तुमच्या शहरात आलं Jio 5G, असं करा अ‍ॅक्टिव्हेट

5G ची प्रतीक्षा संपली आहे आणि देशातील दोन मोठ्या टेलीकॉम कंपन्या Airtel आणि Reliance Jio नं देशातील सर्व राजयांतील आपल्या युजर्ससाठी हळहळू 5G रोलआउट करण्यास सुरुवात केली आहे. आता Akash Mukesh Ambani च्या कंपनी जियोनं अलीकडेच पुण्यात 5G सर्व्हिस लाइव्ह केली. म्हणजे आता दुसरी शहरातील जियो युजर्स प्रमाणेच पुण्यातील युजर्सना वेलकम ऑफर (Jio Beta Trial Welcome Offer) चा लाभ घेता येईल. ज्या अंतर्गत ग्राहक मोफत 1Gbps स्पीडसह 5GB अनलिमिटेड डेटा मिळेल. चला जाणून घेऊया याबाबत…

जियो 5G वेलकम ऑफर म्हणजे काय?

Jio 5G Welcome ऑफर पाहता कंपनी 5G वापरणाऱ्या ग्राहकांना कंपनी फ्री 5GB डेटा ऑफर करत आहे. ग्राहकांना मिळणारा 5GB डेटा 1जीबीपीएस पर्यंतच्या स्पीडनं मिळेल, ज्यासाठी त्यांना अतिरिक्त शुल्क द्यावं लागणार नाही. परंतु जर तुम्हाला jio 5जीसाठी इनवाइट मिळालं नसेल तर Jio 5G चा वापर आणि अनुभव घेण्यासाठी ‘वेलकम ऑफर’ टेस्टिंग स्वतःची नोंदणी करू शकता. चला जाणून घेऊया याची प्रोसेस. हे देखील वाचा: OTT Release This Week: ऑस्करला जाणारा भारतीय चित्रपट आला ओटीटीवर; या आठवड्यात पाहा हे चित्रपट आणि वेबसीरीज

असं मिळवा Jio 5G

 • जियोच्या वेबसाइट आणि ‘MyJio’ अ‍ॅप वर जाकर Jio 5G Welcome Offer साठी सइनअप करता येईल.
 • अ‍ॅपमध्ये तुम्हाला वरच्या बाजूला ‘जियो वेलकम ऑफर’ चा बॅनर दिसेल.
 • त्यानंतर, ‘आय अ‍ॅम इंट्रेस्टेड’ बटनवर क्लिक करा
 • नेक्सट स्क्रीनवर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ‘Done’ वर टॅप करा
 • बॅकएन्डमध्ये, Jio तुमच्या ठिकाणी 5G उपलब्धतेची माहिती मिळवले आणि तुमच्या स्मार्टफोनची 5G कंपेटिबल टेस्ट करेल.
 • हे पूर्ण झाल्यावर, तुम्हाला सूचित केलं जाईल की तुम्हाला 5G टेस्टिंगसाठी निवडण्यात आलं आहे.

हे देखील वाचा: VIDEO: MS Dhoni नं खरेदी केली ‘ही’ इलेक्ट्रिक कार; फीचर्स ऐकून तुम्ही देखील व्हाल फॅन

कंपनीच्या साइटवरून मिळवा जियो 5G >

 • तसेच कंपनीच्या साइटवरील जियो वेलकम ऑफर बॅनरवर जाऊन क्लिक करा.
 • त्यानंतर ‘आय अ‍ॅम इंट्रेस्टेड’ वर टॅप करा.
 • टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचा जियो नंबर टाकावा लागेल आणि ओटीपी आल्यावर तो सबमिट करावा लागेल.
 • ओटीपी दिल्यानंतर Done च्या ऑप्शनवर क्लिक करा.
 • त्यानंतर तुम्हाला 5G टेस्टिंगसाठी निवडण्यात आल्याचं मेसेजच्या माध्यमातून सूचित केलं जाईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here