आयफोन एक्स चा स्वस्त वेरिएंट आला समोर, 6.1-इंचाच्या एलसीडी डिस्प्ले वाल्या आयफोनचा फोटो झाला लीक

अॅप्पल बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की कंपनी यावर्षी तिन नवीन स्मार्टफोन लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस कपंनी च्या सुपरहिट आयफोन 10 प्रमाणे नॉच डिस्प्ले सह सादर होतील. बातमी होती की आयफोन 10 च्या यशा नंतर कंपनी याच लुक मध्ये एक स्वस्त आयफोन पण घेऊन येईल जो एलसीडी डिस्प्ले वर बनलेला असेल. तसेच आता एका लीक च्या माध्यामातून या कथित स्वस्त आयफोन 10 ची रेंडर ईमेज पण समोर आली आहे.

बीजीआर वेबसाइट ने आपल्या रिपोर्ट मध्ये या नवीन आयफोन ची रेंडर ईमेज शेयर केली आहे. अॅप्पल बद्दल चर्चा आहे की या वर्षी सप्टेंबर महिन्यात कंपनी तिन नवीन डिवाईस लॉन्च करेल आणि हे तिन्ही डिवाईस नॉच डिस्प्ले वाले असतील. दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले वर बनलेले असतील तर एक एलसीडी डिस्प्ले सह सादर केला जाईल.

समोर आलेल्या रेंडर ईमेज मध्ये आयफोन मध्ये नॉच दाखविण्यात आली आहे. फोन च्या फ्रंट पॅनल वर कोणतेही फिजिकल किंवा 3डी टच देण्यात आला नाही. वर देण्यात आलेल्या नॉच मध्ये सेल्फी कॅमेरा सह अन्य सेंसर पण दिसत आहेत. फोन च्या उजव्या पॅनल वर वॉल्यूम रॉकर आणि म्यूट बटन देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे फोन च्या बॅक पॅनल वर सिंगल रियर कॅमेरा आहे ज्या खाली एलईडी लाईट पण देण्यात आली आहे, पॅनल मध्ये अॅप्पल लोगो देण्यात आला आहे. फोन च्या खाली यूएसबी पोर्ट आहे.

अॅप्पल च्या या स्वस्त आयफोन मध्ये 6.1-इंचाचा एलसीडी डिस्प्ले मिळू शकतो तसेच फोन 3जीबी रॅम सह लॉन्च केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे अॅप्पल चे अन्य दोन आयफोन ओएलईडी डिस्प्ले सह सादर केले जाऊ शकतात ज्यात 6.5-इंचाची 5.8-इंचाची स्क्रीन मिळू शकते.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी अॅप्पल विशेषज्ञ मिंग ची कुओ ने सांगितले होते की अॅप्पल चा आगामी 6.1-इंचाचा एलसीडी स्क्रीन वाला आयफोन अॅप्पल साठी खास असेल. कुओ चे म्हणणे आहे की अॅप्पल च्या या फोन चे जवळपास 100 मीलियन यूनिट यावर्षीच्या शेवटपर्यंत विकले जाऊ शकतात. कुओ नुसार हा आयफोन 700 ते 800 यूएस डॉलर दरम्यान लॉन्च केला जाईल. ही किंमत भारतीय करंसी नुसार 45,000 रुपये ते 52,000 रुपयांच्या मध्ये असेल.

मीडिया रिपोर्ट नुसार अॅप्पल चा हा आयफोन बाजारात आयफोन 8 ची जागा घेण्याच्या क्षमते सह सादर केला जाईल. तसेच 5.8-इंचाचा ओएलईडी आयफोन आयफोन 10 सेकेंड जेनरेशन च्या रुपात सादर केला जाऊ शकतो तर 6.5-इंचाचा ओएलईडी आयफोन अॅप्पल आयफोन 10 प्लस च्या रुपात समोर येऊ शकतो. बोलले जात आहे की अॅप्पल चे हे तिन्ही आयफोन्स मध्ये 19.5:9 चा आस्पेक्ट रेश्यो असेल आणि या फोन मध्ये फेस आईडी फीचर असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here