OnePlus 7T Pro लॉन्च, एंडरॉयड 10 आणि स्नॅपड्रॅगॉन 855+ चिपसेट असलेल्या या फोनला नाही तोड

फ्लॅगशिप कीलर म्हणून ओळखली जाणाऱ्या टेक कंपनी OnePlus ने अलीकडेच भारतीय बाजारात आपला पावरफुल फोन OnePlus 7T लॉन्च केला होता. OnePlus 7T भारतात यशस्वी झाला आहे, आज याच यशाचा फायदा घेत कंपनीने या सीरीजचा अजून एक डिवाईस OnePlus 7T Pro पण भारतीय बाजारात सादर केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असेलला हा फोन एंडरॉयड 10 सह लॉन्च झालेल्या निवडक स्मार्टफोन्स पैकी एक आहे. चला जाऊन घेऊया नवीन फ्लॅगशिप कीलर OnePlus 7T Pro ची वैशिष्ट्ये आणि भारतात याच्या उपलब्धतेबद्दल. सोबतच कंपनीने McLaren Edition पण सादर केला आहे आणि हा OnePlus 7T Pro चा एक वेरिएंट आहे आणि या दोन्हींचे स्पेसिफिकेशन्स जवळपास सारखेच आहेत.

OnePlus 7T Pro McLaren Edition

वनप्लस 7T प्रो चा मॅकलॅरेन एडिशन मॅकलॅरेनच्या प्रसिद्ध ‘पपाया’ ऑरेंज कलर मध्ये येईल. हा फोन 90Hz डिस्प्ले सह सादर केला गेला आहे. याच्या बॅक पॅनल वर टेक्शचर पॅटर्न असेल तर बॉटम आणि साइडला ऑरेंज एक्सेंट असेल. कंपनीने गेल्यावर्षी वनप्लस 6T प्रो मॅकलॅरेन एडिशन लॉन्च केला होता.

OnePlus 7T Pro

OnePlus 7T Pro 19.5:9 आस्पेक्ट रेशियो सह येतो जो 3120 x 1440 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.67 इंचाच्या क्यूएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. कंपनीने हा डिस्प्ले फ्ल्यूड एमोलेड डिस्प्लेचे नाव दिले आहे जो एचडीआर10 + सोबत 90हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. डिस्प्लेच्या सुरक्षेसाठी हा 3डी कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्ट केला गेला आहे.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता OnePlus 7T Pro ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.6 अपर्चर वाला 48 मेगापिक्सलचा IMX586 प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे जो ओआईएस फीचरसह येतो. तसेच फोन मध्ये 16 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस आणि एफ/2.4 अपर्चर वाला 8 मेगापिक्सलची टेलीफोटो लेंस देण्यात आला आहे. सेल्फी साठी हा फोन 16 मेगापिक्सलच्या पॉप अप फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

OnePlus 7T Pro कंपनी द्वारा एंडरॉयडच्या सर्वात नवीन ओएस एंडरॉयड 10 वर सादर केला गेला आहे जो आक्सिजन ओएस सह चालतो. तसेच प्रोसेसिंग साठी या फोन मध्ये 2.96गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वालकॉमचा सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855+ आहे. तर ग्राफिक्स साठी OnePlus 7T Pro एड्रेनो 640 जीपीयू ला सपोर्ट करतो.

OnePlus 7T Pro कंपनी द्वारा 8 जीबी पावरफुल रॅम सह लॉन्च केला गेला आहे जो 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. हा एक डुअल सिम फोन आहे ज्यात 4जी एलटीई आहे. OnePlus 7T Pro मध्ये बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सह सिक्योरिटी साठी यात इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी हा फोन 30वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असेलेल्या 4085एमएएच च्या पावरफुल बॅटरीला सपोर्ट करतो.

किंमत आणि सेल

कंपनीने OnePlus 7T Pro 53,999 रुपये आणि 7T Pro McLaren Edition 58,999 रुपयांमध्ये लॉन्च केला आहे. सोबत कंपनीने या इवेंट मध्ये OnePlus Bullet वायरलेस इयरफोन ओलिव ग्रीन कलर मध्ये सादर केले आहेत. OnePlus 7T Pro एक्सक्लूसिव OnePlus स्टोर वर 11 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता सेल केला जाईल. तसेच डिवाइस 12 ऑक्टोबर पासून Amazon.in, OnePlus.in आणि OnePlus ऑफलाइन स्टोर्स वर दुपारी 12 वाजता सेल केला जाईल.

तसेच OnePlus 7T Pro McLaren Edition OnePlus रिटेल स्टोर्स वर प्री-बुक करता येईल. प्री-बुक करणाऱ्या ग्राहकांना 18 ऑक्टोबरपासून फोन मिळण्यास सुरवात होईल, ज्या सोबत Type-C Bullets ईयरफोन्स फ्री मिळतील. तसेच ऑनलाइन आणि ऑफलाइन फोनचा ओपन सेल 5 नोव्हेंबर दुपारी 12 वाजता होईल.

वनप्लस 7टी प्रो वीडियो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here