iQOO - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Wed, 26 Jul 2023 08:27:19 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-pro-5g-price-in-india-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-pro-5g-price-in-india-and-specifications-leaked/#respond Wed, 26 Jul 2023 08:27:19 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22577 iQOO Z7 Pro 5G फोन भारतात लाँच होण्यासाठी तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी आयकू इंडियाचे अधिकारी निपुण मार्या ह्यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून हा आगामी स्मार्टफोन टीज केला होता. कंपनीनं अद्याप फोनची लाँच डेट घोषित केली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार बाजारात येण्यापूर्वीच आयकू झेड7 प्रो 5जी ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत, […]

The post लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • ह्या फोनची प्रारंभिक किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असेल
  • हा डिवाइस OnePlus Nord CE 3 आणि Redmi Note 12 Pro 5G ला टक्कर देईल.
  • फोनमध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते

iQOO Z7 Pro 5G फोन भारतात लाँच होण्यासाठी तयार होत आहे. काही दिवसांपूर्वी आयकू इंडियाचे अधिकारी निपुण मार्या ह्यांनी आपल्या ट्वीटर हँडलच्या माध्यमातून हा आगामी स्मार्टफोन टीज केला होता. कंपनीनं अद्याप फोनची लाँच डेट घोषित केली नाही परंतु एका ताज्या लीकनुसार बाजारात येण्यापूर्वीच आयकू झेड7 प्रो 5जी ची भारतीय किंमत आणि स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत, ही माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

iQOO Z7 Pro 5G ची भारतीय किंमत (लीक)

टिपस्टर पारस गुगलानीनं आयकू झेड7 प्रो 5जी फोनची किंमत ट्वीटर हँडलवरून शेयर केली आहे. टिपस्टरनुसार ह्या फोनची प्रारंभिक किंमत 25,000 रुपयांच्या आसपास असेल तसेच सर्वात मोठ्या व्हेरिएंटची किंमत 30,000 रुपये पर्यंत जाईल. लीकनुसार iQOO Z7 Pro 5G बाजारात त्या प्राइस सेग्मेंटमध्ये आणलं जाईल ज्यात आधीपासूनच OnePlus Nord CE 3 आणि Redmi Note 12 Pro 5G आहे.

iQOO Z7 Pro 5G स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • 6.78″ 120Hz AMOLED display
  • MediaTek Dimensity 7200
  • 12GB RAM + 256GB storage
  • 64MP Rear + 16MP Front Camera
  • 66W fast charging
  • 4,600mAh battery
  • स्क्रीन : लीकनुसार आयकू झेड7 प्रो 5जी फोन 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली असेल तसेच 120हर्ट्झ रिफ्रेश रेटवर चालेल. कंपनीनं आधीच सांगितलं आहे की फोनमध्ये कर्व्ड पंच-होल डिस्प्ले मिळेल.
  • प्रोसेसर : Z7 Pro 5G अँड्रॉइड 13 आधारित फनटचओएस 13 सह लाँच केला जाऊ शकतो. लीकनुसार प्रोसेसिंगसाठी ह्या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7200 ऑक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो.
  • मेमरी : लीकनुसार नवीन आयकू फोन भारतात दोन रॅम व्हेरिएंट्समध्ये सादर होऊ शकतो. तसेच बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅम दिला जाऊ शकते तर मोठ्या व्हेरिएंटमध्ये 12जीबी मिळू शकतो. स्टोरेजसाठी 128जीबी मेमरी आणि 256जीबी मेमरी ह्या फोनमध्ये दिली जाऊ शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ह्याच्या बॅक पॅनलवर 64 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स मिळू शकते. तसेच फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी iQOO Z7 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 4,600एमएएचची बॅटरी असल्याचं लीकमध्ये सांगण्यात आलं आहे. ह्या फोनमध्ये 66वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.

The post लाँचपूर्वीच लीक झाली iQOO Z7 Pro 5G ची किंमत; भारतीय स्पेसिफिकेशन्सचा देखील खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7-pro-5g-price-in-india-and-specifications-leaked/feed/ 0
iQOO Z8 फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 5000mAh बॅटरी, Dimensity 8200 चिपसेटचा खुलासा https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z8-specifications-leaked-dimensity-8200-chipset-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z8-specifications-leaked-dimensity-8200-chipset-revealed/#respond Fri, 21 Jul 2023 07:25:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22510 iQOO आपल्या Z-सीरीजचा विस्तार करू शकते. असं सांगितलं जात आहे की कंपनी iQOO Z8 स्मार्टफोन घेऊन येऊ शकते. फोनबद्दल गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु आहे. तर, आता ह्या फोनचं अजून एक नवीन लीक समोर आलं आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. तुम्ही ह्या पोस्टमध्ये नवीन मोबाइलची माहिती वाचू शकता. iQOO Z8 स्मार्टफोन (लीक) iQOO […]

The post iQOO Z8 फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 5000mAh बॅटरी, Dimensity 8200 चिपसेटचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • मिड रेंज सेगमेंटमध्ये नवीन iQOO फोन सादर करू शकते.
  • ह्यात 144Hz रिफ्रेश रेट असलेला डिस्प्ले मिळू शकतो.
  • 120W फास्ट चार्जिंग दिली जाऊ शकते.

iQOO आपल्या Z-सीरीजचा विस्तार करू शकते. असं सांगितलं जात आहे की कंपनी iQOO Z8 स्मार्टफोन घेऊन येऊ शकते. फोनबद्दल गेल्या काही वर्षांपासून चर्चा सुरु आहे. तर, आता ह्या फोनचं अजून एक नवीन लीक समोर आलं आहे. ज्यात प्रमुख स्पेसिफिकेशनची माहिती मिळाली आहे. तुम्ही ह्या पोस्टमध्ये नवीन मोबाइलची माहिती वाचू शकता.

iQOO Z8 स्मार्टफोन (लीक)

iQOO Z8 मोबाइल बद्दल डिजिटल चॅट स्टेशनकडून लीक माहिती समोर आली आहे. त्याचबरोबर भारतातील प्रमुख टिपस्टर अभिषेक यादव यांनी देखील माहिती शेयर केली आहे. असं देखील बोललं जात आहे की डिवाइस कंपनी मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करू शकते. तसेच सर्वप्रथम हा स्मार्टफोन होम मार्केट चीनमध्ये लाँच होईल. त्यानंतर ह्याची एंट्री इतर बाजारांमध्ये केली जाऊ शकते.

iQOO Z8 चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : फोनच्या डिस्प्ले साइज बाबत माहिती मिळाली नाही परंतु ह्यात युजर्सना 144hz रिफ्रेश रेट असलेला आयपीएस एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो.
  • प्रोसेसर : दमदार परफॉर्मन्ससाठी कंपनी Dimensity 8200 प्रोसेसरचा वापर करू शकते.
  • स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 टेक्नॉलॉजीसह इंटरनल स्टोरेज दिला जाऊ शकते.
  • बॅटरी : हा फोन 2440mAh ड्युअल सेल बॅटरीसह येऊ शकतो. म्हणजे दोन्ही मिळून फोनमध्ये सुमारे 5000एमएएच ची बॅटरी दिली जाऊ शकते. ही बॅटरी 120वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.
  • कॅमेरा : डिवाइस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. परंतु ह्यातील सेन्सर्सची माहिती मात्र मिळाली नाही.
  • अन्य : डिवाइसमध्ये हीटिंग कमी करण्यासाठी कूलिंग टेक्नॉलॉजी, ड्युअल सिम 5G, वायफाय, ब्लूटूथ, फिंगरप्रिंट सेन्सर सारखे फीचर्स मिळू शकतात.
  • ओएस : हा लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.

The post iQOO Z8 फोनचे स्पेसिफिकेशन्स लीक; 5000mAh बॅटरी, Dimensity 8200 चिपसेटचा खुलासा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z8-specifications-leaked-dimensity-8200-chipset-revealed/feed/ 0
iQOO 12 फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह होऊ शकतो लाँच, लीक झाली महत्वाची माहिती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-12-specifications-leaked-phone-may-launch-soon-with-snapdragon-8-gen-3-chipset/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-12-specifications-leaked-phone-may-launch-soon-with-snapdragon-8-gen-3-chipset/#respond Wed, 12 Jul 2023 07:35:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22350 दमदार स्मार्टफोन बनवण्याच्या बाबतीत iQOO कंपनी गेल्या काही दिवसांपासून खूप सक्रिय झाली आहे. अलीकडेच iQOO 11S डिवाइस दमदार फीचर्ससह चीनमध्ये आला होता. तर, आता कंपनी आपली नंबर सीरीज वाढवण्यासाठी iQOO 12 आणण्याची तयारी करत आहे. असं सांगितलं जात आहे की हा डिवाइस फ्लॅगशिप लेव्हल फीचर्ससह येऊ शकतो. पुढे आम्ही लीक रिपोर्टमधून समोर आलेली माहिती दिली […]

The post iQOO 12 फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह होऊ शकतो लाँच, लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • कंपनी iQOO 12 आणण्याची तयारी करत आहे.
  • ह्यात स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो.
  • हा फोन ह्यावर्षीच्या शेवटी लाँच होऊ शकतो.

दमदार स्मार्टफोन बनवण्याच्या बाबतीत iQOO कंपनी गेल्या काही दिवसांपासून खूप सक्रिय झाली आहे. अलीकडेच iQOO 11S डिवाइस दमदार फीचर्ससह चीनमध्ये आला होता. तर, आता कंपनी आपली नंबर सीरीज वाढवण्यासाठी iQOO 12 आणण्याची तयारी करत आहे. असं सांगितलं जात आहे की हा डिवाइस फ्लॅगशिप लेव्हल फीचर्ससह येऊ शकतो. पुढे आम्ही लीक रिपोर्टमधून समोर आलेली माहिती दिली आहे.

iQOO 12 5G

iQOO 12 बद्दल टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं माहिती दिली आहे. त्यानं असं सांगितलं आहे की डिवाइस सर्वप्रथम चीनमध्ये येईल, त्यानंतर हा इतर बाजारपेठांमध्ये लाँच केला जाईल. अद्याप लाँच तारीख ठरली नाही परंतु हा फोन ह्या वर्षीच्या अखेरीस लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरु आहे.

iQOO 12 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • डिस्प्ले : iQOO 12 च्या डिस्प्लेच्या आकाराची माहिती मिळाली नाही परंतु हा डिवाइस 2K रिजॉल्यूशन असलेल्या अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येऊ शकतो. ह्यात 144hz रिफ्रेश रेट आणि चांगला व्हिज्युअल एक्सपीरियंस मिळू शकतो.
  • प्रोसेसर : लीकनुसार ह्यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 चिपसेट मिळू शकतो. हा प्रोसेसर अद्याप बाजारात आला नाही. ह्याचा लाँच येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. हा इंडस्ट्रीमधील बेस्ट आणि सर्वात शक्तिशाली प्रोसेसर असू शकतो.
  • स्टोरेज : हा डिवाइस 16GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येण्याची शक्यता आहे. लाँचच्या वेळी अन्य मॉडेल देखील समोर येऊ शकतात.
  • कॅमेरा : iQOO चा नवीन डिवाइस ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो. ह्यात 50 मेगापिक्सलची प्रायमरी कॅमेरा लेन्स मिळण्याची शक्यता आहे. अन्य कॅमेरा लेन्स आणि सेल्फी कॅमेऱ्याची माहिती मिळाली नाही.
  • बॅटरी : नवीन मोबाइलमध्ये 4700 किंवा 5000mAh ची बॅटरी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह मिळू शकते.
  • कनेक्टिव्हिटी : डिवाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, ब्लूटूथ, वायफाय आणि अन्य बेसिक फीचर्स देण्यात आले आहेत.
  • ओएस : स्मार्टफोन लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर आधारित असू शकतो.

The post iQOO 12 फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 सह होऊ शकतो लाँच, लीक झाली महत्वाची माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-12-specifications-leaked-phone-may-launch-soon-with-snapdragon-8-gen-3-chipset/feed/ 0
200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चीनमध्ये iQOO 11S लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11s-launched-in-china-with-snapdragon-8-gen-2-200w-charging-sport-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11s-launched-in-china-with-snapdragon-8-gen-2-200w-charging-sport-price-specifications/#respond Wed, 05 Jul 2023 06:17:54 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21896 iQOO नं चीनमध्ये आपल्या iQOO 11 सीरीजमध्ये नवीन iQOO 11S लाँच केला आहे. नव्याने बाजारात आलेला हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स ब्राइटनेस आणि 3200 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर चालतो. चला जाणून घेऊया ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स. iQOO 11S ची […]

The post 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चीनमध्ये iQOO 11S लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोनमध्ये 16GB रॅम आणि 1TBGB पर्यंतची स्टोरेज आहे.
  • हा स्मार्टफोन iQOO 11 सीरीजचा तिसरा हँडसेट आहे.
  • iQOO 11S मध्ये 200W फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

iQOO नं चीनमध्ये आपल्या iQOO 11 सीरीजमध्ये नवीन iQOO 11S लाँच केला आहे. नव्याने बाजारात आलेला हा फोन 144Hz रिफ्रेश रेट, 1800 निट्स ब्राइटनेस आणि 3200 x 1440 पिक्सल रेजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर चालतो. चला जाणून घेऊया ह्या फोनचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स.

iQOO 11S ची किंमत आणि उपलब्धता

  • डिवाइसच्या 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत CNY 3799 (जवळपास 43,156 रुपये) आहे.
  • 16जीबी रॅम आणि 256G स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4099 (जवळपास 46,600 रुपये) आहे.
  • 16GB रॅम आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY 4399 (जवळपास 49,900 रुपये) आहे.
  • 16GB रॅम आणि 1TBGB इंटरनल स्टोरेज मॉडेलची किंमत CNY 4,799 (जवळपास 54,518 रुपये) आहे.
  • हा डिवाइस चीनमध्ये 10 जुलैपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल.

iQOO 11s चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : iQOO 11s मध्ये 2K रेजोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेटसह 6.78-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • प्रोसेसर : स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 प्रोसेसरवर आधारित आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : iQOO 11s 12GB + 256GB, 16GB + 256GB, 16GB + 512GB आणि 16GB + 1TB च्या चार व्हेरिएंटमध्ये येतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी iQOO 11s मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 50MP Sony VCS IMX866 सेन्सर, 13MP पोर्ट्रेट लेन्स आणि 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्सचा समावेश आहे. सेल्फीसाठी ह्यात फ्रंटला 16MP चा कॅमेरा आहे.
  • ओएस : सॉफ्टवेयर पाहता QOO 11s अँड्रॉइड 13-आधारित ओरिजिन ओएस 3.0 आउट-ऑफ-द-बॉक्स चालतो.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh ची बॅटरी आहे.
  • कनेक्टिव्हिटी ऑप्शन : तसेच कनेक्टिव्हिटीसाठी ड्युअल सिम सपोर्ट, 4G LTE, 5G आणि वाय-फाय 7 चा समावेश करण्यात आला आहे.
  • कलर : iQOO 11s ट्रॅक व्हर्जन (व्हाइट), कियानतांग टिंगचाओ (सियान) आणि लेजेंडरी व्हर्जन (ब्लॅक) अशा तीन रंगात येतो.

iQOO 11S भारतात येणार का?

iQOO 11S सध्या फक्त चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. तसेच कंपनीनं ह्याच्या इंडिया लाँच बद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. त्यामुळे अजूनतरी ठोस काही सांगता येणार नाही, परंतु तुम्ही भारतात iQOO 11 5G विकत घेऊ शकता जो काही महिन्यांपूर्वी आला आहे.

The post 200W फास्ट चार्जिंग सपोर्टसह चीनमध्ये iQOO 11S लाँच, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11s-launched-in-china-with-snapdragon-8-gen-2-200w-charging-sport-price-specifications/feed/ 0
16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/#respond Tue, 04 Jul 2023 09:42:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21883 iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत […]

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO Neo 7 Pro स्मार्टफोन iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे.
  • हँडसेटमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC देण्यात आली आहे.
  • फोनची प्रारंभिक किंमत 34,999 रुपये आहे

iQOO Neo 7 Pro भारतीय बाजारात सादर करण्यात आला आहे. Neo-series मध्ये आलेला हा फोन भारतातील iQOO Neo 7 पेक्षा महाग आहे. ह्या फोनमध्ये Snapdragon 8+ Gen1 SoC आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. तसेच ह्या स्मार्टफोनची जाडी फक्त 8.5एमएम आहे तर वजन 197ग्राम आहे. चला जाणून घेऊया ह्या नवीन आयकू स्मार्टफोनची किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

iQOO Neo 7 Pro ची किंमत

  • iQOO Neo 7 Pro च्या 8GB/128GB मॉडेलची किंमत 34,999 रुपये आणि 12GB/256GB व्हेरिएंटची किंमत 37,999 रुपये आहे.
  • हा फोन 18 जुलै पर्यंत 1,000 रुपयांची डिस्काउंटसह विकत घेता येईल.
  • एसबीआय आणि आयसीआयसीआय डेबिट/क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास 2,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळेल.
  • iQOO च्या प्रामाणिक ग्राहकांसाठी 6 महिने नो-कॉस्ट ईएमआय, 2,000 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट आणि 1,000 रुपयांची अतिरिक्त सूट मिळत आहे. तसेच 2 वर्षांची अतिरिक्त वॉरंटी देखील मिळत आहे.

iQOO Neo 7 Pro चे स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : आयकू नियो 7 प्रो 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोवर सादर झाला आहे जो 6.78 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. ही फोन स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनल वापरून बनवण्यात आली आहे जी पंच-होल स्टाईलवर बनली आहे. हा आयकू मोबाइल 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो तसेच ह्यात एचडीआर10+ सारखे फीचर्स देखील मिळतात.
  • प्रोसेसर, रॅम व स्टोरेज : प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 चिपसेट देण्यात आला आहे तसेच ग्राफिक्ससाठी हा एड्रेनो 730 जीपीयूला सपोर्ट करतो. हा मोबाइल फोन LPDDR5 RAM आणि UFS 3.1 storage टेक्नॉलॉजी वर चालतो.
  • ओएस : iQOO Neo 7 Pro अँड्रॉइड 13 वर लाँच झाला आहे जो ओरिजन ओएससह चालतो.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी आयकू नियो 7 रेसिंग एडिशन च्या बॅक पॅनलवर एफ/1.88 अपर्चर असलेल्या 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सेन्सरसह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. तसेच फोनच्या फ्रंट पॅनलवर 16 मेगापिक्सलचा सेल्फी सेन्सर आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी हा फोन 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.

The post 16GB RAM आणि 120W चार्जिंगला सपोर्टसह लाँच झाला बाहुबली फोन, जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-with-16gb-ram-120w-fast-charging-launched-in-india-price-specification/feed/ 0
16GB रॅम असलेल्या iQOO 11 Legend च्या किंमतीत झाली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-gets-a-price-cut-of-rs-7000/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-gets-a-price-cut-of-rs-7000/#respond Tue, 04 Jul 2023 07:34:18 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21879 iQOO च्या फ्लॅगशिप फोन iQOO 11 Legend च्या किंमतीत कपात झाली आहे. फोन कंपनी यावर्षीच्या सुरवातीला लाँच केला होता. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो. ह्यात तुम्हाला चांगल्या कॅमेऱ्यासह 144Hz डिस्प्ले, 16GB जीबी पर्यंत रॅम, 120 वॉट फ्लॅशचार्ज इत्यादी मिळतात. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर आता चांगली संधी आहे. […]

The post 16GB रॅम असलेल्या iQOO 11 Legend च्या किंमतीत झाली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • iQOO 11 Legend वर 7000 रुपयांपर्यंतची सूट.
  • स्मार्टफोन 8GB/16GB रॅम व 256GB स्टोरेज मध्ये उपलब्ध.
  • फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी.

iQOO च्या फ्लॅगशिप फोन iQOO 11 Legend च्या किंमतीत कपात झाली आहे. फोन कंपनी यावर्षीच्या सुरवातीला लाँच केला होता. हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर चालतो. ह्यात तुम्हाला चांगल्या कॅमेऱ्यासह 144Hz डिस्प्ले, 16GB जीबी पर्यंत रॅम, 120 वॉट फ्लॅशचार्ज इत्यादी मिळतात. जर तुम्हाला हा फोन विकत घ्यायचा असेल तर आता चांगली संधी आहे. कारण ह्यावर तुम्हाला चांगली डील मिळेल.

iQOO 11 Legend ची नवीन किंमत

iQOO नं iQOO 11 Legend स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्समध्ये लाँच केला आहे, ज्यात 8GB रॅम + 256GB स्टोरेज आणि 16GB रॅम + 256GB स्टोरेजचा समावेश आहे. ह्या व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 61,999 रुपये आणि 66,999 रुपये आहे. प्रीमियम स्मार्टफोनच्या किंमतीत आता 7,000 रुपयांची कपात झाली आहे. ग्राहक आता 8GB व्हेरिएंट 54,999 रुपये आणि 16GB व्हेरिएंट 59,999 रुपयांमध्ये विकत घेऊ शकतील. किंमत कमी करण्याव्यतिरिक्त कंपनी आयसीआयसीआय बँक कार्डवर 3,000 रुपयांची इन्स्टंट सूट आणि 15 दिवसांची रिप्लेसमेंट देखील ऑफर करत आहे.

आयकू 11 लीजेंड स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले : या स्मार्टफोनमध्ये 6.79-इंच 2K डिस्प्ले आहे, जो 144Hz च्या हाय रिफ्रेश रेटसह सॅमसंग E6 टेक्नॉलॉजीचा वापर करतो. पॅनल एचडीआर 10+ सपोर्टसह येतो आणि 1800 निट्सची पीक ब्राइटनेस देऊ शकतो. चांगल्या व्हिज्युअल्ससाठी ह्यात डेडिकेटेड V2 चिप आहे.

  • प्रोसेसर : iQOO 11 लीजेंडमध्ये ऑक्टा-कोर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट आहे.
  • रॅम-स्टोरेज : स्मार्टफोनमध्ये 8GB/16GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज आहे. तसेच, युजर्सकडे 3GB पर्यंत अतिरिक्त रॅम वाढवण्याचा पर्यायही आहे.
  • बॅटरी-चार्जिंग : स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 120W फ्लॅशचार्ज टेक्नॉलॉजी आहे. जी फक्त 8 मिनट मध्ये 50% पर्यंत चार्ज होते.
  • कॅमेरा : फोनमध्ये 50MP GN5 प्रायमरी सेन्सर, 13MP टेलीफोटो आणि पोर्ट्रेट कॅमेरा, सह 8MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आहे.

    The post 16GB रॅम असलेल्या iQOO 11 Legend च्या किंमतीत झाली मोठी कपात, जाणून घ्या नवीन किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11-legend-gets-a-price-cut-of-rs-7000/feed/ 0 iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-india-launch-date-specifications-leak/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-india-launch-date-specifications-leak/#respond Thu, 01 Jun 2023 09:46:05 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21324 iQOO भारतात आपला नवीन मोबाइल फोन घेऊन येत आहे जो काही दिवसांपूर्वी ब्रँडचे इंडिया हेड निपुण मार्या यांनी टीज देखील केला होता. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही की कंपनी कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे, ताज्या ताजा लीकमध्ये नवीन आयकू फोनच्या नाव, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. त्यानुसार iQOO Neo […]

    The post iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • फोन 20 जूनच्या आसपास सादर होऊ शकतो.
    • ह्यात Snapdragon 8+ Gen 1 चिपसेट असू शकतो.
    • फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम दिली जाऊ शकतो.

    iQOO भारतात आपला नवीन मोबाइल फोन घेऊन येत आहे जो काही दिवसांपूर्वी ब्रँडचे इंडिया हेड निपुण मार्या यांनी टीज देखील केला होता. परंतु अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही की कंपनी कोणता स्मार्टफोन भारतात घेऊन येत आहे, ताज्या ताजा लीकमध्ये नवीन आयकू फोनच्या नाव, लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. त्यानुसार iQOO Neo 7 Pro भारतात लाँच होऊ शकतो.

    iQOO Neo 7 Pro इंडिया लाँच डेट (लीक)

    आयकू नियो 7 प्रो संबंधित माहिती टिपस्टर अभिषेक यादवनं शेयर केली आहे. अजूनतरी कोणतंही ठराविक लाँच डेट तर सांगण्यात आली नाही परंतु लीकनुसार Neo 7 Pro 20 जूनच्या जवळपास भारतात लाँच होऊ शकतो. हा आयकू फोन गेल्या महिन्यात चीनमध्ये लाँच झालेल्या iQOO Neo 8 चा रीब्रँडेड व्हर्जन असू शकतो.

    iQOO Neo 7 Pro स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • डिस्प्ले : iQOO Neo 7 Pro मध्ये 6.78 इंचाचा 1.5K AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. ज्यात 1260 x 2800 पिक्सल रिजोल्यूशन, 20:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियो, 144Hz रिफ्रेश रेट आणि 1,300 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली जाईल.
    • प्रोसेसर : नवीन iQOO डिवाइसमध्ये युजर्सना स्नॅपड्रॅगन 8 प्लस जेन 1 प्रोसेसर मिळू शकतो.
    • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 12GB पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256GB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज दिला जाऊ शकतो.
    • बॅटरी : iQOO Neo 7 Pro मध्ये मोठी 5000mAh ची बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
    • कॅमेरा : डिवाइसमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात OIS सह 50 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा आणि 2MP डेप्थ कॅमेरा लेन्स मिळू शकते. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
    • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 वर चालेल.
    • सुरक्षा : डिवाइसमध्ये सुरक्षेसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील मिळू शकतो.

    The post iQOO Neo 7 Pro ची इंडिया लाँच डेट आणि स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-7-pro-india-launch-date-specifications-leak/feed/ 0
    iQOO 11S चे स्पेसिफिकेशन्स लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11s-specifications-leaked-before-official-launch/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11s-specifications-leaked-before-official-launch/#respond Thu, 25 May 2023 06:33:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21173 चीनी स्मार्टफोन निर्माता iQOO आपल्या 11 सीरीजमधून एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याची प्लॅनिंग करत आहे. कंपनीनं अजूनतरी फोन बाबत कोणतीही माहिती शेयर केली नाही. परंतु, रिपोर्ट्सनुसार अपकमिंग iQOO 11S स्मार्टफोन 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तसेच ऑफिशियल लाँचपूर्वीच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती शेयर केली आहे. चला त्यावर एक […]

    The post iQOO 11S चे स्पेसिफिकेशन्स लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • iQOO 11S July आणि September दरम्यान येऊ शकतो आहे.
    • Snapdragon 8 Gen 2 मिळू शकतो फोनमध्ये.
    • ह्या फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा असू शकतो.

    चीनी स्मार्टफोन निर्माता iQOO आपल्या 11 सीरीजमधून एक नवीन स्मार्टफोन सादर करण्याची प्लॅनिंग करत आहे. कंपनीनं अजूनतरी फोन बाबत कोणतीही माहिती शेयर केली नाही. परंतु, रिपोर्ट्सनुसार अपकमिंग iQOO 11S स्मार्टफोन 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केला जाण्याची शक्यता आहे. तसेच ऑफिशियल लाँचपूर्वीच टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशननं स्मार्टफोनच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती शेयर केली आहे. चला त्यावर एक नजर टाकूया.

    आयकू 11एस चे लीक स्पेसिफिकेशन्स

    डिस्प्ले : ह्यात 6.78-इंचाचा E6 AMOLED डिस्प्ले 2K रेजोल्यूशन आणि हाय 144Hz रिफ्रेश रेट असू शकतो.

    कॅमेरा : V2 ISP इमेजिंग सिस्टमसह 50MP मेन कॅमेरा दिला जाऊ शकतो. सध्या फ्रंट कॅमेऱ्याची माहिती समोर आली नाही.

    चिपसेट : फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटची प्रोसेसिंग पावर दिली जाऊ शकते.

    रॅम व स्टोरेज : कंपनी 8GB रॅम आणि 12GB रॅमसह 256GB इंटरनल स्टोरेजचा ऑप्शन देऊ शकते.

    बॅटरी : 200W पावरसह फोनमध्ये मोठी बॅटरी दिली जाऊ शकते.

    नोट : ही सर्व माहिती टिपस्टरच्या टिपवर आधारित आहेत. परंतु कंपनीनं ह्या फोनबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही.

    कधी बाजारात येऊ शकतो आयकू 11एस

    iQOO 11S साल 2023 च्या तिसऱ्या तिमाहीत सादर केला जाऊ शकतो. ज्याचा अर्थ असा की कंपनी जुलै आणि सप्टेंबर दरम्यान हा स्मार्टफोन लाँच करू शकते. परंतु स्मार्टफोनच्या भारतीय लाँच बाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे सर्वप्रथम हा फोन चीनमध्ये येईल मग इतर देशांमध्ये उपलब्ध होऊ शकतो.

    यंदा जानेवारीत कंपनीनं भारतात iQOO 11 लाँच केला होता, जो आधी डिसेंबर 2022 मध्ये चीनमध्ये आला होता. ह्या फोनमध्ये 6.78-इंच QHD+ डिस्प्ले, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen2 चिपसेट, Android 13, 512GB पर्यंत स्टोरेज ऑप्शन सारखे स्पेसिफिकेशन्स आहेत. स्मार्टफोनच्या 8GB+256GB व्हेरिएंटची किंमत 59,999 रुपये आणि टॉप-अँड 16GB+256GB व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे.

    The post iQOO 11S चे स्पेसिफिकेशन्स लीक, लवकरच येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iqoo-11s-specifications-leaked-before-official-launch/feed/ 0
    iQOO Neo 8 सीरीज चीनमध्ये लाँच, मिळतो 50MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-8-series-launched-in-china-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-8-series-launched-in-china-price-specifications/#respond Wed, 24 May 2023 07:32:28 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21146 iQOO Neo 8 सीरीज अखेरीस चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. ह्या लाइनअपमध्ये कंपनीनं iQOO Neo 8 आणि iQOO Neo 8 Pro सादर केला आहे. ही सीरीज लुक आणि फीचर्सच्या बाबतीत भरपूर शानदार आहे. खासियत पाहता कंपनीनं पहिल्यांदाच iQOO Neo series मध्ये फोटोग्राफीसाठी V1+ चिप आणि AI चा वापर केला आहे. आयकू नियो 8 सीरीजची किंमत […]

    The post iQOO Neo 8 सीरीज चीनमध्ये लाँच, मिळतो 50MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • iQOO Neo 8 सीरिजची प्रारंभिक किंमत RMB 2,499 (सुमारे 29,400 रुपये) आहे.
    • iQOO Neo 8 सीरीजमध्ये अँड्रॉइड 13 OS आणि 50MP ट्रिपल कॅमेरा सेन्सर आहे.
    • iQOO Neo 8 सीरीज चीनच्या बाहेरही लाँच केली जाऊ शकते.

    iQOO Neo 8 सीरीज अखेरीस चीनमध्ये लाँच करण्यात आली आहे. ह्या लाइनअपमध्ये कंपनीनं iQOO Neo 8 आणि iQOO Neo 8 Pro सादर केला आहे. ही सीरीज लुक आणि फीचर्सच्या बाबतीत भरपूर शानदार आहे. खासियत पाहता कंपनीनं पहिल्यांदाच iQOO Neo series मध्ये फोटोग्राफीसाठी V1+ चिप आणि AI चा वापर केला आहे.

    आयकू नियो 8 सीरीजची किंमत

    iQOO Neo 8 च्या 12जीबी + 256जीबी व्हेरिएंटची किंमत RMB 2,499 (जवळपास 29,400 रुपये), 12GB + 512GB व्हेरिएंटची किंमत RMB 2,799 (जवळपास 32,900 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंटची किंमत RMB 3,099 (जवळपास 36,400 रुपये) आहे.

    iQOO Neo 8 Pro च्या 16GB + 256GB व्हेरिएंटची किंमत RMB 3299 ( जवळपास 38,800 रुपये) आणि 16GB + 512GB व्हेरिएंट RMB 3599 (जवळपास 42,300 रुपये) आहे. ह्या दोन्ही फोन्सची विक्री चीनमध्ये 31 मेपासून सुरु होईल.

    आयकू नियो 8 सीरीज चे स्पेसिफिकेशन्स

    डिस्प्ले : iQOO Neo 8 सीरीजमध्ये 6.78-इंचाचा 1.5K अ‍ॅमोलेड डिस्प्ले 144Hz रिफ्रेश रेट, 92.9 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो, 2800×1260 रिजोल्यूशन, 2160Hz PWM आणि पंच होल कटआउट सह देण्यात आला आहे.

    प्रोसेसर : iQOO Neo 8 Pro मध्ये पावरसाठी नवीन Immortalis-G715 सह Dimensity 9200+ प्रोसेसरसह मिळतो. तर वॅनिला मॉडेलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन1 आणि एड्रिनो जीपीयू देण्यात आला आहे.

    रॅम आणि स्टोरेज : iQOO Neo 8 सीरीजमध्ये 16GB LPDDR5 RAM आणि 512GB UFS 4.0 पर्यंतच्या स्टोरेज असेल.

    ओएस : iQOO Neo 8 सीरीज Origin OS 3.0 सह अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमवर चालते.

    कॅमेरा : iQOO Neo 8 मध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा सेन्सर आणि 2MP बोकेह लेन्स आहे तर iQOO Neo 8 Pro मध्ये 50MP Sony IMX866V चा मेन कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर आहे. तसेच दोन्ही फोन्समध्ये सेल्फीसाठी 16MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.

    बॅटरी : iQOO Neo 8 सीरीजमध्ये 120 वॉट फास्ट चार्जिंगसह 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच ह्यात USB टाइप-सी चार्जिंग पोर्ट आहे.

    कनेक्टिव्हिटी : iQOO Neo 8 सीरीजमध्ये इन-डिस्प्ले सेन्सर आणि aptX, टाईप-सी ऑडियो, 5G, 4G LTE, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.3, जीपीएस, एनएफसी आणि USB टाइप-सी पोर्ट मिळतो.

    The post iQOO Neo 8 सीरीज चीनमध्ये लाँच, मिळतो 50MP कॅमेरा आणि 120W फास्ट चार्जिंग first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iqoo-neo-8-series-launched-in-china-price-specifications/feed/ 0
    स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह iQOO Z7s 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7s-5g-launched-in-india-with-snapdragon-695/ https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7s-5g-launched-in-india-with-snapdragon-695/#respond Mon, 22 May 2023 05:38:03 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21047 iQOO नं कोणताही गाजावाजा न करता गुपचूप iQOO Z7s 5G स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. हा कंपनीच्या Z7 सीरिजमधील दुसरा फोन आहे. ह्याआधी कंपनीनं डिमेन्सिटी 920 चिपसेटसह iQOO Z7 5G स्मार्टफोन यंदा मार्चमध्ये सादर केला होता. नवीन आयकू झेड7एस मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला असून ह्याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे. आयकू झेड7एस […]

    The post स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह iQOO Z7s 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • iQOO Z7s 5G ची किंमत 19 हजारांच्या आत ठेवण्यात आली आहे.
    • फोनमध्ये अ‍ॅमोलेड डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे.
    • फोनमध्ये 8जीबी पर्यंत रॅम मिळतो.

    iQOO नं कोणताही गाजावाजा न करता गुपचूप iQOO Z7s 5G स्मार्टफोन भारतात सादर केला आहे. हा कंपनीच्या Z7 सीरिजमधील दुसरा फोन आहे. ह्याआधी कंपनीनं डिमेन्सिटी 920 चिपसेटसह iQOO Z7 5G स्मार्टफोन यंदा मार्चमध्ये सादर केला होता. नवीन आयकू झेड7एस मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला असून ह्याच्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती पुढे देण्यात आली आहे.

    आयकू झेड7एस ची किंमत

    • iQOO Z7s 5G 6GB + 128GB = 18,999 रुपये
    • iQOO Z7s 5G 8GB + 128GB = 19,999 रुपये

    iQOO Z7s 5G मोबाइल फोन आता कंपनीच्या भारतीय वेबसाइटसह अ‍ॅमेझॉन इंडियावर लिस्ट करण्यात आला आहे. फोनचा 6जीबी रॅम व 128जीबी स्टोरेज असलेला मॉडेल 18,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8जीबी रॅम व 128जीबी स्टोरेजसाठी 19,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन नॉर्वे ब्लू आणि पॅसिफिक नाईट कलर्समध्ये सादर करण्यात आला आहे.

    आयकू झेड7एस चे स्पेसिफिकेशन्स

    • 6.38” FHD+ AMOLED display
    • 90Hz refresh rate

    iQOO Z7s 5G मध्ये 6.38 इंचाचा अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 1080 x 2400 पिक्सलसह फुल एचडी+ रिजोल्यूशन, 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 360 हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 1300 निट्झ पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. तसेच सिक्योरिटीसाठी ह्यात फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.

    • Snapdragon 695 chipset
    • 8GB RAM, 128GB storage

    स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटची ताकद आयकू झेड7एस मध्ये देण्यात आली आहे. चांगल्या गेमिंग एक्सपीरियन्ससाठी कंपनीनं ह्यात मोशन कंट्रोल, 1200हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि अल्ट्रा गेमिंग मोड दिला आहे. हा डिवाइस 8जीबी पर्यंतच्या रॅम, 8जीबी वर्चुअल रॅम आणि 128जीबी इंटरनल स्टोरेजसह येतो. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे.

    • 16 MP front camera
    • 64 MP primary camera with OIS

    स्मार्टफोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर फोनच्या मागे ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह ओआयएस सपोर्ट असलेला 64 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर आणि जोडीला 2 मेगापिक्सलचा बोकेह कॅमेरा देण्यात आला आहे.

    • Android 13 OS
    • 44W fast charging

    iQOO Z7s 5G स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित फनटच ओएस 13 वर चालतो. ह्यात 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 44 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी ह्यात ड्युअल सिम सपोर्ट, 5जी, वायफाय 5, ब्लूटूथ 5.1, जीपीएस, यूएसबी सी पोर्ट आणि 3.5एमएम ऑडिओ जॅक देण्यात आला आहे.

    The post स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसरसह iQOO Z7s 5G ची भारतात एंट्री; जाणून घ्या किंमत first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/iqoo-z7s-5g-launched-in-india-with-snapdragon-695/feed/ 0