iPhone 14 Pro - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Thu, 09 Mar 2023 10:49:17 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट https://www.91mobiles.com/marathi/realme-mini-capsule-could-come-in-c-series-smartphone/ https://www.91mobiles.com/marathi/realme-mini-capsule-could-come-in-c-series-smartphone/#respond Thu, 23 Feb 2023 09:22:09 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=18091 iPhone 14 series मध्ये Apple नं आपल्या मोबाइल्सची स्क्रीन स्टाईल बदलून Dynamic Island डिस्प्ले सादर केला आहे. नॉच आणि पंच-होलचं हे मिश्रण लोकांना खूप आवडलं. आता अशीच डिस्प्ले डिजाईन Realme C-series च्या स्मार्टफोन्समध्ये देखील मिळू शकते. कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी ट्वीटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे ज्याला ‘Realme Mini Capsule’ असं नाव देण्यात आलं […]

The post Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C-series स्मार्टफोन्समध्ये iPhone Dynamic Island डिस्प्ले दिला जाऊ शकतो.
  • कंपनी याला Realme Mini Capsule असं नाव देऊ शकते.
  • रियलमी व्हीपी माधव सेठ यांनी ही माहिती एके ट्वीटमधून दिली आणि नंतर डिलीट केली.

iPhone 14 series मध्ये Apple नं आपल्या मोबाइल्सची स्क्रीन स्टाईल बदलून Dynamic Island डिस्प्ले सादर केला आहे. नॉच आणि पंच-होलचं हे मिश्रण लोकांना खूप आवडलं. आता अशीच डिस्प्ले डिजाईन Realme C-series च्या स्मार्टफोन्समध्ये देखील मिळू शकते. कंपनीचे व्हीपी माधव सेठ यांनी ट्वीटच्या माध्यमातून याची घोषणा केली आहे ज्याला ‘Realme Mini Capsule’ असं नाव देण्यात आलं आहे.

Realme Vice President Madhav Sheth यांनी आपल्या ऑफिशियल ट्वीटर हँडलच्या माध्यमातून काल घोषणा केली होती की, कंपनीच्या ‘सी’ सीरीज स्मार्टफोन्समध्ये Realme Mini Capsule डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन स्टाईल मोठ्या प्रमाणावर iPhone 14 Pro आणि Pro Max सारखी होती. रियलमी फॅन्स हे पाहून खूप उत्सुक झाले होते परंतु काही तासांनी माधव सेठ यांनी हे ट्वीट डिलीट केलं. हे देखील वाचा: असे असतील Realme GT Neo 5 SE चे स्पेसिफिकेशन्स; लाँचपूर्वीच लीक झाली महत्वाची माहिती

Realme C-series स्मार्टफोन्समधील हे मिनी कॅप्सूल फिचर पाहून ब्रँडचे फॉलोवर्स जितके खुश झाले होते, तेवढेच माधव सेठ यांनी ट्वीट डिलीट केल्यावर नाराज झाले आहेत. लोकांना आशा होती की आगामी Realme C55 मध्ये ही नवीन डिस्प्ले स्टाईल मिळेल, परंतु आता यावर विश्वास ठेवणं कठीण झालं आहे. महागड्या आयफोन सारखा डिस्प्ले स्वस्त रियलमी फोन्समध्ये मिळेल की नाही या माहितीसाठी थोडा वेळ वाट पाहावी लागेल.

Realme C55

रियलमी सी55 बद्दल बोलायचं झालं तर याबाबत अनेक लीक्स आतापर्यंत समोर आले आहेत. अलीकडेच याबाबत सांगण्यात आलं आहे की हा स्मार्टफोन तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो. यात 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज, 4जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज तसेच 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेजचा समावेश असू शकतो. तसेच रिपोर्टनुसार रियलमी सी55 भारतीय बाजारात Rainforest (Green), Rainy Night (black) आणि Sunshower (orange) कलरमध्ये विकला जाईल. हे देखील वाचा: सुरु झाली Revolt RV400 electric bike ची प्री-बुकिंग; चार्जिगविना धावते 150KM

हा स्मार्टफोन इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS सह अनेक ठिकाणी लिस्ट झाला आहे. हा मोबाइल फोन 5,000एमएएचच्या बॅटरीसह लाँच होईल जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते, अशी चर्चा आहे. फोटोग्राफीसाठी या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाऊ शकतो. फोनच्या ठोस स्पेसिफिकेशन्स व लाँच डिटेल्ससाठी आता कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.

The post Realme Mobile मध्ये मिळणार iPhone 14 Pro सारखा डिस्प्ले! माधव सेठ यांनी चुकून केलं ट्वीट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-mini-capsule-could-come-in-c-series-smartphone/feed/ 0
MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-display-type-smartphone-xiaomi-13-lite-5g-price-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-display-type-smartphone-xiaomi-13-lite-5g-price-specifications-leaked/#respond Mon, 20 Feb 2023 07:02:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17951 Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल आणि त्याचबरोबर कंपनी Xiaomi 13 देखील भारतात आणू शकते. आता बातमी आली आहे की शाओमी आपल्या नंबर सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन Xiaomi 13 Lite जोडण्याची तयारी करत आहे जो आगामी काळात मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमी 13 लाइट MWC 2023 च्या मंचावरून सादर केला जाऊ शकतो परंतु […]

The post MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Xiaomi 13 Lite 5G ची स्क्रीन स्टाईल iPhone 14 Pro सारखी असेल.
  • फोनच्या फ्रंट पॅनलवर 32MP Dual Selfie Camera दिला जाऊ शकतो.
  • या फोनची किंमत 499 यूरोच्या आसपास असू शकते.

Xiaomi 13 Pro 26 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल आणि त्याचबरोबर कंपनी Xiaomi 13 देखील भारतात आणू शकते. आता बातमी आली आहे की शाओमी आपल्या नंबर सीरीजमध्ये आणखी एक स्मार्टफोन Xiaomi 13 Lite जोडण्याची तयारी करत आहे जो आगामी काळात मार्केटमध्ये एंट्री करू शकतो. शाओमी 13 लाइट MWC 2023 च्या मंचावरून सादर केला जाऊ शकतो परंतु ताज्या लीकमध्ये या फोनच्या घोषणेपुर्वीच किंमतीची माहिती समोर आली आहे.

Xiaomi 13 Lite 5G Price

शाओमी 13 लाइट बद्दल सांगण्यात आलं आहे की हा मोबाइल फोन 8 जीबी रॅमसह लाँच केला जाऊ शकतो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करेल. लीकनुसार या स्मार्टफोनची किंमत 499 यूरोच्या आसपास असू शकते. ही किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 44,000 रुपये आहे. परंतु जर भारतात आला तर किंमत कमी होऊ शकते. लीकनुसार Xiaomi 13 Lite 5G फोन ग्लोबल मार्केटमध्ये Black, Blue आणि Pink कलरमध्ये लाँच केला जाऊ शकतो. हे देखील वाचा: BSNL चे डेली 2GB Data देणारे Prepaid Plan, कमी खर्चात मिळतील जास्त बेनिफिट्स

Xiaomi 13 Lite 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

  • 6.55″ FHD+ 120Hz AMOLED
  • 8GB RAM + 128GB Storage
  • Qualcomm Snapdragon 7 Gen 1
  • 50MP Triple Rear Camera
  • 32MP Dual Selfie Camera
  • 67W 4,500mAh battery

शाओमी 13 लाइटचे फीचर्स व स्पेसिफिकेशन्स पाहता समोर आलेल्या लीक्स नुसार हा स्मार्टफोन 6.55 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. या फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असू शकते जी इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करू शकते तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करू शकते. लीकनुसार फोन डिस्प्लेमध्ये 1920हर्ट्ज पीडब्ल्यू डिमिंग आणि 1000निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स मिळू शकतात.

Xiaomi 13 Lite 5G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो. हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआय 13 सह काम करू शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी शाओमी फोनमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 4,500एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते. हे देखील वाचा: 1 मार्चला लाँच होईल Vivo V27 Series, पाहा कोण-कोणते फोन येणार बाजारात

फोटोग्राफीसाठी शाओमी 13 लाइट 5जी फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असू शकतो. यात 50 मेगापिक्सलच्या सोनी आयएमएक्स766 प्रायमरी सेन्सरसह 20 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि एक 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो सेन्सरचा समावेश असू शकतो. तसेच फ्रंट पॅनलवर 32 मेगापिक्सलचा ड्युअल सेन्सर सेन्सर असू शकतो, असं लीकमध्ये समोर आलं आहे.

The post MWC 2023 मधील लाँचपूर्वीच Xiaomi 13 Lite ची किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-display-type-smartphone-xiaomi-13-lite-5g-price-specifications-leaked/feed/ 0
…म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-price-in-dubai/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-price-in-dubai/#respond Mon, 19 Sep 2022 12:42:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13244 स्मार्टफोन विश्वातील Apple ब्रँडच्या iPhones चं वेड जगप्रसिद्ध आहे. आयफोन आणि किडनीची 2011 मधील गोष्ट अजूनही मिम्समध्ये जिवंत आहे. आयफोनसाठी लोक काहीही करू शकतात हे पुन्हा एकदा एका गोष्टीतून सिद्ध झालं आहे. नवीन आयफोन मिळवण्यासाठी अ‍ॅप्पल फॅन कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतात आणि महागडा फोन विकत घेण्यासाठी पाण्यासारखे पैसे खर्च करताना देखील मागे पुढे पाहत नाहीत. […]

The post …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन विश्वातील Apple ब्रँडच्या iPhones चं वेड जगप्रसिद्ध आहे. आयफोन आणि किडनीची 2011 मधील गोष्ट अजूनही मिम्समध्ये जिवंत आहे. आयफोनसाठी लोक काहीही करू शकतात हे पुन्हा एकदा एका गोष्टीतून सिद्ध झालं आहे. नवीन आयफोन मिळवण्यासाठी अ‍ॅप्पल फॅन कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतात आणि महागडा फोन विकत घेण्यासाठी पाण्यासारखे पैसे खर्च करताना देखील मागे पुढे पाहत नाहीत. असंच एक उदाहरण समोर आलं आहे ज्यात नवीन iPhone 14 Pro सर्वप्रथम मिळवण्यासाठी केरळचा एक व्यक्ती विमानप्रवास करून दुबईला पोहोचला.

iPhone 14 Pro च्या खरेदीसाठी गाठली दुबई!

Apple iPhone 14 Series ची विक्री भारतात 16 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच झाले आहेत तसेच नवीन आयफोन्ससाठी लोक वेडे झाले आहेत. आयफोनचं वेड इतकं आहे होतं की एक व्यक्ती देशातील पहिला आयफोन 14 प्रो युजर बनण्यासाठी फ्लाइट पकडून दुबईला पोहोचला. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

iPhone 14 Price In Dubai

केरळमधील या व्यक्तीचे नाव धीरज पल्लियिल आहे जो कोची मधला व्यावसायिक आहे. त्याला भारतात सर्वप्रथम आयफोन 14 प्रो मिळवायचा होता. यासाठी 16 सप्टेंबरला भारतात सेल सुरु होण्याच्या एक दिवस आधी या व्यक्तीनं फ्लाइट पकडून थेट दुबई गाठली आणि तिथून त्याने आपला नवीन iPhone 14 Pro विकत घेतला. अशाप्रकारे तो आयफोन 14 प्रो विकत घेणारा सर्वात पहिला भारतीय बनला.

iPhone 14 Price in Dubai

भारतातील सर्वात पहिला iPhone 14 Pro तर मिळाला पण त्यासाठी तेवढा खर्च देखील धीरजला करावा लागला. न्यूज रिपोर्टनुसार आयफोन 14 प्रोसाठी त्याने केरळवरून दुबई पर्यंतच्या फ्लाइट टिकट बुकिंग आणि वीजावर 40,000 रुपये खर्च केले होते. तसेच दुबईला जाऊन मिर्डिफ सिटी सेंटरमधून iPhone 14 Pro 512GB Storage व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी 1,29,000 रुपये मोजले.

विमानप्रवास आणि आयफोनची किंमत मिळून त्याला हा आयफोन जवळपास 1,69,000 रुपयांना पडला आहे. भारतात आयफोन 14 प्रोच्या 512 जीबी व्हेरियंटची किंमत 1,59,900 रुपये आहे.धीरजनं या आयफोनचा नवीन पर्पल कलर व्हेरिएंट खरेदी केला आहे. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

iPhone 14 Price In Dubai

iPhone in Dubai

विशेष म्हणजे दुबईत जाऊन आयफोन विकत घेण्याची पल्लियिलची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील धीरजनं 3 वेळा दुबईला जाऊन नवीन आयफोन विकत घेतला आहे. iPhone 11 Pro Max, iPhone 12 आणि iPhone 13 देखील या व्यक्तीने भारतात विक्री सुरु होण्याच्या एक दिवस आधी दुबईत जाऊन विकत घेतले होते. धीरजनं टीओआयला सांगितलं आहे की फक्त भारतातच नव्हे तर दुबईत देखील तो आयफोन 12 आणि आयफोन 13 खरेदी करणारा पहिला ग्राहक बनला होता.

The post …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-price-in-dubai/feed/ 0
सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-pro-and-pro-max-launched-check-price-and-features/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-pro-and-pro-max-launched-check-price-and-features/#respond Wed, 07 Sep 2022 19:46:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12923 Apple iPhone 14 Pro and Pro Max launched: Apple नं अखेरीस लेटेस्ट iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. कंपनीनं चार नवीन मॉडेल iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, आणि iPhone 14 Pro Max लाँच केले आहेत. हे सर्व मॉडेल गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या iPhone 13 लाइनअपची जागा घेतील. या लेखात आपण सीरिजमधील सर्वात […]

The post सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Apple iPhone 14 Pro and Pro Max launched: Apple नं अखेरीस लेटेस्ट iPhone 14 सीरीज लाँच केली आहे. कंपनीनं चार नवीन मॉडेल iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro, आणि iPhone 14 Pro Max लाँच केले आहेत. हे सर्व मॉडेल गेल्यावर्षी लाँच करण्यात आलेल्या iPhone 13 लाइनअपची जागा घेतील. या लेखात आपण सीरिजमधील सर्वात प्रीमियम आणि नव्या डिजाईनसह आलेल्या iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची माहिती घेणार आहोत. कंपनीनं या प्रो मॉडेल्स शानदार कॅमेरा इंप्रूवमेंट्स आणि अनेक मोठे बदल केले आहेत.

Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max: फीचर्स

डिस्प्ले

सर्वप्रथम आयफोन 14 सीरिजच्या प्रो मॉडेल्समधील जी बाब उठून दिसते ती म्हणजे यातील पंच होल कटआऊट. कंपनीनं नॉच डिजाईनला डच्चू देत नवीन पिल शेप पंच होल दिला आहे ज्याला डायनॅमिक आयलंड असं नाव देण्यात आलं आहे. अ‍ॅप्पलच्या सर्वात प्रीमिमय मॉडेल्सचे डिस्प्ले पाहता Apple iPhone 14 Pro मध्ये 6.1 इंच आणि iPhone Pro Max मध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. हे डिस्प्ले 1600 निट्स ते 2000 निट्स ब्राइटनेस ऑफरकरतात . अ‍ॅप्पलचा दावा आहे की दुसरा कोणताही स्मार्टफोन इतकी ब्राइटनेस देत नाही. कंपनीनं आपल्या प्रो मॉडेल्समध्ये पहिल्यांदाच ऑलवेज ऑन डिस्प्ले दिला आहे.

नवीन प्रोसेसर

दोन्ही iPhones 14 Pro आणि iPhones 14 Pro Max मध्ये कंपनीनं लेटेस्ट A16 Bionic प्रोसेसर देण्यात आला आहे. या प्रोसेसरमुळे या फोन्सची परफॉर्मन्स, कॅमेरा आणि बॅटरी लाइफ देखील सुधारते, असं दावा कंपनीनं केला आहे. अ‍ॅप्पलचा हा नवीन प्रोसेसर 4-नॅनोमीटर आर्कटेक्चरवर बनवण्यात आला आहे. Apple चा दावा आहे की लेटेस्ट A16 Bionic प्रोसेसर अँड्रॉइड स्मार्टफोनच्या सर्वात फास्ट प्रोसेसरपेक्षा अनेक पटीनं पुढे आहे. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

48MP चा कॅमेरा

Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. अ‍ॅप्पलने प्रो मॉडेलमध्ये क्वॉड पिक्सल सेन्सर टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. हे अँड्रॉइड स्मार्टफोनमधील पिक्सल बाइनिंग टेक्नॉलॉजीला देण्यात आलेले नवीन नाव आहे. परंतु ProRAW चा वापर करून युजर्स पिक्सल बाइनिंगविना देखील इमेज कॅप्चर करू शकतात.

प्रायमरी कॅमेऱ्यासह प्रो मॉडेल्स मध्ये 12MP चा टेलीफोटो सेन्सर, आणि 12MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर देण्यात आला आहे. अल्ट्रा वाइड सेन्सरमधून मॅक्रो फोटोग्राफी देखील करता येईल. तसेच दोन्ही फोनमध्ये नवीन फोटोनिक इंजिन देखील आहे जो लो लाइटमध्ये शानदार इमेज क्लिक करतो. त्याचबरोबर या दोन्ही फोन्समध्ये अ‍ॅक्शन आणि सिनेमॅटिक मोड देखील देण्यात आले आहेत जे 4K रिजोल्यूशनमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग करतात. फ्रंटला 12MP चा सेल्फी सेन्सर नव्या ऑटो फोकस फिचरसह मिळतो.

>किंमत

किंमत पाहता iPhone 14 Pro चा बेस मॉडेल भारतात 128GB स्टोरेजसह 1,29,900 रुपयांमध्ये सादर करण्यात आला आहे. 256GB स्टोरेज मॉडेल 1,39,900 रुपये, 512GB स्टोरेज मॉडेल 1,59,900 रुपये आणि 1TB स्टोरेज मॉडेल 1,79,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच iPhone 14 Pro Max चा 128GB स्टोरेज मॉडेल 1,39,900 रुपये, 256GB स्टोरेज मॉडेल 1,49,900 रुपये, 512GB स्टोरेज मॉडेल 1,69,900 रुपये आणि 1TB व्हेरिएंट 1,89,900 रुपयांमध्ये उपलब्ध होईल.

Apple च्या लेटेस्ट मॉडेलची प्री बुकिंग 9 सप्टेंबरपासून सुरु होईल, तर प्रो मॉडेलची विक्री 16 सप्टेंबरपासून सुरु होईल. iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल चार कलर ऑप्शन – डीप पर्पल, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्लॅकमध्ये सादर करण्यात आले आहेत. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हेंचर प्रेमी भटक्यांसाठी खास Apple Watch Ultra; म्युजिक प्रेमींसाठी शानदार Apple AirPods Pro 2 लाँच

The post सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-pro-and-pro-max-launched-check-price-and-features/feed/ 0