Aadhaar Card हरवलं आहे? जाणून घ्या नवीन आधार मिळवण्याची ऑनलाइन-ऑफलाइन पद्धत

भारतीय नागरिकांसाठी Aadhaar card खूप महत्वाचं डॉक्यूमेंट आहे. हे आयडेंटिटी प्रूफ म्हणून वापरता येतं. सध्या शाळा असो किंवा बँक अकाऊंट प्रत्येक कामासाठी आवश्यक आहे. त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड कधी हरवलं तर अडचणी वाढू शकतात. अनेक प्रकार आहेत, ज्यांच्या मदतीनं आधार कार्ड पुन्हा मिळवता येतं. चला जाणून घेऊया ह्या पद्धती…

युआयडीएआयच्या वेबसाइटवरून कसं मिळवायचं आधार कार्ड

UIDAI पोर्टलच्या मदतीनं आधार कार्ड पुन्हा मिळवता येतं. तुम्ही इथून आधारची कॉपी डाउनलोड देखील करू शकता. ह्यासाठी नाव, आधार क्रमांक आणि जन्म तारीख आवश्यक आहे.

स्टेप 1: सर्वप्रथम युआयडीएआयच्या स्वयंसेवा पोर्टल https://ssup.uidai.gov.in/web/guest/ssup-home वर जा. इथे तुम्हाला Retrieve EID / Aadhaar number चा पर्याय मिळेल. त्यावर क्लिक करावं लागेल.

स्टेप 2: इथे तुम्हाला आधार क्रमांक आणि एनरॉलमेंट नंबरचा पर्याय मिळेल. यातील एकाची निवड कर.

स्टेप 3: त्यानंतर तुमचं पूर्ण नाव, रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडी नोंदवा.

स्टेप 4: त्यानंतर कॅप्चा टाकून सेंड ओटीपी असलेल्या बटनवर टॅप करा.

स्टेप 5: तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर ओटीपी मिळेल, तो सबमिट करा

स्टेप 6: एकदा ओटीपी सबमिट केल्यावर तुम्हाला तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर आधार नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर मिळेल.

स्टेप 7: पुन्हा युआयडीएआय सेल्फ सर्व्हिस पोर्टलवर जा आणि डाउनलोड आधारचा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.

स्टेप 8: त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर, नाव, पिन कोड आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.

स्टेप 9: पुन्हा गेट वन टाइम पासवर्ड बटनवर क्लिक करा आणि तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल नंबर किंवा ईमेल आयडीवर आलेला ओटीपी टाका.

स्टेप 10: ओटीपी सबमिट झाल्यावर तुम्ही तुमच्या आधार कार्डची एक कॉपी डाउनलोड करू शकता.

युआयडीएआय हेल्पलाइनवरून कसं मिळवायचं आधार कार्ड

आधार कार्ड हरवल्यानंतर पुन्हा मिळवण्यासाठी युआयडीएआय हेल्पलाइन नंबर 1800-180-1947 (टोल-फ्री) किंवा 011-1947 (लोकल) वर देखील कॉल करता येतो. हेल्पलाइन आठवड्याचे सातही दिवस सकाळी 7:00 ते रात्री 10:00 वाजेपर्यंत उपलब्ध आहे.

स्टेप 1: युआयडीएआय हेल्पलाइन नंबर 1800-180-1947 किंवा 011-1947 डायल करा.

स्टेप 2: आयवीआर सूचनांचे पालन करा आणि तुमचं आधार कार्ड पुन्हा मिळवण्यासाठी उपयुक्त ऑप्शनची निवड करा.

स्टेप 3: तुमचं नाव, जन्म तारीख अशी आवश्यक माहिती द्या.

स्टेप 4: एकदा दिलेली माहिती पटली की रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर तुम्हाला तुमचा आधार नंबर किंवा एनरॉलमेंट नंबर मिळेल.

स्टेप 5: तुमच्या आधार कार्डची कॉपी डाउनलोड करण्यासाठी युआयडीएआय स्वयंसेवा पोर्टल किंवा आधार एनरॉलमेंट सेंटरवर जा.

आधार एनरॉलमेंट सेंटरवरून कसं मिळवायचं आधार कार्ड

जर तुम्हाला वरील पद्धतीनं आधार कार्ड मिळालं नाही तर तुम्ही डुप्लीकेट आधार कार्डसाठी आधार एनरॉलमेंट सेंटरवर जाऊ शकता.

स्टेप 1: सर्वप्रथम जवळच्या आधार केंद्र म्हणजे एनरॉलमेंट सेंटर वर जा.

स्टेप 2: आधार करेक्शन फॉर्म भरा आणि तुमचं मूळ आधार कार्ड (जर तुमच्याकडे असेल), बायोमॅट्रिक्स (फिंगरप्रिंट आणि आयरिस स्कॅन) आणि तुमच्या आयडी प्रूफची एक प्रत जमा करा.

स्टेप 3: शुल्क भरा आणि फॉर्म जमा करा.

स्टेप 4: तुम्हाला तुमच्या एनरॉलमेंट नंबरसह एक पावती मिळेल.

अशाप्रकारे तुम्ही आधार कार्ड हरवल्यावर नवीन आधार कार्ड पुन्हा मिळवू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here