iQOO Neo 7 5G - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 11:16:15 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-iqoo-neo-7-5g-price-in-india-leak-ahead-of-16-february-launch/ https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-iqoo-neo-7-5g-price-in-india-leak-ahead-of-16-february-launch/#respond Mon, 13 Feb 2023 05:31:49 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17735 iQOO ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी भारतात iQOO 11 हा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला होता. जगातील सर्वात वेगवान फोन्स पैकी एक असलेल्या आयकू 11 ची किंमत देखील जास्त होती. आता या आठवड्यात 16 फेब्रुवारीला कंपनी मिडरेंज सेगमेंटमध्ये iQOO Neo 7 5G फोन लाँच करणार आहे. ज्याच्या रॅम व्हेरिएंट्सची आणि किंमतीची माहिती […]

The post 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • फोन 8GB RAM आणि 12GB RAM व्हेरिएंटमध्ये उपलब्ध होऊ शकतो.
  • या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत लीकमधून समोर आली आहे.

iQOO ब्रँडची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी भारतात iQOO 11 हा प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर केला होता. जगातील सर्वात वेगवान फोन्स पैकी एक असलेल्या आयकू 11 ची किंमत देखील जास्त होती. आता या आठवड्यात 16 फेब्रुवारीला कंपनी मिडरेंज सेगमेंटमध्ये iQOO Neo 7 5G फोन लाँच करणार आहे. ज्याच्या रॅम व्हेरिएंट्सची आणि किंमतीची माहिती आता समोर आली आहे.

iQOO Neo 7 5G Price in India

टिपस्टर अभिषेक यादवनं आयकू नियो 7 5जी फोनची माहिती लीक केली आहे. त्यानुसार या फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8 जीबी रॅमसह 128 जीबी इंटरनल स्टोरेज दिली जाईल तसेच हा मॉडेल 26,999 रुपयांमध्ये भारतीय बाजारात लाँच केला जाऊ शकतो. ही प्राइस लाँच ऑफर्सनंतर मिळेल, म्हणजे मूळ किंमत यापेक्षा जास्त असू शकते. हे देखील वाचा: What is GB WhatsApp: जीबी व्हॉट्सअ‍ॅप म्हणजे काय? वापरल्यामुळे डेटा जातो का चोरीला? कसं डाउनलोड करायचं? जाणून घ्या

iQOO Neo 7 5G 12 जीबी रॅम + 256 जीबी स्टोरेजचा खुलासा अलीकडेच टिपस्टर पारस गुगलानीनं केला होता आणि सांगितलं होतं की याची किंमत 34,999 रुपये असू शकते. या व्हेरिएंटची ऑफर प्राइस 30,999 रुपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात आलं आहे. लीकनुसार हा आयकू फोन Interstellar Black आणि Frost Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होऊ शकतो. फोनची विक्री 19 किंवा 20 फेब्रुवारीपासून सुरु होऊ शकते.

iQOO Neo 7 5G Specifications

  • 6.78” 120Hz AMOLED display
  • 12GB RAM, 256GB Storage
  • MediaTek Dimensity 8200 SoC
  • 64MP Triple Rear Camera

आयकू नियो 7 5जी फोन चायनामध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसईचा रीब्रँडेड व्हर्जन असेल. त्यामुळे या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असतिल. चीनमधील नियो 7एसई 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

आयकू नियो 7एसई मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटसह लाँच झाला आहे तसेच हा प्रोसेसर iQOO Neo 7 5G फोनमध्ये देखील मिळू शकतो. आयकू नियो 7एसई 16जीबी रॅमवर लाँच झाला होता परंतु नवीन लीकमध्ये नियो 7 5जी 12जीबी रॅमसह समोर आला आहे. तसेच हा फोन 8जीबी रॅमसह लाँच होणार आहे. हे देखील वाचा: भारतीय बाजारात धुमाकूळ घालण्यासाठी येतोय Nokia X30 5G; रेडमी-रियलमीची लागणार का वाट?

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 5जी फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post 16 फेब्रुवारीच्या लाँचपूर्वीच iQOO Neo 7 5G च्या किंमतीचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/8gb-ram-iqoo-neo-7-5g-price-in-india-leak-ahead-of-16-february-launch/feed/ 0
लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-price-in-india-leaked-before-16-february-launch/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-price-in-india-leaked-before-16-february-launch/#respond Fri, 10 Feb 2023 06:18:13 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17696 iQOO Neo 7 5G फोन 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. हा भारतात येणारा आयकू नियो सीरीजचा दुसरा स्मार्टफोन असेल तसेच प्रोसेसिंगसाठी यात Mediatek Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनचे स्पेसिफिकेशन्स अनेक लीक्समधून समोर आले आहेत परंतु आज लाँचपूर्वीच फोनच्या भारतातील किंमतीचा देखील खुलासा झाला आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स, कलर ऑप्शन्स, प्राइस […]

The post लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.
  • हा फोन 12GB RAM+256GB Storage मध्ये सेलसाठी उपलब्ध होईल.
  • फोनची लाँच प्राइस व ऑफर प्राइस लीकमध्ये समोर आली आहे.

iQOO Neo 7 5G फोन 16 फेब्रुवारीला भारतात लाँच होणार आहे. हा भारतात येणारा आयकू नियो सीरीजचा दुसरा स्मार्टफोन असेल तसेच प्रोसेसिंगसाठी यात Mediatek Dimensity 8200 चिपसेट दिला जाऊ शकतो. फोनचे स्पेसिफिकेशन्स अनेक लीक्समधून समोर आले आहेत परंतु आज लाँचपूर्वीच फोनच्या भारतातील किंमतीचा देखील खुलासा झाला आहे. नवीन लीकमध्ये फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स, कलर ऑप्शन्स, प्राइस व सेल ऑफर्सची माहिती मिळाली आहे.

iQOO Neo 7 5G Price

आयकू नियो 7 च्या किंमतीची माहिती पारस गुगलानीनं दिली आहे. टिपस्टरनुसार हा मोबाइल फोन भारतात 12 जीबी रॅमसह लाँच केला जाईल ज्यात 256 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. या फोनची किंमत लीकमध्ये 34,999 रुपये सांगण्यात आली आहे.
टिपस्टरनुसार हा फोन 19 किंवा 20 फेब्रुवारीपासून सेलसाठी उपलब्ध होईल तसेच बँक व एक्सचेंज ऑफर अंतगर्त याची किंमत 30,999 रुपये होईल. लीकनुसार आयकू नियो 7 5जी फोन भारतीय बाजारात Interstellar Black आणि Frost Blue कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. हे देखील वाचा: एकदम गोळीगत! 240W Fast Charging सह Realme GT Neo5 लाँच; नाव बदलून येणार भारतात?

iQOO Neo 7 5G Specifications

आयकू नियो 7 5जी फोन चायनामध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसईचा रीब्रँडेड व्हर्जन असेल. त्यामुळे या दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स एक सारखे असतिल. चीनमधील नियो 7एसई 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह लाँच झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल असलेली स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर काम करते.

आयकू नियो 7एसई मीडियाटेक डिमेनसिटी 8200 चिपसेटसह लाँच झाला आहे तसेच हा प्रोसेसर iQOO Neo 7 5G फोनमध्ये देखील मिळू शकतो. आयकू नियो 7एसई 16जीबी रॅमवर लाँच झाला होता परंतु नवीन लीकमध्ये नियो 7 5जी 12जीबी रॅमसह समोर आला आहे. त्यामुळे हा फोन 16जीबी रॅमसह लाँच होण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा: आता 7 हजारांपेक्षा कमीमध्ये मिळणार Realme C30s; कंपनीनं कमी केली किंमत

फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 5जी फोनच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर असलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. पावर बॅकअपसाठी या फोनमध्ये 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएचची बॅटरी दिली जाऊ शकते.

The post लाँच झाला नाही तरी समोर आली iQOO Neo 7 ची किंमत; 16 फेब्रुवारीला येतोय भारतात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-price-in-india-leaked-before-16-february-launch/feed/ 0
16 फेब्रुवारीला भारतात येतोय iQOO Neo 7 5G; कंपनीनं केली घोषणा https://www.91mobiles.com/marathi/16-february-iqoo-neo-7-5g-launch-date-in-india/ https://www.91mobiles.com/marathi/16-february-iqoo-neo-7-5g-launch-date-in-india/#respond Tue, 17 Jan 2023 05:33:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16936 विवो सब-ब्रँड आयकू हळू-हळू भारतीय बाजारात जम बसवत आहे. एकीकडे कंपनी iQOO 11 5G सारखे फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करून वनप्लस, शाओमी आणि सॅमसंगला टक्कर देत आहे. तर दुसरीकडे या पावरफुल फोन नंतर आता कंपनी मिडबजेटमध्ये देखील दमदार स्मार्टफोन नियो 7 आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 16 फेब्रुवारीला iQOO Neo 7 […]

The post 16 फेब्रुवारीला भारतात येतोय iQOO Neo 7 5G; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 5G चा 16 फेब्रुवारीला भारतीय लाँच
  • अ‍ॅमेझॉनवरून होणार विक्री
  • iQOO Neo 7 5G मध्ये 16GB RAM आणि 120W Fast Charging

विवो सब-ब्रँड आयकू हळू-हळू भारतीय बाजारात जम बसवत आहे. एकीकडे कंपनी iQOO 11 5G सारखे फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करून वनप्लस, शाओमी आणि सॅमसंगला टक्कर देत आहे. तर दुसरीकडे या पावरफुल फोन नंतर आता कंपनी मिडबजेटमध्ये देखील दमदार स्मार्टफोन नियो 7 आणण्याची तयारी करत आहे. कंपनीनं घोषणा केली आहे की येत्या 16 फेब्रुवारीला iQOO Neo 7 5G फोन भारतात लाँच केला जाईल. हा भारतातील आयकू नियो सीरीजचा दुसरा स्मार्टफोन असेल.

आयकू इंडियानं अधिकृतपणे घोषणा केली आहे की नवीन iQOO Neo 7 5G फोन 16 फेब्रुवारीला भारतात लाँच केला जाईल. कंपनी हा ‘अ‍ॅमेझॉन स्पेशल’ प्रोडक्ट म्हणून टीज करत आहे त्यामुळे स्पष्ट झालं आहे की हा मोबाइल या ई-कॉमर्स साइटवर विकला जाईल. सध्या लाँच डेट व्यतिरिक्त कंपनीकडून इतर कोणतीही माहिती देण्यात आली नाही. नियो 7 5जी चायनामध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसईचा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो, अशी चर्चा आहे. त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स देखील सारखे असतील. हे देखील वाचा: अशी संधी पुन्हा मिळणार नाही! Nothing Phone (1) वर सर्वात मोठा डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर

iQOO Neo 7 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू नियो 7 चे स्पेसिफिकेशन्स चीनमध्ये आलेल्या आयकू नियो 7 एसई स्मार्टफोन सारखे असतील. या मोबाइल फोनचे स्पेसिफिकेशन्स पाहता, iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080-पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि पंच होल कटआउट थिन बेजल्ससह देण्यात आला आहे.

आयकूचा हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येतो, ज्याच्या जोडीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, जो चौकोनी आकाराच्या कॅमेरा मोड्युलमध्ये आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. आयकूच्या Neo 7 SE 5G स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. हे देखील वाचा: 16GB RAM आणि 5 कॅमेऱ्यांसह Samsung Galaxy A23 5G भारतात लाँच; इतकी आहे किंमत

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.3, ड्युअल-बँड Wi-Fi, NFC आणि GPS चा पर्याय मिळतो. तसेच हा फोन Android 13 आधारित Origin OS 3 वर चालतो.

The post 16 फेब्रुवारीला भारतात येतोय iQOO Neo 7 5G; कंपनीनं केली घोषणा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/16-february-iqoo-neo-7-5g-launch-date-in-india/feed/ 0
कथित iQOO Neo 7 5G फोन झाला भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-india-launch-soon-phone-listed-on-bis-check-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-india-launch-soon-phone-listed-on-bis-check-specifications/#respond Wed, 14 Dec 2022 06:46:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15975 iQOO नं अलीकडेच चीनमध्ये तीन नवीन स्मार्टफोन iQOO 11 5G, iQOO 11 Pro 5G आणि iQOO Neo 7 SE लाँच केले आहेत. कंपनीची नंबर सीरीज फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आली आहे तर नियो 7एसई मिडबजेट फोन आहे. हे तिन्ही मोबाइल फोन भारतीय बाजारात देखील लवकरच लाँच केले जाऊ शकतात. परंतु आज कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट […]

The post कथित iQOO Neo 7 5G फोन झाला भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
iQOO नं अलीकडेच चीनमध्ये तीन नवीन स्मार्टफोन iQOO 11 5G, iQOO 11 Pro 5G आणि iQOO Neo 7 SE लाँच केले आहेत. कंपनीची नंबर सीरीज फ्लॅगशिप कॅटेगरीमध्ये आली आहे तर नियो 7एसई मिडबजेट फोन आहे. हे तिन्ही मोबाइल फोन भारतीय बाजारात देखील लवकरच लाँच केले जाऊ शकतात. परंतु आज कंपनीच्या अधिकृत घोषणेपुर्वी भारतीय सर्टिफिकेशन साइट BIS वर एक नवीन स्मार्टफोन iQOO Neo 7 5G दिसला आहे. त्यामुळे अंदाज लावला जात हा फोन लवकरच आता भारतात लाँच केला जाऊ शकतो.

कथित iQOO Neo 7 5G फोन इंडियन सर्टिफिकेशन्स साइट बीआयएसवर लिस्ट झाला आहे. हा स्मार्टफोन चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 7 SE चा ही रिब्रँडेड व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे जो भारतीय बाजारात नियो 7 5जी नावानं सादर केला जाऊ शकतो. गिजमोचायनाच्या रिपोर्टनुसार ही लिस्टिंग 12 डिसेंबरची आहे तसेच यात सर्टिफाइड स्मार्टफोन आयकू नियो 7एसईच आहे जो लवकरच भारतात आयकू नियो 7 5जी नावानं लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: 17,500 रुपयांमध्ये वनप्लसचा दणकट फोन; OnePlus Nord CE 2 Lite वर असा मिळवा अतिरिक्त डिस्काउंट

iQOO Neo 7 5G चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स

आयकू नियो 7 5जी फोन चीनमध्ये लाँच झालेल्या आयकू नियो 7 एसई स्मार्टफोनचा इंडियन व्हर्जन असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे दोन्ही स्मार्टफोन्सचे स्पेसिफिकेशन्स सारखेच असू शकतात. iQOO Neo 7 SE स्मार्टफोनमध्ये 6.78-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 2400×1080-पिक्सल, अ‍ॅस्पेक्ट रेश्यो 20:9 आणि रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये फ्लॅट डिस्प्ले आणि पंच होल कटआउट थिन बेजल्ससह देण्यात आला आहे.

आयकूचा हा फोन MediaTek Dimensity 8200 SoC सह येतो, ज्याच्या जोडीला 16GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेज मिळते.फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो, जो चौकोनी आकाराच्या कॅमेरा मोड्युलमध्ये आहे. या फोनमध्ये 64MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. त्याचबरोबर 2MP चा मॅक्रो सेन्सर आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. आयकूच्या Neo 7 SE 5G स्मार्टफोनमध्ये 16MP चा फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे.

फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर आणि AI फेस अनलॉक मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये Bluetooth 5.3, ड्युअल-बँड Wi-Fi, NFC आणि GPS चा पर्याय मिळतो. तसेच हा फोन Android 13 आधारित Origin OS 3 वर चालतो. हे देखील वाचा: रेडमीच्या आधीच ‘ही’ कंपनी भारतात आणतेय 200MP Camera असलेला स्वस्त स्मार्टफोन; लाँच डेट घोषित

The post कथित iQOO Neo 7 5G फोन झाला भारतीय सर्टिफिकेशन वेबसाइटवर लिस्ट; लवकरच होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-5g-india-launch-soon-phone-listed-on-bis-check-specifications/feed/ 0