप्शन्सच्या यादी ओपन होईल, जिथे Settings चा पर्याय निवडा.

3. आता WhatsApp Profile Picture दिसेल, त्यावर टच करताच DP वर कॅमेरा आयकॉन येईल.

4. या कॅमेरा आयकॉनवर क्लिक केल्यावर Camera आणि Gallery चा पर्याय येईल, गॅलरीच्या ऑप्शनची निवड करा.

5. इथे गॅलरीमध्ये सेव्ह तिरंग्याचा फोटो सिलेक्ट करून Done करा. Tiranga WhatsApp Dp वर सेट होईल.

नोट: इन्स्टाग्राम किंवा व्हॉट्सअ‍ॅपवर आपल्या प्रोफाईल पिक्चरवर तिरंगा ठेवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये राष्ट्रध्वज तिरंग्याचा फोटो डाउनलोड व सेव्ह करावा लागेल. यासाठी तुम्ही गुगलवर डायरेक्ट सर्च करू शकता आणि तुमच्या आवडीचा फोटो आधी मोबाइल फोनमध्ये सेव्ह करू शकता.

The post Instagram आणि WhatsApp वर तिरंगा प्रोफाईल पिक्चर म्हणून कसा ठेवायचा? first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/75-independence-day-how-to-change-tiranga-dp-instagram-whatsapp/feed/ 0
Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-deactivate-instagram-account-simple-steps/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-deactivate-instagram-account-simple-steps/#respond Mon, 17 May 2021 18:29:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=10948 Instagram अकाउंट तात्पुरते डीअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. लक्षात असू द्या कि हे काम फक्त वेब ब्राउजरमधून करता येते कारण इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये यासाठी ऑप्शन देण्यात आला नाही.

The post Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोशल मीडिया साइट Instagram मित्रांच्या संपर्कात राहण्यासाठी एक चांगले माध्यम आहे. पण अनेकदा आपल्याला याचा कंटाळा येतो आणि काही दिवस या प्रकारच्या सोशल मीडियापासून काही हात लांब राहावे असे वाटते. अश्यावेळी सर्वप्रथम तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट डिलीट किंवा डीअ‍ॅक्टिव्हेट करावे. लक्षात असू द्या कि फक्त इंस्टग्राम अ‍ॅप काढून टाकल्याने हे काम होत नाही. आता तुम्ही विचार करत असाल कि हे काम कसे करता येईल आणि किती वेळाने आपण हे अकाउंट पुन्हा रिस्टोर करू शकतो किंवा नाही करू शकत. या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी आम्ही तुम्हाला हे काम करण्याची संपूर्ण प्रक्रिया सोप्प्या स्टेप्समध्ये सांगणार आहोत. (How to delete deactivate Instagram account simple steps)

एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल कि तुमचे इंस्टाग्राम अकाउंट तेव्हा डिलीट करा जेव्हा तुम्ही याबाबत ठोस निर्णय घेतला असेल कारण एकदा अकाउंट डिलीट झाले कि ते पुन्हा मिळवण्याची कोणतीही पद्धत उपलब्ध नाही. परंतु, इंस्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर हे पुन्हा अ‍ॅक्टिव्ह केले जाऊ शकते.

इंस्टाग्राम अकाउंट कशाप्रकारे करावे डीअ‍ॅक्टिव्हेट

Instagram अकाउंट तात्पुरते डीअ‍ॅक्टिव्हेट करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करा. लक्षात असू द्या कि हे काम फक्त वेब ब्राउजरमधून करता येते कारण इंस्टाग्राम अ‍ॅपमध्ये यासाठी ऑप्शन देण्यात आला नाही.

Instagram

  • सर्वप्रथम आपल्या फोनचा किंवा डेस्कटॉपच्या ब्राउजरमधून https://www.instagram.com ओपन करून तुमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर लॉग इन करा.
  • अकाउंट लॉग इन केल्यानंतर प्रोफाइल आयकॉनवर क्लिक करा जो टॉप राइट कॉर्नरवर असेल. त्यानंतर ‘Profile’ सिलेक्ट करा.
  • प्रोफाइल सिलेक्ट केल्यानंतर ‘Edit Profile’ ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर खाली स्क्रोल करा जोपर्यंत ‘Temporarily disable my account’ ऑप्शन दिसत नाही.
  1. डिसेबल बटणवर क्लिक केल्यानंतर इंस्टाग्राम पेजवर ड्रॉप डाउन मेन्यू येईल ज्यात इंस्टाग्राम तुम्हाला विचारेल – तुम्हाला अकाउंट का डिअ‍ॅक्टिव्हेट करायचे आहे? ड्रॉप डाउन बॉक्स बघा आणि त्यावर क्लिक करा. त्या ड्रॉपडाउन बॉक्समध्ये काही कारणे असतील. जे कारण तुम्हाला योग्य वाटेल त्याची निवड करा.
  • त्यानंतर ‘Temporarily Disable Account’ बटणवर टॅप करून इंस्टाग्राम अकाउंट डीअ‍ॅक्टिव्हेट केले जाऊ शकते.

एकदा जर तुम्ही सर्व स्टेप्स फॉलो केल्या तर तुम्ही तुमचे इंस्टाग्राम अकाउंट यशस्वीरीत्या डीअ‍ॅक्टिव्हेट करू शकाल. जर तुम्ही पुन्हा तुमचे इंस्टाग्राम अकाउंट सक्रिय करू इच्छित असाल तर तुम्हाला फक्त अकाउंट लॉग-इन करावे लागेल.

इंस्टाग्राम अकाउंट डिलीट कसे करावे

जर तुम्ही कायमस्वरूपी तुमचे अकाउंट काढून टाकू इच्छित असाल तर अकॉउंट डिलीट करणे फायदेशीर ठरेल. तुम्ही तुमच्या Instagram अकाउंटसोबतच सर्व डेटा पण काढून टाकू शकता. या कामासाठी पण तुम्हाला वेब ब्राउजरचा वापर करावा लागेल.

Instagram

  • इंस्टाग्राम अकाउंट डिलीट करण्यासाठी तुम्हाला डेस्कटॉप किंवा मोबाईलच्या मदतीने ब्राउजरवर आपले अकाउंट लॉग-इन करावे लागेल.
  • अकाउंटच्या होम पेजवर युजर नेमवर क्लिक करा जी स्क्रीनच्या उजवीकडे असेल. युजरनेमवर क्लिक करून तुम्हाला ड्रॉप डाउन बॉक्स (drop down box) चा ऑप्शन दिसेल.
  • ड्रॉप डाउन बॉक्समध्ये एक ऑप्शन असेल- Edit Profile. या लिंकवर क्लिक करा.
  • Edit Profile निवडल्यावर जे पेज येईल, त्यात तुमच्या अकाउंटबाबत माहिती असेल (जी तुम्ही हवी असल्यास आता एडिट करू शकता) पेजवर खाली स्क्रोल करत जा, जिथे तुम्हाला एक बटण- I’d like to delete my account दिसले . त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुमचा पासवर्ड टाका आणि कायमस्वरूपी अकाउंट डिलीट करण्याच्या ऑप्शनवर टॅप करा.

लक्षात असू द्या कि जेव्हा तुम्ही तुमचा Instagram अकाउंट डिलीट कराल तेव्हा इंस्टाग्रामवर अपलोड केलेले फोटो आणि व्हिडीओ पण डिलीट होतील. यासाठी तुम्ही आधीच बॅकअप घ्यावा.

The post Instagram पासून राहायचे आहे का दूर मग अश्याप्रकारे करा तुमचे अकाउंट डिलीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-delete-deactivate-instagram-account-simple-steps/feed/ 0
TikTok चा धमाका, फेसुबक-इंस्टाग्रामला मागे टाकत सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-most-downloaded-social-media-app-in-september-report/ https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-most-downloaded-social-media-app-in-september-report/#respond Thu, 24 Oct 2019 13:59:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5591 टिकटॉक आणि फेसबुक व्यतिरिक्त Instagram, Likee आणि Snapchat सारखे ऍप्स टॉप-5 च्या यादीत आहेत.

The post TikTok चा धमाका, फेसुबक-इंस्टाग्रामला मागे टाकत सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
विडियो मेकिंग ऍप TikTok सध्या सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया मोबाईल ऍपलिकेशन बनला आहे. यावर्षी हा ऍप काही काळासाठी बॅन पण केला गेला होता. पण काही दिवसांनी हा ऍप पुन्हा एकदा डाउनलोड साठी उपलब्ध झाला होता.

या ऍपच्या लोकप्रियतेचा अंदाज यावरून लावता येतो कि हा फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या मोठ्या ऍप्सना मागे टाकून सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला आहे. ऍप ऍनॅलिटीक्स प्लॅटफॉर्म Sensor Tower च्या रिपोर्ट मध्ये हि माहिती समोर आली होती.

रिपोर्टनुसार Tiktok यावर्षी सप्टेंबर मध्ये सर्वात जास्त डाउनलोड केला गेलेला सोशल मीडिया ऍप बनला आहे.हा फक्त गूगल प्ले स्टोर नाही तर ऍप्पल ऍप स्टोर वर पण सर्वात जास्त यूजर्सने डाउनलोड केला आहे. यानंतर फेसबुक आणि इस्टाग्रामचा नंबर येतो.

हे देखील वाचा: Exclusive : येत आहे OPPO Reno S, यात असले 64 MP कॅमेरा, स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट आणि 65W SuperVOOC 2.0 टेक्नॉलॉजी

रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि जवळपास 60 मिलियन इंस्टॉल सह TikTok सप्टेंबर 2019 पासून जगातील मोस्ट डाउनलोडेड ऍप आहे. खास बाब अशी कि टीकटॉक ऍप सर्वात जास्त भारतात डाउनलोड केला गेला आहे. भारतात याचे एकूण डाउनलोड्सच्या 44 टक्के आणि अमेरिकेत 8 टक्के डाउनलोड केले गेले आहेत.

भारतात Tiktok ची नशा यूजर्सना चढली आहे. याचा अंदाज रोज येत असलेल्या वीडियोज वरून लावता येतो. टीकटॉक वरील वीडियो फेसबुक आणि इंस्टाग्राम वर भरपूर शेयर पण केले जातात. या ऍपने अनेकांना प्रसिद्धी पण दिली आहे.

हे देखील वाचा: Samsung ने आणली दिवाळी भेट, Galaxy S10e वर 3000 रुपयांची सूट आणि Galaxy A70s सोबत 1999 रुपयांचे हेडफोन फ्री

प्रसिद्ध ऍप फेसबुक बद्दल बोलायचे तर सप्टेंबर 2019 मध्ये हा जगभरात डाउनलोड केल्या गेलेल्या सोशल मीडिया ऍप्सच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर होता. टिकटॉक आणि फेसबुक व्यतिरिक्त Instagram, Likee आणि Snapchat सारखे ऍप्स टॉप-5 च्या यादीत आहेत.

The post TikTok चा धमाका, फेसुबक-इंस्टाग्रामला मागे टाकत सर्वात जास्त डाउनलोड होणारा ऍप बनला first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/tik-tok-most-downloaded-social-media-app-in-september-report/feed/ 0
30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-facebook-instagram-will-not-work-on-these-phones-from-april-30/ https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-facebook-instagram-will-not-work-on-these-phones-from-april-30/#respond Fri, 05 Apr 2019 13:33:42 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4026 वेळेनुसार कंपनीला यूजर्सनी नवीन फोन वापरावे असे वाटते.

The post 30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सोशल मीडिया विश्वातली दिग्गज कंपनी फेसबुक आपल्या काही ऍप्सचा सपोर्ट विंडोज फोन प्लॅटफॉर्म वर बंद करण्याचे प्लानिंग करत आहे. कंपनी 30 ऍप्रिल नंतर अनेक विंडोज फोन वर फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजर ऍप चालणार नाहीत. अशी माहिती माइक्रोसॉफ्टच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.

सर्वात आधी हि बातमी एनगॅजेट वर दिसली होती, नंतर माइक्रोसॉफ्टने स्वतःहून स्पष्ट केले आहे. पण व्हाट्सऍप बद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही कि कंपनी व्हाट्सऍप सपोर्ट पण विंडोज फोन वरून काढून टाकेल कि नाही.

कारण व्हाट्सऍप फेसबुकच्या मालकीचे आहे. त्यात आधीच माइक्रोसॉफ्ट विंडोज फोन प्लॅटफॉर्म बंद झाला आहे आणि आता कोणत्याही फोन मध्ये विंडोज ओएस मिळत नाही. पण अजूनही काही यूजर्स आहेत जे विंडोज फोन प्लॅटफॉर्म वापरत आहेत.

जर तुमच्याकडे पण विंडोज 10 प्लॅटफॉर्म वर चालणारा फोन असेल तर त्यात इंस्टाग्राम, फेसबुक आणि मेसेंजर ओपन केल्यावर एक मेसेज येईल. मेसेज मध्ये लिहून येईल कि हा ऍप या फोन मध्ये 30 ऍप्रिलला बंद होईल. हा मेसेज सर्वात आधी रेडिट यूजर ने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर बघितला होता.

पण तुम्ही थर्ड पार्टी ऍप्सच्या मदतीने फेसबुक, इंस्टाग्राम आणि मेसेंजरचा वापर करू शकता. याआधी कंपनीने व्हाट्सऍप सपोर्ट पण अनेक फोन्स मध्ये बंद केला आहे. याचा थेट अर्थ असा निघतो कि वेळेनुसार कंपनीला यूजर्सनी नवीन फोन वापरावे असे वाटते.

The post 30 ऍप्रिल नंतर या फोन्स मध्ये चालणार नाही Facebook आणि Instagram, तुमचा फोन आहे का या लिस्ट मध्ये first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/whatsapp-facebook-instagram-will-not-work-on-these-phones-from-april-30/feed/ 0