शाओमी मी ए2 लाइट ची माहिती झाली लीक, कमी किंमतीत डुअल कॅमेरा आणि नॉच स्क्रीनची आहे तयारी

काही दिवसांपूर्वी चीनी सर्टिफिकेशन साइट टेना वर शाओमी चा एक मॉडेल लिस्ट करण्यात आला होता. या मॉडेल मध्ये नॉच स्क्रीन सह डुअल कॅमेरा सेटअप दिसला होता. पण त्यावेळी या फोन ला कोणी शाओमी रेडमी एस2 प्लस तर कोणी रेडमी 6 प्लस चे नाव दिले होते. आता पुन्हा एकदा शाओमी चा हा फोन सर्टिफिकेशन साइट वर दिसला आहे जिथे फोन चे नाव पण स्पष्ट लिहलेले आहे. हा फोन यावेळी सिंगापुर च्या सर्टिफिकेशन साइट वर लिस्ट झाला आहे याला शाओमी मी ए2 लाइट नववी देण्यात आले आहे.

सिंगापुर सर्टिफिकेशन साइट आईएमडीए वर हा एम1805डी1एसजी नावाने लिस्ट करण्यात आला आहे आणि तिथे याला स्पष्ट पणे फोन चे नाव मी ए2 लाइट देण्यात आले आहे. आईएमडीए यूएस सर्टिफिकेशन साइट एफसीसी आणि चीनी सर्टिफिकेशन साइट टेना सारखी आहे.

फोन ची फोटोग्राफी मागच्या आठवड्यात टेना वर लिस्ट केलेल्या फोन सारखी आहे फक्त मॉडेल नंबर मध्ये शेवटच्या दोन डिजिट चा फरक आहे. पण कंपन्या जे हाय दुसर्‍या देशात फोन लॉन्च करताता खुपदा कोड नेम बदलतात. त्यामुळे आशा आहे की हा फोन जगभरात शाओमी मी ए2 लाइट नावाने लॉन्च होईल.

मागच्या वर्षी कंपनी ने चीन मध्ये मी 5एक्स लॉन्च केला होता जो जगभरात मी ए1 नावाने सादर करण्यात आला होता. मी ए1 चे स्पेसिफिकेशन तेच होते फक्त आॅपरेटिंग सिस्टम चा फरक होता. शाओमी मी ए1 एंडरॉयड वन इंटिग्रेशन सह सादर करण्यात आला होता. तसेच यावर्षी कंपनी ने चीन मध्ये मी 6एक्स लॉन्च केला आहे जो जगभरात मी ए2 नावाने लॉन्च केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आशा आहे की कदाचित कंपनी यावेळी मी ए2 सोबत कंपनी याचा छोटा वर्जन सादर करू शकते.

आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी ए2 लाइट मध्ये तुम्हाला 5.84—इंचाच्या नॉच स्क्रीन वाला डिस्प्ले मिळू शकतो. कंपनी याला फुल एचडी+ रेजल्यूशन सह सादर करू शकते. तसेच या फोन मध्ये तुम्हाला 2.0 गीगाहट्र्जचा आक्टाकोर प्रोसेसर मिळू शकतो. माहितीनुसार कंपनी याला 2जीबी, 3जीबी आणि 4जीबी रॅम सह सादर करू शकते. त्याचबरोबर हा फोन 16जीबी, 32जीबी आणि 64जीबी इंटरनल मेमरी मध्ये उपलब्ध होऊ शकतो. या फोन मध्ये तुम्हाला 12—एमपी + 5—एमपी चा डुअल रियर कॅमेरा मिळू शकते. त्याचबरोबर 5—एमपी चा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार शाओमी मी ए2 लाइट मध्ये तुम्हाला एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 ओरियो मिळू शकतो. तसेच फोन मध्ये 3,900 एमएएच ची बॅटरी असू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here