फक्त 5,999 रुपयांमध्ये विकला जाईल 5,000एमएएच बॅटरी आणि 6.1 इंचाचा डिस्प्ले असलेला स्वस्त Infinix Smart HD 2021 फोन

Infinix ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन Infinix Zero 8i लॉन्च केला होता. हा मोबाईल फोन 14,999 रुपयांमध्ये लॉन्च झाला होता जो 6 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. इनफिनिक्स झिरो 8आय नंतर आता कंपनी लो बजेट मध्ये पण एक नवीन एंट्री करेल. इनफिनिक्सने एक नवीन फोन सादर केला आहे जो Infinix Smart HD 2021 नावाने विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि या फोनची किंमत असेल फक्त 5,999 रुपये.

Infinix Smart HD 2021 चे प्रोडक्ट पेज शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वर लाईव करण्यात आले आहे. या प्रोडक्ट पेज वर फोनच्या फोटो आणि अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स सोबतच याची किंमतीत पण सांगण्यात आली आहे. कंपनीने फोन बाजारात आणण्याआधी सांगितले आहे कि इनफिनिक्स स्मार्ट एचडी2021 स्मार्टफोन 5,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होईल. या फोनची विक्री फ्लिपकार्ट वरच होईल. इनफिनिक्स 16 डिसेंबरला फोन ऑफिशियली लॉन्च करेल.

अशी आहे डिजाईन

Infinix Smart HD 2021 कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे ज्यात ‘यू’ शेप छोटीशी नॉच देण्यात आली आहे. स्क्रीनच्या तीन कडा नॅरो बेजल्स आहेत तसेच खालच्या बाजूला थोडा रुंद चिन पार्ट आहे. फोनच्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटपअ देण्यात आला आहे जो वर डावीकडे चौकोनी आकारात आहे. बॅक पॅनल वर मध्यभागी फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे ज्याच्या खाली Infinix ची ब्रँडिंग आहे. रियर पॅनल वरच खाली स्पीकर आहे तसेच उजव्या पॅनल वर वाल्यूॅम रॉकर व पावर बटन देण्यात आला आहे.

हे देखील वाचा : Micromax चा अजून एक नवीन फोन होणार आहे भारतात लॉन्च, करेल लो बजेट मध्ये एंट्री

असे असतील स्पेसिफिकेशन्स

Infinix Smart HD 2021 च्या प्रोडक्ट पेजच्या माध्यमातून लॉन्चच्या आधीच खुलासा करण्यात आला आहे कि हा स्मार्टफोन 6.1 इंचाच्या ड्रॉप नॉच डिस्प्ले वर लॉन्च केला जाईल जो एचडी प्लस रेज्ल्यूशन सह येईल. सिक्योरिटीसाठी फोन मध्ये रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच सोबतच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करेल. पावर बॅकअपसाठी इनफिनिक्स स्मार्ट एचडी 2021 स्मार्टफोन मध्ये 5,000एमएएच ची मोठी बॅटरी दिली जाईल. 16 डिसेंबर दुपारी 12 वाजता हा फोन सादर केला जाईल.

Infinix Zero 8i

इनफिनिक्सल झिरो 8आय पाहता हा फोन भारतात एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 8 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन 14,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे जो Silver Diamond आणि Black Diamond कलर वेरिएंट मध्ये फ्लिपकार्ट वर विकत घेता येईल. फोनची संपूर्ण माहिती, फीचर्स व स्पेसिफिकेशन्स जाणून घेण्यासाठी (इथे क्लिक करा)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here