भारतात येत आहे हातावर बांधता येणारा स्मार्टफोन, लुक पाहून व्हाल दिवाने

चाइनीज टेक ब्रँन्ड नूबिया ने यावर्षी बार्सिलोना मध्ये झालेल्या मोबाईल वर्ल्ड कांग्रेस 2019 मध्ये आपला Nubia Alpha वियरेबल स्मार्टफोन सादर केला होता. त्यानंतर हा फ्लेक्सिबल स्क्रीन असलेला फोन कंपनी ने आपल्या घरच्या मार्केट मध्ये लॉन्च केला. पण जर तुम्ही या डिवाइसची वाट भारतात बघत असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे कारण कंपनी ने घोषणा केली आहे कि Nubia Alpha मे मध्ये भारतीय मार्केट मध्ये लॉन्च केला जाईल.

पण कंपनी ने याची लॉन्च डेट सांगितली नाही. नूबियाच्या या फोनची सर्वात खास बाब अशी कि हा तुम्ही तुमच्या मनगटावर घड्याळाप्रमाणे बांधू शकता. फोन सहज फोल्ड होऊन हातावर फिट व्हावा यासाठी यात फ्लेक्सिबल स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार Nubia Alpha सोबत nubia pods पण सादर केले जातील. नूबिया ईयर पॉड्स बद्दल बोलायचे तर हे खऱ्या अर्थाने कंपनीचे पहिले वायरलेस ईयरबड आहेत आणि यांच्या डिजाइन साठी कंपनी ने 1MORE शी भागेदारी केली आहे.

Nubia Alpha ची किंमत
Nubia Alpha ब्लूटूथ आणि सेल्युलर दोन वेरिएंट मध्ये सादर केला गेला आहे. स्मार्टवॉचचा ब्लूटूथ वेरिएंट 449 यूरो मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत इंडियन करंसी नुसार 36,300 रुपयांच्या आसपास आहे. तसेच सेल्युलर वेरिएंट 549 यूरो म्हणजे जवळपास 44,400 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला आहे. तसेच कंपनी ने या स्मार्टवॉचचा एक गोल्ड वेरिएंट पण सादर केला आहे ​ज्याची किंमत 649 यूरो म्हणजे अंदाजे 52,500 रुपये आहे.

जबरदस्त ​फीचर्स
Nubia Alpha फ्लेक्सीबल ओएलईडी डिस्प्ले वर बनवण्यात आला आहे. हा अनोखा डिवाईस उघडून फोनप्रमाणे वापरला जाऊ शकतो तसेच हा बेंड करून एखाद्या घड्याळाप्रमाणे मनगटावर बांधता येतो. Nubia Alpha मध्ये 45:9 अल्ट्रा वाइट आस्पेक्ट रेशियो असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिवाईस 960 x 192 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 4-इंचाच्या स्क्रीनला सपोर्ट करतो. या डिवाईसची स्क्रीन पॉलीमाइडने प्रोटेक्ट करण्यात आली आहे. या मटेरियल मुळे डिस्प्ले गरम होत नाही.

या स्मार्टवॉच मध्ये वॉयस कमांड द्वारे मेन्यू ऑपरेट केला जाऊ शकतो. स्मार्टवॉच मध्ये बॅक मेन्यू वर जाण्यासाठी तसेच वॉयस कमांड एक्टिवेट करण्यासाठी दोन फिजिकल बटण देण्यात आले आहेत. या बटणाव्यतिरिक्त एयर जेस्चर द्वारे पण स्मार्टवॉचचा मेन्यू वापरला जाऊ शकतो. यासाठी तुम्हाला हवेत हातवारे करावे लागतील आणि मेन्यू मागे किंवा पूढे जाईल. सोबतच Nubia Alpha फिटनेस ट्रॅकरचे पण काम करतो आणि यातून स्लीम, एक्सरसाईज तसेच हार्टरेट इत्यादि ट्रॅक केली जाऊ शकते.

Nubia Alpha चे स्पेसिफिकेशन्स
स्पेसिफिकेशन्स पाहता Nubia Alpha मध्ये 1जीबी रॅम देण्यात आला आहे. हा डिवाईस 8जीबी इंटरनल मेमोरीला सपोर्ट करतो ज्यात फोटोज, वीडियो व गाणी सेव करता येतील. हा स्मार्टवॉच एडरॉयड आपरेटिंग सिस्टम वर बनलेला आहे तसेच प्रोसेसिंग साठी कंपनी ने Nubia Alpha मध्ये क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगॉन वियर 2100 चिपसेट दिला आहे. तसेच फोटो घेण्यासाठी हा स्मार्ट डिवाईस 5-मेगापिक्सलच्या कॅमेरा सेंसरला सपोर्ट करतो. पावर साठी यात 500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी कंपनीनुसार एकदा चार्ज केल्यावर 2 दिवस चालते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here