4,000 रुपयांनी स्वस्त झाला Nokia 8.1, Nokia 8110 4G फोन पण मिळेल फक्त 2,999 रुपयांमध्ये

Nokia ने गेल्या वर्षी आपला नॉच डिस्प्ले असलेल्या डिवाईसच्या रूपात Nokia 8.1 स्मार्टफोन भारतात लॉन्च केला गेला होता. हा स्मार्टफोन 4जीबी रॅम + 64जीबी मेमरी आणि 6जीबी रॅम + 128 जीबी मेमरी वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध आहे. कंपनीने Nokia 8.1 चा 4जीबी रॅम वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता तर फोनचा 6जीबी रॅम वेरिएंट 22,999 रुपयांमध्ये बाजारात आला होता. Nokia ने या दोन्ही फोन्सच्या किंमती आधीपण कमी केल्या आहेत तसेच आता पुन्हा एकदा कंपनीने Nokia 8.1 ची किंमत कमी केली आहे.

Nokia ने Nokia 8.1 के 4जीबी रॅम + 64जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत कमी केली आहे. आधी झालेल्या प्राइस कट नंतर हा फोन 19,999 रुपयांमध्ये सेल साठी उपलब्ध झाला होता आता कंपनीने पुन्हा फोनची किंमत 4,000 रुपयांनी कमी केली आहे. या नवीन प्राइस कट नंतर Nokia 8.1 चा 4जीबी रॅम वेरिंएंट 15,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. आम्हला मिळालेल्या माहिती नुसार हा प्राइस कट सध्या फक्त ऑफलाईन प्लॅटफॉर्म वरच केला गेला आहे म्हणजे रिटेल स्टोर्स वर हा 19,999 रुपयांचा फोन 15,999 रुपयांमध्ये मिळेल.

Nokia 8.1 सोबतच कंपनीने Nokia 8110 4G feature phone च्या किंमतीत पण कपात केली आहे. Nokia ने आपलाच 4जी फीचर फोन 4,999 रुपयांमध्ये लॉन्च केला होता. तसेच आता झालेल्या प्राइस कट नंतर Nokia 8110 4G 2,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. म्हणजे कंपनीने या स्मार्टफोनची किंमत थेट 2,000 रुपयांनी कमी केली आहे. विशेष म्हणजे Nokia 8110 वर झालेल्या प्राइस कट पण सध्या ऑफलाईन प्लॅटफॉर्म वरच लागू झाला आहे.

Nokia 8.1

Nokia 8.1 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन 18.5:9 आस्पेक्ट रेशियो वाल्या बेजल लेस डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे ज्याच्या वरच्या भागात नॉच आहे. हा फोन 2,246 x 1,080 पिक्सल रेज्ल्यूशन वाल्या 6.18-इंचाच्या टीएफटी स्क्रीन सह बाजारात आला आहे. हा फोन एंडरॉयड 9 पाई वर सादर झाला आहे जो ऑक्टा-कोर प्रोसेसर सह क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 710 चिपसेट वर चालतो.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता Nokia 8.1 च्या बॅक पॅनल वर डुअल एलईडी फ्लॅश सह 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि 12-मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. फोनचा रियर कॅमेरा कार्ल जेसिस लेंस सह चांगले फोटो कॅप्चर करू शकतो. त्याचप्रमाणे फोनच्या फ्रंट पॅनल वर एफ/2.0 अपर्चर वाला 20-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

किती आहे नवीन किंमत

Nokia 8.1 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. त्याचप्रमाणे पावर बॅकअप साठी Nokia 8.1 मध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 3,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन ब्लू सिल्वर, स्टील कॉपर आणि आयरन स्टील कलर ऑप्शन्स मध्ये सेल साठी उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here