OnePlus Ace 2 Pro ची लाँच टाइमलाइन आणि डिस्प्ले स्पेसिफिकेशन्स लीक; जाणून घ्या माहिती

Highlights

  • Ace 2 सीरीजमध्ये नवीन मॉडेल OnePlus Ace 2 Pro असू शकतो.
  • OnePlus Ace 2 Pro मध्ये 50MP ट्रिपल कॅमेरा सेटअप असू शकतो.
  • हँडसेटमध्ये Snapdragon 8 Gen 2 प्रोसेसर मिळू शकतो.

OnePlus कथितरित्या आपला नवीन फोन Ace 2 Pro लाँच करण्याची योजना बनवत आहे. आतापर्यंत ह्या नवीन वनप्लस मोबाइल बद्दल कंपनीनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु सध्या अनेक लीक्समधून फोनच्या काही स्पेसिफिकेशन्सचा खुलासा झाला आहे. आता एका नवीन लीकमधून OnePlus Ace 2 Pro ची लाँच टाइमलाइन आणि डिस्प्ले स्पेक्स समोर आले आहेत.

OnePlus Ace 2 Pro ची लाँच टाइमलाइन आणि डिस्प्ले स्पेक्स (लीक)

लीकस्टर डिजिटल चॅट स्टेशननुसार फोन “जुलै-ऑगस्ट” मध्ये लाँच केला जाऊ शकतो. तसेच आशा आहे की रिलीज झाल्यानंतर हा Redmi K60 Ultra ला टक्कर देईल. वनप्लस एस 2 प्रो बाबत अफवा आली आहे की हा महिन्याच्या सुरुवातीला समोर येऊ लागला होता. तसेच आता टिप्सटर डिजिटल चॅट स्टेशननुसार, हा फोन 1.5K स्क्रीन आणि 100W फास्ट चार्जिंगसह नवीन स्नॅपड्रॅगन 8 Gen 2 चिपसेटसह बाजारात येऊ शकतो.

OnePlus Ace 2 Pro स्पेसिफिकेशन्स (संभाव्य)

  • डिवाइसमध्ये 50MP ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आणि 16MP चा सेल्फी शूटर असू शकतो.
  • वनप्लस एस 2 प्रो मध्ये यूएसबी टाइप-सी चार्जिंग पोर्टवर 100W सुपरवूक फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh ची बॅटरी असू शकते.
  • सॉफ्टवेयर पाहता असं निश्चितपणे सांगता येईल की OnePlus Ace 2 Pro लेटेस्ट Android 13-बेस्ड ColorOS 13 स्किन आउट ऑफ द बॉक्स बूट करेल.

भारतात येईल का OnePlus Ace 2 Pro

तसेच भारतीय लाँच बद्दल सध्या काहीही सांगणं घाई होईल. परंतु आशा आहे की डिवाइस देशात एक वेगळ्या नावानं येऊ शकतो. फोन आगामी काळात वनप्लस 11टी किंवा वनप्लस 11आरटी नावानं येऊ शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here