Aadhaar कार्ड मध्ये मोबाईल नंबर बदलणे झाले सोप्पे, ई-मेल अपडेट करण्याची पद्धत पण बदलली

प्रत्येक भारतीयाची ओळख त्याचे आधार कार्ड आहे. शाळा असो वा हॉस्पिटल, बॅंक अकांउट असो वा एखादे सरकारी काम, प्रत्येक ठिकाणी ओळखपत्र म्हणून Aadhaar Card मागितला जातो. सरकारने आधार कार्ड मध्ये धारकाची सर्व माहिती समाविष्ट केली आहे. आधार कार्ड मध्ये यूजरचा मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी देणे पण सरकारने आवश्यक असल्याचे सांगितले आहे कारण भविष्यात Aadhaar मध्ये बदल करण्यासाठी यांच्यावरच OTP म्हणजे वन टाइम पासवर्ड येतो. देशातील अनेक ठिकाणी असे लोक आहेत ज्यांच्या आधार कार्ड मध्ये योग्य मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी नाही. त्यामुळे यूजर्सच्या अडचणी कमी करत आधारचा कार्यभार सांभाळणाऱ्या UIDAI ने आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट करण्याच्या प्रक्रियेत बदल केला आहे जो आधीपेक्षा जास्त सरळ व सोप्पा आहे.

Aadhaar बनवणारी संस्था Unique Identification Authority of India म्हणजे यूआईडीएआई ने आपल्या सोशल मीडिया हँडेलच्या माध्यमातून देशातील नागरिकांना या मोठ्या बदलाची माहिती दिली आहे. UIDAI ने अधिकृतपणे अशी घोषणा केली आहे कि आतापासून आधार कार्ड मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट करण्याची पद्धत बदलण्यात आली आहे. या नवीन बदलामुळे फक्त ज्यांच्या कार्ड मध्ये चुकीचा नंबर किंवा मेल ऍड्रेस देण्यात आला आहे आशा लोकांना फायदा होईल असे नाही तर त्या लोकांवर पण याचा परिणाम होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे आणि तो त्यांना आपल्या आधार कार्ड मध्ये जोडायचा आहे.

असा आहे नवीन बदल

आधार कार्ड मध्ये जर एखाद्या यूजरला आपला जुना मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी बदलायचा असेल किंवा नवीन नंबर द्यायचा सेल तर त्यासाठी आधार केंद्रावर कोणतेही डाक्यूमेंट घेऊन जाण्याची गरज नाही. UIDAI ने स्पष्ट केले आहे कि आता आधार केंद्रावर फक्त तुमचा Aadhaar Card घेऊन जावा लागेल तसेच आता वोटर कार्ड, जन्माचा दाखला किंवा पॅन कार्ड इत्यादी दाखवण्याची गरज नाही.

आधार सेवा केंद्रातील कर्मचारी यूजरचा आधार कार्ड बघून ऑनलाईन त्यात बदल करतील. आधार केंद्रावर रिक्वेस्ट टाकल्यावर जुना मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी मध्ये बदल करून नवीन मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी आधार कार्ड मध्ये अपडेट केला जाईल. यूआईडीएआई ने या प्रक्रियासाठी फक्त 50 रुपयांचे शुल्क ठेवले आहे. म्हणजे मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी च्या रिक्वेस्ट सह तुम्हाला 50 रुपये द्यावे लागतील.

Aadhaar Card मध्ये मोबाईल नंबर आणि ई-मेल आईडी अपडेट असणे खूप आवश्यक आहे. कारण भविष्यात कधीही जर आधार कार्ड मध्ये बदल करायचा असेल तेव्हा किंवा एखादी वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर रजिस्टर्ड मोबाईल नंबर किंवा ईमेल आईडी वर ओटीपी पाठवला जातो. आणि जर आधार कार्ड मध्ये योग्य मोबाईल नंबर व मेल आईडी नसेल तर वेरिफिकेशन प्रक्रिया पूर्ण होणार नाही. तसेच UIDAI ने स्पष्टपणे सांगितले आहे कि जर कोणत्याही आधार सेवा केंद्रात 50 रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेतले गेले तर त्याची तक्रार करावी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here