8जीबी रॅम सह भारतात लॉन्च झाला असूसचा सर्वात पावरफुल फोन, याचे स्पेसिफिकेशन्स ऐकून व्हाल हैराण

टेक कंपनी असूस ने यावर्षी गेमिंग स्मार्टफोन सीरीजची सुरवात करत टेक मंचावर रिपब्लिक आॅफ गेमर्स सादर केला होता. असूस ने हा दमदार व पावरफुल स्मार्टफोन ROG म्हणजे ‘आरओजी’ फोन (रिपब्लिक आॅफ गेमर्स) नावाने सादर केला होता. हा फोन खासकरून मोबाईल गेमिंग साठी बनवण्यात आला आहे जो अश्या यूजर्स साठी एखादी अनोखी भेट ठरू शकतो जे स्मार्टफोन मध्ये गेम खेळतात. असूसचा हा दमदार फोन आज भारतात आला आहे. असूस इंडिया ने असूस आरओजी भारतात लॉन्च केला आहे जो 69,999 रुपयांमध्ये आज पासून सेल साठी उपलब्ध आहे.

असूस आरओजी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 2160 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6-इंचाच्या फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. गेम खेळताना प्रत्येक गोष्ट स्पष्ट दिसते तसेच गेम मधील प्रत्येक ग्राफिक व आब्जेक्ट क्लियर तसेच ​ब्राइट राहावा, यासाठी असूस फोनचा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेशरेट वर विजुअल देतो. या डिस्प्ले मध्ये 10 प्वाइंट मल्टीटच सपोर्ट आहे तसेच डिस्प्ले प्रत्येक पिक्चर 10,000 कॉन्ट्रास्ट रेशियो वर दाखवतो.

हा फोन एंडरॉयड ओरियो आधारित आहे जो 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड वाल्या आॅक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉम स्नॅपड्रॅगॉन 845 चिपसेट वर चालतो. तसेच गेम खेळताना बेस्ट ग्राफिक्स देण्यासाठी कंपनी ने यात एड्रेनो 630 जीपीयू दिला आहे. कंपनी ने हा फोन 8जीबी रॅम मेमरी सह सादर केला आहे ज्यासोबत हा फोन 128जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो.

हाईग्राफिक्स गेम तसेच हेवी प्रोसेसिंग साठी कंपनी ने फोन मध्ये गेमकूल वेपर चेंबरचा वापर करण्यात आला आहे. या टेक्नॉलिजीमुळे हेवी गेम प्ले केल्यामुळे तसेच दीर्घकाळ गेम खेळल्यामुळे पण फोन गरम होत नाही. तसेच लॅगफ्री गेमिंग एक्सपीरियंस देतो. असूस ने या फोन मध्ये खास इमेज प्रोसेसिंग चिप वापरली आहे जी डिस्प्ले मध्ये एचडीआर सपोर्ट करते. या फोन मध्ये साइड माउंटेड पोर्ट, प्रोग्रामेबल अल्ट्रासोनिक एयर​ट्रिगर सेंसर आणि फोर्स ​फीडबॅक सिस्टम देण्यात आली आहे. फोन मध्ये डॉक सपोर्ट पण आहे आणि ज्याच्या माध्यमातून ट्विन व्यू डॉक, मोबाईल डेस्कटॉप डॉक आणि गेम वॉयस कंट्रोल वाईगीग डॉकचा वापर पण करता येईल.

असूस आरओजी मध्ये फोटोग्राफी साठी डुअल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर 12-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 8-मेगापिक्सलचा सेकेंडरी रियर कॅमेरा आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन मध्ये 7.1 सराउंड साउंड टेक्नॉलिजी सह डीटीएस हेडफोन जॅक पण देण्यात आला आहे. तसेच हा फोन क्वालकॉम च्या ऐप्टएक्स हाई डेफिनेशन ब्लूटूथ वायरलेस आॅडियो ला पण सपोर्ट करतो. 4जी वोएलटीई सह फोन मध्ये पावर बॅकअप साठी 4,000 एमएएच ची बॅटरी आहे.

असूस आरओजी को 69,999 रुपयांमध्ये शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेत येईल. फ्लिपकार्ट वर असूस आरओजी 12 महिन्याच्या नो कॉस्ट ईएमआई वर विकत घेता येईल हि ऑफर प्रत्येक बँकेच्या डेबिट आणि क्रेडिट कार्ड वर लागू असेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here