Samsung Galaxy S23 Plus - 91Mobiles Marathi https://www.91mobiles.com/marathi Tech, Gadgets and Mobile News in Marathi - 91mobiles Marathi Fri, 10 Mar 2023 13:14:32 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.5.3 Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-plus-ultra-india-prices-offers-revealed/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-plus-ultra-india-prices-offers-revealed/#respond Thu, 02 Feb 2023 06:38:12 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17432 Samsung Galaxy S23 सीरिजच्या भारतीय किंमतीची अधिकृत माहिती अमेरिकन लाँच नंतर काही तासांनी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे जे Galaxy S22 series ची जागा घेतील. यातील Samsung Galaxy S23 Ultra सर्वात शक्तिशाली मॉडेल आहे जो 200MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला […]

The post Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy S23 सीरिज Unpacked event च्या माध्यमातून लाँच करण्यात आली आहे.
  • फोन्समध्येे डायनॅमिक अ‍ॅमोलेड 2एक्स डिस्प्ले, अँड्रॉइड 13 ओएस, 45वॉट पर्यंत फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेट मिळतो.
  • Samsung Galaxy S23 ची किंमत भारतात 74,999 रुपयांपासून सुरु होते.

Samsung Galaxy S23 सीरिजच्या भारतीय किंमतीची अधिकृत माहिती अमेरिकन लाँच नंतर काही तासांनी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये Galaxy S23, Galaxy S23 Plus आणि Galaxy S23 Ultra स्मार्टफोन्सचा समावेश करण्यात आला आहे जे Galaxy S22 series ची जागा घेतील. यातील Samsung Galaxy S23 Ultra सर्वात शक्तिशाली मॉडेल आहे जो 200MP प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह बाजारात आला आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरिज Qualcomm Snapdragon 8 Gen 2 चिपसेट आणि Android 13 OS सह बाजारात आली आहे. पुढे आम्ही सॅमसंग गॅलेक्सी एस23, गॅलेक्सी एस23 प्लस आणि सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्राच्या भारतातील किंमतीची आणि ऑफर्सची माहिती दिली आहे.

Samsung Galaxy S23 Series prices in India

Samsung Galaxy S23 ची किंमत भारतात 74,999 रुपयांपासून सुरु होते, जी स्मार्टफोनच्या 8GB रॅम व 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत आहे. तर स्मार्टफोनचा 8GB रॅम व 256GB स्टोरेज मॉडेल 79,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन फँटम ब्लॅक, क्रिम, ग्रीन आणि लॅव्हेंडर कलर ऑप्शनसह उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Airtel ग्राहकांना मोठा धक्का! बंद झाले कंपनीचे सर्वच स्वस्त रिचार्ज प्लॅन

Samsung Galaxy S23 Plus च्या बेस मॉडेलची किंमत 94,999 रुपये ठेवण्यात आली आहे, ज्यात 8GB रॅमसह 256GB स्टोरेज मिळते. तर 104,999 रुपये देऊन तुम्ही या स्मार्टफोनचा 8GB रॅम व 512GB स्टोरेज मॉडेल विकत घेऊ शकता. हा फोन फँटम ब्लॅक आणि क्रीम कलरमध्ये विकत घेता येईल.

Samsung Galaxy S23 Ultra च्या 12GB रॅम व 256GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 124,999 ठेवण्यात आली आहे. तर 12GB रॅम व 512GB स्टोरेजसाठी 134,999 रुपये आणि 12GB रॅम व 1TB स्टोरेजसाठी 154,999 रुपये मोजावे लागतील. हा फोन फँटम ब्लॅक, क्रीम, ग्रीन, रेड, ग्रॅफाइट, लाइम आणि स्काय ब्लू कलर ऑप्शनसह बाजारात आला आहे.

सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरिज प्री बुकिंग आणि ऑफर्स

आज म्हणजे 2 फेब्रुवारीपासून गॅलेक्सी एस23 सीरिज भारतात प्री-बुकिंगसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध झाली आहे. Galaxy S23 Ultra ची प्री बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना Galaxy Watch4 LTE classic आणि Galaxy Buds2 4,999 रुपयांच्या स्पेशल प्राइसमध्ये खरेदी करता येतील. तर Galaxy S23+ च्या प्री बुकिंगवर Galaxy Watch4 BT तुम्ही 4,999 मध्ये मिळवू शकता. Galaxy S23 प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना 5000 रुपयांची स्टोरेज अपग्रेड ऑफर मिळेल.

त्याचबरोबर ऑनलाइन चॅनेल्सवर 8000 रुपयांचा बँक कॅशबॅक देखील या स्मार्टफोन्सवर सॅमसंग देत आहे. तसेच सॅमसंग लाइव्हच्या माध्यमातून आज प्री बुकिंग केल्यास तुम्हाला वायरलेस चार्जर आणि ट्रॅव्हल अडॅप्टर मोफत मिळेल. हे देखील वाचा: कोल्ड्रिंक विकणारी कंपनी करणार स्मार्टफोन लाँच; Coca-Cola Phone बाबत मोठा खुलासा, तारीखही ठरली

सॅमसंग गॅलेक्सी एस23 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस23 ची माहिती जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा.

सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा च्या स्पेसिफिकेशन्ससाठी इथे क्लिक करा.

The post Samsung Galaxy S23, Galaxy S23 Plus, Galaxy S23 Ultra ची भारतीय किंमत आली समोर first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-plus-ultra-india-prices-offers-revealed/feed/ 0
Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-and-galaxy-s23-plus-launched-with-snapdragon-8-gen-2-know-specs-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-and-galaxy-s23-plus-launched-with-snapdragon-8-gen-2-know-specs-and-price/#respond Wed, 01 Feb 2023 18:16:02 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17405 Samsung चा Galaxy Unpacked 2023 इव्हेंट पार पडला आहे या इव्हेंटमधून Samsung Galaxy S23 ही कंपनीची फ्लॅगशिप सीरीज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 200MP चा कॅमेरा Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं Samsung Galaxy S23 5G आणि Galaxy S23 Plus 5G देखील सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा, 45W […]

The post Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 50MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus लाँच
  • दोन्ही फोन्समध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेटची पावर
  • 120Hz रिफ्रेश रेटसह FHD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले

Samsung चा Galaxy Unpacked 2023 इव्हेंट पार पडला आहे या इव्हेंटमधून Samsung Galaxy S23 ही कंपनीची फ्लॅगशिप सीरीज सादर केली आहे. या सीरिजमध्ये 200MP चा कॅमेरा Galaxy S23 Ultra 5G स्मार्टफोन आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं Samsung Galaxy S23 5G आणि Galaxy S23 Plus 5G देखील सादर केले आहेत. या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा, 45W फास्ट चार्जिंग, 8GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. दोन्ही फोन्सचे बरेचशे स्पेक्स एकसारखे आहेत परंतु काही बदल आहेत ज्यांची माहिती पुढे दिली आहे.

Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus चे स्पेसिफिकेशन्स

  • FHD+ 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • 45W फास्ट चार्जिंग
  • 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप
  • IP68 सर्टिफिकेशन
  • 8GB RAM आणि 512GB स्टोरेज

Samsung Galaxy S23 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले आहे तर Galaxy S23 Plus 6.6 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. दोन्ही फोन एफएचडी+ एज अ‍ॅमोलेड डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचर सह देण्यात आला आहे. हे फोन्स अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह बाजारात आले आहेत. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये क्वॉलकॉमचा शक्तिशाली Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे. जोडीला 8GB रॅम आणि 512GB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हे फोन्स अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतात. हेव्ही टास्क नंतर देखील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी व्हेपर चेंबर कुलिंग मिळते.

हे फोन पाणी आणि धुळीपासून सुरक्षित राहावे म्हणून IP68 सर्टिफाइड करण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटी फिचरमध्ये Samsung Knox आणि Samsung Knox Vault चा समावेश आहे. छोट्या Samsung Galaxy S23 मध्ये 3900mAh ची छोटी बॅटरी मिळते तर प्लस मॉडेल 4700mAh च्या बॅटरीसह येतो. दोन्ही फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात.

दोन्ही स्मार्टफोन्सच्या कॅमेरा सेटअपमध्ये काहीही फरक नाही. यात एफ 1.8 अपर्चर असलेला 50MP चा प्रायमरी सेन्सर, एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा आणि एफ 2.4 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यात एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे.

Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

Samsung Galaxy S23 स्मार्टफोनचे तीन व्हेरिएंट बाजारात ज्यात 8GB रॅम मिळतो. याच्या 128GB स्टोरेजची किंमत 799 डॉलर्स (सुमारे 65,486 रुपये) ठेवण्यात आली आहे. 256GB स्टोरेज मॉडेल आणि 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत लवकरच समोर येईल. हे देखील वाचा: POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; तुमच्या बजेटमध्ये बसेल का? जाणून घ्या

Samsung Galaxy S23 Plus मध्ये 8GB रॅमसह दोन स्टोरेज ऑप्शन मिळतात. यातील 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 999 डॉलर्स (सुमारे 81,878 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर मोठ्या 512GB स्टोरेज मॉडेलची किंमत गुलदस्त्यात आहे. हे दोन्ही फोन भारतीय बाजारात देखील येणार आहेत, ज्यांची किंमत कंपनी उद्या घोषित करेल.

The post Samsung Galaxy S23 आणि Galaxy S23 Plus झाले लाँच; जाणून घ्या माहिती first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-and-galaxy-s23-plus-launched-with-snapdragon-8-gen-2-know-specs-and-price/feed/ 0
एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-launched-with-200mp-camera-know-specs-and-price/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-launched-with-200mp-camera-know-specs-and-price/#respond Wed, 01 Feb 2023 18:15:58 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=17404 Samsung नं आपल्या एका जबरदस्त लाँच इव्हेंट Galaxy Unpacked 2023 मधून आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीनं तीन प्रिमीयम स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy S23 5G, Galaxy S23 Plus 5G आणि Galaxy S23 Ultra 5G बाजारात आणले आहेत. यातील अल्ट्रा मॉडेल 200MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, […]

The post एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • 200MP कॅमेऱ्यासह Samsung Galaxy S23 Ultra लाँच
  • फोनमध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 8 Gen 2 चिपसेट देण्यात आला आहे
  • 5000mAh च्या दमदार बॅटरीसह फोनची एंट्री

Samsung नं आपल्या एका जबरदस्त लाँच इव्हेंट Galaxy Unpacked 2023 मधून आपली नवी फ्लॅगशिप Samsung Galaxy S23 सीरीज सादर केली आहे. या सीरिज अंतर्गत कंपनीनं तीन प्रिमीयम स्मार्टफोन सादर केले आहेत. कंपनीनं Samsung Galaxy S23 5G, Galaxy S23 Plus 5G आणि Galaxy S23 Ultra 5G बाजारात आणले आहेत. यातील अल्ट्रा मॉडेल 200MP कॅमेरा, 5000mAh बॅटरी, 12GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 2 चिपसेटसह लाँच करण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Samsung Galaxy S23 Ultra चे स्पेसिफिकेशन्स, फीचर्स आणि किंमत.

Samsung Galaxy S23 Ultra Specifications

  • 6.8 इंचाचा 120Hz अ‍ॅमोलेड डिस्प्ले
  • Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर
  • एस पेन सपोर्ट
  • 5000mAh ची बॅटरी
  • 200MP क्वॉड कॅमेरा सेटअप
  • IP68 सर्टिफिकेशन
  • 12GB RAM आणि 1TB स्टोरेज

Samsung Galaxy S23 Ultra मध्ये 6.8-इंचाचा क्यूएचडी+ एज डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक अ‍ॅमोलेड पॅनल आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, व्हिजन बूस्टर आणि एन्हान्सड कम्फर्ट फिचरला सपोर्ट करतो. हा फोन एस पेनला सपोर्ट करतो. फोनचे डायमेन्शन 78.1 X 163.4 X 8.9एमएम आणि वजन 234 ग्राम आहे. हे देखील वाचा: अबब! तब्बल 240W फास्ट चार्जिंग! Realme GT Neo 5 च्या लाँचची कंपनीनं केली घोषणा

प्रोसेसिंगसाठी Galaxy S23 Ultra मध्ये क्वॉलकॉमच्या लेटेस्ट Snapdragon 8 Gen 2 चा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या दमदार फोनमध्ये 12GB पर्यंत रॅम आणि 1TB पर्यंतची स्टोरेज देण्यात आली आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित सॅमसंगच्या One UI 5.1 वर चालतो. गेमिंग करताना फोनचं तापमान वाढू नये म्हणून यात व्हेपर चेंबर कुलिंग देण्यात आली आहे.

हा फोन IP68 सर्टिफाइड असल्यामुळे धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात 5G, LTE, Wi-Fi 6 आणि Bluetooth 5.3 चे ऑप्शन मिळतात. सिक्योरिटीसाठी अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. पावर बॅकअपसाठी फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते जी 45W फास्ट चार्जिंग, वायरलेस चार्जिंग आणि रिवर्स वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

फोटोग्राफीसाठी फोनमध्ये क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात एफ 1.7 अपर्चर असलेला 200MP चा प्रायमरी सेन्सर, जोडीला एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा वाइड अँगल कॅमेरा, एफ 2.3 अपर्चर असलेली 10MP 3X ऑप्टिकल झूम असलेली टेलीफोटो लेन्स आणि एफ 4.9. अपर्चर असलेली 10MP ची 10X झूमसह टेलीफोटो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये एफ 2.2 अपर्चर असलेला 12MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हे देखील वाचा: POCO X5 Pro स्मार्टफोन 6 फेब्रुवारीला भारतात होईल लाँच; तुमच्या बजेटमध्ये बसेल का? जाणून घ्या

Samsung Galaxy S23 Ultra ची किंमत

Samsung Galaxy S23 Ultra स्मार्टफोनचे चार व्हेरिएंट बाजारात आले आहेत. यातील बेस मॉडेलमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळते. तसेच 12GB RAM व 256GB स्टोरेज, 12GB RAM व 512GB स्टोरेज आणि 12GB RAM व 1TB स्टोरेज मॉडेल देखील बाजारात आले आहेत. यातील बेस मॉडेलची किंमत 1,199 डॉलर्स (सुमारे 98,271 रुपये) ठेवण्यात आली आहे. इतर मॉडेल्सची किंमत अद्याप समोर आली नाही. तसेच या स्मार्टफोनची भारतीय किंमत उद्या शेयर केली जाईल.

The post एकच नंबर! 200MP च्या कॅमेऱ्यासह आला बाहुबली स्मार्टफोन Samsung Galaxy S23 Ultra first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-ultra-launched-with-200mp-camera-know-specs-and-price/feed/ 0
लाँच पूर्वीच Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची संभाव्य किंमत लीक https://www.91mobiles.com/marathi/upcoming-samsung-galaxy-s23-galaxy-s23-plus-and-galaxy-s23-ultra-price-leak-before-1-february-launching-flagship-phone-in-2023/ https://www.91mobiles.com/marathi/upcoming-samsung-galaxy-s23-galaxy-s23-plus-and-galaxy-s23-ultra-price-leak-before-1-february-launching-flagship-phone-in-2023/#respond Mon, 16 Jan 2023 05:25:48 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=16895 Samsung Galaxy S23 सीरीज 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. सीरीजमध्ये बेस मॉडेल Galaxy S23 सह S23 Plus आणि S23 Ultra स्मार्टफोन येऊ शकतात. कंपनीनं एस23 सीरीज भारतात प्री-रिजर्वसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. आता मार्केटमध्ये येण्यापूर्वी या पावरफुल सॅमसंग फोनची संभाव्य किंमत देखील लीक झाली आहे. एक नवीन रिपोर्टमध्ये तिन्ही गॅलेक्सी स्मार्टफोन्सच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची […]

The post लाँच पूर्वीच Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
Highlights

  • Samsung Galaxy S23, S23 Plus आणि S23 Ultra ची संभाव्य प्राइस लीक झाली आहे.
  • या फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरीजची आंतरराष्ट्रीय किंमत जवळपास 64,900 रुपयांपासून सुरु होऊ शकते.
  • इंडिया प्राइस स्मार्टफोन्सच्या ग्लोबल प्राइसच्या तुलनेत कमी मिळू शकते.
  • Samsung Galaxy S23 series 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल.

Samsung Galaxy S23 सीरीज 1 फेब्रुवारीला भारतात लाँच होईल. सीरीजमध्ये बेस मॉडेल Galaxy S23 सह S23 Plus आणि S23 Ultra स्मार्टफोन येऊ शकतात. कंपनीनं एस23 सीरीज भारतात प्री-रिजर्वसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. आता मार्केटमध्ये येण्यापूर्वी या पावरफुल सॅमसंग फोनची संभाव्य किंमत देखील लीक झाली आहे. एक नवीन रिपोर्टमध्ये तिन्ही गॅलेक्सी स्मार्टफोन्सच्या मेमरी व्हेरिएंट्स आणि त्यांची संभाव्य प्राइस शेयर करण्यात आला आहे.

सॅमसंग गॅलॅक्सी एस23 ची संभाव्य किंमत

लीकनुसार सॅमसंग गॅलेक्सी एस23 स्मार्टफोन दोन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच होऊ शकतो. बेस मॉडेलमध्ये 8जीबी रॅम + 128जीबी स्टोरेज मिळेल ज्याची किंमत $799 डॉलर असू शकते. तसेच मोठा व्हेरिएंट 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेजसह लाँच केला जाऊ शकतो आणि याची किंमत $849 डॉलर असू शकते. भारतीय करंसीनुसार यांची किंमत अनुक्रमे 64,900 रुपये आणि 69,000 रुपयांच्या आसपास आहे. हे देखील वाचा: My Scheme Portal Online Process: खास तुमच्यासाठी कोणती सरकारी योजना आहे सांगेल ‘ही’ वेबसाइट, आताच करा चेक

सॅमसंग गॅलॅक्सी एस23प्लस ची संभाव्य किंमत

गॅलेक्सी ए23+ पाहता लीकनुसार, या फोनच्या मेमरी व्हेरिएंट्स देखील वॅनिला मॉडेल सारखे असू शकतात. फोनचा 8GB RAM + 128 GB storage व्हेरिएंट $999 डॉलर मध्ये तर 8GB RAM + 256GB storage व्हेरिएंट $1049 डॉलरमध्ये लाँच होऊ शकतो. या किंमती जवळपास 81,000 रुपये आणि 85,000 रुपयांमध्ये रूपांतरित होतात.

सॅमसंग गॅलॅक्सी एस23 अल्ट्राची संभाव्य किंमत

सीरीजचा सर्वात मोठा अल्ट्रा मॉडेल तीन मेमरी व्हेरिएंट्समध्ये लाँच केला जाऊ शकतो, असं सांगण्यात आलं आहे. किंमत पाहता 8जीबी रॅम + 256जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1,249 डॉलर (जवळपास 1,01,499 रुपये), 12जीबी रॅम+ 512जीबी स्टोरेज व्हेरिएंट $1349 (जवळपास 1,09,499 रुपये) आणि 12जीबी रॅम + 1टीबी स्टोेरेज व्हेरिएंट $1499 (जवळपास 1,21,800 रुपये) मध्ये लाँच होऊ शकतो. हे देखील वाचा: Amazon Great Republic Day Sale: या आहेत बेस्ट स्मार्ट टीव्ही डील्स, घरच्या घरी थिएटरची मजा

सॅमसंग गॅलॅक्सी एस23 कधी होणार लाँच

गॅलेक्सी ए23 सीरीज लाँच डिटेल्स पाहता, Galaxy Unpacked 2023 इव्हेंटच्या मंचावरून ही नवीन फ्लॅगशिप फोन सीरीज 1 फेब्रुवारीला मार्केटमध्ये एंट्री घेईल. हा लाँच इव्हेंट सॅन फ्रांसिस्कोमध्ये आयोजित करण्यात येईल जो भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. हा इव्हेंट कंपनीच्या अधिकृत वेबसाइट सोबतच सर्व सॅमसंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लाइव्ह बघता येईल. भारतात कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि ई-कॉमर्स साइट अ‍ॅमेझॉनवर ही सीरीज आतापासून रिजर्व करता येईल तसेच प्री-रिजर्वेशनवर सॅमंसग अनेक ऑफर्स देखील देत आहे.

The post लाँच पूर्वीच Samsung Galaxy S23, S23+ आणि S23 Ultra ची संभाव्य किंमत लीक first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/upcoming-samsung-galaxy-s23-galaxy-s23-plus-and-galaxy-s23-ultra-price-leak-before-1-february-launching-flagship-phone-in-2023/feed/ 0
Samsung Galaxy S23 Series फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-series-launch-details-and-specifications-leaked/ https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-series-launch-details-and-specifications-leaked/#respond Tue, 29 Nov 2022 09:31:04 +0000 https://www.91mobiles.com/marathi/?p=15473 अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये सॅमसंग की गॅलेक्सी एस सीरीजचा दर्जा वेगळाच आहे. कंपनीच्या Samsung Galaxy S22 सीरीजनं भारतीय बाजारात अनेक रेकॉर्ड बनवले आहेत आणि आता Samsung Galaxy S23 सीरीज देखील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येण्यास तयार होत आहे. Samsung Galaxy S23 Series Launch Timeline समोर आली आहे आणि बातमी येत आहे की पावरफुल गॅलेक्सी एस23 […]

The post Samsung Galaxy S23 Series फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोन्समध्ये सॅमसंग की गॅलेक्सी एस सीरीजचा दर्जा वेगळाच आहे. कंपनीच्या Samsung Galaxy S22 सीरीजनं भारतीय बाजारात अनेक रेकॉर्ड बनवले आहेत आणि आता Samsung Galaxy S23 सीरीज देखील अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि हायएन्ड स्पेसिफिकेशन्ससह येण्यास तयार होत आहे. Samsung Galaxy S23 Series Launch Timeline समोर आली आहे आणि बातमी येत आहे की पावरफुल गॅलेक्सी एस23 सीरीज फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात लाँच होऊ शकते.

Samsung Galaxy S23 सीरिज लाँच

सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीज लाँच बद्दल नवीन रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टमध्ये दावा केला जात आहे की ही फ्लॅगशिप सॅमसंग स्मार्टफोन सीरीज फेब्रुवारी 2023 च्या पहिल्या आठवड्यात लाँच केली जाऊ शकते. रिपोर्टनुसार फेब्रुवारी 2023 मध्ये कंपनी अमेरिकेत Samsung Unpacked event चं आयोजन करू शकते आणि या मंचावरून Samsung Galaxy S23 Series लाँच होऊ शकते. या सीरीज अंतगर्त Samsung Galaxy S23, Samsung Galaxy S23 Plus आणि Samsung Galaxy S23 Ultra लाँच होऊ शकतात, अशी चर्चा आहे. हे देखील वाचा: 12 नव्हे 13 महिने चालेल BSNL चा ‘हा’ प्लॅन; एयरटेल-जियोपेक्षा कमी किंमत आणि रोज 2GB डेटा

Samsung Galaxy S23 5G

सॅमसंग गॅलेक्सी एस23 सीरीजचा बेस मॉडेल Samsung Galaxy S23 5G असू शकतो. आतापर्यंत समोर आलेल्या डिटेल्सनुसार हा मोबाइल फोन 6.1 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो जो अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेला असू शकतो तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालू शकतो. ही स्क्रीन पंच-होल स्टाईलसह येऊ शकते आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजीला सपोर्ट करू शकते.

Samsung Galaxy S23 5G फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 जेन 2 चिपसेटवर लाँच केला जाऊ शकतो. हा चिपसेट सीरीजच्या अन्य मॉडेल्स Samsung Galaxy S23 Plus आणि S23 Ultra मध्ये देखील मिळू शकतो. तसेच लीकनुसार गॅलेक्सी एस23 5जी फोन 12 जीबी रॅमवर लाँच होऊ शकतो तसेच 512 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करू शकतो. सॅमसंग गॅलेक्सी एस23 अल्ट्रा मध्ये 16जीबी रॅम दिला जाऊ शकते. हे देखील वाचा: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली स्मार्टफोन असेल OnePlus 11; लाँच पूर्वीच स्पेसिफिकेशन्स लीक

फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy S23 5G मध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळू शकतो. या फोनच्या बॅक कॅमेराची माहिती समोर आली नाही परंतु Samsung Galaxy S23 Ultra बद्दल सांगण्यात आलं आहे की या स्मार्टफोनमध्ये 200 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

The post Samsung Galaxy S23 Series फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात येऊ शकतो बाजारात first appeared on 91Mobiles Marathi.

]]>
https://www.91mobiles.com/marathi/samsung-galaxy-s23-series-launch-details-and-specifications-leaked/feed/ 0