लॉन्चच्या आधी समोर आली 64MP चा कॅमेरा असलेल्या Vivo S9 5G ची महत्वाची माहिती, जाणून घ्या याची खासियत

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती कि चिनी टेक कंपनी वीवो आपल्या S-सीरीज मध्ये एक नवीन स्मार्टफोन Vivo S9 5G वर काम करत आहे. तर गेल्या आठवड्यात एका रिपोर्ट मध्ये खुलासा झाला होता कि वीवो चीन मध्ये 6 मार्चला एस9 स्मार्टफोन लॉन्च करू शकते. त्याचबरोबर फोन मॉडेल नंबर Vivo V2072A सह गुगल प्ले कंसोल लिस्टिंग मध्ये पण समोर आला होता. या सर्व लीक्सनंतर आता या फोनचे काही महत्वाचे स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. हि माहिती प्रसिद्ध टिप्स्टर Digital Chat Station ने दिली आहे.

डिजिटल चॅट स्टेशनने दिलेल्या माहितीनुसार कथित वीवो एस9 5G मध्ये 90 हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला ओलेड डिस्प्ले असेल. लक्षात असू द्या कि कंपनीने याआधी S-सीरीजच्या स्मार्टफोन्स मध्ये एमोलेड पॅनल दिला आहे. तसेच सांगण्यात आले आहे कि फोन मध्ये 44 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा असेल. पण अजूनतरी सेकंडरी सेल्फी लेंसबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. वीवो एस9 5G मध्ये मागे 64 मेगापिक्सल प्राइमरी कॅमेरा दिला जाईल. त्याचबरोबर हँडसेटला पावर देण्यासाठी 4000mAh ची बॅटरी दिली जाऊ शकते.

हे देखील वाचा : 5,000 रुपयांनी स्वस्त झाले Vivo चे दोन ताकदवान फोन वीवो X50 आणि V19, जाणून घ्या नवीन किंमत

अलीकडेच वीवोचा एक फोन मॉडेल नंबर V2072A सह गुगल प्ले कंसोल वर दिसला होता. या लिस्टिंगवरून खुलासा झाला होता कि वीवोच्या आगामी फोन मध्ये डाइमेंसिटी 1100 (MT6891 मॉडेल नंबर) चिपसेट असेल. डिवाइस चीनी मार्केट मध्ये Vivo S9 5G नावाने लॉन्च केला जाऊ शकतो. पण याची अधिकृत माहिती समोर आली नाही.

लिस्टिंगमधून समोर आले होते कि फोन मध्ये 1080 x 2400 पिक्सल फुलएचडी+ रिजोल्यूशन डिस्प्लेसह 12 जीबी रॅम व अँड्रॉइड 11 ओएस दिला जाईल. इतकेच नव्हे तर गुगल प्ले कंसोलवर दाखवण्यात आलेल्या फोनच्या फोटोवरून समजले होते कि यात पुढच्या बाजूला दोन फ्रंट कॅमेऱ्यांसाठी एक रुंद नॉच दिली जाईल.

हे देखील वाचा : Vivo S7t 5G फोन लॉन्च, यात आहे 8GB रॅम, 44MP डुअल सेल्फी आणि 64MP ट्रिपल रियर कॅमेरा

वर सांगितल्याप्रमाणे वीवो एस9 5जीच्या लॉन्चबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अजूनतरी समोर आली नाही. त्यामुळे आहि माहिती फक्त अफवा आहे असे म्हणता येईल. अधिकृत विधान समोर येईस्तोवर काही निश्चित सांगता येणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here