Mobile Tips And Tricks In Marathi - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 23 Jun 2023 11:18:53 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं https://www.91mobiles.com/marathi/bank-ac-kas-ughdayach-how-to-open-bank-ac-know-the-simple-tricks/ https://www.91mobiles.com/marathi/bank-ac-kas-ughdayach-how-to-open-bank-ac-know-the-simple-tricks/#respond Fri, 23 Jun 2023 10:30:32 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=13580 How To Open Bank AC Online: सध्या आधार कार्ड आणि वोटर आयडीप्रमाणे बँक अकाऊंट देखील आवश्यक आहे. तुम्ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्ही स्वतःच बँक अकाऊंट स्वतः ओपन करू शकता. विशेष म्हणजे या डिजिटल युगात तुम्ही घर बसल्या तुमचं बँक अकाऊंट उघडू शकता. या लेखात आम्ही घर बसल्या बँक अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगितली […]

The post घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
How To Open Bank AC Online: सध्या आधार कार्ड आणि वोटर आयडीप्रमाणे बँक अकाऊंट देखील आवश्यक आहे. तुम्ही 18 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल तर तुम्ही स्वतःच बँक अकाऊंट स्वतः ओपन करू शकता. विशेष म्हणजे या डिजिटल युगात तुम्ही घर बसल्या तुमचं बँक अकाऊंट उघडू शकता. या लेखात आम्ही घर बसल्या बँक अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगितली आहे. इथे आम्ही HDFC Bank मध्ये सेव्हिंग अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगितली आहे परंतु सर्व खाजगी बँकांमध्ये ही पद्धत थोड्याफार फरकाने सारखीच असते.

बँक अकाऊंट कसं उघडायचं

आज आम्ही तुम्हाला सेव्हिंग बँक अकाऊंट उघडण्याची पद्धत सांगणार आहोत. ऑनलाइन बँक अकाऊंट ओपन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाइल नंबरसह आधार कार्ड, पॅन कार्ड आणि वोटर आयडी सारखे डॉक्यूमेंट तयार ठेवणं आवश्यक आहे. या डॉक्युमेंट्सच्या आधारावर तुमचं अकाऊंट ओपन होईल. हे देखील वाचा: 43 हजार रुपयांमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर; GT Force नं लाँच केल्या दोन स्वस्त Electric Scooters

HDFC मध्ये सेव्हिंग बँक अकाऊंट उघडण्यासाठी सर्वप्रथम

स्टेप 1: तुम्हाला या लिंकवर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2: इथे क्लिक करताच तुमच्या समोर एक विंडो उघडेल जिथे सर्वप्रथम मोबाइल नंबर टाकावा लागेल आणि त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ म्हणजे जन्मतारीख टाका. त्यानंतर खाली दिलेल्या स्टार्ट नाउ बटनवर क्लिक करा.

स्टेप 3: क्लिक केल्यानंतर व्हेरिफाय केलं जाईल आणि तुम्हाला Mr, Ms किंवा थर्ड जेंडरसाठी Mx पैकी एक पर्याय निवडावा लागेल. त्यानंतर बाजूला असलेल्या रकान्यात आधार कार्ड प्रमाणे तुमचं नाव टाका आणि खाली दिलेल्या Get OTP वर क्लिक करा.

Bank Ac Kas Ughdayach How To Open Bank Ac Know The Simple Tricks

स्टेप 4: त्यानंतर मोबाइल आलेला OTP सबमिट करा आणि कंटिन्यू करा.

स्टेप 5: त्यानंतर जेव्हा तुम्ही पुढे जाल तेव्हा तुम्हाला आधार नंबर किंवा व्हर्च्युअल आधार आयडी टाकण्याचा पर्याय मिळेल.

Bank Ac Kas Ughdayach How To Open Bank Ac Know The Simple Tricks

स्टेप 6: आधार नंबर टाकून सबमिट केल्यानंतर पुन्हा एकदा एक ओटीपी येईल आणि तो सबमिट करा. हा OTP त्या मोबाइल नंबरवर येईल ज्याच्याशी आपका आधार कार्ड कनेक्ट आहे.

स्टेप 7: OTP सबमिट करताच एक नवीन विंडो उघडेल जिथे आधारवरील तुमचा पत्ता येईल. त्यात लँड मार्क टाका आणि सबमिट करा.

स्टेप 8: त्यानंतर एक नवीन पेज येईल ज्यात तुमच्या व्यवसाय किंवा नोकरीची माहिती द्यावी लागेल आणि तुमच्याकडे पॅन कार्ड नंबर देखील मागितला जाईल. तो देऊन पुढे कंटिन्यू करा.

Bank Ac Kas Ughdayach How To Open Bank Ac Know The Simple Tricks

स्टेप 9: इथे तुमच्याकडे दोन प्रकारचे सेव्हिंग अकाऊंट उघडण्याचे पर्याय मिळतील. यातील ग्रामीण भागांतील अकाऊंटसाठी 10 हजार रुपये तुम्हाला बँलेन्स मेंटेन करावा लागतो तर मेट्रो शहरांमध्ये 25 हजार बॅलेन्स लागतो.

स्टेप 10: अकाऊंटचा पर्याय निवडल्यानंतर तुमच्या आई आणि वडिलांची नावे आणि नॉमिनी डिटेल्ससह अन्य माहिती द्यावी लागेल.

स्टेप 11: माहिती दिल्यानंतर तुम्हाला ऑनलाइन डॉक्यूमेंट सबमिट करण्यास सांगण्यात येईल. सर्व आवश्यक डॉक्यूमेंट अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक व्हिडीओ कॉलशी कनेक्ट केलं जाईल.

Bank Ac Kas Ughdayach How To Open Bank Ac Know The Simple Tricks

स्टेप 12: या व्हिडीओ कॉलमध्ये तुम्ही दिलेल्या माहितीची पडताळणी केली जाईल आणि ओरिजनल डॉक्युमेंट बघितले जातील. हे देखील वाचा: How To Book Confirm Train Ticket Online: अशाप्रकारे मिळवा प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये मिळवा कंफर्म तिकीट

ही प्रक्रिया पूर्ण केल्यावर तुमचं बँक अकाऊंट ओपन होईल आणि तुम्हाला दिलेल्या मोबाइल नंबर आणि ईमेल आयडीवर अकाऊंट नंबर पाठवला जाईल. काही दिवसांनी तुमच्या पत्त्यावर डेबीट कार्ड देखील येईल आणि तुम्ही बँकिंग सेवा वापरू शकाल.

The post घर बसल्या उघडा बँक अकाऊंट, काही क्लिक्समध्ये सुरु करा बचत खातं first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/bank-ac-kas-ughdayach-how-to-open-bank-ac-know-the-simple-tricks/feed/ 0
YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-youtube-channel-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-youtube-channel-in-marathi/#respond Sun, 29 Jan 2023 03:42:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15182 YouTube चॅनेल कसं बनवायचं? मोबाइल आणि लॅपटॉपवर व्हिडीओज बघताना तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की स्वतःचं YouTube चॅनेल कसं बनवायचं? कारण हे एक असं माध्यम आहे जे अगदी सहज तुमची क्रिएटिव्हिटी जगासमोर ठेवण्यास मदत करतं. इथे लोक तुमचे व्हिडीओज लाइक, शेयर आणि कमेंट करतात. यामुळे सध्या अनेक लोक युट्युब व्हिडीओ क्रियेट करत आहेत. तुम्हाला कदाचित […]

The post YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
YouTube चॅनेल कसं बनवायचं? मोबाइल आणि लॅपटॉपवर व्हिडीओज बघताना तुम्हाला देखील प्रश्न पडला असेल की स्वतःचं YouTube चॅनेल कसं बनवायचं? कारण हे एक असं माध्यम आहे जे अगदी सहज तुमची क्रिएटिव्हिटी जगासमोर ठेवण्यास मदत करतं. इथे लोक तुमचे व्हिडीओज लाइक, शेयर आणि कमेंट करतात. यामुळे सध्या अनेक लोक युट्युब व्हिडीओ क्रियेट करत आहेत. तुम्हाला कदाचित माहित नसेल परंतु सध्या जगात 260 कोटींपेक्षा जास्त लोक युट्युबशी जोडले गेले आहेत आणि इथे 5 कोटींपेक्षा जास्त युजर्स युट्युब व्हिडीओ क्रियेट करतात. त्यामुळे तुम्ही देखील या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकता आणि तुमची क्रिएटिव्हिटी युट्युबच्या माध्यमातून जगासमोर ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया कसं बनवायचं युट्युब चॅनेल?

कसं बनवायचं YouTube चॅनेल

युट्युबची सर्वात चांगली बाब म्हणजे चॅनेल बनवण्यासाठी तुम्हाला जास्त मोठी प्रक्रिया करावी लागत नाही. जर तुमच्याकडे जीमेल आयडी किंवा ज्याला गुगल अकाऊंट म्हणतात, असेल तर असं समजा तुमचा युट्युब चॅनल रेडी आहे आणि तुम्हाला फक्त साइन इन करायचं आहे. हे देखील वाचा: सोप्या शब्दांत समजून घ्या 5G स्पेक्ट्रम बँड; 5G फोन विकत घेताना होणार नाही फसवणूक

स्टेप 1ः युट्युब अकाऊंट बनवण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोन किंवा लॅपटॉपच्या ब्राउजरमध्ये जाऊन युट्युब डाट कॉम ओपन करावं लागेल.

स्टेप 2ः तिथे डावीकडे वरच्या बाजूला साइन इनचा ऑप्शन मिळेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 3ः क्लिक करताच गुगल अकाऊंटची नवीन विंडो ओपन होईल आणि त्यात तुम्हाला तुमच्या आयडी व पासवर्डसह साइन इन करायचं आहे.

स्टेप 4ः साइन इन करताच तुमचं युट्युब पेज ओपन होईल.

स्टेप 5ः इथे तुम्हाला वरच्या बाजूला कस्टमाइज चॅनेल आणि मॅनेज व्हिडीओसह दोन ऑप्शन मिळतील. तसेच वर एक छोटासा कॅमेरा आयकॉन असेल. या आयकॉनवर क्लिक करून तुम्ही व्हिडीओ अपलोड करू शकता किंवा तुमच्या मोबाइल कॅमेऱ्याने थेट व्हिडीओ शूट करू शकता.

स्टेप 6ः कस्टमाइज चॅनेलमध्ये तीन ऑप्शन आहेत. पहिला लेआउट जिथे तुम्ही तुमच्या चॅनेलसाठी ट्रेलर आणि फीचर व्हिडीओ सेट करू शकता.

ते दुसरा ऑप्शन आहे ब्रँडिंग. यात क्लिक केल्यावर तुम्ही तुमच्या चॅनेलचं नाव, लोगो आणि बॅनर इमेज सेट करू शकता. तसेच तिसरा ऑप्शन आहे बेसिक इन्फो. यात तुम्ही तुमच्या चॅनेलची माहिती देऊ शकता. तुम्ही या गोष्टी नाही बदलल्या तरी तुमचं चॅनेल सुरु राहील. परंतु माहिती दिल्यास तुमचं चॅनल कशाबद्दल आहे आणि कोणते व्हिडीओ पहिल्या मिळतील, याची माहिती प्रेक्षाकांना मिळेल. तसेच तुमची ब्रँडिंग चांगली होते.

स्टेप 7ः तसेच मॅनेज व्हिडीओमध्ये जाऊन तुम्ही तुमच्या व्हिडीओजची लिस्ट बघू शकता, तसेच ते एडिट आणि त्यांचं पब्लिश टाइम, डेट आणि व्यूवर सेटिंग बदलू शकता. याला युट्युब स्टूडियो देखील म्हणतात.

अशाप्रकारे तुमचं युट्युब चॅनेल तयार होतं. तुम्ही वर दिलेल्या कॅमेरा आयकॉनवर क्लिक करून लाइव्ह व्हिडीओ शूट करू शकता किंवा तुमच्या लॅपटॉप किंवा कंप्यूटरवरील सेव्ह व्हिडीओ अपलोड करून तो पब्लिश करू शकता.

मोबाइलवरून कसा करायचा YouTube व्हिडीओ अपलोड

जर तुम्ही युट्युबचा वापर मोबाइलवरून करत असाल तर काम अजून सोपं होईल. हे देखील वाचा: e-Shram Card साठी कसा करायचा मोफत अर्ज; महिन्याला मिळवा 3 हजार, 2 लाखांचं विमा संरक्षण

स्टेप 1ः यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युट्युब अ‍ॅप ओपन करावं लागेल. जर अँड्रॉइड फोन असेल तर आधीच गुगल अकाऊंट साइन इन असेल. जर अँड्रॉइड फोन नसेल तर गुगल अकाऊंटनं साइन करावं लागेल.

स्टेप 2ः खाली तुम्हाला तुम्हाला होम आणि शॉट्सनंतर प्लसचा ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक करा.

स्टेप 3ः तसेच खाली तीन ऑप्शन मिळतील. क्रियेट शॉट, अपलोड व्हिडीओ आणि गो लाइव्ह.

इथे फक्त पहिल्या ऑप्शनमध्ये युट्युबसाठी शॉर्ट व्हिडीओ क्रियेट करता येतील. परंतु युट्युबच्या मेन चॅनेलसाठी व्हिडीओ बनवायचे असतील तर इथे अपलोडवर क्लिक करून फोनमध्ये सेव्ह केलेला व्हिडीओ अपलोड करता येईल. तसेच जर तुम्हाला लाइव्ह जायचं असेल तर गो लाइव्हचा ऑप्शन आहे.

अशाप्रकारे तुम्ही तुमचं युट्युब अकाऊंट तयार होईल. मोबाइलमध्ये देखील तुम्हाला युट्युब व्हिडीओ मॅनेज करण्याचा ऑप्शन मिळतो. यासाठी तुम्हाला डावीकडे वर दिलेल्या तुमच्या प्रोफाइल इमेजवर क्लिक करावे लागेल आणि इथे युअर चॅनेलवर जा.

इथे क्लिक करताच तुम्ही तुमच्या चॅनेल होमवर पोहोचाल आणि खाली तुमच्या व्हिडीओजची संपूर्ण यादी दिसेल. तसेच समोरच्या स्क्रीनवर मॅनेज व्हिडीओचा ऑप्शन मिळेल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post YouTube Channel बनवण्याची योग्य पद्धत जाणून घ्या इथे, फॉलो करा या स्टेप्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-make-youtube-channel-in-marathi/feed/ 0
अश्याप्रकारे चेक करा आपल्या फोन मध्ये 3G आणि 4G नेटवर्क स्ट्रेंथ, समजेल कॉल ड्रॉपचे कारण https://www.91mobiles.com/marathi/how-to-chek-mobile-network-signal-strength/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-chek-mobile-network-signal-strength/#respond Thu, 19 Nov 2020 13:27:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=9002 हँडसेट विकत घेताना आपण फोन मध्ये फीचर, स्टाइल आणि किंमत बघून बेस्ट डिवाइस घेता पण नेटवर्क स्ट्रेंथ बघत नाही. तसे पाहता तेव्हा हे चेक करता देखील येत नाही पण नंतर तुम्ही हि चेक करू शकता. पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे.

The post अश्याप्रकारे चेक करा आपल्या फोन मध्ये 3G आणि 4G नेटवर्क स्ट्रेंथ, समजेल कॉल ड्रॉपचे कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
मोबाईल वर बोलताना नेहमी कॉल कट होतो किंवा कॉलिंग मध्ये खूप जास्त डिस्टर्बन्स होत असेल तर आपण सर्व दोष नेटवर्क ऑपरेटर्स वर टाकतो. जरा पण विचार करत नाही की समस्या हँडसेट मध्ये पण असू शकते. वास्तवात नेहमी समस्या हँडसेटची असते. फोनची नेटवर्क स्ट्रेंथ कमजोर असते आणि यामुळे कॉलिंग आणि डेटा सह दुसऱ्या अनेक समस्या निर्माण होतात. हँडसेट विकत घेताना आपण फोन मध्ये फीचर, स्टाइल आणि किंमत बघून बेस्ट डिवाइस घेता पण नेटवर्क स्ट्रेंथ बघत नाही. तसे पाहता तेव्हा हे चेक करता देखील येत नाही पण नंतर तुम्ही हि चेक करू शकता. पुढे आम्ही याची पद्धत सांगितली आहे.

जर तुमच्या फोन मध्ये नेटवर्कची समस्या होत असेल तर तुम्हाला हि खूप उपयोगी पडेल. तुम्हाला समजेल कि हि फोनची समस्या आहे कि तुमच्या परिसरात नेटवर्कच कमजोर आहे.

नेटवर्क स्ट्रेंथ म्हणजे काय

मोबाईल मध्ये नेटवर्क स्ट्रेंथ तुमच्या फोन मध्ये कसा सिग्नल येत आहे हे सांगते. हे तुमच्या कॉलिंग आणि डेटा सह नेटवर्क आधारित दुसऱ्या सर्विसेजच्या क्वालिटी वर अवलंबू असते. नेटवर्क स्ट्रेंथ dBm मध्ये मोजली जाते. dBm चा अर्थ decibel-milliwats. प्रत्येक 3 dBm ने नेटवर्कची ताकद दुप्पट होते. तसेच प्रत्येक 6 dBm ने दुप्पट ऐरिया कवर होतो. उदाहरणार्थ जर तुमच्या फोन मध्ये —83 dBm नेटवर्क आहे आणि जर हा —80 झाला तर ताकद दुप्पट झाली आणि जर —77dBm झाला तर त्याचा कवरेज ऐरिया दुप्पट झाला. त्यामुळे लक्षात असू द्या कि नेटवर्क स्ट्रेंथ — dBm मध्ये असेल आणि हि जेवढी कमी असेल तेवढी चांगली.

हे देखील वाचा : 08 मेगापिक्सल कॅमेऱ्यासह येईल Xiaomi Mi 11 स्मार्टफोन, Samsung Galaxy S21 ला टक्कर देण्यासाठी होईल लॉन्च

अशी आहे नेटवर्क स्ट्रेंथ बघण्याची पद्धत

अँड्रॉइड फोनसाठी: अँड्रॉइड फोन मध्ये नेटवर्क स्ट्रेंथ मोजण्याची पद्धत खूप सोप्पी आहे. यासाठी सर्वप्रथम तुम्हाला

1- तुमच्या फोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल.

2- तिथून तुम्हाला अबाउट फोनची निवड करावी लागेल आणि त्यावर क्लिक करावी लागेल.

3- इथे तुम्हाला अनेक ऑप्शन दिसतील पण तुम्हाला स्टेटस मध्ये जायचे आहे.

4- इथे पण अनेक पर्याय आहेत पण तुम्हाला सिम कार्ड स्टेटस निवडायचे आहे. इथे क्लिक करताच नवीन विंडो खुली होईल आणि इथे खाली तुम्हाला सिग्नल स्ट्रेंथ दिसेल. तुम्हाला समजेल कि सिग्नल स्ट्रेंथ कशी आहे.

अनेक मोबाईल फोन मध्ये हि पद्धत थोडी वेगळी असू शकतो. खास करून चीनी ब्रँडच्या फोन मध्ये तुम्हाला सर्वप्रथम अबाउट फोन मध्ये जावे लागेल. इथे स्टेटस मध्ये आणि मग नेटवर्क वर क्लिक करावी लागेल. असे केल्यावर सिग्नल स्ट्रेंथ समोर येईल.

हे देखील वाचा : Samsung च्या आधी या कंपनीने लॉन्च केला M12 स्मार्टफोन, 6GB RAM सह आहे 5,100mAh बॅटरी आणि 48MP कॅमेरा

3जी आणि 4जी नेटवर्कसाठी बेस्ट सिग्नल स्ट्रेंथ कोणती

फोन मध्ये किती सिग्नल स्ट्रेंथ असणे बेस्ट आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. 3जी नेटवर्क आणि 4जी नेटवर्क जाणून घेण्यासाठी पद्धत एकच आहे पण मोजण्याची पद्धत बदलते. जर तुमच्या फोन मध्ये 3जी सिम असेल तर -50 ते -79 dBm नेटवर्क स्ट्रेंथ बेस्ट म्हणता येईल. तसेच जर -80 ते -89 dBm नेटवर्क असेल तरीही ठीक आहे आणि -90 ते -99 dBm नेटवर्क सरासरी म्हणता येईल. म्हणजे इथून तुम्हाला त्रास होऊ शकतो. तसेच जर सिग्नल स्ट्रेंथ 100 ते -109 dBm असेल तर तो कमजोर आहे आणि 110dBm किंवा त्यावर स्ट्रेंथ गेली तर ती खूप वाईट म्हटली जाते.

अश्याप्रकारे 4जी नेटवर्कसाठी हि मोजण्याची पद्धत जास्त वेगळी नाही पण जर -90 dBm पर्यंतचा सिग्नल असेल तर खूप चांगला म्हणता येईल. -91 ते -105 dBm पर्यंत ठीकठाक. तसेच -106 ते -110 dBm नेटवर्क स्ट्रेंथ सरासरी आहे आणि यात समस्या येऊ शकते. तर -111 ते -119 dBm खराब आणि यदि -120 dBm च्या पुढे खूप जास्त वाईट अवस्था म्हणता येईल. अश्याप्रकारे तुम्ही बघू शकता कोणत्या फोन ब्रँडची नेटवर्क स्ट्रेंथ कशी आहे.

The post अश्याप्रकारे चेक करा आपल्या फोन मध्ये 3G आणि 4G नेटवर्क स्ट्रेंथ, समजेल कॉल ड्रॉपचे कारण first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-chek-mobile-network-signal-strength/feed/ 0
फक्त 3 सेटिंग्स बदलल्यावर तुमचा एंड्रॉयड फोन होईल फास्ट https://www.91mobiles.com/marathi/how-to-speedup-android-phone/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-speedup-android-phone/#respond Thu, 02 Apr 2020 12:51:39 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6977 यासाठी तुम्हाला खूप मोठी प्रक्रिया करण्याची पण गरज नाही, फक्त फोनच्या की सेटिंग मध्ये तीन बदल करायचे आहेत.

The post फक्त 3 सेटिंग्स बदलल्यावर तुमचा एंड्रॉयड फोन होईल फास्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
कधीही एंड्रॉयड फोन विकत घेताना प्रयत्न असा असतो कि त्याचा रॅम आणि स्टोरेज जास्तीत जास्त असावी. आणि त्याचा फायदा पण होतो काही दिवस तुमचा फोन योग्यरित्या चालतो. परंतु काही दिवसांनी सत्य समोर येऊ लागते. फोन मध्ये 2 GB रॅम असो, 4 GB रॅम असो वा 8 GB काही दिवसांनी तो स्लो होत जातो. त्यावर एक उपाय आहे कि कॅशे मेमरी तुम्ही क्लियर करता. परंतु यात खूप डेटा पण जातो. त्यामुळे अनेकदा लोक कॅशे क्लिकर करत नाहीत आणि काही प्रमाणात हे योग्य आहे. पण काही ट्रिक्स आहेत ज्या कॅशे क्लियर न करता तुमचा फोन फास्ट करतात. खास बाब अशी आहे कि यासाठी तुम्हाला खूप मोठी प्रक्रिया करण्याची पण गरज नाही, फक्त फोनच्या की सेटिंग मध्ये तीन बदल करायचे आहेत. चला तर मग बघूया.

डेवलपर्स मोड करा ऑन

एंड्रॉयड फोन मध्ये डेवलपर्स मोड असतो. जो कंपनी लपवून ठेवते आणि तुम्हाला तो ऑन करावा लागतो. हा ऑप्शन तुम्हाला साधारण सेटिंग मध्ये मिळणार नाही. हा एका ट्रिकने ऑन करावा लागतो. डेवलपर्स मोड ऑन करण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला फोनच्या सेटिंग मध्ये जावे लागेल आणि तिथून अबाउट फोनची निवड कारवाई लागेल.

अबाउट फोनचा विकल्प अनेक फोन्स मध्ये वरतीच असतो तर काही कंपन्यां तो तळाला देतात. जेव्हा तुम्ही यात क्लिक कराल तेव्हा अनेक ऑप्शन दिसतील. यातील बिल्ट नंबरची निवड तुम्हाला करायची आहे आणि या वर सात वेळा टॅप करा. असे केल्यावर डेवलपर्स मोड ऑन झाल्याची सूचना येईल. आता तुम्ही जेव्हा बाहेर सेटिंग मध्ये याला तेव्हा डेवलपर्स ऑप्शन मिळेल. सर्व फोन्स मध्ये डेवलपर्स मोडचा ऑप्शन असतो पण ब्रँडनुसार याची सेटिंग बदलत जाते. अनेक फोन्स मध्ये सॉफटवेयर इन्फॉर्मेंशनच्या आत बिल्ट नंबरचा पर्याय मिळतो तर काही फोन्स मध्ये यासाठी तुम्हाला वर्जन वर क्लिक करावे लागते.

फोन फास्ट करण्यासाठी या तीन सेटिंग्स बदला

डेवलपर्स ऑप्शन ऑन झाल्यावर तुम्हाला त्यावर क्लिक करा. तिथे थोडे खाली तुम्हाला तीन पर्याय मिळतील. यात पहिला विकल्प विंडोज ऍनिमेशन स्केल, दुसरा ट्रांजिशन ऍनिमेशन स्केल आणि तीसरा ऍनिमटर ड्यूरेशन स्केल दिसेल तुम्हाला तिन्ही वर क्लिक करा आणि सर्व स्केल ऑफ करा. असे केल्याने तुमचा फोन लॅग, हँग किंवा स्लो होणार नाही.

The post फक्त 3 सेटिंग्स बदलल्यावर तुमचा एंड्रॉयड फोन होईल फास्ट first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-speedup-android-phone/feed/ 0
चोरी झालेला मोबाईल करू शकता ट्रॅक आणि पूर्णपणे ब्लॉक, जाणून घ्या पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-stolen-or-lost-mobile-and-how-to-block-imei-number/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-stolen-or-lost-mobile-and-how-to-block-imei-number/#respond Tue, 31 Dec 2019 14:11:07 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=6164 या सेवेचा फायदा दिल्ली आणि मुंबईच्या लोकांना घेता येईल पण हळूहळू संपूर्ण देशात हि सेवा सुरु केली जाईल.

The post चोरी झालेला मोबाईल करू शकता ट्रॅक आणि पूर्णपणे ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
प्रत्येक ठिकाणी तुम्ही मोबाईल घेऊन जाता पण नेहमीच तुम्हाला तुमचा मोबाईल चोरी होण्याची भीती पण वाटत असते. कारण आपण अनेक प्रकरणं ऐकलेली असतात. कधी बस मध्ये तर कधी ट्रेन मध्ये, कधी मेट्रो मध्ये तर अनेकदा एयरपोर्ट वर पण असे अनेक किस्से ऐकायला मिळतात. बाजारात पण मोबाईल चोरीच्या अनेक घटना घडतात. तसेच बऱ्याचदा घरातून पण मोबाईल चोरी होतो. जेव्हा असे प्रसंग ऐकतो तेव्हा विचार येतो कि एखादी अशी सिस्टम असू शकत नाही का जी आपोआप मोबाईल लॉक करू शकेल आणि तो ट्रॅक पण करू शकेल. फोन चोरी झाल्यावर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करतो पण त्यावर किती कारवाई होते समजत नाही. मोबाईल ग्राहकांची हि गरज पाहून भारत सरकारने एक वेब पोर्टल लॉन्च केले आहे जे तुमचा चोरी झालेला किंवा हरवलेला मोबाईल फोन शोधण्यास मदत करेल. सध्या या सेवेचा फायदा दिल्ली आणि मुंबईच्या लोकांना घेता येईल पण हळूहळू संपूर्ण देशात हि सेवा सुरु केली जाईल.

मोबाईल यूजर्ससाठी हि सिस्टम सेंटर फॉर डेवलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स बनवली आहे जी CDOT नावाने ओळखली जाते. संपूर्ण सिस्टम तयार करण्यात दिल्ली पोलिसांचे योगदान महत्वाचे आहे. तसेच CDOT ने सरकारी संस्था डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (DOT) ची पण मदत घेतली आहे. या पोर्टलच्या माध्यमातून तुम्ही फोनचा IMEI Number बंद करू शकता आणि फोन मिळाल्यावर तो पुन्हा अनब्लॉक पण करू शकता.

ब्लॉक करण्याआधी या गोष्टींची काळजी घ्या

लक्षात असू दे कि हा पोर्टल तुमचा आईएमईआई नंबर ब्लॉक करण्यासाठी, अनब्लॉक करण्यासाठी आणि तो ट्रॅक करण्यासाठी आहे. असे असलेतरी तुमचा फोन हरवल्यास किंवा चोरी झाल्यास सर्वात आधी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करणे आवश्यक आहे. तक्रार केल्यानंतर तक्रार नंबर आठवणीने घ्या.

IMEI No ने फोन ब्लॉक कसा करावा

आता तुम्हाला आपला फोन कसा ब्लॉक करायचा हे जाणून घ्यायचे असेल. तर त्यासाठी सर्वात आधी

1. तुम्हाला https://ceir.gov.in/ वेब पोर्टल वर जावे लागेल. इथे क्लिक करून तुम्ही जाऊ शकता.

2. या पोर्टल वर तुम्हाला तीन पर्याय मिळतील. पहिला ब्लॉक स्टोलेन किंवा लॉस्ट मोबाईल, दुसरा अन-ब्लॉक फाउंड मोबाईल आणि तिसरा चेक रिक्वेस्ट स्टेटस.

3. फोन ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला पहिल्या ऑप्शन वर ब्लॉक स्टोलेन किंवा लॉस्ट मोबाईल वर क्लिक करायचे आहे. तुम्ही इथे क्लिक करून थेट ब्लॉक मोबाईलच्या पेज वर जाऊ शकता.

4. यावर क्लिक करताच तुमच्या समोर एक लांबलचक फॉर्म येईल जो भरावा लागेल.

5. यात सर्वात आधी तुमच्याकडून मोबाईल नंबर घेतला जाईल. जर डुअल सिम फोन असेल तर दोन्ही मोबाईल नंबर टाकावे लागतील.

6. त्यानंतर फोनचा IMEI No टाकावा लागेल. जर डुअल सिम फोन असेल तर दोन IMEI No असतील. तुम्हाला IMEI No माहित नसेल तर तो फोनच्या बॉक्स वर पण दिलेला असतो. जर एंडरॉयड फोन असेल तर तुम्ही तुमच्या जीमेल अकाउंट वरून पण काढू शकता.

7. तो टाकल्यानंतर मोबाईलचा ब्रँड, मॉडेल नंबर आणि खरेदीची पावती (बिल) टाकावे लागेल.

8. हि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमचा फोन कुठे, कधी, कोणत्या राज्यात हरवला याची माहिती द्यावी लागेल.

9. त्यानंतर ज्या पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही तक्रार केली आहे त्याची माहिती टाकावी लागेल आणि तक्रार नंबर सह तक्रारीची कॉपी पण अपलोड करावी लागेल.

10. हि प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमची माहिती मागितली जाईल. जसे कि ओनर म्हणजे फोनच्या मालकाचे नाव आणि पत्ता टाकल्यानंतर तुमचा आईडी प्रूफ अपलोड करावा लागेल.

11. तिथेच आईडी नंबर आणि ईमेल आईडी टाकण्याचा पर्याय मिळेल. खाली मोबाईल नंबरचा ऑप्शन असेल जो तक्रारीसह रजिस्टर करायचा आहे. त्याच नंबर वर ओटीपी येईल. ओटापी आल्यानंतर तुमचा रिक्वेस्ट आईडी नंबर येईल आणि तुमचे काम होईल. IMEI ब्लॉक होईल आणि रिक्वेस्ट आईडी नंबर टाकून तुम्ही तो ट्रॅक करू शकाल.

चोरी झालेल्या फोनचे स्टेटस करा चेक

https://ceir.gov.in/ पोर्टल वर तिसरा पर्याय स्टेटस चेक करण्याचा आहे आणि त्यावर क्लिक करताच एक पेज उघडेल त्यात तुम्हाला तुमचा रिक्वेस्ट आईडी टाकायचा आहे. तो टाकल्यावर स्टेटस अपडेट होईल. स्टेटस पोर्टल वर जाण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करू शकता.

IMEI No अनब्लॉक कसा करावा

जेव्हा तुमचा फोन मिळेल तेव्हा तुम्ही तो अनब्लॉक करून वापरू शकता. अश्यावेळी https://ceir.gov.in/ पोर्टल वर दुसरा ऑप्शन IMEI No अनब्लॉक करण्याचा आहे. त्यावर क्लिक करताच एक पेज समोर येईल, तिथे तुमच्याकडे रिक्वेस्ट नंबर आणि मोबाईल नंबर मागितला जाईल. जेव्हा तुम्ही फोन ब्लॉक केला होता तेव्हाचा रिक्वेस्ट नंबर टाकावा लागेल. तुम्ही इथे क्लिक करून थेट अनब्लॉक पेज वर जाऊ शकता.

लक्षात असू दे इथे दोन मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे. पहिला जो तुम्ही रिक्वेस्ट आईडी घेताना ओटीपी साठी वापरला होता तो टाकणे आवश्यक आहे. तर दुसरा मोबाईल नंबर तो ज्यावर तुम्हाला OTP हवा आहे अनब्लॉक करण्यासाठी. यानंतर तुमचा फोन अनब्लॉक होईल आणि तुम्ही पुन्हा वापरू शकाल.

IMEI No ब्लॉक केल्याने काय फायदा होईल

तुमच्या फोन मध्ये खूप डेटा असतो जो तुमच्या फोनपेक्षा जास्त मौल्यवान असतो. त्यामुळे आईएमईआई नंबर ब्लॉक करून फोन पूर्णपणे निष्क्रिय केला जाऊ शकतो. जर एखाद्या माणसाच्या हाती तुमचा फोन लागला तर तो काहीपण करू शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे खूप आवश्यक आहे.

The post चोरी झालेला मोबाईल करू शकता ट्रॅक आणि पूर्णपणे ब्लॉक, जाणून घ्या पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-track-stolen-or-lost-mobile-and-how-to-block-imei-number/feed/ 0
फोन ब्लास्टला यूजर का जबाबदार? तुम्ही घाबरू नका लढा द्या https://www.91mobiles.com/marathi/mobile-blast-reasons-and-how-to-take-legal-action/ https://www.91mobiles.com/marathi/mobile-blast-reasons-and-how-to-take-legal-action/#respond Thu, 05 Dec 2019 14:40:52 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=5982 ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो कि जेवढे नुकसान झाले आहे तेवढी नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल.

The post फोन ब्लास्टला यूजर का जबाबदार? तुम्ही घाबरू नका लढा द्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
सध्या एकापाठोपाठ एक अनेक फोन ब्लास्टच्या बातम्या आल्या आणि जेव्हा आपण फोन ब्लास्टची बातमी ऐकतो तेव्हा थोडी भीती वाटतेच. कारण फोन आपल्या सर्वात जवळ असतो आणि जर हा ब्लास्ट झाला तर सर्वात जास्त शारीरिक नुकसान होण्याची भीती असते. परंतु फोन ब्लास्ट का होतो? आणि जेव्हा ब्लास्ट होतो तेव्हा कंपन्या मोबाईल यूजर्सना जबाबदार ठरवून आपले हात वर का करतात. हेच योग्य आहे का. कारण फोन लॉन्चच्या वेळी कंपन्या अनेक वायदे करतात पण काही खराब होताच सर्व दोष यूजर वर टाकला जातो. चला तर मग जाणून घेऊया कि खर्च यूजर जबाबदार आहे का आणि जर नसेल तर मग कंपनीने यूजर वर दोष टाकून भरपाई देण्यास नकार दिला तर तुम्ही कशाप्रकारे कादेशीर कारवाई करू शकता.

का होतो फोन ब्लास्ट

मोबाईल मध्ये वापरल्या जाणाऱ्या लीथियम आयन बॅटरी मध्ये तीन प्रकारच्या रसायनांचा वापर होतो. कोबाल्ट ऑक्साइड पॉजिटीव्ह इलेक्ट्रोड ज्याला कॅथोड म्हणतात. तर दुसऱ्या भागात ग्राफाईड कार्बन नेगेटिव इलेक्ट्रोड ज्याला ऍनोड म्हटले जाते. तर तिसरा भाग इलेक्ट्रोलॉयट केमिकलचा असतो.

मोबाईल बॅटरी निर्मितीच्या वेळी कॅथोड आणि ऍनोड वेगवेगळे ठेवले जातात. याना वेगळे ठेवण्यासाठी साठी इन्सुलेशन टेप, प्लास्टिक स्ट्रीप किंवा मग रबर स्ट्रीपचा वापर केला जातो. परंतु हे दोन्ही केमिकल जर मिळाले तर फोन ब्लास्ट होतो. मोबाईल मध्ये बॅटरी व्यतिरिक्त ब्लास्ट होण्यालायक काहीच नसते. हे केमिकल काही कारणास्तव एकमेकांमध्ये मिसळू शकतात जसे कि एखादा शॉर्ट सर्किट, मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट, जास्त हीटिंग किंवा मग जास्त दबाव.

यूजर आहे का दोषी

फोन ब्लास्ट झाल्यावर यूजर दोषी मानला जातो आणि केस बंद केली जाते. परंतु सांगू इच्छितो कि अधिकांश प्रकरणात यूजर दोषी नसतो. कंपन्या दोषी आहेत. पुढे आम्ही उदाहरण देऊन सांजवाले आहे आणि सोबत यात सुप्रीम कोर्टाचे वकील आणि सायबर लॉ एक्सपर्ट पवन दुग्गल यांचे मत पण मांडले आहे.

1. मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट: याला तुम्ही निर्मिती दोष पण म्हणू शकता. फोनच्या निर्मितीच्या वेळीच समस्या होऊ शकते आणि या कारणामुळे पण फोन ब्लास्ट होतो. जसे गॅलेक्सी नोट 7 मध्ये झाले होते फोन ब्लास्टच्या बातम्यांमुळे सॅमसंगने संपूर्ण लॉट परत मागवला होता. यावेळी कंपनीने आपली चूक मान्य केली होती पण प्रत्येकवेळी असे नाही होत. कंपन्या काही बहाणा काढून यूजर वर दोष टाकतात जेणेकरून त्यांची प्रतिमा बिघडू नये.

यूजर आहे का जबाबदार: यूजर बिलकुल जबाबदार नाही. याबाबाबत पवन दुग्गल म्हणतात कि “जर फोन ब्लास्ट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीची असते. कंपनी असे नाही म्हणू शकत कि यूजरची चूक आहे. कारण कोणताही यूजर स्वतःहून आपल्या फोन मध्ये आग लावणार नाही. निर्मितीच्या वेळी काही गडबड झाली असावी त्यामुळे फोन ब्लास्ट होतो. अधिकांश कंपन्या जबाबदारी घेऊ इच्छित नाहीत त्यामुळे ती यूजर वर टाकली जाते.”

2. खराब चार्जरचा वापर करणे : फोन ब्लास्ट होण्यामागे दुसरे कारण आहे नकली किंवा अनब्रँडेड चार्जरचा वापर करणे आणि कंपन्यांचे सर्वात मोठे हत्यार हेच असते. फोन ब्लास्ट होताच कंपन्या म्हणतात कि यूजरने नकली चार्जरचा वापर केला असेल त्यामुळे फोन ब्लास्ट झाला आणि आम्ही जबाबदार नाही.

यूजर आहे का जबाबदार: असे बिलकुल नाही जर फोन ब्लास्ट खराब चार्जर मुळे झाला तरी कंपनीच दोषी आहे. याबाबत पवन दुग्गल म्हणतात “जेव्हा तुम्ही डिवाइस घेता तेव्हा रोजच्या दैनंदिन वापरासाठी घेता. त्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल कि नकली चार्जर वापरला किंवा पाणी टाकल्यामुळे खराब होत असेल तर हे कारण कायद्यात बसत नाही. कंपन्या अनेक प्रकारच्या टेस्ट आणि टेक्निकल रिपोर्ट करता आणि हे केल्यानंतर फोन लॉन्च करतात. त्यानंतर ग्राहकांना आकर्षित करतात कि या आमचा प्रोडक्ट विकत घ्या. इतक्या सर्व गोष्टी करून पण तुम्ही त्या नाकारता. त्यामुळे जर फोन ब्लास्ट झाला तर त्याची संपूर्ण जबाबदारी कंपनीवर येते.”

हि गोष्ट बरोबर आहे. कारण जर खराब चार्जरमुळे पावर सप्लाई जास्त होत असेल किंवा कमी होत असेल तर फोन ऑफ व्हावा ब्लास्ट नाही. जर ब्लास्ट होत असेल तर कंपनीची जबाबदारी आहे. जर नकली चार्जरच्या वापरामुळे फोन ब्लास्ट होत असेल तर रोज एक दोन नव्हे तर हजारो फोन ब्लास्ट झाले पाहिजेत. या सर्व गोष्टी यूजरला घाबरवण्यासाठी आहेत.

3. लिक्विडमुळे : अनेकदा कंपन्या म्हणतात कि फोन मध्ये पाणी गेल्यामुळे किंवा लिक्विड डॅमेज होता त्यामुळे फोन ब्लास्ट झाला. परंतु हे चुकीचे आहे. पवन दुग्गल यांनी स्पष्ट शब्दात म्हटले आहे कि कायद्यात हे कारण चालत नाही. हे यूजरला गोंधळात टाकण्यासाठी आहे.

यूजर आहे का जबाबदार: भारतातील वातावरण उष्ण आहे इथे घाम किंवा कुठूनही पाणी जाऊ शकतो. अश्यावेळी फोन बंद झाला पाहिजे ब्लास्ट नाही. फोन खराब झाला तर यूजर जबाबदार असू शकतो पण ब्लास्टसाठी कंपनी जबाबदार आहे.

4. चार्जिंगच्या वेळी कॉलिंग: असे म्हटले जाते कि चार्जिंगच्या वेळी कॉल किंवा मेसेज केल्यास फोन ब्लास्ट होऊ शकतो. सुरक्षेच्या दृष्टीने हे योग्य आहे कि वापर करू नये पण जर ब्लास्ट होत असेल तर हि कंपनीची चूक आहे. त्यांचा फोन खराब आहे.

यूजर आहे का जबाबदार: यूजर जबाबदार नाही. जर असे झाले तर तुम्ही भरपाई मागू शकता. फोन मध्ये सिस्टम आहे ज्यामुळे चार्जिंगच्या वेळी तुम्ही कॉलिंग करता तर त्यात कोणतेही नुकसान झाले नाही पाहिजे.

5. ओवर हीटिंग किंवा खूप गरम होणे: ओवर हीटिंग किंवा फोन गरम झाल्यामुळे फोन ब्लास्ट होतो. अनेकदा कंपन्या फोन ओवर हीट होत होता त्यामुळे ब्लास्ट झाला असे बोलून वाचतात. पंरतु फोन मध्ये थर्मल लॉक सिस्टम असते जी फोन जास्त गरम झाल्यावर तो ऑफ करते.

यूजर आहे का जबाबदार : याबाबतीत पण यूजर जबाबदार नाही. हे फोनच्या तांत्रिक बिघाडामुळे होते आणि जर हीटमुळे फोन ब्लास्ट झाला तर कंपनी जबाबदारी ठरते. तुम्ही नुकसान भरपाई मागू शकता.

6. वजन भरपूर पडणे : अनेकदा भरपूर वजन पडल्यामुळे पण फोन ब्लास्ट होतो.

यूजर आहे का जबाबदार : याबाबतीत यूजर जबाबदार आहे. तुम्ही काळजी घ्यावी कि फोन वर जास्त वजन पडू नये.

कशी करावी कंपनी वर कारवाई

तुम्ही बघितले कि जास्तीत जास्त वेळा फोन ब्लास्ट झाल्यावर कंपनी जबाबदार असते. परंतु कंपनी ग्राहकांची तक्रार घेण्यास नकार देत असेल तर तुम्ही कोर्टात जाऊ शकता.

याबद्दल पवन दुग्गल म्हणतात “फोन ब्लास्ट झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कंपनीला लेखी तक्रार करावी लागेल आणि ब्लास्ट आहे त्यामुळे पोलीस ठाण्यात एफआईआर नक्की करा. जर तुम्ही ऑनलाइन रिपोर्ट करू इच्छित असाल तर https://cybercrime.gov.in/ वर जाऊ शकतो. या नंतर पण कंपनीने तुमची तक्रार ऐकली नाही तर मग तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई करू शकता. तुम्ही तुमच्या जिल्हा न्यायालयात, राज्य किंवा नॅशनल कमिशन मध्ये आपली कंज्यूमर पेटिशन दाखल करू शकता. तसेच तुम्ही आईटी ऍक्टचे स्पेशल कोर्ट हातात तिथे पण जाऊ शकता. भारतीय संविधान सेक्शन 79 आईटी ऍक्ट अंतर्गत यावर कारवाई करता येते.”

ते असे पण म्हणले कि “जर कंपन्या ऐकत नसतील तर तुम्ही हे प्रकरण आपल्या सोशल मीडिया वर टाका. फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर वर जास्तीत जास्त शेयर करा ज्यामुळे हे प्रकरण प्रकाशझोतात येईल. त्यामुळे त्यांची इमेज खराब होऊ नये म्हणून कंपनी लवकरात लवकर कारवाई करण्यास मजबूर होईल.”

फोन ब्लास्ट मध्ये किती असावी नुकसान भरपाई

याबाबत पवन दुग्गल म्हणतात कि ”ग्राहक संरक्षण कायदा म्हणतो कि जेवढे नुकसान झाले आहे तेवढी नुकसान भरपाई तुम्हाला मिळेल. जर फोन ब्लास्ट मध्ये चेहरा, डोळे किंवा कानाला इजा झाली तर भरपाई जास्त असेल. तसेच जर शारीरिक इजा झाली नाही तर कोर्ट म्हणू शकतो कि खराब सामानाच्या बदल्यात नवीन सामान द्या आणि थोडी नुकसान भरपाई वेगळी द्या.”

The post फोन ब्लास्टला यूजर का जबाबदार? तुम्ही घाबरू नका लढा द्या first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/mobile-blast-reasons-and-how-to-take-legal-action/feed/ 0
होटल किंवा चेंजिंग रूम मधील छुपा कॅमेरा आणि माइक मोबाईलने कसा शोधावा https://www.91mobiles.com/marathi/how-to-detect-hidden-camera-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-detect-hidden-camera-in-marathi/#respond Wed, 13 Nov 2019 14:26:14 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=5770 फोनचा वापर पण तुम्ही कॅमेरा आणि माइक्रोफोन डिटेक्टरच्या स्वरूपात करू शकता फक्त तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

The post होटल किंवा चेंजिंग रूम मधील छुपा कॅमेरा आणि माइक मोबाईलने कसा शोधावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
काही दिवसांपूर्वी पुण्यातील एका रेस्टॉरंट मधील घटनेकडे संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेतले होते. बातमी समोर आली होती कि पुण्यातील एका रेस्टॉरंटच्या महिला शौचालयात कॅमेरा लपवण्यात आला होता, जो महिलांची रेकॉर्डिंग करत होता. एका तरुणीला जेव्हा छुप्या कॅमेऱ्याबद्दल समजले तेव्हा तिने पोलिसांमध्ये तक्रार केली. हे प्रकरण खु गंभीर होतं पण ते समोर आल्यामुळे महिला सुरक्षा पुन्हा चर्चेत आली. असे प्रसंग कुठेही आणि कोणासोबत पण होऊ शकतात. त्यामुळे स्वसंरक्षणासाठी तयार रहाणे केव्हाही चांगले. पुढे आम्ही काही असे सोप्पे उपाय सांगितले आहेत, जे फॉलो करून तुम्ही तुमचा आणि तुमच्या नातेवाईकांचा अश्या प्रसंगातून बचाव करू शकता.

तुम्हाला वाटत असेल कि असा छुपा कॅमेरा बटणाप्रमाणे असतो आणि तसाच माइक्रोफोन असेल तर या गोष्टींचा शोध कसा घ्यायचा? कॅमेरा आणि माइक्रोफोन डिटेक्टर तर प्रत्येक ठिकाणी घेऊन जाता येत नाही. पण तुम्ही विसरताय कि एक डिटेक्टर सतत तुमच्या हातात असतो पण तुम्ही त्याचा वापर करत नाही. मी बोलतोय तुमच्या फोन बद्दल. याचा वापर पण तुम्ही कॅमेरा आणि माइक्रोफोन डिटेक्टरच्या स्वरूपात करू शकता फक्त तुम्हाला एक ऍप्लिकेशन डाउनलोड करावे लागेल.

या ऍप्लिकेशनचे नाव आहे हिडन कॅमेरा डिटेक्टर. सर्वात खास बाब अशी कि याचा वापर खूप सोप्पा आहे. फक्त हा इंस्टॉल करावा लागेल आणि एका क्लिक मध्ये हा आपले काम सुरु करेल. जेव्हा तुम्ही तुमच्या एंडरॉयड फोन मध्ये हिडन कॅमेरा डिटेक्टर ऍप इंस्टॉल करून उघडाल तेव्हा सुरवातीला हा तुमच्याकडे कॅमेऱ्या सहित काही ऍक्सेस मागेल. ऍक्सेस दिल्यानंतर सर्वात आधी डिटेक्ट कॅमेरा बाई रेडियेशन मीटर चा ऑप्शन येईल. सोबत डिटेक्ट इन्फ्रारेड कॅमेरा, टिप्स एंड ट्रिक्स आणि पेड ऍप घेण्याचा ऑप्शन असेल.

डिटेक्ट कॅमेरा बाय रेडियेशन मीटर वर क्लिक केल्यावर हा सुरु होईल. स्क्रीन वर गोल सर्कल दिसेल तसेच खाली हिरव्या रंगाची रेष चालू लागेल. लाइनच्या खाली एका पट्टी वर तुम्हाला सूचना मिळतील कि कॅमेरा आहे किंवा माइक्रोफोन. आता तुम्हाला तुमचा फोन अजुनबाजूच्या वस्तूंशी न्यावा लागेल ज्या ठिकाणी छुपा कॅमेरा असल्याचा तुम्हाला संशय आहे. जर काही मिळाले नाही तर हिरवी रेष चालू राहील. एखादा कॅमेरा किंवा माइक्रोफोन रेडियेशन याले मिळाले कि खालची लाइन झिगझॅग होईल. तसेच जेव्हा यात कॅमेरा डिटेक्ट होईल तेव्हा लाइन लाल होईल आणि डिटेक्टरचा अलार्म वाजू लागेल.

इतकेच नव्हे तर हा ऍप मोबाईल आणि कंप्यूटर कॅमेरा पण डिटेक्ट करू शकतो. आणि जर रेडियेशन जास्त असेल तर संपूर्ण रेष काली होईल आणि खालची रेष स्क्रीनच्या वर चालू लागेल. यातून तुम्हाला समजले कि काहीतरी गडबड आहे.

हिडन कॅमेरा डिटेक्टर ऍपचा वापर करताना आम्हाला कोणतीही अडचण आली नाही आणि हा कॅमेरा डिटेक्ट करण्यास सक्षम आहे. तसेच माइक्रोफोन आणि रेडियेशनची पण माहिती देतो. हा कधीकधी चुकीच्या पण सूचना देतो. खासकरून एकदा कॅमेरा डिटेक्ट केल्यावर ऍप पूर्णपणे बंद न करता तुम्ही पुन्हा डिटेक्ट करण्याचा प्रयत्न केल्यास माहिती चुकीची मिळेल. जास्त लांबचा कॅमेरा डिटेक्ट करता येत नाही.

याचा इन्फ्रारेड कॅमेरा डिटेक्टर चांगले काम करतो आणि कमी प्रकाशहत पण हा एखाद्या ठिकाणी कॅमेरा लागला आहे कि नाही ते सांगेल. टिप्स एंड ट्रिक्स मध्ये तुम्हाला कशाप्रकारे आणि कुठे छुपा कॅमेरा शोधू शकता याची पद्धत सांगण्यात आली आहे जे सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. एकंदरीत हे ऍप्लिकेशन चांगले आहे पण यात खूप सुधारणेची गरज आहे. फ्री ऍप मध्ये खूप अड्स आशेत त्यामुळे तुम्ही फक्त 50 रुपयांत तुम्ही ऍड फ्री ऍप चा वापर करू शकता. गूगल प्ले वरून हा ऍप डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

The post होटल किंवा चेंजिंग रूम मधील छुपा कॅमेरा आणि माइक मोबाईलने कसा शोधावा first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-detect-hidden-camera-in-marathi/feed/ 0
तुमच्या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक नसण्याचे 5 तोटे https://www.91mobiles.com/marathi/importance-of-3-5-audio-jack/ https://www.91mobiles.com/marathi/importance-of-3-5-audio-jack/#respond Tue, 11 Jun 2019 12:25:15 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=4545 तुम्ही प्रत्येक ठिकाणी तो छोटा कनेक्टर घेऊन जाऊ शकत नाही. तसेच तो हरवण्याची पण शक्यता असते.

The post तुमच्या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक नसण्याचे 5 तोटे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
स्मार्टफोन मध्ये आज रोज रोज नवीन इनोवेशन दिसत आहेत. यातील काही तुम्हाला आवडतात पण काही तुम्हाला आवडत नाहीत. अशीच नापसंती लोक फोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक नसल्यावर दर्शवतात. सर्वात आधी ऍप्पल ने आईफोन मधून ऑडियो जॅक काढला होता. त्यांनतर अनेक दुसऱ्या कंपन्या ज्या एंडरॉयड फोन बनवत आहेत त्यांनी पण असेच केले. यात वनप्लस, हुआवई, शाओमी आणि आता सॅमसंगचे पण नाव आले आहे. सॅमसंग ने अपने गॅलेक्सी एम40 मधून 3.5एमएम ऑडियो जॅक काढून टाकला आहे जे मोबाईल यूजर्सच्या दृष्टीने चांगले नाही.

तुम्हाला असे वाटत असेल कि 3.5 एमएम ऑडियो जॅक नसेल तर जास्तीत जास्त तुम्हाला साधारण ईयरफोनचा वापर करता येणार नाही एवढेच नुकसान होईल. त्याने काय फरक पडेल? नवीन यूएसबी टाइप सी जॅक वाला ईयरफोन घेतल्यानंतर सर्व समस्या दूर होतील. परंतु तुम्हाला सांगू इच्छितो कि फक्त एवढेच नुकसान नाही अजूनही खूप अडचणी येऊ शकतात. पुढे आम्ही अशाच 5 अडचणींचा उल्लेख केला आहे.

1. हेडफोन वेगळा विकत घ्यावा लागणार, जुना ईयरफोन होईल निरुपयोगी

3.5 एमएम ऑडियो जॅक ऑडियो प्रोडक्ट साठी एक स्टँडर्ड आहे आणि जवळपास सर्व ऑडियो प्रोडक्ट ज्यांचा वापर जास्तीत जास्त लोक करतात त्यात हाच जॅक असतो. त्यामुळे जवळपास प्रत्येकाकडे 1-2, 3.5 एमएम ऑडियो जॅक वाले प्रोडक्ट असतात. जर तुमच्या फोन मध्ये 3.5 एमएम ऑडियो जॅक नसेल तर हे जुने ईयरफोन आणि हेडफोन निरुपयोगी ठरतील. आणि जरी सेल्स पॅक सह तुम्हाला यूएसबी टाइप-सी वाला ईयरफोन मिळाला तरी त्याचा वापर तुम्ही इतर प्रोडक्ट सोबत करू शकणार नाही.

2. ईयरफोन खरेदी होईल महाग

3.5 एमएम ऑडियो जॅक वाले ईयरफोन सध्या प्रत्येक बजेट मध्ये उपलब्ध आहेत. तुम्ही 300 रुपयांमध्ये चांगल्या ब्रँडचे ईयरफोन विकत घेता येतील. परंंतु जर तुमच्या फोन मध्ये ऑडियो सपोर्ट यूसएबी टाइप सी असेल तर मग ईयरफोन साठी किंमत थोडी थोडी जास्त द्यावी लागेल. इतकेच नव्हे तर ऑप्शन पण कमी होतील.

3. कार आणि घरात वापरता येणार नाही ऑक्स केबल

तुम्ही कार मध्ये जात असाल किंवा घरात गाणी ऐकत असाल. दोन्ही म्यूजिक प्लेयर मध्ये ऑक्स सपोर्ट असतो ज्यात 3.5 एमएम ऑडियो जॅक फोनशी कनेक्ट करता येतो आणि इससह फोन मधील गाणी स्पीकर किंवा घरातील म्यूजिक प्लेयर मध्ये ऐकता येतात. परंतु फोन मध्ये यूएसबी टाइपसी कनेक्टर असल्यास असे करता येत नाही. वेगळा कनेक्टर सोबत बाळगावा लागतो.

4. गेम खेळताना किंवा गाणी ऐकताना फोन करता येणार नाही चार्ज

जेव्हा फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक सपोर्ट असतो तर तुम्ही गाणी ऐकताना किंवा गेम खेळताना पण फोन चार्ज करता येतो. परंतु यूसएबी टाइप-सी वाले फोन सह असे करता येत नाही. किंवा मग असे म्हणूया ऍप्पल च्या लाइटनिंग चार्जर वाल्या फोन सोबत असे नाही. तुम्ही एकावेळी एकतर फोन चार्ज करू शकता किंवा गाणी ऐकू शकता. 3.5 एमएम ऑडियो जॅक नसल्यास हाच एक मोठा तोटा आहे.

5. ब्लूटूथ कनेक्टिविटी मुळे बॅटरी जास्त वापरली जाते

3.5-एमएम ऑडियो जॅक नसल्यामुळे बऱ्याचदा लोक गाणी ऐकण्यासाठी ब्लूटूथ डिवाइसचा वापर करतात. पंरतु ब्लूटूथ कनेक्टिविटीचे दोन तोटे आहेत. एक फोनचा बॅटरी बॅकअप कमी होईल आणि फोन सोबत तुम्हाला ब्लूटूथ हेडफोन पण वारंवार चार्ज करावा लागतो. तर दुसरा तोटा असा कि वायरलेस कनेक्टिविटी मध्ये ऑडियो क्वालिटी ती मिळत नाही जी वायर मधून मिळते.

सध्या अनेक कंपन्या ज्या 3.5 एमएम ऑडियो जॅक देत नाहीत त्या यूएसबी टाइप सी-3.5 एमएम ऑडियो कनेक्टर देतात. ज्यातून तुम्ही यूएसबी टाइप सी पोर्ट असलेल्या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक वापरू शकता. परंतु तुम्ही प्रत्येक ठिकाणी तो छोटा कनेक्टर घेऊन जाऊ शकत नाही. तसेच तो हरवण्याची पण शक्यता असते.

The post तुमच्या फोन मध्ये 3.5एमएम ऑडियो जॅक नसण्याचे 5 तोटे first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/importance-of-3-5-audio-jack/feed/ 0
कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क https://www.91mobiles.com/marathi/how-to-update-mobile-number-in-aadhar-online/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-update-mobile-number-in-aadhar-online/#respond Thu, 28 Mar 2019 12:14:21 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=3956 आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी सहित इतर गोष्टी स्वतःहून अपडेट करू शकत नाही.

The post कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
ओळखपत्र दाखवायचे असेल किंवा पुरावा म्हणून वापरायचा असेल तर जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही, तुम्ही सहज हि कामे करू शकता. परंतु सर्वात जास्त त्रास लोकांना आधार कार्डच्या डेटा पासूनच होतो. तसे पाहता लोकांना आधीच सरकारी कामात चुका होतील याची अपेक्षा असते आणि त्या नंतर सुधारव्या लागतील. परंतु अनेकदा पत्ता बदलणे, मोबाईल नंबर बदलणे आणि लग्नानंतर नाव बदलताना त्रास होतोच. पण महत्वाची बाब अशी कि अनेक गोष्टी तुम्ही घर बसल्या बदलू शकता. आज मी तुम्हाला आधार कार्ड संबंधित अशाच समस्यांची उत्तरे देणार.

प्रश्न 1. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर कसा अपडेट करावा?
आधार कार्ड मध्ये आधी मोबाईल नंबर ऑनलाइन अपडेट करण्याचा पर्याय देण्यात आला होता. परंतु आता काढून टाकण्यात आला आहे. जर तुमच्या आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर जोडलेला नसेल किंवा तुम्ही आपला मोबाईल नंबर बदलू इच्छित असाल तर यासाठी तुम्हाला आधार सेवा केंद्र वरच जावे लागेल. ऑनलाइन हि सुविधा उपलब्ध नाही.

प्रश्न 2. आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट करण्याचे शुल्क किती?
आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलण्यासाठी तुम्हाला 25 रुपये शुल्क द्यावे लागेल.

प्रश्न 3. किती वेळात मोबाईल नंबर होईल अपडेट?
मोबाईल नंबर अपडेट होण्यास 90 दिवसांचा वेळ लागू शकतो.

प्रश्न 4. आधार कार्ड मध्ये ऑनलाइन एड्रेस अपडेट कसा करावा?
तुमच्या आधार कार्ड मध्ये तुम्ही एड्रेस ऑनलाइन अपडेट करू शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क देण्याची आवश्यकता नाही. पण एड्रेस अपडेट करण्यासाठी तुमच्या आधार नंबर सोबत मोबाईल नंबर अपडेट असणे आवश्यक आहे. मोबाईल नंबर अपडेट नसेल तर मग अपडेट होऊ शकणर नाही. एड्रेस अपडेट करण्यासाठी

1. सर्वात आधी आधार सेल्फ सर्विस पोर्टल वर जा.

2. तिथे तुम्हाला अनेक ऑप्शन मिळतील परंतु पत्ता बदलण्यासाठी अपडेट एड्रेस वर क्लिक करा.

3. असे करताच एक नवीन विंडो उघडेल. तुम्ही https://ssup.uidai.gov.in/web/guest/aadhaar-home ने थेट एड्रेस अपडेट वर जाऊ शकता.

4. तिथे खाली तुम्हाला एड्रेस अपडेटचा पर्याय मिळेल. तो क्लिक करा. तिथून नवीन विंडो उघडेल आणि सर्वात आधी 12 डिजिट वाला आधार नंबर टाकावा लागेल.

5. त्याखाली कॅपचा येईल तो टाकून सेंट ओटीपी ऑप्शन क्लिक करा. त्यानंतर तुमच्या फोन वर एक ओटीपी येईल.

6. ओटीपी टाकताच तुम्ही एड्रेस सुधार पोर्टल वर पोहचाल. तिथे तुमच्या समोर दोन पर्याय असतील. पहिला एड्रेस अपडेट करण्यासाठी आणि दुसरा एड्रेस वॅलिडेशन लेटर साठी तुम्हाला पहिल्या पर्याय वर क्लिक करायची आहे आणि खाली सबमिट करायचे आहे.

7. असे करताच नवीन एड्रेस टाकण्याचा पर्याय तुमच्या समोर येईल. तुमची संपूर्ण माहिती सविस्तर भरा. नंतर पडताळणी करून सबमिट करा.

8. त्यानंतर तुम्हाला कोणता डाक्यूमेंट तुम्ही एड्रेस प्रूफ मध्ये देणार आहात ते निवडावे लागेल. जसे कि- पासपोर्ट, वोटर कार्ड आणि राशन कार्ड इत्यादी. निवड केल्यानंतर तुमचा डॉक्यूमेंट सबमिट करा.

9. सबमिट करताच तुमच्या समोर ऑप्शन येईल कि बीपीओ सर्विस प्रोवाइडर डाक्यूमेंटची तपासणी करेल आणि तिथे पण तुम्हाला सबमिट करायचे आहे. असे करताच प्रक्रिया पूर्ण होईल.

10. आता तुम्हाला एक यूआरएन नंबर दिला जाईल. हा यूआरएन नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे ज्याने तुम्ही तुमचा आधार कार्ड डाउनलोड करू शकाल आणि एड्रेस अपडेट बघू शकला.

प्रश्न 5. आधार कार्ड मध्ये काय करता येईल ऑनलाइन अपडेट?
आधार कार्ड मध्ये तुम्ही फक्त एड्रेस अपडेट करू शकता आणि एड्रेस वॅलिडेशन लेटर अपडेट करू शकता. याव्यतिरिक्त काही नाही.

प्रश्न 6. आधार कार्ड मध्ये ऑनलाइन काय नाही करता येत अपडेट?
आधार कार्ड मध्ये तुम्ही नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल आईडी सहित इतर गोष्टी स्वतःहून अपडेट करू शकत नाही.

The post कशाप्रकारे करावा आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर अपडेट आणि जाणून घ्या शुल्क first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-update-mobile-number-in-aadhar-online/feed/ 0
असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-3d-photo-in-facebook-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-3d-photo-in-facebook-in-marathi/#respond Fri, 02 Nov 2018 13:06:23 +0000 https://www.91mobiles.com/hub/marathi/?p=2778 तुम्ही तुमचा फोटो 3डी इफेक्ट सह पोस्ट करू शकता आणि हा पर्याय लोकांना खूप प्रभावित पण करत आहे. जर तुम्ही पण तुमच्या फेसबुक वर 3डी पोस्ट करू इच्छित असाल तर त्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.

The post असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
जर तुम्ही इंटरनेट वापरणारे असाल तर तुमचे फेसबुक अकाउंट पण असेलच. रोज तुम्ही इतरांच्या पोस्ट बघता आणि त्यावर तुमच्या रिएक्शन देता. एवढंच नव्हे तर जेव्हा तुम्ही तुमच्या टाईम लाईन वर पोस्ट करता तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त लाइक्स आणि कमेंट्सची अपेक्षा करता. आधी लोक काहीपण आपल्या फेसबुक वर काहीपण टाकत होते पण आता जास्त क्रिएटिव झाले आहेत. हीच क्रिएटिविटी पाहून फेसबुक ने 3डी फोटोचा पर्याय सादर केला आहे. ज्यामुळे तुम्ही तुमचा फोटो 3डी इफेक्ट सह पोस्ट करू शकता आणि हा पर्याय लोकांना खूप प्रभावित पण करत आहे. जर तुम्ही पण तुमच्या फेसबुक वर 3डी पोस्ट करू इच्छित असाल तर त्याची पद्धत आम्ही पुढे सांगितली आहे.

कसा करावा 3डी फोटो अपलोड
सर्वात आधी हे लक्षात घ्या कि सध्या 3डी फोटो आॅप्शन फक्त मोबाईल ऍप मध्येच उपलब्द आहे. जर तुम्ही डेस्कटॉप वरून याचा वापर केला तर हा मिळणार नाही. त्यामुळे तुमच्या फोन वरून फेसबुक वर 3डी फोटो शेयर करण्यासाठी सर्वात आधी
1. तुम्हाला तुमच्या फोन मध्ये फेसबुक ऍप ओपेन करून फेसबुक 360 पेजला लाइक करावे लागेल. ऍप मध्ये वर दिलेल्या सर्च बार मध्ये फेसबुक 360 लिहून सर्च करा मग हे पेज येईल. त्याला लाइक करा आणि ऍप बंद करा. आता तुमच्या फोन मध्ये फेसबुक 3डी आॅप्शन येईल.

Facebook 3D

2. आता तुमच्या मोबाईल कॅमेऱ्या मधून एक फोटो काढा. ध्यानात ठेवा हा फोटो पोट्रेट मोड मध्ये असावा. अर्थात बोके इफेक्ट ज्याला तुम्ही ब्लर बॅकग्राउंड पण म्हणता.

3. त्यानंतर फेसबुक ऍप मध्ये जाऊन न्यू पोस्ट करा.

4. खाली जिथे फोटो, वीडियो, टॅग, जिफ इत्यादी आॅप्शन येतात त्याच लाइन मध्ये 3डी फोटोचा पर्याय मिळेल.
5. तुम्हाला त्यावर क्लिक करावी लागेल आणि तो पोट्रेट मोड वाला फोटो इंसर्ट करावा लागेल आणि मग फोटो शेयर करा. अशा प्रकारे तुमचा 3डी फोटो पोस्ट होईल. जो नेहमीच्या पोस्ट पेक्षा कितीतरी चांगला दिसतो.

तुमचा हा 3डी फोटो लगेचच स्मार्टफोन, डेस्कटॉप आणि आॅक्यूलस वीआर इत्यादी वरून दिसेल. फोन थोडा हलवताच तो 3डी फोटो पण हलेल. 3डी फोटो फेसबुकच्या 360 पेक्षा खूप वेगळा आहे. 360 मध्ये कॅमेरा उजवीकडे-डावीकडे आणि वर-खाली करून संपूर्ण पॅनारॉम शूट करतात. तर यात एकाच फोटो मध्ये 3डी इफेक्ट दिला जातो.

फेसबुकचा फीचर एंडरॉयड स्मार्टफोन आणि ऍपल आईओएस दोन्हींसाठी आहे. परंतु भारतात अजूनतरी आम्ही आईओएस डिवाइस मध्ये हा बघितला आहे. एंडरॉयड फोन मध्ये हा काही दिवसांनी उपलब्ध होईल.

The post असा करा फेसबुक वर 3डी फोटो शेअर, बघा हि सोप्पी पद्धत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/how-to-share-3d-photo-in-facebook-in-marathi/feed/ 0