हे आहेत 5जी फोन जे एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून टेक बाजारात आले

मोबाईलचा महाकुंभ म्हणजे मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 संपन्न झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यावेळी पण एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून अनेक दिग्गज टेक कंपन्यांनी जगासमोर आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत एका पेक्षा एक स्मार्टफोन सादर केले आहेत. सॅमसंग आणि हुआवई सारख्या ब्रँड्सनी जगासोमर आपले फोल्डेबल स्मार्टफोन पण आणले आहेत. पण यावेळी ज्याची सर्वात जास्त चर्चा होती आणि ज्यामुळे संपूर्ण जगला आश्चर्याचा धक्का मिळाला, आणि ते म्हणेज ‘5जी स्मार्टफोन’. एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून एक किंवा दोन नव्हे तर 6 टेक कंपन्यांनी 5जी स्मार्टफोन आणि त्यांचे प्रोटोटाईप सादर केले आहेत तर मोटोरोला आणि वीवो सारख्या कंपन्यांनी पण लवकरच 5जी टेक्नॉलॉजी सत्यात आणण्याची टेक्नॉलॉजी दाखवली आहे. खाली आम्ही त्या सर्व 5जी स्मार्टफोन्सची माहिती दिली आहे जे एमडब्ल्यूसी 2019 च्या मंचावरून इंटरनेटची दुनिया बदलत स्वप्नांना सत्यात आणले आहे.

हुआवई मेट एक्स
हुआवई मेट एक्स जगातील पहिला फोल्डेबल फोन आहे जो 5जी सपोर्ट सह लॉन्च झाला आहे. कंपनी ने दावा केला आहे कि मेट एक्स जगातील सर्वात फास्ट 5जी फोन आहे. हा फोन 7एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या 5जी चिपसेट ने सुसज्ज केला गेला आहे. या फोन मध्ये बॅलॉंग 5000 सोबत हाईसिलिकॉन किरीन 980 प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे कि या फोन मध्ये 1जीबी ची फिल्म फक्त 30 सेकंदात डाउनलोड होईल.

स्पेसि​फिकेशन्स पाहता मेट एक्स च्या फ्रंट पॅनल वर 6.6-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे तसेच फोनच्या बॅक पॅनल मध्ये 6.38-इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. फोन अनफोल्ड केल्यावर म्हणजे हा ओपन केल्यावर हुआवई मेट एक्स चा डिस्प्ले 8.71-इंचाचा होईल. या फोन मध्ये डुअल सिम ग्लोबल कनेक्टिविटी देण्यात आली आहे. पावर बॅकअप साठी मेट एक्स मध्ये दोन बॅटऱ्या देण्यात आल्या आहेत ज्या मिळून 4,500एमएएच ची पावर मिळते. फोन फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी ने सुसज्ज केला गेला आहे.

हुआवई ने मेट एक्स 8जीबी रॅम सह बाजारात आला आहे. या फोन मध्ये 512जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. किंमत पाहता मेट एक्स 2299 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 1,85,219 रुपयांच्या आसपास आहे.

सॅमसंग एस10 5जी
सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 सीरीज मध्ये तीन नवीन स्मार्टफोन लॉन्च करण्यासोबतच गॅलेक्सी एस10 5जी मॉडेल पण सादर केला आहे. या फोन मध्ये 2.8 गीगाहट्र्जचा ऑक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच फोनला 5जी ची ताकद देण्यासाठी क्वालकॉमचा एक्स50 5जी मॉडेम पण आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 5जी 8जीबी रॅम आणि 12जीबी रॅमच्या दोन वेरिएंट्स मध्ये सादर केला आहे जो क्रमश 512जीबी तसेच 1टीबी च्या इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतात.

गॅलेक्सी एस10 5जी 1440 x 3040 पिक्सल रेजल्यूशन वाल्या 6.7—इंचाच्या क्यूएचडी कर्व्ड डायनेमिक सुपर एमोलेड डिस्प्लेला सपोर्ट करतो जो अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट सेंसर ने सुसज्ज आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सल + 12-मेगापिक्सल + 16-मेगापिक्सल + टोओएस लेंस चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 10-मेगापिक्सल आणि 3डी टीओएस सह डुअल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पावर बॅकअप साठी या फोन मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 4,500 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. सॅमसंग ने गॅलेक्सी एस10 5जी 1,500यूएस डॉलर च्या किंमतीत लॉन्च केला आहे जो भारतीय करंसी नुसार जवळपास 1,06,300 रुपये होतात.

एलजी वी50 थिंक
एलजी वी50 थिंक 5जी एंडरॉयड 9 पाई वर सादर केला गेला आहे. हा फोन क्वालकॉमच्या सर्वात ताकदवान चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 सोबत एक्स50 5जी मॉडेम ने सुसज्ज केला गेला आहे. एलजी ने हा फोन 6जीबी रॅम 128जीबी इंटरनल स्टोरेज वर सादर केला आहे जी माइक्रोएसडी कार्डने 2टीबी पर्यंत वाढवता येते. एलजी वी50 थिंक 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह 6.4-इंचाच्या क्वॉडएचडी+ ओएलईडी फुलविजन डिस्प्लेला सपोर्ट करतो. एलजी वी50 थिंक ची एक मोठी खासियत अशी कि या फोन मध्ये एक्सट्रनल डिस्प्ले कनेक्ट केला जाऊ शकतो.

एलजी वी50 थिंक 5जी 5 कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर ​तीन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत तसेच सेल्फी साठी फोनच्या फ्रंट पॅनल वर दोन कॅमेरा सेंसर आहेत. रियर कॅमेरा सेटअप मध्ये एफ/1.5 अपर्चर वाला 12-मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे हा 5जी फोन एफ/1.9 अपर्चर वाल्या 16-मेगापिक्सलच्या वाइड एंगल लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाल्या 12-मेगापिक्सलच्या तिसऱ्या सेंसरला सपोर्ट करतो. सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल आणि 5-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा देण्यात आले आहेत.

एलजी वी50 थिंक 5जी गूगल ​असिस्टंटला सपोर्ट करतो. हा फोन आईपी68 रेटिड आहे ज्यामुळे हा पाणी आणि धुळी पासून वाचतो. ब्लूटूथ, वाईफाई व एनएफसी सारख्या कनेक्टिविटी फीचर्स सोबत या फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी क्वालकॉमच्या 3.0 क्विक चार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.

शाओमी मी मिक्स 3
शाओमी ने मी मिक्स 3 5जी कनेक्टिविटी साठी क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट वर सादर केला आहे. क्वालकॉमचा हा चिपसेट 5जी नेटवर्क सपोर्ट सह येतो. त्याचबरोबर या फोन मध्ये एक्स50 मॉडेम पण देण्यात आला आहे जो मी मिक्स 3 च्या या वेरिएंटला 5जी सपोर्ट देतो. विशेष म्हणजे शाओमी मी मिक्स 3 5जी फोन 2जीबीपीएस पर्यंतचा डाउनलोड स्पीड देऊ शकेल.

शाओमी मी मिक्स 3 सेरॉमिक बॉडी वर बनवण्यात आला आहे. हा 19.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या 6.39-इंचाच्या फुलएचडी+ एमोलेड डिस्प्ले वर सादर केला गेला आहे. मी मिक्स 3 च्या बॅक पॅनल वर एफ/1.8 आणि एफ/2.4 अपर्चर वाले 12-मेगापिक्सलचे दोन कॅमेरा सेंसर देण्यात आले आहेत जे एआई क्षमते सह येतात. तसेच सेल्फी साठी या फोन मध्ये एक कॅमेरा सेंसर 24-मेगापिक्सलचा देण्यात आला आहे तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा आहे. पावर बॅकअप साठी शाओमी मी मिक्स 3 3,800एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

शाओमी ने मी मिक्स 3 5जी 6जीबी रॅम तसेच 128जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला आहे. या 5जी फोनची किंमत 599 यूरो आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार जवळपास 48,000 रुपये आहे. ग्लोबल मंचावर हा फोन मे महिन्यात सेल साठी उपलब्ध होईल.

जेडटीई एक्सॉन 10 प्रो
जेडटीई ने पण 5जी आणत एक्सॉन 10 प्रो स्मार्टफोन लॉन्च केला आहे. जेडटीई ने या फोनचे जास्त स्पेसिफिकेशन्स शेयर केले नाहीत पण या फोन मध्ये पण क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 855 चिपसेट देण्यात आला आहे. या चिपसेट सह जेडटीई एक्सॉन 10 प्रो मध्ये स्नॅपड्रॅगॉन एक्स50 5जी मॉडेम पण देण्यात आला आहे. जेडटीई चा हा फोन वॉटरड्रॉप नॉच सह बाजारात येईल. तसेच फोटोग्राफी साठी फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here