Apple iPhone SE2 ची किंमत असेल 28,000 रुपयांच्या आसपास, 64GB आणि 128GB सह होईल लॉन्च

Apple ने नवीन आईफोन iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max लॉन्च केल्यानंतर काही दिवसांनी बातमी समोर आली होती कि यह दिग्गज टेक कंपनी आपल्या फ्लॅगशिप डिवाईस लॉन्च केल्यानंतर Apple च्या अजून एका नवीन आईफोन वर काम करत आहे आणि जो iPhone SE2 नावासह बाजारात येईल. माहिती अशी मिळाली होती कि iPhone SE2 कंपनी स्वस्तात लॉन्च करेल ज्यामुळे मीड रेंज मध्ये Apple फोन घेऊ इच्छिणारे लोक पण iPhone वापरू शकतील. तसेच आता एका नवीन रिपोर्ट मध्ये Apple iPhone SE2 च्या किंमतीचा पण खुलासा झाला आहे.

Apple iPhone SE2 च्या किंमतीचा खुलासा प्रसिद्ध टिपस्टर आणि ऍप्पल विशेषज्ञ Ming-Chi Kuo यांनी केला आहे. कुओ यांनी सांगितले आहे कि iPhone SE2 कंपनी द्वारा $399 यूएस डॉलर मध्ये लॉन्च केला जाईल. हि किंमत भारतीय करंसीनुसार 28,000 रुपयांच्या आसपास आहे. म्हणजे हि बातमी खरी ठरली तर 30 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत लोक iPhone SE2 वापरू शकतील. विशेष म्हणजे कुओ यांनी iPhone SE2 च्या निर्मितीची बातमी पण सर्वात आधी दिली होती. ते म्हणतात कि iPhone SE2 साल 2020 च्या पहिल्या तिमाहीत टेक बाजारात येईल जो तीन वर्षांपूर्वी लॉन्च झालेल्या iPhone SE चा नवीन व एडवांस वर्जन असेल.

iPhone SE2

Apple च्या या आगामी आईफोनच्या नावाचा खुलासा कारण्यासोबतच टिपस्टरने iPhone SE2 च्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण दिली आहे. कुओ नुसार iPhone SE2 Apple A13 प्रोसेसर वर लॉन्च केला जाईल. हि चिपसेट Apple च्या लेटेस्ट आईफोन सीरीजच्या तिन्ही डिवाईस iPhone 11, iPhone 11 Pro आणि iPhone 11 Pro Max मध्ये पण दिसली होती.

iPhone 11 सीरीज 4 जीबी रॅम सह आली होती पण समोर आलेल्या माहितीनुसार iPhone SE2 ला Apple 3 जीबी रॅम वर लॉन्च करेल जी LPDDR4X RAM मेमरी असेल. रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि Apple iPhone SE2 कंपनीने दोन स्टोरेज वेरिएंट्स मध्ये लॉन्च केला जाईल ज्यात 64 जीबी स्टोरेज आणि 128 जीबी स्टोरेज असेल.

आगामी आईफोनच्या डिजाईन बद्दल कुओ म्हणतो कि iPhone SE2 कंपनी द्वारा iPhone 8 सारख्या लुक आणि डिजाईन वर लॉन्च केला जाऊ शकतो. iPhone SE2 मध्ये 4.7 इंचचाचा डिस्प्ले मिळू शकतो जो नॅरो बेजल्स सह येईल. तसेच नवीन माहिती नुसार Apple iPhone SE2 मध्ये 3D Touch दिला जाईल तसेच हा आईफोन ग्रे, सिल्वर आणि रेड कलर मध्ये लॉन्च होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here