पटकन संपतेय तुमच्या अँड्रॉइड फोनची बॅटरी? काही स्टेप्समध्ये चेक करा फोनची बॅटरी हेल्थ

Phone Battery Drain

How To Check Android Smartphone Battery Health: चांगला बॅटरी बॅकअप देणारा स्मार्टफोन असणं खूप आवश्यक असतं. काही काळाने नियमित चार्जिंगमुळे नवीन स्मार्टफोनच्या बॅटरीमध्ये देखील समस्या येऊ लागतात. फोन वेगानं डिस्चार्ज होऊ लागतो. त्यामुळे मोठ्या बॅटरी बॅकअपसाठी फोनच्या बॅटरीची काळजी घेणं आवश्यक आहे. अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ (Battery Health) मॉनीटर करण्याची खास व्यवस्था नाही. परंतु आम्ही तुम्हाला आज काही अशा ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी हेल्थ (Android Smartphone Battery Health) वेळच्या वेळी मॉनीटर करू शकता. यामुळे तुम्ही तुमच्या फोनची बॅटरी लाइफ दीर्घकालीन टिकू शकते.

बॅटरी हेल्थ म्हणजे काय?

अँड्रॉइड फोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करायची हे जाणून घेण्याआधी बॅटरी हेल्थ म्हणजे काय ते जाणून घेऊया. बॅटरी हेल्थ म्हणजे प्रत्येक चार्जिंग सायकलचा बॅटरीवर किती परिणाम झाला आहे. समजा तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी 4500mAh ची आहे. जर तुमची बॅटरी हेल्थ 100 टक्के असेल तर संपूर्ण 4500mAh चार्ज होईल. जर तुम्ही रेग्युलर चार्ज करत असाल तर तुमच्या फोनची बॅटरी हेल्थ कमी होऊन 95 टक्के होईल त्यामुळे तुमचा फोन फुल चार्ज होऊन देखील 4500mAh पर्यंत पोहोचणार नाही. हे देखील वाचा: हे डिवाइस जोडा आणि जुन्या सायकलला चुटकीसरशी बनवा इलेक्ट्रिक! सिंगल चार्जवर 40 किलोमीटरची रेंज; फुल फायर प्रूफ!

बॅटरी हेल्थ कमी झाल्यामुळे कमी बॅटरी लाइफ मिळते. म्हणजे कमी बॅटरी हेल्थ असलेल्या फोनची बॅटरी वेगानं डाउन होऊ लागेल. त्याचबरोबर तुम्हाला फोन गरम होण्यासारख्या समस्यांचा देखील रोज सामना करावा लागेल. पुढे आम्ही तुम्हाला अँड्रॉइड फोनची बॅटरी हेल्थ चेक करण्याच्या पद्धतीची माहिती देत आहोत.

Android युजर्स फोनची बॅटरी हेल्थ कशी चेक करायची?

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी हेल्थ चेक करण्याचा बिल्ट इन मॉनीटर मिळत नाही. त्यामुळे बॅटरी हेल्थ बाबत अँड्रॉइड युजर्सना काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील, त्यामुळे त्यांच्या अँड्रॉइड स्मार्टफोनच्या बॅटरी हेल्थची माहिती मिळेल.

सेटिंग मेन्यूच्या मदतीनं

Android Battery Health Check From Settings Menu

अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये बॅटरी स्टेटस सेटिंग मेन्यूमध्ये जाऊन चेक करू शकता. सेटिंग मेन्यूमध्ये नेव्हिगेशन ऑप्शन तुमच्या अँड्रॉइड बिल्ड आणि व्हर्जननुसार वेगवेगळा असू शकतो. तुमच्या सेटिंग अ‍ॅपमध्ये बॅटरी ऑप्शनमध्ये जा. बॅटरी सेक्शनमध्ये तुम्हाला तीन डॉट आयकॉनवर क्लिक करावे लागेल, इथे तुम्हाला बॅटरी युसेज (Battery Usage) वर क्लिक करावा लागेल. इथे तुम्ही त्या अ‍ॅप्सची लिस्ट बघू शकता जे चार्जमधून सर्वात जास्त पावर कंज्यूम करत आहेत. तुम्ही हे अ‍ॅप्स इथून फोर्स क्लोज करू शकता. वेगवेगळ्या कंपन्यांच्या फोनमध्ये हा ऑप्शन वेगवेगळा असेल. हे देखील वाचा: 20 हजारांच्या आत मिळणारे हे आहेत बेस्ट 5G फोन; दिवाळीत येणारं 5G Network वापरण्यासाठी व्हा सज्ज

डायल कोडच्या मदतीनं

Android Battery Health Check From Dial Code

खूप कमी लोकांना अँड्रॉइड फोनमधील कोड डायल करून डाग्नोस्टिक मेन्यू अ‍ॅक्सेस करता येतो. पुढे आम्ही तुम्हाला अँड्रॉइड स्मार्टफोनची बॅटरी इंफॉरमेशन चेक करण्याचा कोड सांगत आहोत. Phone अ‍ॅपच्या मदतीनं *#*#4636#*#* डायल करा. एक टेस्टिंग मेन्यू पॉप अप होईल. इथे तुम्हाला बॅटरी इंफॉरमेशन डिटेल्स जसे की चार्ज लेव्हल, बॅटरी टेम्परेचर आणि हेल्थबाबत माहिती मिळेल. जर तुम्हाला डायल कोडमधून बॅटरी इंफॉरमेशन दिसत नसेल तर तुमच्या कंपनीसाठी कोड वेगळा असू शकतो.

थर्ड पार्टी अ‍ॅप्स

AccuBattery App For Battery Health

वर सांगितलेल्या पद्धतींचा वापर करून फोनच्या बॅटरी हेल्थची माहिती मिळाली नसेल तर डीप अ‍ॅनालिसीससाठी AccuBattery सारख्या थर्ड पार्टी अ‍ॅप्सची मदत घेऊ शकता. या अ‍ॅपमधून तुम्हाला बॅटरी युसेज इन्फॉर्मेशन, बॅटरी कपॅसिटी, टेम्परेचर आणि अन्य माहिती मिळते. थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या मदतीनं बॅटरी हेल्थ चेक करण्यासाठी या स्टेप्स फॉलो करा.

गुगल प्ले स्टोरमधून AccuBattery अ‍ॅप डाउनलोड आणि इंस्टॉल करा. अ‍ॅप इंस्टॉल झाल्यानंतर तुम्ही अ‍ॅप उघडताच तुम्हाला चार्जिंग, डिस्चार्जिंग, हेल्थ आणि हिस्ट्री चार टॅब दिसतील. हेल्थ टॅबवर क्लिक करा. इथे तुम्हाला फोनची बॅटरी हेल्थ पर्सेंटेज मिळेल. तसेच अन्य माहिती जसे की बॅटरी कपॅसिटी, बॅटरी वीयर सारखी माहिती देखील तुम्हाला दिसेल. महत्वाची बाब म्हणजे या अ‍ॅपमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण डेटा दिसत नाही. अँड्रॉइड थर्ड पार्टी अ‍ॅप्ससह बॅटरीची संपूर्ण माहिती शेयर करत नाही. हा डेटा बॅटरी चार्ज आणि डिस्चार्जनुसार गोळा केला जातो. हे देखील वाचा: या विकेंड काय बघायचं ठरवताय? OTT वर आल्या आहेत Delhi Crime 2, Criminal Justice 3, Maharani 2 सारख्या जबरदस्त वेब सीरीज

सॅमसंगच्या फोन युजरसाठी

Samsung Members App

जर तुमच्याकडे सॅमसंगचा फोन असेल तर तुम्हाला ही माहिती सहज मिळेल. सॅमसंगच्या फोनमध्ये Samsung Members अ‍ॅप प्री-इंस्टॉल मिळतो. याच्या मदतीनं सहज फोनची बॅटरी चेक करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here