5.67-इंचाचा नॉच डिस्प्ले आणि 13-एमपी कॅमेरा सह आईवूमी झेड1 लॉन्च

टेक कंपनी आईवूमी ने भारतीय बाजारात आपली स्मार्टफोन सीरीज वाढवत एक नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. आईवूमी ने झेड1 लॉन्च करण्यात आला आहे ज्याने नॉच डिस्प्ले सह बाजारात एंट्री घेतली आहे. आईवूमी झेड1 6,999 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे जो 11 ऑक्टोबर पासून आॅनलाईन शॉपिंग साइट फ्लिपकार्ट वरून एक्सक्लूसिव विकत घेता येईल.

आईवूमी झेड1 ची सर्वात मोठी खासियत फोनचा मोठी डिस्प्ले साईज आहे. हा फोन बेजल ले​स डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे ज्याच्या वरच्या बाजूला नॉच आहे. फोन चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा 19:9 आस्पेक्ट रेशियो सह 5.67-इंचाच्या डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे जो 1,498 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन सपोर्ट करतो. हा फोन स्मार्टमी ओएस 3.0 आधारित एंडरॉयड ओरियो वर सादर करण्यात आला आहे जो 1.3गीगार्हट्ज क्वॉड-कोर प्रोसेसर सह मीडियाटेक एमटीके6739डब्ल्यू चिपसेट वर चालतो.

कंपनी ने झेड1 2जीबी रॅम सह सादर केला आहे. हा फोन 16जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो जी माइक्रोएसडी कार्ड ने 128जीबी पर्यंत वाढवता येते. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सोबत 13-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा देण्यात आला आहे तसेच फोनच्या फ्रंट पॅनल वर 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. फोनच्या कॅमेरा मध्ये एआई सपोर्ट आहे.

आईवूमी झेड1 बेसिक ​कनेक्टिविटी फीचर्स सह 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच या फोन मध्ये फेस अनलॉक टेक्नॉलजी पण आहे. तसेच पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 2,800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. आईवूमी झेड1 कंपनी ने क्लासिक ब्लॅक, प्लॅटिनम गोल्ड आणि ओशियन ब्लू कलर मध्ये लॉन्च केला आहे.

6,999 रुपयांमध्ये लॉन्च झालेला आईवूमी झेड1 11 ऑक्टोबर पासून 14 ऑक्टोबर दरम्यान फ्लिपकार्ट वर आयोजित होणार्‍या बिग बिलियन डे मध्ये हा 500 रुपयांनी कमी म्हणजे 6,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच आईवूमी झेड1 सोबत जियो आॅफर पण मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here