Realme - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Tue, 25 Jul 2023 06:10:43 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच https://www.91mobiles.com/marathi/100-mp-camera-phone-realme-11-launching-in-vietnam-on-31-july/ https://www.91mobiles.com/marathi/100-mp-camera-phone-realme-11-launching-in-vietnam-on-31-july/#respond Tue, 25 Jul 2023 06:10:43 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22554 रियलमीने गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये जेव्हा भारतात रियलमी 11 प्रो 5जी सीरीज सादर केली होती तेव्हापासून ग्राहक Realme 11 ची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा संपेल अशी चिन्ह आहेत कारण रियलमी 11 लवकरच भारतात येऊ शकतो. कारण हा मोबाइल फोन येत्या 31 जुलैला ग्लोबली लाँच होणार आहे. ग्लोबल लाँचनंतर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्याची […]

The post 100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • realme 11 31 जुलैला व्हिएतनाममध्ये लाँच होणार
  • व्हिएतनाममध्ये येणाऱ्या रियलमी 11 मध्ये 100 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा
  • कंपनी रियलमी 11 लवकरच भारतात देखील लाँच करू शकते

रियलमीने गेल्या महिन्यात म्हणजे जूनमध्ये जेव्हा भारतात रियलमी 11 प्रो 5जी सीरीज सादर केली होती तेव्हापासून ग्राहक Realme 11 ची वाट पाहत आहेत. आता ही प्रतीक्षा संपेल अशी चिन्ह आहेत कारण रियलमी 11 लवकरच भारतात येऊ शकतो. कारण हा मोबाइल फोन येत्या 31 जुलैला ग्लोबली लाँच होणार आहे. ग्लोबल लाँचनंतर हा स्मार्टफोन भारतीय बाजारात येण्याची शक्यता वाढेल.

रियलमी 11 ग्लोबल लाँच

realme 11 31 जुलैला व्हिएतनाममध्ये लाँच होणार असल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. हा ग्लोबल लाँच भारतीय वेळेनुसार 31 जुलैला संध्याकाळी 4 वाजता व्हिएतनाम मध्ये आयोजित करण्यात आला आहे जो भारतात देखील लाइव्ह बघता येईल. आशा आहे की व्हिएतनाममध्ये सादर केल्यांनतर कंपनी रियलमी 11 लवकरच भारतात देखील लाँच करू शकते.

रियलमी 11 प्राइस (चीन)

हा रियलमी मोबाइल चीनमध्ये आधीची लाँच करण्यात आला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 256जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे तर मोठा व्हेरिएंट 12 जीबी रॅमसह 256जीबी मेमोरीला सपोर्ट करतो. ह्याची किंमत RMB 1,599 आणि RMB 1,799 आहे जी भारतीय करंसीनुसार 19,000 रुपये आणि 21,400 रुपयांच्या आसपास आहे. फोनची ग्लोबल आणि इंडिया प्राइस ह्याच्या आसपास असण्याची शक्यता आहे.

रियलमी 11 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : चीनमध्ये हा स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेसह लाँच झाला आहे. फोनची स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे जी 90हर्ट्झ रिफ्रेश रेट तसेच 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेटवर चालते. त्यावर 1000निट्झ ब्राइटनेस देखील मिळते.
  • प्रोसेसर : realme अँड्रॉइड 12 आधारित रियलमी युआय 4.0 वर सादर करण्यात आला आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 6020 ऑक्टाकोर प्रोसेसरसह चालतो. ग्राफिक्ससाठी ह्यात माली-जी57 जीपीयू आहे.
  • रॅम आणि स्टोरेज : रियलमीचा हा फोन 256 GB स्टोरेज असेलल्या दोन व्हेरिएंटमध्ये येतो. फोनमध्ये 8GB रॅम आणि 12GB रॅम सपोर्ट मिळतो. तसेच मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून युजर्स फोनची स्टोरेज वाढवू शकतात.
  • कॅमेरा : Realme 11 स्मार्टफोन चीनमध्ये 64 मेगापिक्सल ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच झाला होता. परंतु व्हिएतनाममध्ये येणाऱ्या रियलमी 11 मध्ये 100 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच सेल्फी कॅमेरा देखील 8एमपी ऐवजी 16एमपीचा असेल. म्हणजे कॅमेराच्या बाबतीत ग्लोबल मॉडेल चायना पेक्षा चांगला असेल.
  • बॅटरी : ह्या रियलमी स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. चीनमध्ये हा फोन 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह आला होता, परंतु realme 11 ग्लोबल मॉडेलमध्ये 67वॉट फास्ट चार्जिंग मिळू शकते.
  • कनेक्टिव्हिटी : या फोनमध्ये कनेक्टिव्हिटी फीचर्स पाहता कंपनीनं 5G, 4G LTE, Bluetooth, GPS, आणि USB Type-C पोर्ट दिला आहे.

The post 100MP कॅमेरा असलेल्या realme 11 ची लाँच डेट ठरली; 31 जुलैला होईल जगभरात लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/100-mp-camera-phone-realme-11-launching-in-vietnam-on-31-july/feed/ 0
Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/realme-c51-design-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/realme-c51-design-specifications-leaked/#respond Fri, 21 Jul 2023 06:33:53 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22505 रियलमी सतत आपल्या सी सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं अलीकडेच नवीन Realme C53 स्मार्टफोन लाँच केला आहे. आता नवीन लीकमधून Realme C51 फोन समोर आला आहे. विशेष म्हणजे टिपस्टरनं ह्याच्या डिजाइनसह काही प्रमुख स्पेसिफिकेशनदेखील जगासमोर ठेवले आहेत. चला एक नजर टाकूया लीकमधून समोर आलेल्या माहितीवर. Realme C51 डिजाइन (लीक) सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Realme C51 ची […]

The post Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • डिवाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल टोन फिनिश आहे.
  • इमेजमध्ये ड्युअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश दिसला आहे.
  • मिनी कॅप्सूल फीचर देखील दिसत आहे.

रियलमी सतत आपल्या सी सीरीजचा विस्तार करत आहे. कंपनीनं अलीकडेच नवीन Realme C53 स्मार्टफोन लाँच केला आहे. आता नवीन लीकमधून Realme C51 फोन समोर आला आहे. विशेष म्हणजे टिपस्टरनं ह्याच्या डिजाइनसह काही प्रमुख स्पेसिफिकेशनदेखील जगासमोर ठेवले आहेत. चला एक नजर टाकूया लीकमधून समोर आलेल्या माहितीवर.

Realme C51 डिजाइन (लीक)

  • सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन टिपस्टर पारस गुगलानीनं शेयर केले आहेत.
  • लीकनुसार डिवाइस फ्लॅट फ्रेम डिजाइन आणि राउंड कॉर्नरसह येईल.
  • डिवाइसच्या बॅक पॅनलवर ड्युअल टोन फिनिश असेल.
  • डिवाइसच्या मागील बाजूस तीन वर्तुळाकार कटआउट दिसत आहेत ज्यात ड्युअल कॅमेरा आणि एक एलईडी फ्लॅश आहे.
  • फोनच्या उजवीकडे पावर आणि वॉल्यूम बटन आणि डावीकडे सिम ट्रेचा ऑप्शन आहे.
  • इमेजमध्ये दिसत आहे की डिवाइस स्यान ब्लू आणि ब्लॅक कलरमध्ये येईल.
  • डिवाइसच्या फ्रंटला वॉटर ड्रॉप नॉच आहे.
  • इमेज मध्ये मिनी कॅप्सूल फीचर देखील दिसत आहे

Realme C51 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्टोरेज : टिप्स्टरनुसार हा डिवाइस 8GB पर्यंत रॅम आणि 64GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह येऊ शकतो.
  • बॅटरी : स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो.
  • डिस्प्ले : ह्यात 6.5 इंचाचा आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला जाऊ शकतो. जो हाय रिजॉल्यूशन आणि सामान्य रिफ्रेश रेट देऊ शकतो.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक प्रोसेसर मिळण्याची शक्यता आहे.
  • कॅमेरा : फोन ड्युअल रियर कॅमेरा सेटअपसह येईल. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर मिळू शकतो. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा असेल.
  • OS : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस अँड्रॉइड 13 वर चालू शकतो.
  • कनेक्टिव्हिटी : फोनमध्ये ड्युअल सिम 4G सपोर्ट, ब्लूटूथ, वायफाय सारखे ऑप्शन मिळू शकतात.

The post Realme C51 ची डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्स लाँचपूर्वीच लीक, जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-c51-design-specifications-leaked/feed/ 0
Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/#respond Wed, 19 Jul 2023 07:32:42 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22464 रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती. Realme Pad 2 ची किंमत […]

The post Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme Pad 2 11.5 इंचाच्या 2k डिस्प्लेसह आला आहे.
  • ह्यात ड्युअल टोन डिजाइन मिळेल.
  • डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

रियलमीनं आज भारतात दोन डिवाइस लाँच केले आहेत. एक स्मार्टफोन तर दुसरा टॅबलेट. टॅबलेट रेंजचा विस्तार करण्यासाठी Realme Pad 2 चा समावेश करण्यात आला आहे. हा डिवाइस 11.5 इंच 2k डिस्प्ले, शानदार कॅमेरा, 8GB रॅम आणि अनेक फीचर्सना सपोर्ट करतो. चला जाणून घेऊया ह्या स्मार्टफोनचे सर्व स्पेसिफिकेशन आणि किंमतीची माहिती.

Realme Pad 2 ची किंमत

Realme Pad 2 टॅबलेटचे दोन व्हेरिएंट बहरतात आले आहेत. टॅबलेटचा 6GB RAM + 128GB स्टोरेज असलेला मॉडेल 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तर 8GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी 22,999 रुपये मोजावे लागतील. कंपनीनं डिवाइस ग्रीन आणि ब्लॅक अशा दोन कलरमध्ये आणला आहे.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स

  • डिस्प्ले : नवीन टॅबलेट 11.5 इंचाच्या मोठ्या डिस्प्लेसह येतो. हा डिस्प्ले120hz पर्यंतच्या अडॅप्टिव्ह रिफ्रेश रेटला स्पोर्ट करतो. तसेच 85.2 टक्के स्क्रीन टू बॉडी रेश्यो, 2000 x 1200 पिक्सल रिजॉल्यूशन, 450 निट्झ ब्राइटनेस, Q1 अल्ट्राव्हिजन इंजिन सपोर्टची सुविधा आहे.
  • प्रोसेसर : डिवाइसमध्ये चांगल्या परफॉर्मन्ससाठी मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसर प्रोसेसर देण्यात आला आहे. म्हणजे तुम्हाला लॅग फ्री परफॉर्मन्स मिळेल.
  • स्टोरेज : टॅबलेटमध्ये कंपनीनं 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिली आहे.
  • कॅमेरा : हा टॅब 20 मेगापिक्सलच्या दमदार कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी डिवाइसमध्ये 8 मेगापिक्सलची फ्रंट कॅमेरा लेन्स आहे.
  • बॅटरी : ह्यातील 8360mAh ची बॅटरी दमदार बॅटरी बॅकअप देईल. तर चार्जिंगसाठी 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • OS : हा डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो.
  • अन्य : टॅबलेटमध्ये ब्लूटूथ, वायफाय आणि अन्य अनेक बेसिक फीचर्स आहेत.

The post Realme Pad 2 भारतात लाँच, कमी किंमतीत पावरफुल फीचर्स first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-india-launched-price-specifications/feed/ 0
108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-smartphone-realme-c53-launched-know-price-and-specifications/ https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-smartphone-realme-c53-launched-know-price-and-specifications/#respond Wed, 19 Jul 2023 07:04:15 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22460 Realme नं आपल्या बजेट फ्रेंडली सी सीरिजचा विस्तार केला आहे. Realme C53 आज भारतात लाँच झळा आहे. तसेच जोडीला Realme Pad 2 ची एंट्री देखील झाली आहे. ह्या लेखात आपण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लाँच झालेल्या Realme C53 ची माहिती घेणार आहोत. ज्यात 5000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 12GB RAM असे दमदार फीचर्स मिळतात. […]

The post 108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Realme C53 भारतात रियलमी पॅड 2 सह लाँच झाला आहे.
  • फोन अँड्रॉइड 13 वर चालतो.
  • Realme C53 फक्त 7.99 मिमी जाड आहे.

Realme नं आपल्या बजेट फ्रेंडली सी सीरिजचा विस्तार केला आहे. Realme C53 आज भारतात लाँच झळा आहे. तसेच जोडीला Realme Pad 2 ची एंट्री देखील झाली आहे. ह्या लेखात आपण 108 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह लाँच झालेल्या Realme C53 ची माहिती घेणार आहोत. ज्यात 5000mAh ची बॅटरी, 90Hz रिफ्रेश रेट आणि 12GB RAM असे दमदार फीचर्स मिळतात.

Realme C53 ची किंमत

रियलमी सी53 च्या 4जीबी + 128जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे तर 6जीबी + 64जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 10,999 रुपये ठेवण्यात आली आहे. फोनची विक्री 26 जुलैपासून शॉपिंग साइट फ्लिपकार्वर केली जाईल. हा फोन Champion Gold आणि Champion Black कलरमध्ये विकत घेता येईल.

Realme C53 चे स्पेसिफिकेशन्स

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोन 6.74इंचाच्या वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेसह लाँच झाला आहे. जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 560 निट्झ ब्राइटनेस आणि 16.7 मिलान कलर्सला सपोर्ट करतो.
  • प्रोसेसर : ह्या रियलमी फोनमध्ये UNISOC T612 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 ओएसवर लाँच झाला आहे जो रियलमी युआय सह चालतो.
  • रॅम : Realme C53 6 जीबी पर्यंत रॅमसह लाँच झाला आहे. ह्या फोनमध्ये 128जीबी पर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल. 6GB डायनॅमिक रॅमच्या मदतीनं एकूण 12GB RAM ची ताकद मिळवता येईल.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी हा मोबाइल ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर 108 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि पोर्ट्रेट कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सलची लेन्स आहे.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोन 5,000एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 18वॉट चार्जिंग सपोर्ट मिळतो.
  • अन्य फीचर्स : Realme C53 मध्ये ड्युअल सिम, वायफाय, ब्लूटूथ, जीपीएससह सारखे फीचर्स मिळतात. हा फोन साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरला सपोर्ट करतो. ह्या फोनची थिकनेस फक्त 7.99एमएम आहे.

The post 108MP कॅमेऱ्यासह आला Realme C53 फोन, किंमत 10 हजारांच्या आत first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/108mp-camera-smartphone-realme-c53-launched-know-price-and-specifications/feed/ 0
19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/ https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/#respond Mon, 17 Jul 2023 06:39:21 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22411 Realme C53 19 जुलैला भारतात लाँच होईल. रिपोर्ट्सनुसार ह्या मोबाइल फोन सोबतच कंपनी एक नवीन टॅबलेट डिवायस Realme Pad 2 नावाने सादर करणार आहे. दोन्ही डिवाइस एकाच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारतीय बाजारात येतील आणि 26 जुलैपासून ह्यांची विक्री सुरु होईल. इंडिया लाँचपूर्वीच रियलमी पॅड 2 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे. […]

The post 19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • हा रियलमी इव्हेंट 19 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल
  • Realme Pad 2 मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो.
  • रियलमी पॅड 2 मध्ये 8,360एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते.

Realme C53 19 जुलैला भारतात लाँच होईल. रिपोर्ट्सनुसार ह्या मोबाइल फोन सोबतच कंपनी एक नवीन टॅबलेट डिवायस Realme Pad 2 नावाने सादर करणार आहे. दोन्ही डिवाइस एकाच दिवशी म्हणजे 19 जुलैला भारतीय बाजारात येतील आणि 26 जुलैपासून ह्यांची विक्री सुरु होईल. इंडिया लाँचपूर्वीच रियलमी पॅड 2 च्या फीचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि डिजाईनची माहिती समोर आली आहे.

Realme Pad 2 लाँच डिटेल

रियलमी पॅड 2 19 जुलैला भारतात लाँच केला जाईल. हा टॅबलेट कंपनीच्या लो बजेट स्मार्टफोन रियलमी सी53 सह भारतीय बाजारात एंट्री करेल. हा रियलमी इव्हेंट 19 जुलैला दुपारी 12 वाजता सुरु होईल जो कंपनी ऑनलाइन माध्यमातून प्रक्षेपित करेल. Realme Pad 2 आणि Realme C53 इंडिया लाँच कंपनीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह अधिकृत वेबसाइट तसेच युट्युब चॅनेलवर लाइव्ह पाहता येईल.

Realme Pad 2 स्पेसिफिकेशन्स (लीक)

  • स्क्रीन : रियलमी पॅड 2 बाबत कंपनीनं सांगितलं आहे की हा सेग्मेंटमधील पहिला टॅबलेट डिवायस असेल जो 120हर्ट्झ रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ह्यात 2000 x 1200 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 11.5 इंचाचा 2के एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो.
  • प्रोसेसर : लीक्सनुसार, Realme Pad 2 मीडियाटेक हीलियो जी99 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच केला जाऊ शकतो. ह्या टॅबलेटमध्ये अँड्रॉइड 13 ओएससह रियलमी युआय 4.0 दिला जाऊ शकतो.
  • रॅम : रियलमी पॅड 2 बद्दल सांगण्यात आलं आहे की हा टॅबलेट 8जीबी रॅमसह लाँच होऊ शकतो. तसेच टॅबलेटमध्ये 128जीबी इंटरनल स्टोरेज मिळू शकते.
  • कॅमेरा : फोटोग्राफीसाठी ह्या रियलमी टॅबलेटमध्ये 20 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी पॅड 2 मध्ये 8,360एमएएचची दमदार बॅटरी दिली जाऊ शकते. मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

realme C53 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिला जाऊ शकतो. ह्या स्क्रीनवर 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560निट्स ब्राइटनेस सारखे फीचर्स देखील मिळू शकतात. ह्याची थिकनेस 7.49एमएम असू शकते.
  • प्रोसेसर : हा रियलमी फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआयवर लाँच होईल. ह्यात 1.82गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट मिळेल.
  • रॅम : realme C53 कमीत कमी दोन मेमरी व्हेरिएंट्ससह भारतात लाँच होऊ शकतो. ह्यात 6जीबी रॅम दिला जाऊ शकतो, जोडीला 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी देखील मिळू शकते.
  • रॅम : रियलमीचा नवीन मोबाइल फोन 108 मेगापिक्सलच्या कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जोडीला एलईडी फ्लॅश दिली जाईल. ही आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह चालेल.
  • बॅटरी : पावर बॅकअपसाठी रियलमी सी53 स्मार्टफोन 5,000एमएएच बॅटरीसह मार्केटमध्ये येऊ शकतो. मोठी मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते.

The post 19 जुलैला येतोय 108MP Camera असलेला Realme C53 स्मार्टफोन; जोडीला Realme Pad 2 टॅबलेटही first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/realme-pad-2-tablet-and-realme-c53-smartphone-to-launch-in-india-19-july/feed/ 0
108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-realme-c53-india-launch-date-19-july-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-realme-c53-india-launch-date-19-july-revealed/#respond Thu, 13 Jul 2023 06:59:46 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=22362 रियलमीने अलीकडेच नारजो 60 सीरिज सादर करून मिडरेंजमध्ये ग्राहकांना आकर्षित केलं होतं. तर आता कंपनी बजेट सेगमेंटकडे वळत आहे. कंपनीनं अधिकृतपणे ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन realme C53 ची घोषणा केली आहे. हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल. लाँच डेटच्या घोषणेसोबतच सोबतच कंपनीनं खुलासा केला आहे की रियलमी सी53 108 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट […]

The post 108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • फोन 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल.
  • हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल.
  • लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण केलं जाईल.

रियलमीने अलीकडेच नारजो 60 सीरिज सादर करून मिडरेंजमध्ये ग्राहकांना आकर्षित केलं होतं. तर आता कंपनी बजेट सेगमेंटकडे वळत आहे. कंपनीनं अधिकृतपणे ‘सी’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन realme C53 ची घोषणा केली आहे. हा फोन येत्या 19 जुलैला भारतात लाँच होईल. लाँच डेटच्या घोषणेसोबतच सोबतच कंपनीनं खुलासा केला आहे की रियलमी सी53 108 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करेल.

realme C53 इंडिया लाँच डिटेल

रियमलीनं सांगितलं आहे की पुढील आठवड्यात 19 जुलैला रियलमी सी53 स्मार्टफोन भारतात लाँच केला जाईल. त्या दिवशी दुपारी 12 वाजता फोन सादर केला जाईल. ह्या लाँच इव्हेंटचे थेट प्रक्षेपण ऑफिशियल वेबसाइटसह युट्युब चॅनेल आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केलं जाईल.

realme C53 चा कॅमेरा

रियलमी इंडियानं सांगितलं आहे की त्यांचा नवीन मोबाइल फोन भारतीय बाजारात 108 मेगापिक्सल कॅमेरा सेन्सरसह लाँच केला जाईल. फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळेल जोडीला एलईडी फ्लॅश दिली जाईल. रियलमी सी53 स्मार्टफोनचा कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) टेक्नॉलॉजीसह काम करेल.

realme C53 स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • स्क्रीन : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 6.74 इंचाचा वॉटरड्रॉप नॉच डिस्प्ले दिली जाऊ शकते. जो 90हर्ट्झ रिफ्रेश रेट, 180हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट आणि 560निट्स ब्राइटनेसला सपोर्ट करू शकतो. ह्याची थिकनेस 7.49एमएम असू शकते.
  • प्रोसेसर : हा रियलमी फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआयवर लाँच होईल. ह्यात 1.82गीगाहर्ट्झ पर्यंतचा क्लॉक स्पीड असलेला ऑक्टाकोर प्रोसेसर दिला जाऊ शकतो. आशा आहे की फोनमध्ये मीडियाटेक चिपसेट मिळेल.
  • रॅम : realme C53 कमीत कमी दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये भारतात लाँच होऊ शकतो. ह्यात 6जीबी रॅम दिली जाऊ शकतो. जोडीला 6जीबी वचुर्अल रॅम टेक्नॉलॉजी मिळू शकते.
  • बॅटरी : रियलमी सी53 स्मार्टफोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी कंपनी देऊ शकते. तसेच जोडीला 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीचा वापर केला जाऊ शकतो.

    The post 108MP Camera असलेल्या realme C53 ची होणार भारतात एंट्री, तारीख समजली first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]> https://www.91mobiles.com/marathi/108-mp-camera-phone-realme-c53-india-launch-date-19-july-revealed/feed/ 0 Realme GT 3 बाजारात लाँच, 240W फास्ट चार्जिंगनं मिनिटांत होतो चार्ज https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-phone-realme-gt-3-launched-in-russia/ https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-phone-realme-gt-3-launched-in-russia/#respond Fri, 23 Jun 2023 07:50:20 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21735 Realme नं आपला 240 वॉट फास्ट चार्जिंग पावर असलेला स्मार्टफोन Realme GT 3 स्मार्टफोन रशियन मार्केटमध्ये आणला आहे. याआधी हा डिवाइस फेब्रुवारी मध्ये मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2023 दरम्यान चीनमध्ये सादर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा मोबाइल सुमारे 10 मिनिटांत फुल चार्ज होतो. चला जाणून घेऊया ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती. Realme GT 3 ची […]

    The post Realme GT 3 बाजारात लाँच, 240W फास्ट चार्जिंगनं मिनिटांत होतो चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • Realme GT 3 फोन 16GB रॅमसह लाँच झाला आहे.
    • हा सुमारे 10 मिनिटांत फुल चार्ज होतो.
    • डिवाइसमध्ये Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट आहे.

    Realme नं आपला 240 वॉट फास्ट चार्जिंग पावर असलेला स्मार्टफोन Realme GT 3 स्मार्टफोन रशियन मार्केटमध्ये आणला आहे. याआधी हा डिवाइस फेब्रुवारी मध्ये मोबाइल वर्ल्ड कांग्रेस 2023 दरम्यान चीनमध्ये सादर करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा मोबाइल सुमारे 10 मिनिटांत फुल चार्ज होतो. चला जाणून घेऊया ह्याची किंमत आणि स्पेसिफिकेशनची माहिती.

    Realme GT 3 ची किंमत

    कंपनीनं Realme GT 3 रशियन बाजारात सिंगल स्टोरेज ऑप्शनमध्ये आला आहे. ज्यात 16GB रॅम +1TB स्टोरेजचा समावेश आहे. डिवाइसची किंमत RUB 69,990 म्हणजे सुमारे 68,000 रुपये आहे. जर तुम्हाला हा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर realme च्या रशियन वेबसाइट आणि डीएनएस, mvideo, ozon सारख्या काही रिटेल स्टोर्सवर विक्री सुरु होईल.

    Realme GT 3 चे स्पेसिफिकेशन्स

    • डिस्प्ले: Realme GT 3 मध्ये 6.74-इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ह्यात 2772 x 1240 चे पिक्सल रिजॉल्यूशन, 144Hz रिफ्रेश रेट, 10-बिट कलर, 5,000,000:1 चा कॉन्ट्रास्ट रेश्यो, 93.69 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेश्यो आणि 100 टक्के DCI-P3 कलर गमट सपोर्ट मिळतो.
    • प्रोसेसर: 240W फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेल्या ह्या डिवाइसमध्ये Snapdragon 8 Plus Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे.
    • स्टोरेज: स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 1TB पर्यंत UFS 3.1 स्टोरेज मिळते.
    • बॅटरी: बॅटरीच्या बाबतीत डिवाइसमध्ये 4600 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी 240W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. कंपनीचा दावा आहे की ह्या चार्जिंग स्पीडनं फोन 9.5 मिनिटांत फूल चार्ज होऊ शकतो.
    • कॅमेरा: कॅमेरा फीचर्स पाहता Realme GT 3 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स OIS सपोर्टसह येते. ह्या लेन्ससह 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मायक्रोस्कोप लेन्स मिळते. तसेच सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा Samsung S5K3P9SP04 फ्रंट कॅमेरा आहे.
    • OS: ऑपरेटिंग सिस्टम पाहता स्मार्टफोन अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4.0 वर चालतो.
    • सुरक्षा: सुरक्षेसाठी मोबाइलमध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि फेस अनलॉक सारखे फीचर्स मिळतात.
    • अन्य: इतर फीचर्स पाहता डिवाइसमध्ये ड्युअल सिम, 5G, ब्लूटूथ, वायफाय, C शेप एलईडी फ्लॅश आहे जो नोटिफिकेशन मिळाल्यावर वेगवेगळ्या कलर्समध्ये चमकतो.

    The post Realme GT 3 बाजारात लाँच, 240W फास्ट चार्जिंगनं मिनिटांत होतो चार्ज first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/240w-fast-charging-phone-realme-gt-3-launched-in-russia/feed/ 0
    Realme Narzo 60 5G फोन आला समोर, 8GB RAM आणि MediaTek प्रोसेसरसह लवकरच होऊ शकतो लाँच https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-realme-narzo-60-listed-on-geekbench-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-realme-narzo-60-listed-on-geekbench-specifications-leaked/#respond Thu, 15 Jun 2023 06:29:55 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21621 Realme Narzo 50 सीरीज आणि Narzo N53 तसेच N55 स्मार्टफोन भारतात आल्यानंतर आता कंपनी आपल्या नारजो सीरिजमधील नवीन मोबाइल Realme Narzo 60 वर काम सुरु केलं नाही. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथून अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स समोर आली आहे. ह्या लिस्टिंगची माहिती आम्ही एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे ज्याची सविस्तर माहिती पुढे […]

    The post Realme Narzo 60 5G फोन आला समोर, 8GB RAM आणि MediaTek प्रोसेसरसह लवकरच होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • फोन गीकबेंचवर लिस्ट झाला आहे.
    • ह्यात मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 मिळू शकतो.
    • फोन 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याला सपोर्ट करू शकतो.

    Realme Narzo 50 सीरीज आणि Narzo N53 तसेच N55 स्मार्टफोन भारतात आल्यानंतर आता कंपनी आपल्या नारजो सीरिजमधील नवीन मोबाइल Realme Narzo 60 वर काम सुरु केलं नाही. हा स्मार्टफोन बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर लिस्ट झाला आहे जिथून अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स समोर आली आहे. ह्या लिस्टिंगची माहिती आम्ही एमएसपी वेबसाइटच्या माध्यमातून मिळाली आहे ज्याची सविस्तर माहिती पुढे देण्यात आली आहे.

    Realme Narzo 60 गीकबेंच लिस्टिंग

    • नारजो 60 ची ही बेंचमार्क लिस्टिंग आज म्हणजे 14 जूनची आहे.
    • हा फोन Realme RMX3750 मॉडेल नंबरसह लिस्ट करण्यात आला आहे.
    • ह्या सिंगल-कोर मध्ये 714 स्कोर आणि मल्टी-कोर मध्ये 1868 स्कोर मिळाला आहे.
    • रियलमी फोन इथे अँड्रॉइड 13 ऑपरेटिंग सिस्टमसह दाखवण्यात आला आहे.
    • ह्यात मदरबोर्ड कोडनेम k6833v1_64_k419 आहे जो मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 असल्याचं बोललं जात आहे.
    • फोनमध्ये ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला जाईल ज्याची बेस फ्रिक्वेंसी 2.0गीगाहर्ट्झ असेल.
    • हा प्रोसेसर 2.20गीगाहर्ट्झ पर्यंतच्या क्लॉक स्पीडवर चालेल.
    • गीकबेंचवर Realme Narzo 60 8जीबी रॅमसह दाखवण्यात आला आहे.

    Realme Narzo 60 स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • डिस्प्ले : रियलमी नारजो 60 स्मार्टफोन 6.43 इंचाची फुलएचडी+ स्क्रीनसह लाँच केला जाऊ शकतो. हा अ‍ॅमोलेड डिस्प्ले असू शकतो ज्यात 90हर्ट्झ रिफ्रेश रेट मिळेल.
    • परफॉर्मन्स : फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर लाँच केला जाऊ शकतो जो मीडियाटेक डायमेन्सिटी 1080 वर चालेल. मार्केटमध्ये हा फोन 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येऊ शकतो.
    • कॅमेरा : हा फोन ड्युअल रियर कॅमेऱ्यासह लाँच होऊ शकतो ज्यात 64 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सरसह 2 मेगापिक्सल पोर्टरेट लेन्स दिली जाऊ शकते. तर फ्रंट पॅनलवर 8 मेगापिक्सल सेल्फी सेन्सर मिळू शकतो.
    • बॅटरी : पावर बॅकअपसाठी ह्या फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी दिली जाऊ शकते. तसेच बॅटरी चार्जसाठी ह्या 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येऊ शकते.
    • इतर फीचर्स : फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असल्याचं लीकमधून समोर आलं आहे. तसेच रियलमी नारजो 60 मध्ये 3.5एमएम जॅक आणि यूएसबी टाईप-सी पोर्ट सारखे ऑप्शन मिळू शकतात.

    The post Realme Narzo 60 5G फोन आला समोर, 8GB RAM आणि MediaTek प्रोसेसरसह लवकरच होऊ शकतो लाँच first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/8-gb-ram-smartphone-realme-narzo-60-listed-on-geekbench-specifications-leaked/feed/ 0
    Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-might-launch-with-snapdragon-8-gen-2-soc/ https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-might-launch-with-snapdragon-8-gen-2-soc/#respond Mon, 12 Jun 2023 07:31:07 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21535 Realme नं आतापर्यंत अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आता समोर आलं आहे की कंपनी एक नवीन डिवाइस Realme GT Neo 5 Pro वर काम करत आहे. सध्या ब्रँडनं फोनबद्दल कोणतीही घोषणा केली नाही परंतु डिजिटल चॅट स्टेशनच्या एका रिपोर्टमध्ये फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे. Realme GT Neo 5 Pro चा लीक रिपोर्ट […]

    The post Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • फोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 मिळू शकतो.
    • फोनच्या डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेट मिळेल.
    • ह्यात 16GB पर्यंत रॅम मिळू शकतो.

    Realme नं आतापर्यंत अनेक फ्लॅगशिप स्मार्टफोन्स सादर केले आहेत. आता समोर आलं आहे की कंपनी एक नवीन डिवाइस Realme GT Neo 5 Pro वर काम करत आहे. सध्या ब्रँडनं फोनबद्दल कोणतीही घोषणा केली नाही परंतु डिजिटल चॅट स्टेशनच्या एका रिपोर्टमध्ये फोनच्या अनेक स्पेसिफिकेशन्सची माहिती समोर आली आहे.

    Realme GT Neo 5 Pro चा लीक रिपोर्ट

    टिप्स्टरनुसार रियलमी जीटी नियो 5 प्रो OLED पॅनल आणि सर्वात कमी बेजल सह येईल. डिस्प्लेवर युजर्सना 1.5K रिजॉल्यूशन दिलं जाईल. तसेच डिस्प्लेवर 144Hz रिफ्रेश रेट, 2160 PWM डिमिंग सपोर्ट मिळेल.

    Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स (लीक)

    • डिस्प्ले साइज : डिस्प्ले साइज पाहता लीकमध्ये समोर आलं आहे की रियलमी जीटी नियो 5 प्रो 6.74 इंचाचा असेल. म्हणजे युजर्सना मोठा डिस्प्ले आणि उपरोक्त खास टेक्नॉलॉजी दिली जाईल.
    • चिपसेट : प्रोसेसर पाहता स्मार्टफोनमध्ये दमदार Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर असण्याची शक्यता आहे.
    • स्टोरेज : स्टोरेजच्या बाबतीत डिवाइसमध्ये 16GB पर्यंत रॅम मिळेल. इंटरनल स्टोरेज बाबत सध्या माहिती देण्यात आली नाही.
    • बॅटरी : लीकनुसार रियलमी जीटी नियो 5 प्रो मध्ये 100W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाऊ शकतो. परंतु ह्यात किती एमएएचची बॅटरी मिळेल ह्याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
    • कॅमेरा डिटेल : कॅमेरा फीचर्स पाहता काही अन्य लीकमध्ये सांगण्यात आलं आहे की डिवाइसच्या बॅक पॅनलवर OIS सपोर्टसह 50 मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी कॅमेरा लेन्स दिली जाईल. इतर कॅमेरा लेन्सची माहिती मात्र मिळाली नाही, असं देखील सांगण्यात आलं आहे की डिवाइसचा मेन कॅमेरा फ्यूजन अ‍ॅल्गोरिदमवर चालेल. ज्याची क्वॉलीटी शानदार मानली जाते.
    • ओएस : ऑपरेटिंग सिस्टम पाहता डिवाइस लेटेस्ट अँड्रॉइड 13 आधारित Realme UI 4.0 वर चालेल.

    The post Realme GT Neo 5 Pro चे स्पेसिफिकेशन्स लीक; पाहा कसे असतील स्मार्टफोन first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/realme-gt-neo-5-pro-specifications-leaked-might-launch-with-snapdragon-8-gen-2-soc/feed/ 0
    200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/ https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/#respond Thu, 08 Jun 2023 07:54:59 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=21473 रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता. 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ […]

    The post 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    Highlights

    • फोनमध्ये 32MP Selfie मिळतो.
    • ह्याचा फिंगरप्रिंट सेन्सर स्क्रीनच्या खाली लपला आहे.
    • हा 100W Fast Charging ला सपोर्ट करतो.

    रियलमीनं आज आपल्या टेक्नॉलॉजीचा प्रदर्शन करत ब्रँडची नवीन ’11 प्रो’ सीरीज भारतात सादर केली आहे. ह्या सीरिजमध्ये 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच झाला आहे. अत्यंत स्टाईलिश डिजाईन आणि शक्तिशाली स्पेसिफिकेशन्स असलेल्या ह्या मोबाइलचे फीचर्स, स्पेसिफिकेशन्स, किंमत व सेलची माहिती तुम्ही पुढे वाचू शकता.

    200MP Camera असलेला फोन

    Realme 11 Pro+ 5G चा कॅमेरा ह्या फोनची सर्वात मोठी खूबी आहे. ह्या मोबाइलमध्ये 200 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे जी Samsung HP3 super zoom लेन्स आहे. हा 1/1.4″ एक्स्ट्रा लार्ज सेन्सर आहे जो 2.24μm फ्यूजन लार्ज पिक्सल सोबतच 22.9एमएम फोकल लेंथ तसेच 85° फिल्ड व्यू (FOV) देतो. हा सॅमसंग सेन्सर एफ/1.69 अपर्चरवर चालतो.

    तसेच फोनच्या रियर कॅमेरा सेटअपमध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेन्स तसेच एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी रियलमी 11 प्रो+ 5जी फोनमध्ये एफ/2.45 अपर्चर असलेला 32 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

    रियलमी 11 प्रो+ 5जी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

    • 6.7″ FHD+ AMOLED Display
    • 8GB RAM Expansion
    • MediaTek Dimensity 7050
    • 5,000mAh Battery
    • 100W Flash Charging
    • स्क्रीन : रियलमी 11 प्रो+ 5जी फोन फोनमध्ये 1080 x 2412 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.7 इंचाचा फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आला आहे जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनला आहे. ह्या फोन डिस्प्लेमध्ये 120हर्ट्झ रिफ्रेश रेट, 2160हर्ट्झ पीडब्ल्यू डिमिंग, 1260हर्ट्झ टच सॅम्पलिंग रेट, 100% डीसीआई-पी3 कलर गामुट आणि आय केयर सारखे फीचर्स मिळतात.

    • प्रोसेसर : हा रियलमी मोबाइल अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 सह लाँच झाला आहे. प्रोसेसिंगसाठी ह्या स्मार्टफोनमध्ये 6एनएम फॅब्रिकेशनवर बनलेला मीडियाटेक डायमेन्सिटी 7050 ऑक्टाकोर प्रोसेसर देण्यात आला आहे जो 2.6गीगाहर्ट्झ क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी हा फोन माली-जी68 जीपीयूला सपोर्ट करतो.
    • रॅम : Realme 11 Pro+ 5G 8जीबी डायनॉमिक रॅम एक्सपांशन टेक्नॉलॉजीसह बाजारात आला आहे. ही टेक्नॉलॉजी इंटरनल फिजिकल रॅममध्ये एक्स्ट्रा 8जीबी जोडून पावर वाढवते.

    • बॅटरी : Realme 11 Pro+ 5G फोनमध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
    • फास्ट चार्जिंग : मोठी बॅटरी वेगानं चार्ज करण्यासाठी फोनमध्ये 100वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी देण्यात आली आहे जी काही मिनिटांत फोन चार्ज करते.
    • कनेक्टिव्हिटी : हा रियलमी मोबाइल ड्युअल मोड SA/NSA 5Gला सपोर्ट सपोर्ट करतो ज्यावर 7 5जी बँड्स वापरता येतात. ह्यात 4जी एलटीई पण आहे. फोनमध्ये ड्युअल सिम, ब्लूटथ आणि वायफाय सोबतच एनएफसी सारखे फीचर्स मिळतात. रियलमी 11 प्रो+ 5जी मध्ये 1टीबी पर्यंतचा मायक्रोएसडी कार्ड वापरता येतो.

    The post 200MP Camera असलेला फोन Realme 11 Pro+ 5G भारतात लाँच, पाहा प्राइस आणि स्पेसिफिकेशन्स first appeared on 91Mobiles Marathi.

    ]]>
    https://www.91mobiles.com/marathi/200-mp-camera-phone-realme-11-pro-plus-5g-launched-in-india-price-specification-sale-offer-in-marathi/feed/ 0