शाओमी च्या नावे झाला अजून एक रेकॉर्ड, 4 महिन्यात विकले 50 लाखांपेक्षा जास्त रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो स्मार्टफोन

शाओमी आज भारतात सर्वात मोठी स्मार्टफोन कंपनी बनली आहे. शाओमी चे स्मार्टफोन सहज विकले जातात आणि हेच कारण आहे की शाओमी आपल्या स्मार्टफोंस मुळे कोणता na कोणता नवीन रेकॉर्ड बनवत असते. शाओमी इंडिया ने ata पुन्हा नवीन रेकॉर्ड बनवला आहे. शाओमी चा हा रेकॉर्ड कंपनी च्या नव्या ‘नोट सीरीज’ च्या नावे झाला आहे. शाओमी ने सांगितले आहे की त्यांच्या रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो ने 5 मिलियन म्हणजे 50 लाखांचा सेल पूर्ण केला आहे.

शाओमी इंडिया ने घोषणा केली आहे की रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो चे 50 लाखां पेक्षा जास्त यूनिट संपूर्ण भारतात विकले गेले आहेत. विशेष म्हणजे शाओमी ने आपले हे दोन्ही स्मार्टफोन वेरिएंट 14 फेब्रुवारी ला भारतात लॉन्च केले होते. आपल्या पहिल्या फ्लॅश सेल मध्ये रेडमी नोट 5 आणि नोट 5 प्रो चे 3 लाखां पेक्षा जास्त यूनिट विकले गेले होते. तसेच भारतात लॉन्च झाल्यानंतर 4 महिन्यांमध्ये फोन च्या विक्री ने 50 लाखांचा आकडा पार केला आहे.

पण शाओमी ने हे स्पष्ट केले नाही की या 50 लाख यूनिट मधील किती फोन रेडमी नोट 5 होते आणि किती रेडमी नोट 5 प्रो. विशेष म्हणजे शाओमी इंडिया द्वारा रेडमी नोट 5 आता ओपन सेल साठी सादर करण्यात आला आहे तर रेडमी नोट 5 प्रो साठी अजूनही फ्लॅश सेल आयोजित होत आहे. 50 लाखांच्या या आकड्यात रेडमी नोट 5 आणि रेडमी नोट 5 प्रो च्या ओपन सेल आणि फ्लॅश सेल दोन्हींचा समावेश आहे.

जर तुम्ही पण शाओमी चा हा शानदार स्मार्टफोन विकत घेऊ इच्छित असाल तर रेडमी नोट 5 च्या 3जीबी रॅम/32जीबी मेमरी वेरिएंट साठी 9,999 रुपये द्यावे लागतील तसेच 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट साठी 11,999 रुपये द्यावे लागतील. त्याचबरोबर रेडमी नोट 5 प्रो चा 4जीबी रॅम/64जीबी मेमरी वेरिएंट 14,999 रुपये तर 6जीबी रॅम/64जीबी वेरिएंट 16,999 रुपयांच्या किंमतीत सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here