व्हाट्सॅप ग्रुप अॅडमिन वर आता बनवता येणार नाहीत जोक्स, व्हाट्सॅप ने दिले हे खास अधिकार

भारतात सर्वात जास्त वापरला जाणारा इंस्टेंट मेसेजिंग अॅप व्हाट्सॅप आपल्या यूजर्स ची पण काळजी घेतो. चॅटिंग अजून मजेदार व्हावी आणि व्हाट्सॅप चा वापर सोप्पा व्हावा यासाठी कंपनी कोणात ना कोणता नवीन अपडेट आणत असते. त्यानुसार व्हाट्सॅप ने ‘ग्रुप्स सेटिंग’ मध्ये थोडा बदल करून अॅप अपडेट केला आहे. व्हाट्सॅप ने ग्रुप सेटिंग मध्ये केलेल्या या बदलांमुळे फक्त व्हाट्सॅप ग्रुप्स इंटरफेस शानदार झाला नाही तर सोबतच व्हाट्सॅप ग्रुप अॅडमिन ला पण नवीन अधिकार मिळाले आहेत. व्हाट्सॅप ने एंडरॉयड व आईओएस दोन्ही वर हा नवीन अपडेट जारी केला आहे, जो संपूर्ण देशात रोलआउट झाला आहे. चला पाहूया हा व्हाट्सॅप चा खास नवीन अपडेट :

ग्रुप डिस्क्रिप्शन — व्हाट्सॅप वरील ग्रुप्स ची नावे तर सर्व ठेवतात. कोणी ‘फ्रेंड्स फॉरएवर’ तर कोणी ‘स्वीट फॅमिली’ आशा ग्रुप्स मध्ये असतात. काही ग्रुप्स ची नावे अशी पण असतात ज्यांचा इथे उल्लेख पण करता येणार नाही. व्हाट्सॅप ने आपल्या नवीन अपडेट मध्ये या सर्व ग्रुप्सना नवीन ओळख दिली आहे. नवीन अपडेट नंतर व्हाट्सॅप ग्रुप च्या नावा सह डिस्क्रिप्शन चा पण आॅप्शन दिला आहे. ग्रुप डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हाट्सॅप ग्रुप च्या नावा सह त्याची माहिती, ग्रुप बनवण्याचा हेतू, ग्रुप चे नियम इत्यादि चे डिटेल्स लिहता येतील. जेव्हा नवीन मेंबर ग्रुप ज्वाइंन करेल तेव्हा त्याला हे ​​डिस्क्रिप्शन चॅट मध्ये सर्वात वर दिसेल.

अॅडमिन कंट्रोल — व्हाट्सॅप ग्रुप अॅडमिन वर भारतात जोक्स बनात असतात. ग्रुप मग तो मित्रांचा असो वा फॅमिलीचा ग्रुप अॅडमिन च्या नाकात मेंबर्स नेहमीच दम करतात. कधी कोणी ग्रुप चा फोटो बदलतो तर कोणी नाव बदलतात. पण आता व्हाट्सॅप च्या नव्या अपडेट नंतर ग्रुप अॅडमिन जवळ ही पावर असेल की ते ग्रुप मेंबर्सना ग्रुप आइकन व नाव बादलण्यापासून थांबवू शकतात. या अपडेट मध्ये ग्रुप अॅडमिन जवळ अधिकार असेल की ग्रुप मेंबर्स पैकी कोण व्यक्ति ही इंफो बदलू शकतो आणि कोण नाही.

ग्रुप कॅच अप — तुम्ही तुमच्या कामात व्यस्त आहात, तुमच्याकडे ग्रुप मधील गॉसिप साठी वेळ नाही. जेव्हा तुम्ही काम संपवून येता तेव्हा ग्रुप मध्ये ढीगभर अनरिड मेसेज आलेले असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या कामाच्या मेसेज साठी इतर सर्व अनावश्यक मेसेज पण बघावे लागतात. व्हाट्सॅप च्या नवीन अपडेट नंतर ग्रुप मध्ये आलेल्या ढीगभर मेसेज मध्ये ते मेसेज ज्यात तुम्हाला टॅग करण्यात आले आहे आणि ते मेसेज जे तुमच्या मेसेज ला रिप्लाई म्हणून करण्यात आले आहेत, ते तुम्हाला वेगळे करून दाखविण्यात येतील. ग्रुप ओपन करताच उजव्या कोपर्‍यात @ आइकॉन असेल त्यावर टॅप करताच तुम्ही त्या मेसेजेस वर पोहचाल ज्यात तुम्हाला टॅग करण्यात आले आहे.

पार्टिसिपेंट सर्च — ग्रुप मेंबर्स च्या लांबलचक लिस्ट मधून कोणा एकाला शोधायचे असेल तर हा नवीन फीचर तुम्हाला उपयोगी पडेल. ग्रुप इंफो वर जाऊन तुम्ही सरळ त्या पार्टिसिपेंट म्हणजेच मेंबर ला सर्च करू शकता. तसेच या नवीन अपडेट मध्ये कोणाला अॅडमिन बनवायचे आहे, कोणाला अॅडमिन पदावरून हटावायचे आहे हे पण सहज रित्या करता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here