व्हॉट्सअ‍ॅपवर डिलीट केलेले मेसेज कसे बघायचे? जाणून घ्या सर्वात सोपा उपाय

व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज करताना अनेकदा आपण एकमेकांना चुकीचे मेसेज पाठवतो. आधी यावर कोणताही उपाय नव्हता. परंतु आता युजर्सकडे डिलीट मेसेजचा ऑप्शन आला आहे. त्यामुळे मेसेजिंगचं जग बदललं आहे. परंतु अनेकदा आपल्याला डिलीट केलेला मेसेज बघायचा असतो. आज आम्ही तुम्हाला काही आशा टिप्स सांगणार आहोत ज्यांच्या मदतीनं तुम्ही डिलीट केलेले मेसेज वाचू शकता. जर तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तर पुढील टिप्स वापरून पाहा.

नोटिफिकेशन हिस्ट्री

डिलीट केलेला मेसेज वाचण्यासाठी सर्वात पहिली पद्धत आहे, जी स्वतः गुगलनं अँड्रॉइडमध्ये इंटीग्रेट केली आहे. नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये तुम्ही डिसमिस केलेल्या नोटिफिकेशन्स देखील साठवून ठेवल्या जातात. एखाद्या नोटिफिकेशनवर टॅप करताच तुम्ही थेट अ‍ॅपवर पोहोचता आणि मेसेज अ‍ॅक्सेस करू शकता.

व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्रामवर जेव्हा एखादा मेसेज येतो तेव्हा तो सर्वप्रथम नोटिफिकेशनमध्ये दिसतो. त्यामुळे डिलीट आणि अनसेंड मेसेज नोटिफिकेशन्समध्ये वाचता येतो. इथे आम्ही तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री टॅबची माहिती देत आहोत ज्यासाठी तुम्हाला तुमच्या अँड्रॉइड फोनमध्ये पुढील स्टेप फॉलो कराव्या लागतील.

स्टेप 1 : सर्वप्रथम फोनमध्ये सेटिंग अ‍ॅप ओपन करा. आता नोटिफिकेशन ऑप्शन सिलेक्ट करून नोटिफिकेशन हिस्ट्रीवर टॅप करा.

स्टेप 2 : इथे तुम्हाला नोटिफिकेशन हिस्ट्री इनेबल करावी लागेल.

स्टेप 3 : आता तुम्ही व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामवरील कोणताही डिलीट केलेला मेसेज इथे बघू शकता.

विशेष म्हणजे नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये मेसेज फक्त 24 तास साठवला जातो. त्यानंतर कायमस्वरूपी डिलीट केला जातो.

WAMR

नोटिफिकेशन हिस्ट्री खूप उपयुक्त आहे, परंतु सर्व अँड्रॉइड फोनमध्ये हे फीचर उपलब्ध नाही. भारतात सर्वात पॉपुलर स्मार्टफोन ब्रँड Xiaomi आपल्या युजर्सना हे फीचर देत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी नोटिफिकेशन हिस्ट्रीला पर्याय देखील आणला आहे.

WAMR एक शानदार टूल आहे ज्याच्या मदतीनं तुम्ही फक्त व्हॉट्सअ‍ॅप आणि इन्स्टाग्राम नव्हे तर इतर कोणत्याही मेसेजिंग अ‍ॅप्सचे डिलीट केलेले मेसेज रिकव्हर करू शकता. नोटिफिकेशन हिस्ट्रीमध्ये मेसेज फक्त 24 तास साठवले जातात तर WAMR मध्ये डिलीट केलेले मेसेज कायमचे सेव्ह राहतात. WAMR वापरण्यासाठी पुढील स्टेप फॉले करा.

स्टेप 1 : सर्वप्रथम गुगल प्ले स्टोरवरून WAMR अ‍ॅप इंस्टॉल करा.

स्टेप 2 : अ‍ॅप इंस्टॉल केल्यानंतर तुम्हाला काही आवश्यक परमिशन जसे की नोटिफिकेशन अ‍ॅक्सेस द्यावा लागेल.

स्टेप 3 : आता तुम्हाला ते अ‍ॅप्स निवडावे लागतील ज्यांच्या नोटिफिकेशन्स सेव्ह करायच्या आहेत.

स्टेप 4 : सेटअप कंप्लीट केल्यानंतर जेव्हा तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप किंवा इन्स्टाग्रामवर एखादा मेसेज डिलीट केलेला दिसेल तेव्हा तुम्ही WAMR अ‍ॅपमध्ये हा डिलीट केलेला मेसेज वाचू शकता.

नोट : WAMR अ‍ॅपला जेव्हा तुम्ही नोटिफिकेशन्स अ‍ॅक्सेस देता तेव्हा तुमच्या सर्व नोटिफिकेशन्स हे अ‍ॅप वाचू शकतं. यात तुमची खाजगी माहिती जसे की कॉन्टॅक्ट, मेसेज आणि फोटोचा देखील समावेश आहे. WAMR बाबत डेटा चोरीची कोणतीही बातमी समोर आलेली नाही. तसेच गुगल प्ले स्टोरवर या अ‍ॅपला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here