8,999 रुपयांमध्ये Redmi 9 कि Realme C12 कोणता बजेट स्मार्टफोन आहे बेस्ट?

Xiaomi ने गुरुवारी भारतात आपला नवीन Redmi 9 स्मार्टफोन लॉन्च केला आहे. बजेट कॅटेगरी मधील Redmi 9 मध्ये अनेक असे फीचर्स आहेत, ज्यामुळे फोनला भारतीय बाजारात आधीपासून असलेल्या फोन्स कडून टक्कर मिळणे निश्चित आहे. 10 हजार रुपयांपेक्षा पण स्वस्त रेडमी 9 चा थेट मुकाबला रियलमीच्या लेटेस्ट स्मार्टफोन Realme C12 शी आहे. दोन्ही फोन्स कमी किंमतीत येतात आणि यांच्यातील अनेक स्पेसिफिकेशंस एक सारखे आहेत. त्यामुळे दोन्ही फोन्स पैकी एक निवडणे कठीण होऊन जाते. हि अडचण दूर करण्यासाठी आज आम्ही दोन्ही फोन्सचा प्रत्येक पैलू समोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. यामुळे तुम्हाला पण बजेट कॅटेगरी मध्ये एक शानदार फोन निवडणे सोप्पे जाईल.

डिजाइन

लुक व डिजाइन बद्दल बोलायचे झाले तर Redmi 9 आणि Realme C12 दोन्ही फोन वॉटरड्रॉप नॉच सह येतात. तसेच या फोन्स मध्ये बेजल लेस डिस्प्ले सपोर्ट देण्यात आला आहे. पण हँडसेट मध्ये चिन पार्ट आहे. वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन दोन्ही मोबाईल्सच्या उजव्या पॅनल वर आहेत तर डाव्या पॅनल वर सिम स्लॉट देण्यात आला आहे.

रेडमी 9 आणि रियलमी सी 12 फोनच्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा कॅमेरा सेटअप आहे जो वरच्या बाजूला उजवीकडे आहे. पण रेडमी 9 मध्ये डुअल रियर कॅमेरा आणि रियलमी सी12 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट आहे. याव्यतिरिक्त दोन्ही फोन्सच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर आणि बॉटमला यूएसबी पोर्ट आणि स्पीकर ग्रिल देण्यात आली आहे. फक्त रेडमी 9 फोनच्या टॉपला 3.5एमएम जॅक मिळेल. तर हा जॅक रियलमी सी12 च्या बॉटमला आहे.

शानदार डिस्प्ले

रेडमी 9 आणि रियलमी सी 12 फोनचा डिस्प्ले 1600 × 720 पिक्सल रेज्योल्यूशन आणि 20:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो, यात रेडमी 9 मध्ये 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. सोबत फोनची स्क्रीन पी2आई टेक्नॉलॉजीने बनवण्यात आली जी वापर करताना डोळ्यांना सुरक्षित ठेवते. तर रियलमी सी12 मध्ये 6.5 इंचाचा एचडी+ एलसीडी मिनिड्रॉप नॉच डिस्प्ले आहे. या फोनचा स्क्रीन-टू-बॉडी रेशियो 88.7 टक्के आहे तर डिस्प्ले प्रोटेक्शनसाठी हा फोन कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

हार्डवेयर

दोन्ही फोन्स एंडरॉयड 10 वर सादर केले गेले आहेत. पण रेडमी 9 मध्ये मीयूआई 11 आणि रियलमी सी12 मध्ये रियलमी यूआई आहे. दोन्ही फोन्स मध्ये प्रोसेसिंगसाठी 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टा-कोर प्रोसेसर सह 12एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेला मीडियाटेकचा हीलियो जी35 चिपसेट देण्यात आला आहे. तर ग्राफिक्ससाठी हा फोन्स GE8320 जीपीयू सह येतो.

कॅमेरा

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता दोन्ही फोन्स मध्ये सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर Redmi 9 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो ज्यात एलईडी फ्लॅश सह 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन 2 मेगापिक्सलच्या सेकेंडरी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

इकडे रियलमी सी12 ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो, ज्यात एलईडी फ्लॅश सह एफ/2.2 अपर्चर असलेला 13 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी

Redmi 9 आणि Realme C12 दोन्ही डुअल सिम फोन्स आहेत जे 4जी वोएलटीई सपोर्ट सह येतात. तसेच डिवाइस 3.5एमएम जॅक आणि बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह येतात. सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे सोबतच या फोन्स मध्ये फेस अनलॉक फीचर पण आहे. बॅटरी बद्दल बोलायचे तर रेडमी 9 मध्ये पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तर Realme C12 फोन मध्ये 6,000एमएएच ची बॅटरी आहे. दोन्ही फोन 10वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट सह येतात. इतकेच नव्हे तर रियलमी सी12 रिवर्स चार्जिंग टेक्नॉलॉजी सह येतो.

किंमत आणि उपलब्धता

Xiaomi Redmi 9 कंपनीने दोन रॅम वेरिएंट्स आणि Realme C12 एकच वेरिएंट मध्ये येतो. रेडमी 9 पाहता याच्या बेस वेरिएंट 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आणि 4 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 9,999 रुपये आहे. हा फोन येत्या 31 ऑगस्ट पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. तर Realme C12 च्या सिंगल वेरिएंट 3 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेजची किंमत 8,999 रुपये आहे. रियलमी सी12 ची पहिली विक्री 24 ऑगस्टला होती. आता हा फोन पण 31 ऑगस्टला विक्रीसाठी येईल.

दोन्ही फोन्स एकमेकांना चांगलीच टक्कर देत आहेत. Redmi 9 आणि Realme C12 दोन्ही एक सारख्या डिजाइन, चिपसेट आणि सेल्फी कॅमेऱ्या सह येतात. Redmi फोन मध्ये जास्त रॅम आणि स्टोरेज मिळते. तर दुसरीकडे Realme C12 मध्ये एक मोठी बॅटरी आणि ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here