8-इंचाचा डिस्प्ले आणि 5,100एमएएच बॅटरी सह लॉन्च झाला दमदार Samsung Galaxy Tab A 8.0 (2019)

साउथ कोरियन इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने गेल्या महिन्याच्या शेवटी भारतीय मार्केट मध्ये दोन नवीन टॅबलेट लॉन्च केले होते, ज्यात Samsung Galaxy Tab S5e आणि Galaxy Tab A 10.1 चा समावेश होता. तर आता कंपनीने आपला टॅबलेट पोर्टफोलियो वाढवत नवीन टॅबलेट Galaxy Tab A 8.0 (2019) सादर केला आहे.

नावावरून समजत आहे कि हा टॅबलेट 8-इंचाच्या डिस्प्ले साइज सह येतो. तसेच जुन्या वर्जन पेक्षा सॅमसंगने यात चांगल्या डिजाइन सोबतच नवीन स्पेसिफिकेशंस पण दिले आहेत. तसेच यात सॅमसंग फॅमिली शेयर फीचर आहे, ज्या द्वारे तुम्ही तुमच्या नोट्स आणि फोटोज सहज शेयर करू शकता. Samsung Galaxy Tab A 8.0 (2019) टॅबलेट सह कंपनी 2 महिन्यांचे यूट्यूब प्रीमियम सब्सक्रिप्शन आणि 3 महिन्यांचे स्पॉटीफाई प्रीमियम सब्सक्रिप्शन फ्री देत आहे.

स्पेसिफिकेशन्स

या टॅब चे स्पेसिपिकेशन्स पाहता यात 8.0-इंचाचा WXVGA डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन 1280 x 800 पिक्सल्स आहे. या सोबतच हा डिस्प्ले 16:10 एक्सपेक्ट रेश्यो सह येतो. टॅबलेट क्वॉड-कोर चिपसेट सह येतो. यात 2जीबी रॅम आणि 32जीबी स्टोरेज देण्यात आली आहे.

फोटोग्राफी साठी Galaxy Tab A 8.0 (2019) मध्ये 8-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि सेल्फी आणि वीडियो कॉलिंग साठी 2-मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच टॅबलेट मध्ये पावर बॅकअप साठी 5,100एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा एंडरॉयड 9 पाई बेस्ड वनयूआई वर चालतो.

तसेच यात बेसिक कनेक्टिविटी चे सर्व ऑप्शन उपलब्द आहेत. टॅबलेट मध्ये वाईफाई 802.11 ए/बी/जी/एन, यूएसबी 2.0, ब्लूटूथ वी4.2 इत्यादी आहेत. तसेच टॅबलेट वाई-फाई आणि वाई-फाई + एलटीई वेरिएंट मध्ये येतो. सॅमसंग ने अजूनतरी याच्या किंमतीची माहिती दिली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here