12 जीबी रॅम सह समोर आला OnePlus 8 Pro, इंडियन वेबसाइट वर झाला लिस्ट

फ्लॅगशिप किलर म्हणून ओळख असलेली OnePlus आपल्या आगामी स्मार्टफोन सीरीज OnePlus 8 मुळे वारंवार चर्चेत आहे. चर्चा अशी आहे कि वनप्लस 8 सीरीज अंतर्गत कंपनी यावेळी OnePlus 8, OnePlus 8 Pro आणि OnePlus 8 Lite स्मार्टफोन लॉन्च करेल. सीरीजचा एक स्मार्टफोन नुकताच ब्यूरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजे BIS वर लिस्ट झाला आहे ज्यावरून स्पष्ट झाले आहे कि OnePlus 8 ग्लोबल लॉन्च सोबतच भारतीय बाजारात पण एंट्री घेईल. तसेच आता सीरीजचा अजून एक डिवाईस OnePlus 8 Pro काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स सह चीनी बेंचमार्किंग साइट गीकबेंच वर पण समोर आला आहे.

OnePlus 8 Pro गीकबेंच वर ‘GALILEI IN2023’ मॉडेल नंबर सह लिस्ट केला गेला आहे. हि लिस्टिंग 10 जानेवारीची आहे ज्यात वनप्लस 8 प्रो च्या अनेक मोठ्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. स्पेक्स डिटेल्स पाहता गीकबेंचनुसार OnePlus 8 Pro एंडरॉयडच्या ऍडव्हान्स ओएस एंडरॉयड 10 वर लॉन्च केला जाईल. आशा आहे कि बाजारात हा फोन एंडरॉयड 10 आधारित कंपनीच्या यूजर इंटरफेस ऑक्सिजन ओएस सह एंट्री घेईल. गीकबेंच वर OnePlus 8 Pro मध्ये दिल्या जाणाऱ्या चिपसेटचे कोडनेम ‘Kona’ सांगण्यात आले आहे.

हा चिपसेट क्वॉलकॉमचा ही आहे जो बाजारात स्नॅपड्रॅगॉन 865 नावाने येईल. क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 865 अन्ती कंपनीने अधिकृतपणे लॉन्च केला नाही पण हा चिपसेट स्नॅपड्रॅगॉन 855 च्या पुढे जात क्वॉलकॉमचा सर्वात ताकदवान चिपसेट बनेल. इतर स्पेसिफिकेशन्स पाहता OnePlus 8 Pro गीकबेंच वर 12 जीबी रॅम सह येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. स्कोर पाहता वनप्लस 8 प्रो ला सिंगल कोर मध्ये 4296 स्कोर आणि मल्टीकोर मध्ये 12531 स्कोर मिळाला आहे. विशेष म्हणजे हा स्कोर OnePlus च्या स्मार्टफोनला मिळालेल्या बेंचमार्क स्कोर मध्ये सर्वात जास्त आहे.

OnePlus 8 Pro

फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स पाहता आतापर्यंत समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्स आणि लीक्स नुसार OnePlus 8 Pro 6.65 इंचाच्या डिस्प्ले सह लॉन्च केला जाईल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. कंपनी आपला हा फोन पंच-होल डिजाईन वर बाजारात येईल. फोटोग्राफीसाठी वनप्लस 8 प्रो मध्ये क्वॉड रियर कॅमेरा मिळेल जो 3D ToF सेंसर सह येईल. कंपनीची OnePlus 8 सीरीज 5G कनेक्टिविटी सह मार्केट मध्ये येईल.

सीरीजच्या इतर स्मार्टफोन्स पाहता OnePlus 8 Lite सीरीजचा सर्वात स्वस्त फोन असेल जो मीडियाटेकच्या Dimensity 1000 चिपसेट वर लॉन्च होऊ शकतो. त्याचप्रमाणे OnePlus 8 आणि OnePlus 8 Lite दोन्ही स्मार्टफोन्स मध्ये 90हर्ट्ज रिफ्रेश रेट असलेला एमोलेड डिस्प्ले दिला जाऊ शकतो ज्यांची स्क्रीन साईज 6.5 इंचापर्यंत असू शकते. हे स्मार्टफोन्स यूएसबी टाईप-सी ला सपोर्ट करतील तसेच वायरलेस चार्जिंग सह पण येतील. या दोन्ही मॉडेल्स मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा मिळू शकतो. वनप्लसची हि पावरफुल स्मार्टफोन सीरीज कंपनी दुसऱ्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून मध्ये लॉन्च करू शकते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here