पॉप-अप कॅमेरा आणि 5G सह MWC 2020 मध्ये लॉन्च होऊ शकतो Nokia 8.2

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

नोकियाचे मालकी हक्क असणाऱ्या एचएमडी ग्लोबलने नुकताच Nokia 6.2 भारतात लॉन्च केला होता. आता समोर येत असलेल्या बातमीनुसार कंपनी Nokia 8.2 नावाचा समार्टफोन लॉन्च करण्याची तयारी करत आहे. हा फोन कंपनी 5G कनेक्टिविटी सह लॉन्च करू शकते. 5G कनेक्टिविटी सपॉर्ट सह सध्या हुवावे आणि सॅमसंग सारख्या कंपन्या उपलब्द आहेत.

Nokiapoweruser च्या रिपोर्टमध्ये समोर आले आहे कि मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) 2020 मध्ये पुढ्यल्यावर्षी एचएमडी ग्लोबल Nokia 8.2 5G कनेक्टिविटी सपॉर्ट सह लॉन्च करू शकते.

रिपोर्ट मध्ये समोर आले आहे कि Nokia 8.2 च्या रियर पॅनल वर क्वॉड-कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. तसेच सेल्फीसाठी कंपनी पॉप-अप कॅमेरा ट्रेंडचा वापर करू शकते. यावर्षी अनेक स्मार्टफोन्स मध्ये पॉप-अप सेल्फी कॅमेरा मॅकॅनिज्म देण्यात आले होते.

त्याचबरोबर रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे कि या स्मार्टफोनची किंमत एचएमडी ग्लोबल सीईओ जूहो सर्विकास यांच्या मते 500 डॉलर (जवळपास 33,500 रुपये) असू शकते. हा डिवाइस गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या Nokia 8.1 चा अपग्रेडेड वेरियंट असेल.

काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रिपोर्टनुसार Nokia 8.2 मध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 700 सीरीजचा चिपसेट असले. टेक विश्वात चर्चा आहे कि Nokia 8.2 स्नॅपड्रॅगॉन 735 चिपसेट सह लॉन्च केला जाईल.

विशेष म्हणजे Nokia ने अजूनतरी कोणताही एंडरॉयड फोन पॉप-अप सेल्फी कॅमेऱ्यासह लॉन्च केला नाही. त्यामुळे Nokia 8.2 ब्रँडचा पहिला स्मार्टफोन असेल जो या टेक्नॉलॉजीला सपोर्ट करेल. तसेच Nokia 5.2 बद्दल असे सांगण्यात आले आहे कि कंपनी हा स्मार्टफोन पण लवकरच बाजारात आणेल. Nokia 5.2 नॉच डिजाइन सह येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here