सिंगल असो वा कपल, सर्वांना मिळणार 5GB डेटा मोफत; ‘व्हॅलेंटाईन डे’ साठी वोडाफोन आयडियाची ऑफर

Highlights

  • काही रिचार्ज प्लॅन्सवर 2GB डेटा मोफत मिळेल.
  • वी अ‍ॅपवरून करावा लागेल रिचार्ज
  • 14 फेब्रुवारी 2023 पर्यंतच मिळणार मोफत डेटा.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ब्रँड्स नेहिमीच एकापेक्षा एक चांगल्या ऑफर्स सादर करत असतात. अनेकदा अशा ऑफर्स सणासुदीच्या काळात आणल्या जातात. वोडाफोन आयडियानं देखील अशीच एक शानदार ऑफर आणली आहे आणि त्यासाठी प्रेमाचा सणाची निवड केली आहे. कंपनी काही निवडक रिचार्ज प्लॅन्सवर 5GB डेटा मोफत देत आहे.

या विशेष प्रसंगी 299 रुपये आणि त्यापेक्षा जास्त किंमतीच्या निवडक रिचार्ज करणाऱ्या युजर्सना 5 जीबी अतिरिक्त डेटा मिळेल ज्याची वैधता 28 दिवस असेल आणि त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. 199 ते 299 रुपयांपर्यंतच्या निवडक रिचार्जेससोबत ‘वी’ युजर्सना 2 जीबी अतिरिक्त डेटा मिळेल आणि त्याची वैधता 28 दिवस असेल. 14 फेब्रुवारी 2023 पर्यंत ‘वी’ अ‍ॅपवरून रिचार्ज करणाऱ्या ‘वी’ ग्राहकांनाच या विशेष ऑफरचा लाभ घेता येईल. हे देखील वाचा: Cheapest 5G Phone in India: भारतातील सर्वात स्वस्त 5G Phone ची वाढली ताकद; 9GB RAM सह नवा मॉडेल लाँच

5000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर जिंकण्याची संधी

‘वी’ ने फक्त ‘वी’ युजर्ससाठी #ViLoveTunes नावाची एक विशेष सोशल मीडिया स्पर्धा सुरु केली आहे. यात वी अ‍ॅपवर हंगामा म्युझिकमधील व्हॅलेंटाईन प्लेलिस्टमधील विस्कळीत केलेले गाण्याचे बोल ओळखून #ViLoveTunes सह उत्तर कमेंट करायचं आहे. रोज एका भाग्यशाली विजेत्याला 5000 रुपयांचे गिफ्ट व्हाउचर मिळेल. कंपनीच्या अधिकृत सोशल मीडिया हॅन्डल्सवर हे कॉन्टेस्ट 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत सुरु असेल. हे देखील वाचा: लाँच झाला Realme चा Coca-Cola Phone; 108MP कॅमेऱ्यासह मिळतोय 8GB रॅम

Vi 99 plan

Vodafone Idea (Vi) नं आपल्या युजर्ससाठी एका नवा एंट्री लेव्हल प्लॅन सादर केला आहे, ज्याची किंमत 100 रुपयांपेक्षा कमी आहे. Vodafone-idea च्या नव्या 99 रुपयांचा प्लॅनमध्ये युजर्सना 28 दिवसांची वॅलिडिटी मिळते. तसेच 99 चा फुल टॉकटाइम आणि 200 एमबी इंटरनेट डेटा देखील दिला जात आहे. परंतु हा प्लॅन कोणत्याही SMS सुविधेविना येतो. म्हणजे जर या प्लॅनचा वापर करणाऱ्या युजर्सना एसएमएस पाठवण्यासाठी चार्ज द्यावा लागेल. तसेच टॉकटाइम संपल्यावर लोकल आणि नॅशनल कॉल्ससाठी 2.5 पैसे प्रति सेकंद शुल्क आकारलं जाईल. तुम्ही हा प्लॅन vodafone-idea च्या वेबसाइट किंवा इतर रिचार्ज अ‍ॅपवरून रिचार्ज करून वापरू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here