iPhone 14 - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 12 Jul 2023 06:43:07 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 iPhone 14 वर मिळणार मोठा डिस्काउंट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमधील डीलचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-confirmed-to-get-a-huge-price-drop-for-amazon-prime-day-sale/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-confirmed-to-get-a-huge-price-drop-for-amazon-prime-day-sale/#respond Wed, 12 Jul 2023 06:43:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22347 अ‍ॅमेझॉनचा वार्षिक शॉपिंग उत्सव म्हणजे Prime Day सेल येत्या 15 जुलैला भारतात सुरु होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असेल ज्यात ग्राहकांना स्मार्टफोन्ससह अनेक प्रोडक्टसवर भरगोस डिस्काउंट मिळेल. फोन्सवरील ऑफर्समध्ये ग्राहकांना iPhone वरील ऑफर्सची आतुरता असते. यंदाही अ‍ॅमेझॉननं iPhone 14 वर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे. iPhone 14 वरील डिस्काउंट अ‍ॅमेझॉन इंडियानं कन्फर्म केलं आहे […]

The post iPhone 14 वर मिळणार मोठा डिस्काउंट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमधील डीलचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • अ‍ॅप्पलनं iPhone 14 च्या लाँचच्या वेळी बेस मॉडेलची किंमत 79,900 रुपये ठेवली होती.
  • अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेल भारतात 15 जुलैला सुरु होईल.
  • iPhone 14 ची खास किंमत बँक डिस्काउंटनंतर मिळेल.

अ‍ॅमेझॉनचा वार्षिक शॉपिंग उत्सव म्हणजे Prime Day सेल येत्या 15 जुलैला भारतात सुरु होणार आहे. हा दोन दिवसांचा सेल असेल ज्यात ग्राहकांना स्मार्टफोन्ससह अनेक प्रोडक्टसवर भरगोस डिस्काउंट मिळेल. फोन्सवरील ऑफर्समध्ये ग्राहकांना iPhone वरील ऑफर्सची आतुरता असते. यंदाही अ‍ॅमेझॉननं iPhone 14 वर मोठ्या डिस्काउंटची घोषणा केली आहे.

iPhone 14 वरील डिस्काउंट

अ‍ॅमेझॉन इंडियानं कन्फर्म केलं आहे की iPhone 14 प्राइम डे 2023 च्या सेलमध्ये 66,499 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. ही डिस्कॉउंटेड प्राइस फोनच्या 128जीबी स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची आहे. ज्यात आयसीआयसीआय बँक आणि एसबीआयच्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर मिळणाऱ्या 10% डिस्काउंटचा देखील समावेश आहे.

iPhone 14 (128GB) जेव्हा लाँच झाला होता तेव्हा ह्याची किंमत 79,900 रुपये होती आणि अधिकृत वेबसाइटवर देखील हीच किंमत आहे. गेल्या महिन्यात अ‍ॅमेझॉनवर iPhone 14 67,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला होता, त्यामुळे आगामी सेलमध्ये सध्याच्या जेनरेशनच्या आयफोनवर मोठा डिस्काउंट मिळेल हे नक्की. त्याचबरोबर अ‍ॅमेझॉन iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max वरील डिस्काउंट देखील टीज करत आहे.

iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स पाहता यात 6.1-इंच सुपर रेटिना XDR OLED स्लिम बेजल्स, HDR, 1200nits ब्राइटनेस, फेस आयडी सेन्सर आणि 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.

  • प्रोसेसर : फोनमध्ये A15 बायोनिक SoC आहे, ज्यात ग्राफिक्ससाठी 5-कोर GPU आणि 16-कोर NPU आहे.
  • रॅम/स्टोरेज : तसेच यात 4GB रॅम आणि 128GB, 256GB आणि 512GB स्टोरेजचे ऑप्शन आहेत.
  • बॅटरी आणि फास्ट चार्जिंग : 3,279एमएएचची बॅटरी फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे.
  • रियर कॅमेरा : फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. या सेटअपमध्ये f/1.5 अपर्चरसह 12MP wide-angle primary sensor आणि 12MP secondary ultra-wide-angle लेन्स आहे.
  • फ्रंट कॅमेरा : फोनमध्ये फ्रंटला देखील 12 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.
  • सॉफ्टवेअर : हा डिवाइस नवीन iOS 16 वर चालतो.
  • अन्य फीचर्स : कनेक्टिव्हिटी ऑप्शनसाठी फोनमध्ये 5G, Wi-Fi, dual SIM, Bluetooth, GPS आणि लाइटनिंग पोर्ट चार्जिंगसाठी आहे. तसेच फेस आयडीची सुरक्षा, मॅग सेफ वायरलेस चार्जिंग आणि आयपी68 रेटिंग मिळते.

    The post iPhone 14 वर मिळणार मोठा डिस्काउंट; अ‍ॅमेझॉन प्राइम डे सेलमधील डीलचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-confirmed-to-get-a-huge-price-drop-for-amazon-prime-day-sale/feed/ 0 असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14 https://www.91mobiles.com/marathi/man-received-iphone-14-by-mistake-in-flipkart-sale/ https://www.91mobiles.com/marathi/man-received-iphone-14-by-mistake-in-flipkart-sale/#respond Fri, 07 Oct 2022 09:34:47 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13774 Online Shopping fraud व फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येतात. गेल्या महिन्यात झालेल्या सेलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे स्मार्टफोन, लॅपटॉप व अन्य महागड्या वस्तू Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून खरेदी केल्या गेल्या परंतु त्याऐवजी ग्राहकांना साबण, वीट व अन्य भंगार डिलिव्हर करण्यात आलं. चुकीची वस्तू डिलिव्हर करण्याची आता अजून एक घटना समोर […]

    The post असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14 first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Online Shopping fraud व फसवणुकीच्या अनेक बातम्या समोर येतात. गेल्या महिन्यात झालेल्या सेलमध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत जिथे स्मार्टफोन, लॅपटॉप व अन्य महागड्या वस्तू Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाईन शॉपिंग साइट्सवरून खरेदी केल्या गेल्या परंतु त्याऐवजी ग्राहकांना साबण, वीट व अन्य भंगार डिलिव्हर करण्यात आलं. चुकीची वस्तू डिलिव्हर करण्याची आता अजून एक घटना समोर आली आहे परंतु ही थोडी वेगळी व रंजक आहे. बातमी अशी आहे की फ्लिपकार्टनं चुकून एका व्यक्तीला स्वस्त मोबाइल पाठवण्याच्या ऐवजी Apple iPhone 14 डिलिव्हर केला आहे.

    आशीष हेगडे नावाच्या एका व्यक्तीनं ही घटना आपल्या ट्वीटर हँडलवर शेयर केली आहे. ट्वीटमध्ये आशीषनं त्याच्या एका फॉलोवर सोबत ही घटना घडल्याचं म्हटलं आहे. ट्वीटमध्ये फ्लिपकार्ट ऑर्डर डिटेल्स सोबतच डिलिव्हर करण्यात आलेल्या आयफोन 14 च्या बॉक्सचा फोटो देखील शेयर करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया नेमकं प्रकरण काय आहे ते. हे देखील वाचा: Airtel 5G Launched: Airtel 5G Plus ‘या’ शहरांमध्ये लाँच; 5G सर्व्हिसच्या प्लॅन्सची माहिती आली समोर

    चुकून मिळाला आयफोन 14

    मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं शॉपिंग साइट फ्लिपकार्टवरून Apple iPhone 13 विकत घेता होता. जो Blue कलर असलेला 128GB Storage मॉडेल होता ज्यासाठी त्या व्यक्तीनं 49,019 रुपयांची किंमत देखील चुकती केली होती. ही ऑर्डर 22 सप्टेंबरला करण्यात आली होती. आयफोन 13 खरेदी केल्यामुळे ही व्यक्ती खूप आनंदी होती आणि आपल्या नवीन अ‍ॅप्पल मोबाइलची वाट बघत होता. या आनंदाचे कारण म्हणजे iPhone 13 50 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत मिळाला होता.

    man received iphone 14 by mistake in flipkart sale

    परंतु तिकडे फ्लिपकार्टमध्ये वेगळाच घोळ सुरु होता. ठरलेल्या तारखेला नवीन आयफोन डिलिव्हर करण्यात आला. जेव्हा त्या व्यक्तीं आपल्या अ‍ॅप्पल फोनचा बॉक्स ओपन केलं तेव्हा तो थक्क झाला. त्या बॉक्समध्ये आयफोन होता परंतु iPhone 13 नसून त्याजागी iPhone 14 होता. काही लोकांना कदाचित ही मोठी गोष्ट वर्णही नाही परंतु थोडक्यात सांगायचं तर आयफोन 13 साठी 49,019 रुपये देण्यात आले होते तर आयफोन 14 ची प्राइस 79,900 रुपये आहे. म्हणजे एक मॉडेल नंबरमध्ये एक अंक बदलामुळे 30,000 रुपयांचा फरक पडतो. हे देखील वाचा: 15 हजारांच्या आत 50MP Camera असलेला नवीन 5G Phone; मिळतेय 7GB RAM ची पावर

    iPhone 14 Price in India

    49,019 रुपयांच्या Apple iPhone 13 च्या जागी त्या व्यक्तीला 79,900 रुपयांचा Apple iPhone 14 डिलिव्हर करण्यात आला आहे आणि त्याला थेट 30 हजार रुपयांचा फायदा झाला आहे. ई-कॉमर्स साइट फ्लिपकार्टवरील आयफोन 14 ची किंमत पाहता या अ‍ॅप्पल फोनचा सर्वात छोटा मॉडेल 79,900 रुपयांमध्ये विकला जात ज्यात 128जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे iPhone 14 256GB मॉडेल फ्लिपकार्टवर 89,900 रुपयांमध्ये विकला जात आहे.

    लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

    The post असं असावं नशीब! फ्लिपकार्टवर ऑर्डर केला होता स्वस्त मोबाइल, त्याऐवजी मिळाला नवाकोरा iPhone 14 first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/man-received-iphone-14-by-mistake-in-flipkart-sale/feed/ 0
    …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-price-in-dubai/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-price-in-dubai/#respond Mon, 19 Sep 2022 12:42:44 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13244 स्मार्टफोन विश्वातील Apple ब्रँडच्या iPhones चं वेड जगप्रसिद्ध आहे. आयफोन आणि किडनीची 2011 मधील गोष्ट अजूनही मिम्समध्ये जिवंत आहे. आयफोनसाठी लोक काहीही करू शकतात हे पुन्हा एकदा एका गोष्टीतून सिद्ध झालं आहे. नवीन आयफोन मिळवण्यासाठी अ‍ॅप्पल फॅन कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतात आणि महागडा फोन विकत घेण्यासाठी पाण्यासारखे पैसे खर्च करताना देखील मागे पुढे पाहत नाहीत. […]

    The post …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    स्मार्टफोन विश्वातील Apple ब्रँडच्या iPhones चं वेड जगप्रसिद्ध आहे. आयफोन आणि किडनीची 2011 मधील गोष्ट अजूनही मिम्समध्ये जिवंत आहे. आयफोनसाठी लोक काहीही करू शकतात हे पुन्हा एकदा एका गोष्टीतून सिद्ध झालं आहे. नवीन आयफोन मिळवण्यासाठी अ‍ॅप्पल फॅन कोणत्याही मर्यादा ओलांडू शकतात आणि महागडा फोन विकत घेण्यासाठी पाण्यासारखे पैसे खर्च करताना देखील मागे पुढे पाहत नाहीत. असंच एक उदाहरण समोर आलं आहे ज्यात नवीन iPhone 14 Pro सर्वप्रथम मिळवण्यासाठी केरळचा एक व्यक्ती विमानप्रवास करून दुबईला पोहोचला.

    iPhone 14 Pro च्या खरेदीसाठी गाठली दुबई!

    Apple iPhone 14 Series ची विक्री भारतात 16 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. सीरीजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच झाले आहेत तसेच नवीन आयफोन्ससाठी लोक वेडे झाले आहेत. आयफोनचं वेड इतकं आहे होतं की एक व्यक्ती देशातील पहिला आयफोन 14 प्रो युजर बनण्यासाठी फ्लाइट पकडून दुबईला पोहोचला. हे देखील वाचा: अमेरिकन आयफोनला मिळणार स्वदेशी ‘टच’; लवकरच TATA कंपनी बनवू शकते iPhone

    iPhone 14 Price In Dubai

    केरळमधील या व्यक्तीचे नाव धीरज पल्लियिल आहे जो कोची मधला व्यावसायिक आहे. त्याला भारतात सर्वप्रथम आयफोन 14 प्रो मिळवायचा होता. यासाठी 16 सप्टेंबरला भारतात सेल सुरु होण्याच्या एक दिवस आधी या व्यक्तीनं फ्लाइट पकडून थेट दुबई गाठली आणि तिथून त्याने आपला नवीन iPhone 14 Pro विकत घेतला. अशाप्रकारे तो आयफोन 14 प्रो विकत घेणारा सर्वात पहिला भारतीय बनला.

    iPhone 14 Price in Dubai

    भारतातील सर्वात पहिला iPhone 14 Pro तर मिळाला पण त्यासाठी तेवढा खर्च देखील धीरजला करावा लागला. न्यूज रिपोर्टनुसार आयफोन 14 प्रोसाठी त्याने केरळवरून दुबई पर्यंतच्या फ्लाइट टिकट बुकिंग आणि वीजावर 40,000 रुपये खर्च केले होते. तसेच दुबईला जाऊन मिर्डिफ सिटी सेंटरमधून iPhone 14 Pro 512GB Storage व्हेरिएंट खरेदी करण्यासाठी 1,29,000 रुपये मोजले.

    विमानप्रवास आणि आयफोनची किंमत मिळून त्याला हा आयफोन जवळपास 1,69,000 रुपयांना पडला आहे. भारतात आयफोन 14 प्रोच्या 512 जीबी व्हेरियंटची किंमत 1,59,900 रुपये आहे.धीरजनं या आयफोनचा नवीन पर्पल कलर व्हेरिएंट खरेदी केला आहे. हे देखील वाचा: iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत

    iPhone 14 Price In Dubai

    iPhone in Dubai

    विशेष म्हणजे दुबईत जाऊन आयफोन विकत घेण्याची पल्लियिलची ही पहिली वेळ नाही. याआधी देखील धीरजनं 3 वेळा दुबईला जाऊन नवीन आयफोन विकत घेतला आहे. iPhone 11 Pro Max, iPhone 12 आणि iPhone 13 देखील या व्यक्तीने भारतात विक्री सुरु होण्याच्या एक दिवस आधी दुबईत जाऊन विकत घेतले होते. धीरजनं टीओआयला सांगितलं आहे की फक्त भारतातच नव्हे तर दुबईत देखील तो आयफोन 12 आणि आयफोन 13 खरेदी करणारा पहिला ग्राहक बनला होता.

    The post …म्हणून त्याने iPhone 14 Pro खरेदी करण्यासाठी केरळवरून थेट गाठली दुबई first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-price-in-dubai/feed/ 0
    iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-price-in-india-apple-iphone-14-series/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-price-in-india-apple-iphone-14-series/#respond Thu, 08 Sep 2022 08:51:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12944 Apple iPhone 14 Series Price in India: काल झालेल्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच […]

    The post iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Apple iPhone 14 Series Price in India: काल झालेल्या इव्हेंटमधून टेक दिग्गज अ‍ॅप्पलनं आपली बहुप्रतीक्षित आयफोन 14 सीरिज अनेक नव्या फीचर्ससह सादर केली आहे. विशेष म्हणजे आयफोन 14 सीरीज भारतात देखील लाँच झाली आहे. तसेच Apple नं चार नवीन आयफोन iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max भारतात लाँच केले आहेत.

    स्टायलिश लुक, अ‍ॅडव्हान्स फीचर्स आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्ससह येणारे हे new iPhones याच महिन्यात भारतात सेलसाठी उपलब्ध होतील. विशेष म्हणजे आयफोन 14 च्या बेस मॉडेलची किंमत जुन्या iPhone 13 इतकीच आहे. पुढे आम्ही Apple iPhone 14 series Price आणि iPhone Sale ची संपूर्ण माहिती दिली आहे. हे देखील वाचा: सर्वात प्रीमियम फीचर्स आणि नव्याकोऱ्या डिजाईनसह Apple iPhone 14 Pro आणि iPhone Pro Max ची एंट्री, किंमत मात्र जुनीच

    iPhone 14 Price in India

    iPhone 14 128GB = 79,900 रुपये
    iPhone 14 256GB = 89,900 रुपये
    iPhone 14 512GB = 1,09,900 रुपये

    iPhone 14 Plus Price in India

    iPhone 14 Plus 128GB = 89,900 रुपये
    iPhone 14 Plus 256GB = 99,900 रुपये
    iPhone 14 Plus 512GB = 1,19,900 रुपये

    iPhone 14 Pro Price in India

    iPhone 14 Pro 128GB = 1,29,900 रुपये
    iPhone 14 Pro 256GB = 1,39,900 रुपये
    iPhone 14 Pro 512GB = 1,59,900 रुपये
    iPhone 14 Pro 1TB = 1,79,900 रुपये

    iPhone 14 Pro Max Price in India

    iPhone 14 Pro Max 128GB = 1,39,900 रुपये
    iPhone 14 Pro Max 256GB = 1,49,900 रुपये
    iPhone 14 Pro Max 512GB = 1,69,900 रुपये
    iPhone 14 Pro Max 1TB = 1,89,900 रुपये

    iPhone 14 Series Sale in India

    नवीन अ‍ॅप्पल आयफोन्सची प्री-बुकिंग येत्या 9 सप्टेंबरला संध्याकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. आयफोन 14, आयफोन 14 प्रो तसेच आयफोन 14 प्रो मॅक्स 16 सप्टेंबरपासून सेलसाठी उपलब्ध होतील. परंतु मोठ्या डिस्प्लेसह येणारा आयफोन 14 प्लस घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना 7 ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल. हे देखील वाचा: iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन

    iPhone 14 तसेच iPhone 14 Plus मॉडेल Midnight, Purple, Starlight, Blue आणि (PRODUCT) RED कलरमध्ये विकत घेता येतील. तर iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro MAX मॉडेल Space Black, Silver, Gold आणि Deep Purple कलरमध्ये भारतात लाँच करण्यात आले आहेत.

    The post iPhone 14 Series India Price: जुन्याच किंमतीत आला नवीन आयफोन 14, जाणून घ्या आयफोन 14 प्रो मॅक्स पर्यंतच्या सर्व मॉडेल्सची किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-price-in-india-apple-iphone-14-series/feed/ 0
    iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-launched-knwo-price-features-sale-offer/ https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-launched-knwo-price-features-sale-offer/#respond Wed, 07 Sep 2022 18:31:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12907 Apple iPhone 14 Launch: बहुप्रतीक्षित iPhone 14 सीरिज आज लाँच झाली आहे. कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून Apple Watch Series 8, नवीन AirPods Pro सह नवीन iPhones सादर केले आहेत. दिग्गज टेक कंपनी Apple नं आपली सर्वात नवीन आणि अ‍ॅडव्हान्स आयफोन 14 सीरीज (iPhone 14 Series) लाँच केली आहे. नवीन अ‍ॅप्पल आयफोन सीरिजमध्ये iPhone 14, […]

    The post iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Apple iPhone 14 Launch: बहुप्रतीक्षित iPhone 14 सीरिज आज लाँच झाली आहे. कंपनीनं एका मोठ्या इव्हेंटच्या माध्यमातून Apple Watch Series 8, नवीन AirPods Pro सह नवीन iPhones सादर केले आहेत. दिग्गज टेक कंपनी Apple नं आपली सर्वात नवीन आणि अ‍ॅडव्हान्स आयफोन 14 सीरीज (iPhone 14 Series) लाँच केली आहे. नवीन अ‍ॅप्पल आयफोन सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Plus, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल लाँच झाले आहेत. यातील iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये जुनीच नॉच डिजाईन देण्यात आली आहे.

    Apple iPhone 14 Price

    अ‍ॅप्पल आयफोन 14 ची प्रारंभिक किंमत 79900 रुपये आहे ज्यात 128 जीबी स्टोरेज मिळते. तसेच iPhone 14 256GB Storage मॉडेल 89,900 रुपये आणि iPhone 14 512GB Storage ऑप्शन 1,09,900 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा आयफोन भारतात midnight, blue, starlight आणि purple कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: अ‍ॅडव्हेंचर प्रेमी भटक्यांसाठी खास Apple Watch Ultra; म्युजिक प्रेमींसाठी शानदार Apple AirPods Pro 2 लाँच

    Apple iPhone 14 Plus Price

    आयफोन 14 प्लस देखील तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच झाला आहे. iPhone 14 Plus 128GB Price 89,900 रुपये आहे. iPhone 14 Plus 256GB Storage मॉडेल 99,900 रुपये आणि iPhone 14 Plus 512GB Storage व्हेरिएंट 1,19,900 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. हा आयफोन देखील midnight, blue, starlight आणि purple कलरमध्ये विकत घेता येईल.

    Apple iPhone 14 Camera

    ब्रँड व्यतिरिक्त आयफोन्स खरेदी करणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचं फिचर म्हणजे या फोनचा कॅमेरा. जगभरातील चाहते अ‍ॅप्पल आयफोन त्याच्या शानदार फोटोग्राफीसाठी विकत घेतात. iPhone 14 मध्ये देखील 12 मेगापिक्सलचा शानदार रियर कॅमेरा देण्यात आला आहे जो एफ/1.5 अपर्चरसह चालतो. आयफोन 14 चा कॅमेरा 49 टक्क्यांपर्यंत जास्त चांगली लो-लाईट परफॉर्मन्स देऊ शकतो.

    या फोनमध्ये 12MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. नवीन सेल्फी कॅमेरा ऑटोफोकस फिचरसह सादर करण्यात आला आहे. हा कॅमेरा एफ/1.9 अपर्चरसह सादर करण्यात आला आहे. त्यामुळे शानदार ग्रुप फोटो कॅप्चर करता येतील.

    Apple iPhone 14 Performance

    नवीन अ‍ॅप्पल आयफोन 14 दमदार पावर देण्यात आली आहे. Apple नं आपला नवीन iPhone 14 Bionic A15 processor सह बाजारात आणला आहे. हा प्रोसेसर 6 कोर सीपीयू तसेच 5 कोर जीपीयूसह चालतो. तसेच लेटेस्ट iOS 16 सह फोनची परफॉर्मन्स बूस्ट होते.

    iPhone 14 Connectivity

    अ‍ॅप्पल आयफोन 14 सीरीज पूर्णपणे 5G सह येते. नवीन iPhone 14 आणि iPhone 14 Plus दोन्ही 5जी कनेक्टिव्हिटीसह बाजारात आले आहेत तसेच या दोन्ही मोबाइल फोन्समध्ये eSIM support देण्यात आला आहे. म्हणजे कोणत्याही फिजिकल सिमविना फोनवर सेल्युलर कनेक्टिव्हिटी मिळेल. तसेच दोनपेक्षा जास्त सिम प्रोफाइल देखील तुम्ही स्टोर करून ठेऊ शकता. हे देखील वाचा: इतक्या स्वस्तात 16GB RAM! 64MP च्या शानदार कॅमेऱ्यासह Vivo Y75s 5G Phone लाँच

    iPhone 14 SOS Via Satellite

    IPhone 14 सीरिजच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन सेफ्टी फिचर देण्यात आलं आहे, ज्याच्या मदतीनं रेंज नसलेल्या ठिकाणहून देखील मेसेज पाठवून आपत्कालीन मदत मागवता येईल. यासाठी सॅटेलाईट कनेक्टिव्हिटीचा वापर करण्यात येईल. ही सेवा फक्त इमर्जन्सी वापरासाठी आहे, यावरून कॉल करता येणार नाही. दोन वर्षांसाठी ही सेवा मोफत असेल. SOS Via Satellite फिचर फक्त यूएसए आणि कॅनडामध्ये वापरता येईल.

    iPhone 14 आणि iPhone 14 Plus Display

    आयफन 14 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तर आयफोन 14 प्लस मध्ये 6.7 इंचाचा मोठा डिस्प्ले मिळतो. ही सुपर रेटिना एक्सडीआर स्क्रीन आहे जी ओएलईडी टेक्नोलॉजीवर आधारित आहे. डॉल्बी व्हिजनसह नवीन आयफोन्समधील डिस्प्ले 1200निट्स ब्राइटनेस व 2,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियोला सपोर्ट करतो.

    The post iPhone 14 झाला लाँच, स्टायलिश लुक आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह आला दमदार आयफोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/apple-iphone-14-launched-knwo-price-features-sale-offer/feed/ 0
    दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-might-assemble-in-india-price-could-be-low/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-might-assemble-in-india-price-could-be-low/#respond Thu, 01 Sep 2022 10:15:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12718 टेक विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचं नाव म्हणजे अ‍ॅप्पल. नावानुसार कंपनीच्या आयफोन्ससाठी तेवढी किंमत देखील मोजावी लागते. परंतु हेच फोन्स दुबईमध्ये त्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होतात, आता असं होणार नाही. येत्या 7 सप्टेंबर Apple कंपनी आपली iPhone 14 Series सादर करणार आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल सादर केले […]

    The post दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    टेक विश्वातील सर्वात प्रतिष्ठेचं नाव म्हणजे अ‍ॅप्पल. नावानुसार कंपनीच्या आयफोन्ससाठी तेवढी किंमत देखील मोजावी लागते. परंतु हेच फोन्स दुबईमध्ये त्यापेक्षा कमी किंमतीत उपलब्ध होतात, आता असं होणार नाही. येत्या 7 सप्टेंबर Apple कंपनी आपली iPhone 14 Series सादर करणार आहे. या सीरिजमध्ये iPhone 14, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मॉडेल सादर केले जातील. जगभरातील चाहत्यांप्रमाणे भारतातील अ‍ॅप्पल प्रेमी आयफोन 14 सीरीजच्या लाँचची आतुरतेने वाट बघत आहेत. ही आयफोन सीरीज भारतीयांसाठी आणखी खास सिद्ध होणार आहे कारण नवीन iPhone 14 Pro Max ची निर्मिती भारतातच होईल.

    Apple iPhone 14 सीरीज बद्दल बातम्या समोर येत आहे की कंपनी आपल्या नवीन मोबाइल फोन्सची निर्मिती भारतात करेल. यात iPhone 14 सह iPhone 14 Pro Max नावं देखील समोर येत आहे. रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅप्पल कंपनी आयफोन 14 प्रो मॅक्स चीनमध्ये नव्हे तर भारतात बनवत आहे आणि हे Made in India iPhones भारतातून बाहेर दुसऱ्या देशांमध्ये देखील शिप केले जातील. हे देखील वाचा: iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री

    iphone 14 pro max might assemble in india price could be low

    चीन ऐवजी भारतात नवीन आयफोन्सची निर्मिती

    ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, अ‍ॅप्पल कंपनीनं आपल्या लेटेस्ट आणि मोठ्या मोबाइल iPhone 14 Pro Max ची असेंबलिंगसाठी यावेळी चायना ऐवजी यावेळी भारतावर आपला विश्वास दर्शवला आहे. परंतु याचा अर्थ चीनमध्ये पूर्णपणे आयफोन 14 सीरीजची निर्मिती होणार नाही असं नाही. परंतु आयफोन 14 सीरीज प्रोडक्शनचा मोठा भाग चीनच्या ऐवजी भारतात सेट करण्यात आला आहे. असे केल्यामुळे लाँचनंतर प्रोडक्शनमध्ये जास्त उशीर होणार नाही.

    iphone 14 pro max might assemble in india price could be low

    Made in India iPhone 14 ऑक्टोबरपासून विकले जातील

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅप्पल आयफोन मॅन्युफॅक्चरर फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुपच्या चेन्नईमधील प्लांटमध्ये iPhone 14 Series असेंबलिंगचं काम सुरु देखील झालं आहे. 7 सप्टेंबरला सीरीज लाँच झाल्यानंतर पुढील महिन्यात म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरपासूनच मेड इन इंडिया आयफोन 14 प्रो मॅक्सची विक्री सुरु केली जाईल. हे देखील वाचा: iPhone 14 पासून स्वस्त OnePlus पर्यंत हे आहेत पुढील महिन्यात भारतात येणारे 5G स्मार्टफोन, पैसे ठेवा तयार

    iPhone 14 Series ची किंमत किती असेल?

    iPhone 14 Series ची निर्मिती भारतात होणार असल्यामुळे फोन शिपमेंटवरील कस्टम ड्यूटीमध्ये कंपनीला खूप फायदा होणार आहे. त्यामुळे अ‍ॅप्पल इंडियाचा फोन बनवण्याच्या खर्च कमी होईल तसेच टोटल कॉस्ट ऑफ प्रोडक्शन देखील काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. फोन बनवण्याचा खर्च कमी झाल्यामुळे कंपनी फोनची सेल प्राइस देखील कमी करू शकते. बाहेरून आयत केल्यावर आयफोन 14 सीरीजची जी किंमत होणार होती त्यापेक्षा कमी किंमतीत हे फोन्स भारतात उपलब्ध होतील अशी आशा आहे.

    The post दुबईप्रमाणे भारतात देखील स्वस्तात मिळणार iPhone 14 Pro Max; चीनच्या ऐवजी भारतात होणार निर्मिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-pro-max-might-assemble-in-india-price-could-be-low/feed/ 0
    iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री https://www.91mobiles.com/marathi/7-september-iphone-14-series-launch-date-apple-event-announced/ https://www.91mobiles.com/marathi/7-september-iphone-14-series-launch-date-apple-event-announced/#respond Thu, 25 Aug 2022 07:13:56 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=12471 Apple एकमेव असा ब्रँड आहे जो वर्षभरात निवडक मोबाइल फोन सादर करतो आणि याच मॉडेल्सच्या जीवावर टेक विश्वावर राज्य करतो. वर्षातून एकदा होणाऱ्या अ‍ॅप्पल आयफोनकडे संपूर्ण जगाच्या नजरा असतात. हीच वेळ आता पुन्हा येणार आहे. नवीन iPhone 14 Series लाँच होणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 ऑफिशियली सादर […]

    The post iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Apple एकमेव असा ब्रँड आहे जो वर्षभरात निवडक मोबाइल फोन सादर करतो आणि याच मॉडेल्सच्या जीवावर टेक विश्वावर राज्य करतो. वर्षातून एकदा होणाऱ्या अ‍ॅप्पल आयफोनकडे संपूर्ण जगाच्या नजरा असतात. हीच वेळ आता पुन्हा येणार आहे. नवीन iPhone 14 Series लाँच होणार आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 7 सप्टेंबरला Apple iPhone 14 ऑफिशियली सादर केला जाईल. सीरीज अंतगर्त 7 सप्टेंबरला iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच होऊ शकतात.

    Apple iPhone 14 Series Launch

    आयफोन 14 सीरीजच्या लाँचची माहिती देत अ‍ॅप्पलनं सांगितलं आहे की कंपनी येत्या 7 सप्टेंबरला Apple Event चं आयोजन करणार आहे. हा इव्हेंट कंपनीच्या Apple Park campus मध्ये होईल ज्याचं थेट प्रक्षेपण जगभरात करण्यात येईल. भारतीय वेळेनुसार हा लाँच इव्हेंट रात्री 10 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल जो अ‍ॅप्पल वेबसाइटसह कंपनीच्या युट्युब चॅनेलवर बघता येईल.

    अ‍ॅप्पलनं मात्र या इव्हेंटमध्ये लाँच केल्या जाणाऱ्या सर्व प्रोडक्ट्सची माहिती दिली नाही. परंतु या इव्हेंटच्या मंचावरून आयफोन 14 सीरीज सादर केली जाईल आणि यात iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro तथा iPhone 14 Pro Max लाँच होंगे, अशी चर्चा आहे. iPhone 14 Series सोबतच 7 सप्टेंबरला अ‍ॅप्पल इव्हेंटमध्ये कंपनी Apple Watch Series 8 देखील जगासमोर ठेवू शकते.

    कसे असतील अ‍ॅप्पल आयफोन 14 सीरीजचे फोन्स?

    नोट- वरील सर्व फोटोज लीक्समध्ये समोर आले आहेत त्यामुळे ही डिजाइन अधिकृत म्हणता येणार नाही.

    अ‍ॅप्पल आयफोन 14 सीरीजचे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

    Apple नवीन मोबाइल सीरीज अंतगर्त iPhone 14, iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max लाँच करू शकते. लीक्सममधून या आयफोन्सचे स्पेसिफिकेशन्स शेयर करण्यात आले आहेत त्यानुसार आयफोन 14 प्रो तसेच आयफोन 14 प्रो मॅक्स ऑलवेज-ऑन डिस्प्लेला सपोर्ट करतील. सर्व आयफोन्स पैकी सर्वात मोठी स्क्रीन साईज 6.7 इंचाची असेल जी प्रो मॅक्स मॉडेलमध्ये मिळू शकते.

    iPhone 14 Series च्या सर्व मोबाइल फोन्समध्ये लेटेस्ट चिपसेट मिळू शकतो. विशेष म्हणजे हा अ‍ॅप्पलचा आतापर्यंतचा सर्वात अ‍ॅडव्हान्स आणि फास्ट प्रोसेसिंग चिपसेट आहे. आयफोन 14 सीरीजमध्ये 48 मेगापिक्सल पर्यंतचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. लीकनुसार सीरीजच्या सर्व मॉडेल्समध्ये नवीन ऑटो फोकस सेल्फी कॅमेरा दिला जाईल.

    The post iPhone 14 Series च्या लाँचचा मुहूर्त ठरला; एकाच इव्हेंटमधून होणार iPhone 14 Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max ची एंट्री first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/7-september-iphone-14-series-launch-date-apple-event-announced/feed/ 0
    स्वस्त असेल का iPhone 14? कधी होणार लाँच? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि किती मॉडेल येणार बाजारात https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-launch-date-price-specifications-features-os-and-detail/ https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-launch-date-price-specifications-features-os-and-detail/#respond Tue, 19 Jul 2022 10:37:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=11531 iPhone 14 मधून संमिश्र अनुभव मिळणार आहे. नवीन फीचर्स तर मिळतील परंतु जुन्या फीचर्समुळे कंपनी ट्रोल देखील होणार आहे. काहीही असलं तरी iPhone 14 ची उत्सुकुता टेक प्रेमींना आहेच.

    The post स्वस्त असेल का iPhone 14? कधी होणार लाँच? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि किती मॉडेल येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    दरवर्षी सप्टेंबरमध्ये Apple द्वारे एका इव्हेंटचं आयोजन केलं जातं ज्यात कंपनी आपली नवीन आयफोन सीरीज को सादर करते आणि या इव्हेंटबद्दल काही महिन्यांपूर्वीच चर्चा सुरु होते. यावेळी कंपनी iPhone 14 लाँच करणार आहे आणि या फोनबद्दल चर्चाना उधाण आलं आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यावेळी देखील कंपनी चार मॉडेल सादर करू शकते, अशी चर्चा आहे. पंरतु आतापर्यंत जे लीक आले आहेत त्यानुसार यावेळी मिनी व्हर्जन येणार नाही. तसेच यावेळी iPhone 14 आणि प्रो मॅक्स मॉडेलमध्ये खूप फरक असू शकतो. नवीन आयफोनबाबत याच चर्चेबाबत आज आम्ही हा रिपोर्ट तयार केला आहे जिथे तुम्ही iPhone 14 सीरीजच्या लाँच डेट, स्पेसिफिकेशन, भारतीय किंमत आणि मॉडेलसह सर्व माहिती मिळवू शकता.

    iPhone 14 लाँच डेट

    गेली अनेक वर्ष अ‍ॅप्पल आपली नवीन आयफोन सीरीज सप्टेंबरमध्ये लाँच करत आहे आणि यावेळी देखील हीच परंपरा कायम राहील अशी आशा आहे. परंतु कंपनीनं अधिकृतपणे अजूनतरी तारखेची घोषणा केली नाही परंतु iPhone 14 सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात लाँच होऊ शकते, अशी चर्चा आहे. iHacktu ileaks नावाच्या एका टिपस्टरनं माहिती दिली आहे की, कंपनी येत्या 13 सप्टेंबर ग्लोबल लाँच करू शकते आणि तेव्हाच ही सीरिज भारतात देखील उपलब्ध होईल. परंतु यात कोणत्याही अधिकृत सोर्सचा हवाला देण्यात आलेला नाही.

    तसेच टिपस्टरनं या फोनच्या सेल डेटची देखील माहिती दिली आहे. त्यानुसार iPhone 14 चे सर्व मॉडेल 23 सप्टेंबरपासून विक्रीसाठी उपलब्ध होतील. परंतु या लीकनंतर काही दिवसांनंतर माहिती आली आहे की नवीन आयफोन सीरीज जरी 13 सप्टेंबरला लाँच झाली तरी सेल डेट पुढे ढकलली जाऊ शकते. Nikkei Asia च्या एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की चीनमध्ये लॉकडाउन असल्यामुळे आयफोनच्या निर्मितीला उशीर होत आहे त्यामुळे हे फोन्स विक्रीसाठी येण्यास थोडा वेळ लागू शकतो. त्यांनी असं देखील म्हटलं आहे की अन्य मॉडेलची विक्री सुरु होईल परंतु iPhone 14 Pro Max चा सेल सुरु होण्यास वेळ लागेल. त्यामुळे कंपनी iPhone 14 ची लाँच डेट अर्थात 13 सप्टेंबर देखील पुढे ढकलली जाऊ शकते.

    iPhone 14 सीरीजचे सर्व मॉडेल

    गेल्यावर्षी कंपनीनं iPhone 13 सीरीजमध्ये चार मॉडेल सादर केले होते ज्यात iPhone 13 सह iPhone 13 मिनी, iPhone 13 प्रो आणि iPhone 13 प्रो मॅक्स होते. परंतु मिळालेल्या माहितीनुसार iPhone 13 मिनीची विक्री खूप चांगली झाली नाही. त्यामुळे कंपनीनं यावर्षी हा मॉडेल काढण्याची तयारी केली आहे. त्यामुळे iPhone 14 सीरिजमध्ये iPhone 14 Plus किंवा Max, iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max असे मॉडेल मिळू शकतात. जुन्या मॉडेलच्या यावेळी नवीन आयफोनमध्ये तुम्हाला खूप बदल दिसतील, अशी देखील चर्चा आहे.

    iPhone 14 ची भारतातील किंमत (price in India)

    आयफोन महाग असतात असे सर्वच म्हणतात. परंतु यावेळी जे रिपोर्ट आले आहेत त्यानुसार तुम्ही म्हणाल iPhone 14 खूपच महाग आहे. यामागे दोन कारणे आहेत. पाहिलं कारण म्हणजे यावेळी कंपनी आपला मिनी व्हर्जन काढून टाकत आहे. त्यामुळे बेस मॉडेलची किंमत वाढेल. तसेच डॉलरची किंमत वाढल्यामुळे फोनच्या किंमतीत जास्त फरक पडेल. लिक्सनुसार यावेळी किंमतीत 10,000 रुपयांपर्यंतची वाढ होऊ शकते. iPhone 13 ची आरंभिक किंमत 79,900 रुपये होती. तर यावेळी iPhone 14 ची भारतीय किंमत 89,900 रुपये असू शकते. तर iPhone 14 Max कंपनी Rs 99,900 रुपयांमध्ये सादर करू शकते. iPhone 14 Pro ची किंमत 1,29,900 आणि iPhone 14 Pro Max 1,39,900 रुपयांमध्ये उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

    iPhone 14 ची डिजाइन

    दरवेळी लोकांना कंपनी यावेळी मोठा बदल करेल असं वाटतं, परंतु तसं होत नाही. छोट्या-मोठ्या डिजाईन चेंजसह कंपनी नवीन फोन सादर करते. यावेळी देखील iPhone 14 सीरिजमध्ये तुम्हाला जास्त काही बदल दिसणार नाही. विशेष म्हणजे बेस मॉडेलमध्ये जवळपास त्याच डिजाइनची पुनरावृत्ती केली जाईल. आयफोन 14 कंपनी बॉक्स डिजाइनमध्ये सादर करू शकते ज्यात एज खूप फ्लॅट असतील.. मोठ्या मॉडेलमध्ये एक दोन बदल दिसू धकतात खासकरून यावेळी नवीन डिस्प्ले डिजाईन मिळू शकते.

    iPhone 14 चे स्पेसिफिकेशन

    डिस्प्ले: iPhone 14 च्या मॉडेलमध्ये तुम्हाला यावेळी OLED डिस्प्ले मिळू शकतो जसा आयफोन 12 आणि आयफोन 13 मध्ये दिसला होता. परंतु यावेळी कंपनी iPhone 14 आणि iPhone Plus या Max मॉडेलमध्ये देखील ProMotion डिस्प्लेचा वापर करू शकते. तसेच बेस मॉडेलमध्ये देखील तुम्हाला हाय रिफ्रेश रेट मिळू शकतो.

    iPhone 14 आणि iPhone 14 Plus किंवा Max मॅक्स मॉडेलमध्ये 6.1-इंचाचा LTPS OLED डिस्प्ले 90Hz स्क्रीन रिफ्रेश रेटसह मिळेल. ज्यात वेरियेबल रिफ्रेश रेट आणि ऑलवेज ऑन डिस्प्ले सारखे फीचर्स नसतील. तर मोठे मॉडेल iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये कंपनी 6.7-इंचाचा LTPO OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देऊ शकते.

    कॅमेरा: आयफोनमध्ये जरी कमी मेगापिक्सलचा कॅमेरा असला तरी पिक्चर क्वॉलिटी जबरदस्त असते आणि कंपनी एक बेंच मार्क सेट करते. नवीन सीरीजमध्ये कॅमेऱ्यावर नजर टाकायची झाल्यास तुम्हाला बेस मॉडेलमध्ये 12MP चा ड्युअल कॅमेरा मिळू शकतो. सोबतीला 12MP चा फ्रंट कॅमेरा असेल.बातमीनुसार मेन कॅमेऱ्यात तुम्हाला जुन्या मॉडेलच्या तुलनेत कोणताही बदल दिसणार नाही. तसेच टिपस्टर Ming-Chi Kuo नुसार सेल्फी कॅमेऱ्याचा अपर्चर अपग्रेड होईल. कंपनी f/1.9 अपर्चरचा वापर करू शकते जो ऑटो फोकस फीचरसह येईल. जुन्या मॉडेलमध्ये f/2.2 चा फिक्स्ड फोकस अपर्चर देण्यात आला होता.

    मोठ्या मॉडेलमध्ये कॅमेरा खूप अपग्रेड होईल. यावेळी कॅप्सूल शेप पंच होल तुम्हाला स्क्रीनवर मिळेल. यावेळी कॅमेऱ्यासह Face ID dot projector दिला जाऊ शकतो. तसेच Ross Young नुसार कंपनी डिस्प्लेमध्ये Face ID साठी हार्डवेयर देऊ शकते त्यामुळे नवीन डिजाइननुसार डिस्प्ले छोटा राहण्यास मदत होईल. iPhone 14 Pro आणि Pro Max च्या कॅमेऱ्यात 48MP चा हाय रिजोल्यूशन सेन्सर दिला जाऊ शकतो.

    कनेक्टिव्हिटी: यावर्षीपासून अ‍ॅप्पल फोनमध्ये USB-C पोर्ट दिला जाईल, अशी चर्चा आहे. परंतु नवीन लिक्समध्ये खुलासा झाला आहे की आयफोन 14 सीरीजमध्ये हा बदल दिसणार नाही आणि कंपनी लाईटनिंग पोर्टचाच वापर करेल. आयफोन iPhone 15 पासून कंपनीनं टाईप सी पोर्टकडे वळू शकते, कारण युरोपीय यूनियननं ते बंधनकारक केलं आहे.

    तसेच Apple 14 सीरीजमध्ये सॅटेलाईट कनेक्टिव्हिटी फीचर मिळणार असल्याच्या देखील बातम्या आल्या आहेत. हे फीचर आपत्कालीन परिस्तिथीत कोणत्याही सिमविना शॉर्ट मेसेजेस पाठवण्याची मुभा देतं. तसेच कंपनी यावर्षीपासून सिम स्लॉट हटवणार आहे. तुम्हाला फक्त e-SIM चा ऑप्शन ही मिळेल. तसेच नवीन आयफोनमध्ये Wi-Fi 6E मिळणार आहे. ही सर्व माहिती अ‍ॅप्पल अनॅलिस्ट Ming-Chi Kuo यांनी दिली आहे.

    प्रोसेसर: प्रोसेसरच्या बाबतीत अ‍ॅप्पल युजर्सना थोडी निराशा होऊ शकते. खास करून ते युजर्स ज्यांना बेस व्हेरिएंट घ्यायचा आहे. नवीन iPhone 14 बद्दल जी माहिती मिळाली आहे त्यानुसार कंपनी दोन्ही बेस मॉडेल iPhone 14 आणि Plus किंवा Max मध्ये जुना प्रोसेसर A15 Bionic देऊ शकते. तर A16 Bionic प्रोसेसर फक्त iPhone 14 Pro आणि Pro Max मध्ये मिळेल. Ming-Chi Kuo यांच्या मते कंपनीनं जुन्या प्रोसेसरच्या तुलनेत यावेळी जास्त बदल केलेले नाहीत. त्यामुळे परफॉर्मन्समध्ये जास्त फरक दिसणार नाही.

    हा यावेळी तुम्हाला vapour chamber cooling system मिळू शकते. कंपनी यावर खूप काम करत आहे. Ming-Chi Kuo यांनी सांगितलं आहे की व्हेपर चेंबर कूलिंग अँड्रॉइड फोनप्रमाणेच काम करेल. यावेळी कूलिंग सिस्टम आणण्याचे मोठे कारण म्हणजे 5जी कनेक्टिव्हिटी. ज्यामुळे इंटरनेट खूप फास्ट झालं आहे आणि आयफोनमध्ये हीटिंगची समस्या येत आहे. परंतु इथे देखील बेस व्हेरिएंट युजर्ससाठी बातमी चांगली नाही. कारण फक्त iPhone 14 Pro आणि iPhone 14 Pro Max मधेच कुलिंग सिस्टम मिळेल.

    सॉफ्टवेयर: iPhone 14 च्या सर्व मॉडेलमध्ये तुम्हाला iOS 16 ओएस आउट ऑफ द बॉक्स मिळेल. नवीन ओएसमध्ये सर्वात मोठा बदल यावेळी लॉक स्क्रीन फीचरचा आहे. कंपनीनं आता लॉक स्क्रीन कस्टमाइजेशनचं फिचर दिलं आहे. आता तुम्ही फोनच्या लॉक स्क्रीनवर फोटो, फॉन्ट स्टाईल आणि कॅलेंडर, वेदर, डेट, टाइम झोन, अलार्म आणि बॅटरी लेव्हलसह अन्य विजेट्स सेट करू शकता. तुम्ही एकाच फोनमध्ये अनेक लॉक स्क्रीन ठेऊ शकता. काही दिवसांपूर्वीच कंपनीनं iOS 16 बीटा रिलीज केला होता ज्यात नवीन फीचर्स दिसले आहेत.

    तसेच iOS 16 मध्ये तुम्हाला शेयर्ड फोटो लायब्ररी फीचर, फास्ट टाइपिंग डिटेक्शन कीबोर्ड, हेल्थ फीचर, ईमेल शेड्यूलिंग, मल्टी स्टॉप मॅप, व्हिडीओ मध्ये टेक्सट सपोर्ट आणि सफारीमध्ये ग्रुप टॅब सपोर्ट असे फीचर्स मिळतील.

    एकंदरीत iPhone 14 सीरिज तुम्हाला संमिश्र अनुभव देऊ शकते. चांगल्या फीचर्सचं कौतुक तर होईलच परंतु काही जुने स्पेक्स आणि फीचर्स तसेच ठेवल्यास अ‍ॅप्पल ट्रोल देखील होऊ शकते. परंतु काहीही असलं तरी iPhone 14 ची प्रतीक्षा फॅन्ससह टेक प्रेमींना देखील आहे.

    The post स्वस्त असेल का iPhone 14? कधी होणार लाँच? जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि किती मॉडेल येणार बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iphone-14-launch-date-price-specifications-features-os-and-detail/feed/ 0