5,000mAh बॅटरी आणि 48MP कॅमेऱ्यासह लॉन्च झाला स्वस्त Infinix HOT 10T स्मार्टफोन

Infinix Hot 10T

Infinix ने गेल्याच महिन्यात टेक मार्केटमध्ये ‘हॉट 10’ सीरीज अंतगर्त दोन नवीन स्मार्टफोन Infinix Hot 10S आणि Infinix HOT 10S NFC एडिशन सादर केले होते. यातील हॉट 10एस लवकरच भारतीय बाजारात पण येईल. पण हा फोन भारतात येण्यापूर्वी आज कंपनीने सीरीजअंतगर्त अजून एक नवीन तसेच तिसरा मॉडेल पण जोडला आहे. हा फोन कंपनीने Infinix HOT 10T नावाने लॉन्च केला आहे जो लो बजेटमधेच आला आहे. (Infinix Hot 10t launch specs price sale offer)

Infinix HOT 10T

इनफिनिक्स हॉट 10टी केन्यामध्ये लॉन्च झाला आहे. याचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा मोबाईल फोन 20:5:9 आस्पेक्ट रेशियोवर लॉन्च केला गेला आहे जो 720 x 1640 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.82 इंचाच्या एचडी+ आयपीएस एलसीडी ड्यूड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटवर काम करते.

Infinix Hot 10T

Infinix HOT 10T अँड्रॉइड 11 वर सादर केला गेला आहे जो एक्सओएस 7.6 सह चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये आक्टाकोर प्रोसेसरसह मीडियाटेकचा हीलियो जी70 चिपसेट देण्यात आला आहे. केन्याच्या बाजारात हा फोन 4 जीबी रॅमवर लॉन्च झाला आहे जो 64 जीबी आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो.

हे देखील वाचा : Samsung चे आगामी Galaxy S21 FE, Galaxy Z Fold 3 आणि Galaxy Z Flip 3 बदलून टाकतील स्मार्टफोन मार्केट, जाणून घ्या कधी होतील लॉन्च

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता इनफिनिक्स हॉट 10टी ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेंसर तर तिसरी एआय लेंस आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा नवीन इनफिनिक्स फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

Infinix Hot 10T

Infinix HOT 10T एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनलवर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअपसाठी हा फोन 10वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो. इनफिनिक्स हॉट 10टी बाजारात 7-degree Purple, 95-degree Black, Morandi Green आणि Heart of Ocean नावाच्या कलर वेरिएंटमध्ये आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here