Motorola पण घेऊन येत आहे स्वस्त 5G फोन, 6 जीबी रॅमसह झाला वेबसाइटवर लिस्ट

Credit: David Imel / Android Authority

Motorola बद्दल काही दिवसांपूर्वी बातमी आली होती कि कंपनी अफॉर्डेबल 5G स्मार्टफोनवर काम करत आहे, ज्याचे कोडनेम Motorola Ibiza सांगण्यात आले होते. लीक मध्ये या फोनच्या अनेक महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती पण देण्यात आली होती. तसेच आता लीकच्या पुढे जात मोटोरोलाचा हा नवीन स्मार्टफोन चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंचवर पण लिस्ट झाला आहे, जिथे फोनच्या रॅम व प्रोसेसिंग सोबतच इतर डिटेल्सचा पण खुलासा झाला आहे.

Motorola Ibiza ची हि बेंचमार्किंग लिस्टिंग उद्या म्हणजे 4 फेब्रुवारीची आहे जिथे फोन Motorola XT2137-2 मॉडेल नंबरसह लिस्ट केला गेला आहे. गीकबेंचवर हा मोटोरोला फोन अँड्रॉइडच्या लेटेस्ट ओएस अँड्रॉइड 11 सह दाखवण्यात आला आहे. त्याचबरोबर 1.80गीगाहर्ट्ज बेस फ्रिक्वेंसी असलेला आक्टाकोर प्रोसेसर असल्याचे सांगण्यात आले आहे. गीकबेंचवर मदरबोर्ड सेग्मेंट मध्ये ‘Ibiza’ टायटल लिहिण्यात आले आहे त्याच्याबाबत बोलले जात आहे कि हे क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेटचे नाव आहे.

विशेष म्हणजे स्नॅपड्रॅगॉन 480 चिपसेट 5G ला सपोर्ट करतो, हा क्वॉलकॉमचा सर्वात स्वस्त 5जी चिपसेट आहे. आतापर्यंत Vivo Y31s आणि Oppo A93 असे दोन स्मार्टफोन आहेत जे या चिपसेटसह बाजारात आले आहेत. तसेच गीकबेंचवर Motorola Ibiza स्मार्टफोन मध्ये 6 जीबी रॅम असल्याचे सांगण्यात आले आहे. बेंचमार्किंग स्कोर पाहता या फोनला सिंगल-कोर मध्ये 2466 आणि मल्टी-कोर मध्ये 6223 स्कोर देण्यात आला आहे.

असे असू शकतात स्पेसिफिकेशन्स

Motorola Ibiza संबंधित आधीच्या रिपोर्ट्सनुसार हा स्मार्टफोन 720 × 1600 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला जाईल जो वॉटरड्रॉप नॉच डिजाईनवर बनला असेल आणि 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. जुन्या रिपोर्ट मध्ये या फोनचा 4 जीबी रॅम वेरिएंट समोर आला होता जो ज्यात 128 जीबी इंटरनल स्टोरेज असल्याचे सांगण्यात आले होते. आता गीकबेंचवर फोनचा 6 जीबी रॅम वेरिएंट पण समोर आला आहे.

फोटोग्राफीसाठी या फोन मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा असल्याचे लीक मध्ये सांगण्यात आले आहे. लीकनुसार हा स्मार्टफोन 48 मेगापिक्सलच्या प्राइमरी कॅमेरा सेंसरला सपोर्ट करेल त्याचबरोबर 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर मिळू शकतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 13 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेंसर Motorola Ibiza मध्ये मिळू शकतो. मोटोरोला कधी हा फोन मार्केट मध्ये घेऊन येईल हे अजून स्पष्ट झाले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here